शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. अडीच घर जंग फार झाली (३) उत्तर: लढाई
२. लोकांना विसरून करा बोळवण (४) उत्तर : विसर्जन
३. दुसऱ्याची वाणी चालू राहील (४) उत्तर: परंपरा
४. पानं मोजून खा (३) उत्तर :पातोळा , पानगी
५. शिक्षेचा हिशेब छान दिसला (४) उत्तर: सजावट
६. सूक्ष्म असेल, बराच काळ राहील पण खोटा नाही (४) उत्तर : कणखर
७. पादपूरक आणि प्रतिष्ठेला नेहमी विश्वास कमी पडला (४)उत्तर : पानीपत
८. धातुभोवती वेडे वस्त्र (४) उत्तर : पीतांबर

मैदान मोकळे आहे.....
कोणी तयार करत असेल तर सांगा.
तोपर्यंत चघळायला एक छोटेसे देऊ शकतो.

मैदान मोकळे आहे.....>>>>> Happy खेळाडू असतात.... आयोजकांचीच उणीव भासते.
चला सगळे खेळाडू ..... टाय-बिल्ले लावून येऊया आळीपाळीने

द्या तुम्ही कुमार सर

हे घ्या एक छोटेसे सोपे ...
आठ अक्षरी शब्द ओळखा.

वैशिष्ट्ये ( अक्षर क्रमांकानुसार )
१ २ = इथे चेंगरायची भीती
३ ४ = एकेकाळी कुटुंबात याचा बाऊ करायचे

२ ७ पुनरावृत्ती ..... जप
५ ६ = मुलीचे घरगुती नाव

५ ७ = आदरणीय व्यक्ती ...... बाप
५ ८ = विशिष्ट धागा

संपूर्ण शब्द : अर्थपूर्ण आहे. वेळ आल्यावर त्याचे महत्व कळेल !

१ २ = इथे चेंगरायची भीती --- पूल जिना जत्रा गर्दी
२ ७ पुनरावृत्ती ---- जप धोशा
५ ६ = मुलीचे घरगुती नाव --- बाय
५ ७ = आदरणीय व्यक्ती -- बाप

वा,
मानव मस्तच !
कारवी पण छान.
.................

अच्छा, कॉम्प्युटर वर होय, मी मोबाईलवरून करतो.
कॉम्प्युटर साठी:
PrtScr ने फक्त क्लिपबोर्डला कॉपी होतो स्क्रीन
आणि नुसता PrtScr न वापरता Alt + PrtScr वापरा म्हणजे फक्त ऍक्टिव्ह विंडोचाच स्क्रीनशॉट येतो.
Alt + PrtScr ने स्क्रीनशॉट घ्या.
Paint Brush उघडा. तिथे फाईल -> प्रॉपर्टीज ला जाऊन आधी पिक्सलस् कमीत कमी : 10 x 10 एवढे करा. मग पेस्ट करा (Ctrl + V). म्हणजे जेवढी विंडो इमेज आहे तेवढा आणि तेवढाच आकार आपोआप घेतल्या जाईल. मग ती फाईल सेव्ह करा. आणि ती अपलोड करा.

आणि काही किबोर्डला PrtScr हे Fn बटन सोबत रिलेटेड असते खास करून PrtScr च्या भोवती चौरस असेल तर. अशा कीबोर्ड साठी Fn + Alt + PtrScr दाबावे लागेल. माझ्या एका जुन्या लॅपटॉपला तसे करावे लागे.

हजरजबाबीपणा ==> मानव, मस्त

कुमार सर,धन्यवाद !!

स्क्रीनशॉट येत नाही. => मी अनेकदा मोबाईलने फोटोच काढतो.

सतीश,
उशीरा आलात. सोपे दिले होते.
Bw

सतीश,
उशीरा आलात. सोपे दिले होते.
===> हो मी पहिले आता ., मस्त धागा आहे , पुन्हा धन्यावाद Happy

काही किबोर्डला PrtScr हे Fn बटन सोबत रिलेटेड असते >>>>
ओके हे बघते. धन्यवाद.
PrtScr नुसते आणि Alt + / ctrl / shift / windows कीज बरोबर पाहिले.
Paint Brush चे माहीत आहे. पण तिथे पेस्ट करायला काही येतच नव्हते PrtScr ने.
मी नेहमी करत नाही त्यामुळे काहीतरी विसरले असे वाटले होते. Fn बटन विसरले.

ता.क. --- आले करता ..... Fn बटन वापरून आले. Happy

मागच्या ‘कविताशक्ती’ वरील चर्चेतून सुचलेला अजून एक मुद्दा.

‘Poetic justice’ याचे मराठीत ‘काव्यगत न्याय’ असे अगदी शब्दशः भाषांतर केले गेले आहे. मला ते तितकेसे बरोबर वाटत नाही. मूळ इंग्लिश वाक्प्रचाराबद्दल मी वाचन केले. त्यातून Poetic चा अर्थ साहित्य असा व्यापक आहे.

योग्य भाषांतर / समुचित वाक्प्रचार तुमच्या मते काय असावा ?

Poetic Justice ..noun. हे मला सापडले पण हा वाक्प्रचार आहे का विशेषण/ नाम हे कळत नाही. इथे noun सांगितलयं तर तसेच घेऊन....
license or liberty taken by a poet, prose writer, or other artist in deviating from rule, conventional form, logic, or fact, in order to produce a desired effect.

