गणेशोत्सव २०२० स्पर्धा

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 16:50
ठिकाण/पत्ता: 
मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही मायबोलीच्या गणेशोत्सवासाठी काही स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.
विषय: 
तारीख/वेळ: 
Wednesday, August 12, 2020 - 16:45 to Tuesday, September 1, 2020 - 14:29
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाणाची स्पर्धा एकही नाही
काय हे.. यावेळी फावला वेळ होता तर आपल्याला जे जमते त्याची स्पर्धा नाही... Sad

स्पर्धा चांगल्या वाटतायत. सगळे धागे नीट वाचले नाहीत पण एक तांत्रिक शंका.
हे सगळे धागे कुठल्या ग्रुपात आहेत ?
उजव्या बाजुला नाव दिसत नाहीये आणि मला माझ्या फीडमध्ये पण दिसत नाहीयेत. ग्रुप जॉईन कसा करायचा ?

स्पर्धकांना तयारी करायला वेळ मिळावा म्हणून स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. उपक्रमांचे आयोजन ही सुरू आहे. काही दिवसात उपक्रम सुद्धा जाहीर करण्यात येतील. आणखी स्पर्धा ही एक एक करून येत्या काही दिवसात जाहीर करू.

पराग, तुझ्या फीड मधे धाग्याखाली हे दिसत नाहीये का ? मला माझ्या फिड मधे दिसते आहे. दिसत नसेल तर अ‍ॅडमिन ला विचारवे लागेल कि काय मिसिंग आहे ते.

Groups audience:
मायबोली गणेशोत्सव २०२० संयोजन
Group content visibility:
Public - accessible to all site users

Groups audience:
- Private group -

असं दिसतं.
संयोजन हा क्लोज्ड , by invitation group असेल ना?

मायबोली गणेशोत्सव २०२० असा ग्रूप काढायला लागेल.

मायबोली गणेशोत्सव (२०२०) ग्रूप आपण नेहेमीच उपक्रमाच्या पहिल्या दिवशी (गणेश चतुर्थीला) सुरु करतो.

भरत ग्रूप चे नाव काहिही असो त्याने फरक पडू नये. त्यातले बाफ फीड्स वर दिसतहेत की नाही हे शोधावे लागेल. हा बाफ मला फीड मधेही दिसतोय नि नवीन लेखन मधे डोक्यावर पिन केलेलाही दिसतोय. पराग ला तसे दिसत नाहीये बहुतेक. तुमचे काय ?

असामी , हा बाफ मला पिनमध्ये आणि न्यूज फीड मध्ये दिसतोय. मात्र स्पर्धाचे बाफ न्यूज फीड दिसत नाहीत . हा बाफ उघडून त्यातील लिंकवर क्लिक तरच नवीन प्रतिसाद वाचता येतो . नवीन प्रतिसाद वाचता येत नाही त्याशिवाय

हा बाफ मला पिनमध्ये आणि न्यूज फीड मध्ये दिसतोय. मात्र स्पर्धाचे बाफ न्यूज फीड दिसत नाहीत >>>>> हां हेच म्हणायचं होतं मला.

पराग, तुझ्या फीड मधे धाग्याखाली हे दिसत नाहीये का ? >>>> हे कळलं नाही. फीडमध्ये (म्हणजे नवीन लेखन वर क्लिक केल्यावर) आणि धाग्या खाली (म्हणजे धाग उघडून त्याच्या मजकूराच्या खाली) ह्या दोन वेगवेगळ्या जागा आहेत ना?
धाग्याखाली (म्हणजे धागा उघडल्यावर) कुठेही तू म्हणतो तो मजकूर दिसत नाहीये. हा धागा कुठल्या ग्रुपात आहे हेच कळत नाहीये.

तारीख/वेळ:
Thursday, August 13, 2020 - 04:45 to Wednesday, September 2, 2020 - 02:29
Groups audience:
- Private group -

Group content visibility:
Public - accessible to all site users

हे असं दिसतंय, त्याविषयी म्हणतोय बहुधा पराग. साधारणपणे ग्रुपाचं नाव दिसतं.

बरोबर भा.

