सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मरु द्या ती सी बी आय आणि बिहारी पोलीस !!!
पण खेडेगावातील आणि शहरातील अगदी गल्ली बोळा तील किचकट मर्डर मिस्ट्री सुनेची हत्या / आत्महत्या आठ दहा दिवसात सोडवणारे महाराष्ट्र पोलीस बॉलीवुड मधील आत्महत्या बाबत मात्र हतबल झालेले दिसतात .

गुन्हा घडलेल्या ठिकाणच्या जवळ च्या चार पाच मोबाईल टॉवर च्या संपर्कात असणाऱ्या हजारो लोकांची चौकशी करून , त्या चार पाच किलोमीटर परिसराच्या त्रिज्येत आलेल्या हजारो लोकांची सी सी टी वी तपासणी करून महाराष्ट्र पोलिसांनी केस सोडवल्या आहेत .
पण बॉलीवुड म्हटल की पोलिसांची बुध्दी चालणे का बंद होत असावे ?

बुद्धी चालणं बंद असं नसेल.दबाव असू शकतो.कोण्या श्रीमंत माणसाकडून/अंडरवर्ल्ड कडून.
मुंबई पोलिसांबद्दल वाईट वाटतं.ते नेहमी स्वतःचं कर्तव्य करत असतात.आणि वरून आलेल्या निर्णयांमुळे शिव्याही खात असतात.

बुद्धी चालणं बंद असं नसेल.दबाव असू शकतो.कोण्या श्रीमंत माणसाकडून/अंडरवर्ल्ड कडून>>> किंवा राजकारण्यांकडुन Uhoh

राजकारणी श्रीमंत माणूस नाही असं मी म्हटलेलं नाहीय Happy
ते सदर त्या सदरात मोडतं.(असा मी असामी: म्हणजे तो सदरा त्या सदरात पडला होय?)

आज टीव्ही वर तेच गुर्‍हाळ चालु आहे अधुन-मधुन. कोण कोण राजकारणी पार्टी करायला यायचं त्या सुशांतच्या घरी.

सुशील मोदींना मुंबईत पाणी भरल्याची काळजी वाटत होती. आता बिहारम ध्ये पूर आलाय. ७४ लाख लोक बधित आहेत. २३ मृत्यू.

गुऱ्हाळ लोक टाइम पास म्हणून बघतात.
पण त्यांना त्या मुळे हुरूप येतो.
मी न्यूज चॅनल पासून लांब च राहतो.
आणि त्या मध्ये हिंदी चॅनल पासून तर खूपच लांब.

मुंबई पोलिसांबद्दल वाईट वाटतं.ते नेहमी स्वतःचं कर्तव्य करत असतात.आणि वरून आलेल्या निर्णयांमुळे शिव्याही खात असतात >>>>>

अगदी तेच !!!!
कर्तबगार असून पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचून नाचून पोलीस दलाची मानहानी होत गेली , याला सगळे पक्ष जबाबदार आहेत .
आम्हाला १०० % खात्री आहे आपले ज्युनियर मंत्री फालतू गुन्हे कधीच करणार नाही , कारण ते करण्यासाठी लागणारा बेरकिपणाचा अभाव त्यांच्यात दिसतो , बिचारे साळ सूद वाटतात .
पण ....
मुंबई पोलिसांना फ्री हॅण्ड न दिल्या मुळे , बिहारी पोलिसांना गुन्हेगारी वागणूक दिल्या मुळे , सी बी आय ला विलगी करण ची धमकी दिल्या मुळे गेल्या महिन्याभरात कुठल्याही निष्कर्षाप्रत न आल्या मुळे सेना बॉलीवुड मधील. माफियांची पाठराखण करत असल्याचे चित्र निर्माण झाले .

