Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. समज
१. समज
ताल =सम
मज मला
समज देणे
बडीशेप मस्त आहे अवनी...
बडीशेप मस्त आहे अवनी...
१, ४, ७ राहिले, सुचत नाहीयेत....
साधारणपणे शब्दाचा अर्थ आणि
साधारणपणे शब्दाचा अर्थ आणि उपशब्द सूचक दिले आहेत.
अक्षरसंख्या कंसात.
बाकी आहेत
१. नटूनथटून छान
उघड माझे कान (३)
१.(सुधारित )
मला तालात टाळी देऊन कान उघड
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा (४)
४. (सुधारित )
जोडीने इथे सुसाट धावा, गा...
असं नाही दिलंय....आता विचार करा
७. रावसाहेब, बसा. पाहुणचार घ्या. नसत्या उठाठेवी कशाला (४)
Submitted by अवनी
. नटूनथटून छान
. नटूनथटून छान
उघड माझे कान (३) : समज
2. रस्त्याचे नववे डोके (४) : मार्गशीर्ष
३.पायाचा नोकर डोक्यावर बसे ! (३) :पगडी
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा (४)
५. सभोवती सुरुवात करून स्वतः:च्या डोळ्यात बघ (३) :मुसळ
६. कृष्णाकाठी थाटले नांगराचे दुकान (४) :हलवाई
७. रावसाहेब, बसा. पाहुणचार घ्या. नसत्या उठाठेवी कशाला (४)
८. तृणधान्याची गोड बाजू फेकून दे (३) :पाकड
९. आकार मोठा आहे पण टाक तोंडात (४) : बडीशेप
१०. श्वास घेऊन सा लावला म्हणून हसतोस काय ?शूरवीरच की ! (३): साहस
अवनी, पाकड चे स्पष्टीकरण काय?
अवनी, पाकड चे स्पष्टीकरण काय?
पाकड हे बाजरीच्या आकाराचं
पाकड हे बाजरीच्या आकाराचं थोडं त्रिकोणी आणि सागरगोट्याच्या रंगाचं बी असतं ..पाखड असंही म्हणतात.
५० -६० वर्षामागे बाजारात तांदूळ मिळत त्यात हे बी हमखास असे.निवडक धान्य जमान्यात आता ते कुठेच दिसत नाही
तांदूळ निवडताना पाकड काढतात.
तांदूळ निवडताना पाकड काढतात.
लहानपणी मी काढलेत.
पण गोड बाजु कुठली?
पण गोड बाजु कुठली?
मी पण
मी पण
पाक गोड कड बाजू
पाक गोड
कड बाजू
4 आणि 7 दोन्ही interesting
4 आणि 7 दोन्ही interesting आहेत.
सोडवा
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा (४) >>>>> वेगेवेगे
वेगे = सुसाट
वेगेवेगे = जोडीने सुसाट
इथे धावा, गा = वेगेवेगे धावू ( ससा तो कसा गाण्याचा संदर्भ)
७. रावसाहेब, बसा. पाहुणचार घ्या. नसत्या उठाठेवी कशाला (४) >>>>> पंचायत
रावसाहेब = पंत
पाहुणचार घ्या = चाय (चहा)
प्यायलेला चहा पंतांच्या पोटात गेला = पं (चाय) त
याहून अधिक नाही सुचत.
कारवी , छानच !
कारवी , छानच !
पंचायत ..अगदी बरोबर
चहा ..पोटात ..हाहाहा
ओके.
४. साठी सूचक
जोडीने येणारा शब्द तिथेच लपलाय. शोधा बरं
अर्थदर्शक शब्द दिलेला नाही. दिला तर कोडे फारच दोरीसूत होईल
थोड्याच वेळात उत्तर सांगते.
थोड्याच वेळात उत्तर सांगते.