पराग, हा बाफ नि इतर स्पर्धांचे बाफ "मायबोली गणेशोत्सव २०२० संयोजन" ह्याचा भाग आहेत. त्यात मोजक्याच लोकांना प्रवेश असल्यामूळे ते फिड मधे दिसत नसावेत. ह्यासाठी ते वर पिन केले आहेत. गणपती प्रतिस्थापनेनंतर नेहमीच्या गणेशोत्सव बाफ मधे हलवले गेले कि अपडेट्स फीड मधे दिसू लागतील. अर्थात सध्या हे गैरसोयीचे होते आहे हे मला लक्षात आलेय. मी विचारून बघतो.

धन्यवाद असामी.
हा बाफ जसा पिन केलेला आहे तसच बाकी स्पर्धांचे बाफपण गणेशोत्सव सुरू होईपर्यंत पिन करता येतील का?

अरे बरेच बाफ पिन करणे किचकट हो होते म्हणून हा कॉमन बाफ बनवून पिन केला होता. नवीन स्पर्धा अ‍ॅड केली कि त्या बाफापुढे 'बदलून' असे येते का ?

हो बदलून येते. म्हणजे आज सकाळी तरी आले होते. पण अगदी एक अक्षर जरी बदललं तरी तसं येतं त्यामुळे दरवेळी 'बदलून' दिसल्यावर बघितलं जातच असं नाही. सहज काही करता येणं शक्य असेल तर ठिक आहे पण मुद्दा समजून त्यावर मुद्देसुद उत्तरं दिल्यावर धन्यवाद. Happy

" मायबोलीवर नवीन लेखन मधे स्पर्धा मधे झालेले बदल पण दिसतील" हा तोडगा सुचवलाय. बाकीचे पर्याय जरा किचकट होताहेत.

स्पर्धा छान आहेतच. स्पर्धा नसणारे उपक्रम पण दर वर्षी असतात ना?
जसं की गणपती सजावट वगैरे.. सगळ्यांचे सुंदर सुंदर सजावट बघायला छान वाटते. तसेही उपक्रम येऊन द्यात.

शाळेतल्या कार्यानुभव, चित्रकला इ. तासांची आठवण झाली. Light 1 चांगल्या आहेत स्पर्धा. मास्कची आवडली. अजून येऊ दे.

छान स्पर्धा आहेत. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा..
मास्कची स्पर्धा आवडली. माणसांसारखा गणपतीला पण मास्क हवा. गणपतीला मास्क नक्की कुठे आणि कसा बांधायचा? सोंडेला की तोंडाला की झोळीसारखा दोन्ही झाकणारा? की दोन मास्क??

अरे इथे बर्‍याच स्पर्धा आल्यात की! मस्त!

मी पहिल्या दिवशी उघडलेला हा बाफ. मग 'बदलुन' दिसला की काही तरी टायपो असतील म्हणून बदलला असेल समजुन उघडला जात नाही माझा. इतरांचं ही असं होत असेल तर प्रतिसादात पण अपडेट करा. प्रतिसाद वाढले की आपोआप उघडला जातो Happy
(त्या मोदकांच्या फोटोवर गोंधळ झालेला प्रतिसाद अचानक वाढल्याने बरोब्बर समजला मला Proud )

आता कळलं ना 'बदलुन' दिसला की नवी भर सुद्धा असू शकते ते. आता बदलून दिसला तरी उघडत जावा. Light 1
(हा प्रतिसाद प्रतिसाद वाढवायला.)

मस्त स्पर्धा आहेत यावेळी
शुभेच्छा सर्वांना
एका गुलाबी रंगाच्या आकस्मिक विघ्नामुळे कश्यातही भाग घेऊ शकणार नाही(नाही दर महिने वालं विघ्न नाही, पायाला गुलाबी प्लास्टर)
पण यावेळी मजा येणार आहे सर्व एन्ट्री वाचायला
डोक्यात एक दोन तिखट मोदक होते ते आता मनातल्या मनात करेन. Happy

आता कळलं ना 'बदलुन' दिसला की नवी भर सुद्धा असू शकते ते. आता बदलून दिसला तरी उघडत जावा. 
(हा प्रतिसाद प्रतिसाद वाढवायला.)

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 22 August, 2020 - 09:41
गणपती बाप्पा मोरया !!!!
(हा माझा प्रतिसाद, (प्रतिसाद प्रतिसाद वाढवायला) वाचून वाढवायला)
Lol

@अनु टेक केअर

संयोजक , झब्बु ऊपक्रम फेबु वरुन बघितला. पण आता इथुन गणेशोत्सव उपक्रम मध्ये वरती पिन केलेल्या लिंक्स मध्ये दिसत नाही. काय चुकतय माझ ?

Pages