आपल्याला काय करायचे त्या सुशांत सिंह चे ?
म्हणून आपण भट्ट ,सलमान करण यांना सुद्धा डोक्यावर घेत नाही !
मराठी फिल्म इंडस्ट्री ला स्क्रीन न भेटली तर पेटणाऱ्या आपल्या सारख्या जनतेने त्या बॉलीवूड मधील कोणाचीही बाजू घेतली नाही पाहिजे , लटकू द्या ना भट्ट , सल्लू करण्या आणि ती कंगना सुध्दा !
आता तो सूरज पांचोली तर दोन मर्डर केस मध्ये वाचला आहे , व त्याच्या बापाचे पण भरपूर विकृत चाळे ऐकून आहोत .
पण झालंय काय काही विशिष्ट लोक या सगळ्या माफिया मंडळींना वर्षानुवर्षे वाचवत आहेत . आणि खरी गेनबा ची मेख तिथे च आहे .
मला तर बॉलीवुड मधील कुठल्याही लोकांशी ममत्व वाटतं नाही .
मराठी सिनेमा दर्जेदार नाही वाटला तर सरळ साऊथ इंडस्ट्री ला शरण जावे ! एक से एक दर्जेदार सिनेमांची अनु भती येते ....

शेखर कपूर फालतू बोलणारा मनुष्य नव्हे. मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने जे ट्वीट केले त्यातच सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या जातीयवादी हXमिंचा उल्लेख आहे. जोहर-भट्ट-खान टोळीने त्याला सिनेमे मिळवू दिले नाहीत. एकापाठोपाठ एक सात सिनेमांचे करार रद्द केले. शेखर कपूर सोबतचा चित्रपट सुद्धा त्यातलाच एक. सुशांतने कैकवेळा कपूर यांच्यापुढे आपली व्यथा मांडली होती, रडला होता. सगळ्या गोष्टी साफ होत्या.

आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करणे अवघड नव्हते. पण जोहर, भट्ट आणि इतर जात्यंध भामटे कसे गप्प बसतील? पोलिसांना म्यानेज करता येते. पण जनमानसांचे काय? डागाळलेली प्रतिमा कशी स्वच्छ करणार? मग माध्यमांना हाताशी धरून त्यांनी आपल्यावरचा बालंटरुपी लाईमलाईट अन्यत्र वळवायचे काम सुरु केले. अर्थात, देशभरातील माध्यमे हाताळणे हे व्यक्तिगत स्तरावर शक्यच नाही. पण सध्या भोंदूत्ववाद बोकाळलेला असल्याने या मंडळीना माध्यमे मिळवून देण्यात कुणी मदत केली असेल वेगळे सांगायला नको. सर्व भोंदू वृत्तींची सध्या पद्धतशीर युती झाली आहे. इथल्या प्रतिक्रीया पाहता भोंदूत्ववादी किडे आपल्या जातबंधूंवर बालंट येऊ नये आणि एकंदर नेपोटीजम सुरक्षित राहावे म्हणून सुशांत विरोधात एक होऊन सर्वत्र वळवळ करताना दिसत आहेत. मृत्यूनंतर सुद्धा त्याची बदनामी करायला मागेपुढे पाहिले जात नाही.

ज्याच्या हाती माध्यमे तो पारधी. नेपोटीजम वादी टोळी आणि त्यांचा राजकीय बाप व इतर चमचे यांनी हे नेपोटीजमचे बालंट अन्यत्र वळवण्यासाठी विविध स्क्रिप्ट लिहून त्यातले कोणते खपते हे पहायचे उद्योग केले:

१. दावूद चा संबंध: एका माजी रॉ अधिकाऱ्याला विकत घेऊन त्याच्यातर्फे सुशांत हत्येमागे दावूदचा संबंध असल्याचे पसरवले गेले. जनतेला उल्लू बनवणे हा यांच्या डाव्या हातचा मळ. पण तरीही हे स्क्रिप्ट काही कारणास्तव चालले नाही.

