शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमिताभ (केबीसी), राकेश बेदी , अन्नु कपूर (अंताक्षरी )....
? अंजन श्रीवास्तव, पल्लवी जोशी, रत्ना पाठक

जिथे ते स्वतःच्या नावाने होते तिथे व्य क्ती. कथाप्रधान मालिकांसाठी व्यक्तिरेखा.
श्रीमान श्रीमती मधले राकेश बेदी आणि अर्चना पूरणसिंग.- दिलरुबा आणि डॉल. ही मालिका सध्या रेट्रो दूरदर्शनवर लागते.
सुरभीतले सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे. ही देखील रात्री साडे नऊला असते.

विक्रमवेताळ
भारत एक खोज मधील पं. नेहरू आहेत का ते डावीकडे वरती दुर्बिणीतून पहाताना?
कलाकार माहिती नाहीत.
जसपाल भट्टी - उलटा पुलटा?

फार कमी मालिका पाहिल्यात, त्यामुळे पास.

अन्नु कपूर आणि पल्लवी जोशी अ़ताक्षरी.
तबस्सुम फूल किल्ले है गुलशन गुलशन
विक्रम वेताल
हमलोगमधले दादाजी आणि लल्लू
सिंग घेऊन आलेला व्योम्केश बक्षी आहे का?
झोपलेला मुंगेरीलाल के हसीन सपने

अमिताभच्या पुढ्यात अशोककुमार वाटतोय. हम लोग.

जस्सी तैसी कोई नहीं
तिच्या शेजारी संजीव कपूर खाना खजाना
त्यातल्या बाजूला नुक्कडभ्मधला दारुडा.
मागे हम पॉंच मधला अशोक सराफ. त्याच्या मुलीही असाव्यात.
नेहरूंच्या पुढे घडांची कविता चौधरी.
शफी इनामदार, स्वरूप संपत, राकेश बेदी, सतीश शहा यांची मालिका. नाव विसरलो

दरवाजा तोडणारा दया आणि एसीपी प्रद्युम्न. सीआयडी.
त्याच्या शेजारी तेनालीराम
करमचंदच्या बाजूला खिचडीतले बाबूजी
अंजन श्रीवास्तव - वागळे च्या बाजूला माया साराभाई

डोक्यावर 'तुळसी' वृंदावन घेतलेली क्यों की मधली बा.
पेपर वाचणारा शेजारी रजनी.
गेटवेवर शक्तिमान

डाव्या कोपऱ्यात लग्न झालेलं जोडपं मानव(SSR ) आणि अर्चना
जॅकेट वाला टकलू- रघु/राजीव
अशोक कुमार च्या खाली छोटा भीम

उलटा चष्मावाले मला हमलोगवाले वाटले. माझं चुकलं.

करण जोहर आहे कॉफी घेतलेला.
जसपाल भट्टीशेजारी बुनियादमधला आलोकनाथ?

गेटवे जवळ पाठीवर बाईला उचलून घेतलेला एक माणूस आहे. तो कोण?
करमचंद आणि बाबुजींच्या मध्ये ते दोघे कोण आहेत?
करोल बाग कुंपणापलीकडे पिपाणी वाजवणारा?
तिथलाच ड्रॅकुलासारखा?
अनु कपूरच्या मागचा दाढीवाला?
कॉफी क रणच्या बाजूचे दोघे?
अल्लाउद्दीन वर मालिका होती का?

त्याच्या दिव्यातल्या जिनखाली पृथ्वीराज संयोगिता टाइप कोणी आहेत का? तो बालकलाकार गाजलेला.
रीमा आणि सायकलवाल्याच्या मागची दोन मुस्लिम कॅरॅक्टर्स?

मला सायकलवाले दोघे रोडीज वाटतात.

भरत
कोडे पूर्ण झाले की तुम्ही जाहीर करा
मग विजयना देता येईल
धन्यवाद

Pages