मंडळी,
'कोडे फारच दोरीसूत होईल' यात एक सूचना आहे
४ भागाकार
४ भागाकार
'कोडे फारच दोरीसूत होईल' यात
'कोडे फारच दोरीसूत होईल' यात एक सूचना आहे >>> ते कळले पण क्लिक नाही झाले अजून
धावदोरा आहे का
धावधाव ( धावधाव विठू आता असा धावा करणे)
धागाधागा
धागा जोडीने वापरला
धा वा गा --- धा अक्षर वापरा किंवा गा अक्षर वापरा
पण मग सुसाटचे काय?
धागाधागा <> लगालगा = लगबगीने = सुसाट
धागा चा समानार्थी लगा
धागाधागा
धागाधागा
मानावजी
मानवजी
योग्य धागा पकडलात
आता त्याला functional करा
कारवी...किती जवळ आहेस
कारवी...किती जवळ आहेस उत्तराच्या
तुम्ही इतका छान प्रयत्न करत
तुम्ही इतका छान प्रयत्न करत आहात की उत्तर सांगावेसे वाटत नाही पण पुढचे पाच तास इथे यायला जमणार नाही म्हणून सांगते
सुसाट इथे धावा गा
यांची आद्याक्षरे घेऊन उत्तर
सुईधागा
(सुसाट इथे च्या ऐवजी इथे सुसाट चालणार नाही अशी एक सूचना मी दिली होती)
नटूनथटून छान
नटूनथटून छान
उघड माझे कान (३) : समज
2. रस्त्याचे नववे डोके (४) : मार्गशीर्ष
३.पायाचा नोकर डोक्यावर बसे ! (३) :पगडी
४. जोडीने सुसाट इथे धावा, गा (४) :सुईधागा
५. सभोवती सुरुवात करून स्वतः:च्या डोळ्यात बघ (३) :मुसळ
६. कृष्णाकाठी थाटले नांगराचे दुकान (४) :हलवाई
७. रावसाहेब, बसा. पाहुणचार घ्या. नसत्या उठाठेवी कशाला (४) :पंचायत
८. तृणधान्याची गोड बाजू फेकून दे (३) :पाकड
९. आकार मोठा आहे पण टाक तोंडात (४) : बडीशेप
१०. श्वास घेऊन सा लावला म्हणून हसतोस काय ?शूरवीरच की ! (३): साहस
धन्यवाद !!
अक्षरसांगड खेळ
अक्षरसांगड खेळ
खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे 20 मराठी शब्द बनवा. त्यापैकी निदान 3 तरी चार अक्षरी किंवा त्याहून अधिक अक्षरी असावेत.
खेळ सादर केल्यापासून 4 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.
ड बा ता
क ल ड
ला न वा
..................................
हा खेळ नव्याने सोडविणाऱ्या लोकांसाठी याचे काही नियम :
१. सर्व शब्द सामान्य व मूळ स्वरुपात हवेत.
२. उघड विशेषनामे नकोत. (मुलामुलींची , गावांची नावे, इ.)
३. सर्व शब्द किमान ३ अक्षरी हवेत.
४. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.
५. एक शब्द करताना दिलेले कुठलेही अक्षर एकदाच वापरा. पुढचा शब्द करताना ते अक्षर परत वापरू शकता.
६. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.
७. दिलेल्या अक्षरांत ह्रस्वदीर्घ महत्वाचे आहे. ते तसेच ठेवावे.
जे कोणी खेळत आहेत त्यांनी
जे कोणी खेळत आहेत त्यांनी हजेरी देऊन ठेवावी.
धन्यवाद.
मी खेळतेय
मी खेळतेय
मी पण प्रयत्न करतेय. एक शंका
मी पण प्रयत्न करतेय. एक शंका - बा , ता दिले आहे तर फक्त तेच वापरायचे की ब च्या बाराखडी तील बाकी पण चालतील ?
फक्त तेच , जसेच्या तसे !
फक्त तेच , जसेच्या तसे !
मी पण
मी पण
भाप्रवे १९.०० वा भेटू.
भाप्रवे १९.०० वा भेटू.
ड बा ता क ल ड ला न वा
.
ठीक,
ठीक,
आता प्रत्येकाने आधी फक्त ३ अक्षरीची यादी द्या.
वेळ झाली !
Pages