शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रयत्न व खेळ.
चालू ठेवा.
उद्या भेटू ....
.............................................
१. निरोप देतो व समजावतो देखील ( २)

२. माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२)
३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)

४. बोलताना थांबला आणि ताठरला (2)
५. आपल्याकडची सर्दी पण उत्तरेतली युक्ती (3)

७. मंचावर दिसते , कवितेत पण असते आणि सोंग पण असते. (3)

७ नाटक >> अगदी बरोबर !
'नाटक' हा काव्यशास्त्राचाही एक प्रकार आहे.
छान.
..................................................
आता हे :

१. निरोप देतो व समजावतो देखील ( २)

२. माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२)
३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)

४. बोलताना थांबला आणि ताठरला (2)
५. आपल्याकडची सर्दी पण उत्तरेतली युक्ती (3).... जुगाड

किडा नव्हे !
२. पैसे (Money )कडे जरा नीट पाहा ....

४ मूक >>> नाही,
पण आता हे संपवू.....
चूप हे उत्तर.

उरलेले सुधारित :

१ हा शब्द निरोप देतो व समज दर्शवतो देखील ( २)
२. माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२)
३. दक्षिणेतला यार मराठीत मात्र अगदी पूज्य (2)

माझ्या घरात फिरतात आणि खिशात पण राहतात ! (२)>> याचं मनी हे नाहीये का उत्तर ?
मग हात किंवा कर ??
हात फिरे तिथे लक्ष्मी वसे वरून म्हणतेय Proud
किंवा जरा टेबल वरून हात फिरव म्हणतो आपण टेबल पूस च्या ऐवजी .. आणि हात खिशात पण ठेवतोच !

नाही
२ : भर
घरात फिरतात ‘ते’ आपलेच असतात, आणि
खिशात/ पर्समध्ये असतात ते भारतीयांच्याच !

गांधी.
पण घरात फिरतात? मुन्नाभाईच्या घरात फिरतात बुवा.

गांधी. >>>> एक दिशा बरोबर , आता थोडा अधिक विचार !

हे दोन्ही अर्थ एकाच शब्दातून व्यक्त व्हावेत.

मला गांधी वरून महात्मा > त्यावरून आत्मा असं पण वाटलं होतं .. पण खिशात काय असत ? रुमाल , चष्मा ?
आता मला मार मिळेल असल्या तर्कांवरून

३. दक्षिणेतला यार >>>
किती दक्षिणेतला ? तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम?

२. घरात फिरतात ‘ते’ आपलेच असतात >>> पाय? पण मग खिशात काय?

Pages