Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता मी देतो.
आता मी देतो.
एक शब्द आणि त्याचे ५ अर्थ असे एकूण ६ शब्द ओळखा.
पाच शब्द ४ अक्षरी आहेत
आणि एकच शब्द ५ अक्षरी.
सर्वांची अक्षरे खाली मिसळून दिली आहेत. प्रत्येक अक्षर एकदाच वापरा.
ळा नु ब ष वा
रा त वा र म
त री गो ता द
ज अ ल द गो
ळे मा बे जु बं
ताळेबंद आहे का यात?
ताळेबंद आहे का यात?
गोषवारा
गोषवारा
गोळाबेरीज
मतलब
तरजुमा
उरलं: अनुवाद
सर्व बरोबर. छान.
सर्व बरोबर.
छान.
पटकन सुटलं..... सोपे दिलेत
पटकन सुटलं..... सोपे दिलेत साद...
मला वाटले ताळेबंद आहे तर हिशेब / अकाउंटस विषय आहे
अक्षरमिसळ
अक्षरमिसळ
एक ८ अक्षरी शब्द ओळखायचा आहे. हा खेळ २ टप्प्यात आहे.
टप्पा १:
दोन गटांत मिळून ८ अक्षरमिसळ दिल्या आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येक मिसळीतून (फक्त) एकेक अक्षर निवडा. त्या ४ अक्षरांतून (योग्य तो क्रम लवून ) प्रत्येक गटाचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यासाठी शोधसूत्र दिले आहे.
गट १:
अधूसरपणामूळचाच
सकातकरीचाचाला
वावरतानाचहालात्या
विसरमिसळीतूनह्या
४ अक्षरी शब्दाचे सूत्र : धातूची अवजड वस्तू
.........................
गट २ :
धुरंधरच्यापायाशी
विशहाजोगपणाने
तोदबण्यासाठीच
सरकारदादताना
४ अक्षरी शब्दाचे सूत्र : व्यक्तीविशेषण
.....................
टप्पा २:
आता पहिल्या गटाच्या शब्दाला दुसऱ्या गटाचा शब्द जोडा. = अर्थपूर्ण शब्द.
(हा अर्थपूर्ण झाल्यासच खेळ पूर्ण).
>>> धातूची अवजड वस्तू >>>
>>> धातूची अवजड वस्तू >>>
धातूची वस्तू खूप जड आहे का ?
होय, बऱ्यापैकी जड.
होय, बऱ्यापैकी जड.
पांढरपेशा नाही उचलत ती
अजून एखादा क्लू देता का ?
अजून एखादा क्लू देता का ? सहज आसपास असते का हि वस्तू ?
मला सारखा खलबत्ता आठवतोय ..
नाही. ते तुमचे माझे काम
नाही. ते तुमचे माझे काम नाही.
ती बाळगायला पाहिजे जातीचे ...... !
तलवार / समशेर / चिलखत वाटले..
तलवार / समशेर / चिलखत वाटले..... पण काही अक्षरे नाहीयेत मिसळीत
कारवी,
कारवी,
जवळ आलात !!
शब्द जरा सुधारा !
तलवार / समशेर / चिलखत वाटले..
तलवार / समशेर / चिलखत वाटले..... पण काही अक्षरे नाहीयेत मिसळीत>> अगदी मलाही समशेर बहाद्दर वगैरे वाटले पण काय अक्षरं जुळेनात
समशेरबहादर सारखे असे काही
समशेरबहादर सारखे असे काही असावे.
एक शब्द जरा सुधारा !
एक शब्द जरा सुधारा ! उत्तर तिथेच आहे !!
बहादर >>> बरोबर.
बहादर >>> बरोबर.
हे आधी आ ले, छान !
धुरंधरच्यापायाशी
धुरंधरच्यापायाशी
विशहाजोगपणाने
तोदबण्यासाठीच
सरकारदादताना
तरवार तरवार बहादर
तरवार
तरवार बहादर
मला वाटले "बहाद्दर" असा शब्द
मला वाटले "बहाद्दर" असा शब्द आहे.. पण द्द न दिसल्यामुळे म्हटलं नसेल तो शब्द
बहादर , बहादुर व बहाद्दर
बहादर , बहादुर व बहाद्दर सर्व समान !
'द्द' मुद्दामच टाळला .
तरवार बहादर
तरवार बहादर
Submitted by कविन on 13 October, 2020 - 11:29>> हे बरोबरे का म ?
होय तो सलग एक शब्द आहे
होय
तो सलग एक शब्द आहे
तरवारबहादर
अरे वा ! मग आता दुसरा टप्पा !
अरे वा ! मग आता दुसरा टप्पा !!
जरा दुसरीकडे जाऊन येईपर्यंत
झाला ना दुसरा टप्पा anjali_kool
झाला ना दुसरा टप्पा anjali
झाला ना दुसरा टप्पा anjali_kool>> अरे हो ! दुसरा टप्पा म्हणजे फक्त जोडायचे होते
सॉरी 
सर्व छान खे ळले धन्यवाद !
सर्व छान खे ळले
धन्यवाद !
अजून एक खेळ !
अजून एक खेळ !
खालील कोड्यात दिलेल्या कंसामधे अशी अक्षरे लिहा की ज्या मुळे कंसाच्या आधी दिलेला शब्द पूर्ण होईल आणि कंसाच्या पुढे दिलेल्या शब्दासाठी सुरुवात होईल.
कंसामध्ये जेवढे डॅश दिले आहेत तेवढी अक्षरे लिहायची आहेत.
उदा. सुख (- -) पाठ ==== शांती
1. बस (- -) खर
2.घंटा (- -) वान
3. प्रभा (- -) दाता
4. प्रभा (- -) चण
5. अभि (- -) गिरी
6. रान (- -) थापा
7. एक (- -) कथा
8.कला ( - -) मूळे
9. शक्ती (- -) ग्राम
10.उप (- -) वारी
बस कण खर
बस कण खर
घंटा गाडी वान
उप कार वारी ?
2.घंटा (नाद) वान
2.घंटा (नाद) वान
3. प्रभा (कर) दाता
4. प्रभा (वळ) चण
5. अभि (नव) गिरी
6. रान (भूल) थापा
7. एक (नाथ) कथा
कला कंद मूळे
कला कंद मूळे
Pages