कलाकृती अंतर्गत घेतलेले स्वातंत्र्य~~~
निर्मितीस्वातंत्र्य /निर्मितीमुक्त , किंवा साहित्यनिर्मितीस्वातंत्र्य किंवा कृतीनिर्मितीमुक्त अगदी पर्फेक्ट नाही पण न्याय शब्दशः (lost in translation) वाटते त्यापेक्षा काकणभर बरं Happy !
आणि तुम्ही म्हणता तसे व्यापकच असायला हवे, that makes sense, justice actually means liberty in this scenario.... the Poetic word includes all the art and artists... तरच वाक्प्रचार व्यापक होईल आणि न्याय्य ही!!

की माझच हरवलं अनुवादात Wink !

‘Poetic justice’ = काव्यगत न्याय शब्दशःच आहे. अभिप्रेत अर्थ त्यात योग्य तर्‍हेने व्यक्त होत नाही.
परिस्थितीचा संदर्भ + आपल्या भाषेचा लहेजा / मातीतले शब्द घेऊन केलेले भाषांतर नाही. गुगल भाषांतर सारखे आहे.

Poetic justice --- जैसे ज्याचे कर्म तैसे फळ; ---- योग्य वेळेत दुष्टाला शिक्षा सुष्टाला न्याय.
जे फक्त कथा-कादंबरी-नाटकात घडते, (खर्‍या आयुष्यात क्वचितच. बहुतांश वेळी सज्जन दीर्घकाळ सोसतात आणि दुर्जन शिरजोरच रहातात ) ---- म्हणून Poetic (काल्पनिक रचनांमधील).

कालच्याप्रमाणेच English via French from Latin from Greek
Poetic <<---- Greek poetikos

poetikos = as literally ---- poetics
poetikos = as best translated as ----- active or able to create
poetikos = as described without physical notion attached ---- distinct, unaffected and unmixed, being in its essence actuality.

हा शेवटचा अर्थ, थोडा Poetic justice च्या भावार्थाच्या जवळपास जाणारा वाटतो.
मराठीत ---
चोख न्याय, खासा न्याय, रामशास्त्री बाण्याचा न्याय, नीरक्षीरन्याय, धारवाडी काट्याचा न्याय सुचतेय.
अजून योग्य भाषांतर / समुचित वाक्प्रचार --- थोडा विचार करून सांगते.

अस्मिताना काय वेगळच सापडले...... liberty taken by a poet......to produce a desired effect
हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य होईल किंवा साहित्यिकाच्या कल्पनेची भरारी जी लौकिक जगातील वस्तुस्थितीपेक्षा खूप निराळी असू शकेल.

उद्या सर आले की बघू पुढे काय ते.

मलाही ते दाखवले होते कारवी "सच्चाई की बुराईपे जीत " टाईप पण मला हेच अधिक योग्य असेल वाटले , वाट बघू Happy
अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे निर्मितीशी संलग्न आहे का नाही कळत नव्हते(उगीच वाटते की कलाकृती पूर्ण झाली की येणारा शब्द आहे हा ... चुभूदेघे) आणि आपला मूळ शब्द कविताशक्ती हा कलेच्या(प्रतिभेच्या) सृजनाशी संबंधित आहे म्हणून यातच खोदकाम केले. Happy

अस्मिता व कारवी,

चांगली चर्चा आणि सूचनाबद्दल धन्यवाद.

बरोबर आहे, अगदी आपल्या मातीशी साधर्म्य दाखवेल असा थेट शब्दप्रयोग नाही करता येत. रामशास्त्री बाण्याचा न्याय हे तसे रोचक वाटले. हा विषय रंजक आहे. या शब्दप्रयोगाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारांचे अर्थ आहेत :

१.चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईटचे वाईट ,आणि
२. एखाद्याची जी पात्रता/ लायकी (deserves) होती, तेच त्याला अखेर मिळाले.

एखाद्याची जी पात्रता/ लायकी (deserves) होती, तेच त्याला अखेर मिळाले >>>>
याला नकारात्मक म्हणताय का? एखादा जे deserve करतो ते मिळणे कसे नकारात्मक?

पण, तो काय / किती deserve करतो हे ठरवणे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून.
( उदा एखाद्या नाटकातील गुन्हेगार पात्र; प्रेक्षकागणिक मत वेगळे असू शकते. कठोर शिक्षा, नाममात्र शिक्षा, परिमार्जनाची संधी, माफी + सुधारण्याची संधी, नाही तो गुन्हेगार असला तरी ज्यांच्यावर वचक ठेवून होता ते काबूत रहाण्यासाठी असे कुणीतरी हवेच --- अशी वेगवेगळी प्रतिक्रिया होऊ शकते)

अजून योग्य भाषांतर / समुचित वाक्प्रचार ---
कालचे श्ब्दप्रयोग थोडे मोठे होते. हे काही सुटसुटीत शब्द + न्याय असे वापरता येईल
यथायोग्य, यथायुक्त, समर्पक, उचित
रास्त, चोख, समदर्शी,
निःपक्षपाती, निःस्पृह

यथायुक्त, समदर्शी थोडे जास्त जवळचे वाटले Poetic justice च्या (मला). अजूनही बघता येतील आपल्या मनातल्या अपेक्षेनुसार. काव्यगत न्याय मलाही नाही पटायचा बातमी / अग्रलेखात वगैरे वाचल्यावर, पण कधी पर्याय शोधला नव्हता. तो गृहपाठ तुमच्या प्रश्नाच्या निमीत्ताने झाला.

कारवी
पर्याय छान. धन्यवाद.

इथे अधिक आहे :http://www.literarydevices.com/poetic-justice/

Note that poetic justice takes both positive and negative forms, depending on how a character has acted through the narrative.

Pages