शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ गाव कामगार = अलुते.
आता शोध सोपा होईल . १२ पैकी योग्य तो हुडका. मग त्याचे साधन.
सोनार नाही, हे झालंय.

उत्तरे

मूळ शब्द : तूर
• एक द्विदल धान्य.
• दोहोंकडे टोकें असणारा खिळा

• विणलेलें वस्त्र ज्या लांकडाभोंवतीं गुंडाळलें जातें तें लांकूड; कोष्ट्याची दांडी.
• तुतारीसारखें एक वाद्य

आता कळले.
विणकर आहे कारागीर.
धन्यवाद

बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार नं
असंच लक्षात होते. उलट झाले का माझे...
फरक माहिती नाही, पोपटपंची आहे.

धन्यवाद मंडळी.
आता या कोड्याचा जन्म कसा झाला ते सांगतो.
मला माझ्या एका मित्राने “ताकास तूर लागू न देणे’ या म्हणी मागची एक रोचक व्युत्पत्ती पाठवली. अजून एक वेगळ्या प्रकारची व्युत्पत्ती मी मनोगतवर वाचली. त्यातून एकूणच ताका आणि तूर यांच्याबद्दलचे कुतूहल चाळवले गेले. मग तूर् चे अर्थ बघताना मी स्तिमित झालो आणि म्हणून तो शब्द कोडयासाठी घेतला.

‘ताकास तूर लागू न देणे’ मध्ये वरवर पाहता पिण्याचे ‘ताक’ वाटते. परंतु, ते ताक नसून ताका संबंधी आहे ! ताका म्हणजे तागा.

ताकास तूर लागू न देणे’ मध्ये वरवर पाहता पिण्याचे ‘ताक’ वाटते. परंतु, ते ताक नसून ताका संबंधी आहे ! ताका म्हणजे तागा............अरे देवा!खरेच हा अर्थ. माहीतच नव्हता.dhanyvad डॉक्टर!

‘ताकास तूर न लागू देणे.’
(या म्हणीचा प्रचलित अर्थ म्हणजे *एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला अजिबात पत्ता लागू न देणे.* )

दोन व्युत्पत्ती :

1.
इथे 'ताक’ हा शब्द नसून ‘ताका’ हा शब्द आहे.

*ताका म्हणजे कापडाचा तागा*

तर 'तूर' म्हणजे एक द्विदल धान्य असा अर्थ नसून हातमागावर कापड विणण्यासाठी धागे गुंडाळून घ्यायचे जे विणकराच्या डोक्यावरचे आडवे लाकूड/तुळई असते तिला ‘तूर’ असे म्हणतात.

म्हणजे या म्हणीचा शब्दशः अर्थ असा की, ताग्याचा आणि तुरीचा संबंधच येऊ न देणे.

थोडक्यात ,एखादी गोष्ट पार पडण्यासाठी जो कळीचा घटक आहे, तोच होऊ न देणे किंवा होणार नाही ह्याची काळजी घेणे.

तर अशी आहे ‘ताकाच्या !

2.
ही शेतकऱ्यांची म्हण आहे. 'ताग' या शब्दाचे 'ताक' हे भ्रष्ट रूप आहे.तागाचे रोप आणि तुरीचे रूप ही लहान असताना अगदी सारखी दिसतात. परंतु त्यांचे गुणधर्म पूर्णपणे विरोधी असतात. तागाच्या पोटी फार उष्णता असते.ताग व तूर यांची लागवड एकत्र केल्यास तूर तागाच्या उष्णतेने मरून जाईल.म्हणून शेतकरी तागास तूर लागू देत नाहीत.

एकूण ६ शब्द याच क्रमाने ओळखा.

शब्द १ : दोन अक्षरी
शब्द २ : पाच अक्षरी
शब्द ३ : पाच अक्षरी
शब्द ४ : पाच अक्षरी
शब्द ५ : चार अक्षरी
शब्द ६ : पाच अक्षरी .

• प्रत्येक शब्दातील सलग दोन अक्षरे त्याच्या पुढच्या शब्दात सलग आहेत. (म्हणजे १ ची २ मध्ये ..........असे करत ५ ची ६ मध्ये).

• या शब्दांची शोधसूत्रे क्रम विस्कटून अशी दिलीत :

वर्तुळाकार चाल कलावंतीण उनाड मिश्रण सजलेला .

( प्रत्येकाचे १ सूत्र).

मानव,
‘गोल’ साठी मधला एखादा शब्द पाहता येईल.

वर्तुळाकार >>>
>>> 'गोलाकार' नाही. हा क्र ५ नाही. दुसरा एखादा क्र बघा. (१ व ५ या सूत्राशी बाद झाले ).

असे करतच योग्य सूत्र योग्य शब्दाशी जुळेल.
प्रयत्न चालू ठेवा.

१. रीत >>> नाही.
२. अलंकारीत >> हा शब्द नाही. पण ‘सजलेला’ साठी क्र २ योग्य !
(साद यांचा १ चा प्रयत्न पण लक्षात घ्या).

छान. चालू द्या

वर्तुळाकार > १, २ व ५ बाद झाले.
सजलेला >>> २ आहे. शब्द शोधा.
चाल > १ बाद.

वर्तुळाकार > याचा शोध आता सोपा होईल.
एक जरी आला की त्याच्या वरच्या/खालच्याला मदत होणार .

मानव, छान
१. नट > बरोबर !

पण २. नटवलेला? >>> नाही कारण यातली २ अक्षरे घेऊन ३ नाही होणार.

२ साठी नट ***
असेच प्रयत्न करा.

२)नटमोगरी
३)गरगरीत
खरे तर नगरवधू हा शब्द सुचतोय पण कुठे बसवायचा कळत नाही.
रीतभात चार अक्षरी

Pages