२. सेक्रेटरीचा विनयभंग: मग दुसरे स्क्रिप्ट लिहिले गेले. काय तर म्हणे सुशांतची सेक्रेटरी दिशा तिने आत्महत्या केली कारण एका पार्टीत तिचा विनयभंग केला गेला होता म्हणे. कोणतरी राजकीय धेंड मुख्य आरोपी होता. म्हणून दिशाला कायमचे शांत केले गेले. आणि सुशांत ला त्या व्यक्तीचे नाव माहित असल्याने सुशांतला सुद्धा त्यांनी शांत केले वगैरे वगैरे कथानक रचले. यात बराच मसाला टाकून त्याला तद्दन फिल्मी स्वरूप दिले होते. पण हि थियरी सुद्धा खपली नाही. स्क्रिप्ट अयशस्वी ठरले.

३. सुशांतचा स्वभाव व बदनामी: मग सुशांतला बदनाम करायचे उद्योग सुरु झाले. (भामट्यांची नेहमीची परंपरागत मानसिकता. विरोधक नमत नाही मग त्याला बदनाम करायचे). तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्यामुळे सेटवर सुद्धा विक्षिप्त वागायचा. त्याचा स्वभाव अत्यंत हेकट होता. वगैरे वगैरे पसरवणे सुरु झाले. या धाग्यावर काही प्रतिक्रिया सुद्धा अशा स्वरुपाच्या आल्या आहेत. जेणेकरून त्याने आत्महत्या त्याच्या स्वभावामुळे केली असे पसरले जावे. "आमचे जातबंधू व एकंदर नेपोटीजम त्यास जबाबदार नाही" असा सूर आळवला होता. पण हे स्क्रिप्ट सुद्धा खपले नाही.

४. रिया चक्रवर्ती: मग एखाद्या भामट्याच्या लक्षात आले, सुशांतच्या एखाद्या गर्लफ्रेंडला मध्ये ठेवून स्क्रिप्ट लिहू. अंकिता तर पूर्वीची होती. मग रियाला घेऊन स्क्रिप्ट लिहिले. काय तर म्हणे ती सुशांतला खूप त्रास देत होती. पण एवढ्यावर पब्लिक उल्लू कसे बनेल? आत्महत्या करण्यासारखे मोठे कारण हवे ना. म्हणून त्याची कोट्यावधी रुपयांची रक्कम तिने आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्स्फर केली आहे इत्यादी इत्यादी लिहिले गेले. हे स्क्रिप्ट मात्र खपू लागले. लगोलग सुशांतच्या वडलाना त्यानुसार पोलीस केस करायला सांगितले. रिया जर जबाबदार असती व असे काही खरेच घडले असते तर सुशांतचे वडील इतके दिवस/महिने का थांबले असते? दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच रिया विरोधात पोलीस केस केली असती ना? मुळात जो सुशांत स्कॉलर होता, ज्याला फिल्ममध्ये नेपोटीजमला टक्कर देऊन खूप सारे करीयर घडवायचे होते व ज्याच्या याआधीच दोन गर्लफ्रेंड झाल्यात तो या गर्लफ्रेंडला कोट्यावधी रुपये देण्याइतका नेभळट असेल का? इतक्या दुबळ्या मनाचा असता तर इथवर आला असता का? पण नाही. जी जनता चीन मधले फोटो अहमदाबादचे आहेत यावर विश्वास ठेऊन भामट्या वृत्तीला मतदान करते, ती जनता असले तार्किक प्रश्न कशाला विचारेल नाही का? हे स्क्रिप्ट जोर धरू लागले. इकडे रियाला गायब केले गेले. तिच्याशी सुद्धा सौदा केला असणार. नेपोटीजम उर्फ जातीयवाद जिवंत ठेवायचा तर कायकाय करावे लागते ना?

सध्या रिया चक्रवर्ती स्क्रिप्ट माध्यमांतून जोरात खपत आहे. शेखर कपूर शांत झालाय. किरकोळ होता तो. सुशांतचे वडील रियावर केस ठोकून बसलेत. नेपोटीजमला आवाज देणारी कंगना सुद्धा कालांतराने शांत होईल. तसेही ती आरडाओरडा करण्याशिवाय फार काही करणार नव्हतीच.

