अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<चाकाच्या खुर्चीवर मांडी घालून बसा>>> मी ऑफिस ला असले की असेच बसते.

आता घरी पण खुर्चीवर मांड्या घालूनच बसते, उगा कशाला लटकत ठेवायचे पाय

मला तर एकदा आप्पा बळवंत चौकात चकवा लागला होता. थिअरी ऑफ मशिन्सचे एक पुस्तक पाहिजे म्हणून आ.ब. चौकात गेलो (असे घरी सांगितले)..... फरासखान्यापासून रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडे पुस्तक बघायला सुरुवात केली. मजल दरमजल करीत तांबड्या जोगेश्वरी पर्यंत पोचलो तेव्हा 1 तास होऊन गेला होता (असे घरी सांगितले)...... मग पुढे रसिक साहित्य दिसेपर्यंत आणखीन 2 तास गेले (अ घ सा)..... आईला काळजी वाटून तिने शनिवार पेठेत राहणाऱ्या मित्राला फोन लावला अन त्याला मला पिकअप करायला सांगितले. चाणाक्ष मित्र शनवारातून आब चौकाकडे येताना नदी ओलांडून पुण्यातील एक जुन्या इंग्रजांच्या वेळच्या कॉलेजच्या रस्त्यावरून आला. त्याला मी सापडलो. मलाही तो सापडला. आदराने आनंदाने आणि प्रेमाने आम्ही एकमेकांच्या पाया पडलो. कमरेखाली वाकताच दोघांना आपण चकव्यात होतो असे ज्ञान झाले. मग तो मला त्याच्या घरी घेऊन गेला (असे माझ्या घरी सांगितले) आणि तो माझ्या घरी आला (असे त्याच्या घरी सांगितले) आईला हुश्श झाले
तात्पर्य हेच चकवे कुठेही लागतात. काळजी घ्या!

हा किस्सा आमच्या गावी घडला असून एकदम खरा आहे. आमच्या शेजारी काका राहायचे. आता त्यांना जाऊन साधारण वीस एक वर्षे झाली असतील. तर त्यांना पत्ते खेळायचा खूप नाद होता. एकदा डाव मांडला की रात्रीचे दोन तीन वाजल्याशिवाय संपत नसे. असेच एकदा रात्री दोन अडीचच्या सुमारास ते पत्ते खेळून घरी जात होते. आमच्या समोरून एक रस्ता जातो आणि रस्त्याच्या बाजूला अंगण आहे. तो रस्ता ओलांडताना त्यांना कोणीतरी मागून जोराचा धक्का दिला होता. तो धक्का एव्हडा जोरात होता की ते अंगणाच्या बाजूला असलेल्या ड्रममध्ये पडले होते. काकांची शरीरयष्टी धिप्पाड होती त्यामुळे तो धक्का कोणत्यातरी अमानवीय गोष्टीने दिला होता. काहींच्या म्हणजे गावतल्या म्हाताऱ्या माणसांच्या मते त्या रस्त्यावरून रात्री देव जातो त्यामुळे त्यानेच तो धक्का काका मध्ये आल्यामुळे दिला असावा. दुसऱ्या दिवसापासून काकांनी रात्री उशिरापर्यंत पत्ते खेळणं बंद केलं.

ड्रम मोठा होता आणि जोरात धक्का मारला त्यामुळे कदाचित जोरात ड्रमवर आपटून डोकं खाली पाय वर अशा अवस्थेत ड्रममध्ये पडले.

ड्रमवर आपटून डोकं खाली पाय वर अशा अवस्थेत ड्रममध्ये पडले.
>> बाहेर कसे निघाले?
ड्रममध्ये पाणी होते का?
ड्रम लोखंडी होता की प्लास्टीकचा?
कोणाचा होता?
आता इतके प्रश्न पुरे बाकीचे नंतर विचारतो.

हवेत जरासे वर उडून पडले असावेत.>>> हो मला पण तसंच वाटतंय.
बाहेर कसे निघाले?>>> जोरजोराने धडपड करून ड्रम आडवा केला.
ड्रममध्ये पाणी होते का?>>> अर्धा भरलेला असावा बहुतेक.
ड्रम लोखंडी होता की प्लास्टीकचा?>>>> प्लास्टिकचा.
कोणाचा होता?>>> शेजाऱ्यांचा होता.

पृथ्वीकर, गणेशोत्सवातील खेळ संपला की. गाव झाले आता नाव विचाराल. मग काकांचे आवडते फळ फूल विचाराल.

बोकलत "बी पॉझिटीव्ह" दिसतात. ड्रम अर्धा भरलेला म्हणाले. काका म्हणाले असतील अर्धा रिकामा होता म्हणून वाचलो.

ते जाऊ द्या, ड्रममधून बाहेर कसे आले?
( या प्रश्र्नाचे उत्तर "विहीरीत पडलेला हत्ती ओला होऊन बाहेर आला" या धर्तीवर मिळावे)

नाबुआबुनमा Lol

मी एकदा कोकणात गेलो असताना एका गावाबाहेर एक गेंडा अंगावर आला. मी त्याला पकडून त्याचे शिंग कापून टाकले.
तेव्हा पासून तो रात्री अपरात्री त्या गावात जाऊन दिसेल त्याला डोक्याने उचलून फेकून देतो. शिंग न लागल्याने लोकांना कळत नाही गेंडा होता ते.
म्हणुन बोकलत ना नाव विचारतोय गावाचं. लोणेरे नाव।होतं त्याचं.

५००

ड्रम फुटला असेल प्लास्टिक चा होता ना..बहुतेक निळा रंगाचा असेल..रात्री निळ्या रंगात अमानवीय शक्ती येते . असे रत्नाकर मतकरींच्या रंगआंधळा या पुस्तकात वाचलंय..

Pages