रिया थियरी चालेल न चालेल. पण भामट्यांच्या प्लान प्रमाणे नेपोटीजम मुद्दा केंव्हाच मागे पडलाय हेच यश आहे. सुशांतच्या आत्महत्येबाबत रिया हा एकच मुद्दा सध्या चर्चेत आहे. एक तेजस्वी करीयर पद्धतशीरपणे मारले गेले आहे. विकृत नेपोटीजम उर्फ जातीयवाद पुन्हा एकदा जिंकण्याच्या मार्गावर आहे. जय हो!

काम नाकारले , हे काय मरायचे कारण झाले ? लॉक डाऊन मुळे भलेभले उद्योग मेलेत
इन्फोसिस ने किती लोकांना काढले , म्हणून त्यातला कुणी मेला तर मूर्तीवर केस करणार का ?

15 सिनेमे मिळाले ( त्यातले 4 चालले , उरलेले निर्माते जिवन्त आहेत का कुणास ठाऊक , ) तेंव्हा नाही बोलला, मला बॉलिवूड ने अन्न दिले म्हणून

मीडिया , यात सोशल मीडिया ही आली- दुसरी थियरी अजूनही जोरात चालवली जाते आहे. कारण यात राजकीय अँगल कोंबला आहे.

सुशान्तच्या घरच्यांनी रियाविरोधात केस केली. यात पैशाचा प्रश्न असू शकेल.

जी जनता चीन मधले फोटो अहमदाबादचे आहेत यावर विश्वास ठेऊन भामट्या वृत्तीला मतदान करते, ती जनता असले तार्किक प्रश्न कशाला विचारेल नाही का?>>>>>>>
एकदम मुद्देसूद लिहलय !
कसले फोटो होते हो ?
हा विषय लक्षात नाही आला !!

रिपब्लिक चे वेबसाइट आणि ट्विटर हँडल पाहिलं. अर्ध्याहून अधिक बातम्या सुशांत संबंधी आहेत.
उत्तर प्रदेशात हापूर येथे झालेल्या सहा वर्षाच्या मुलीवरील भयंकर बलात्काराबद्दल अक्षर दिसलं नाही. ही घटना ताजी आहे.

यूट्यूब-इंस्टाग्राम वर काही तथाकथित सायकिक मिडीयम लोकांचे विडिओ फिरत आहेत ज्यात त्यांनी सुशांतच्या आत्म्याबरोबर केलेला संवाद आहे. एका बाहेरच्या तज्ज्ञाने तर कसली emp टेक्नॉलॉजी वापरलीये. काही लोकं आम्हाला सुशांतचा आत्मा झोपेतुन उठवतो वगैरे सांगत आहेत. मीडिया सर्कस पाहून कंटाळा आला असेल तर हे सुद्धा पाहून घ्या Lol

:-))

मी ज्या व्हिडिओ ची लिंक दिली त्यातील माणसाला मी ओळखत नाही, पण तारीख, सनांसह सहजतेने त्याने जी माहिती सांगीतली ते पाहून ही व्यक्ती अभ्यासू असून ध्येयाने पछाडलेली वाटली. अर्थात हे माझं वैम.

सुशांतच्या निमित्ताने मानसिक रोगांवर बरेच काही वाचले. जे कळले ते इतकेच की -

ऐन पंचविशीतील, बाहेरून फिट दिसणारा, वार्षिक आरोग्य तपासणीत आतून फिट असणारा माणूस अचानक एक दिवस आजारी पडू शकतो. त्याला साधा फ्लू होऊ शकतो ज्यातून तो आठवड्यात ठणठणीत बरा होऊ शकतो. किंवा त्याला कॅन्सर, हृदयरोग,टीबी इत्यादी गंभीर आजार होऊन तो तडकाफडकी अचानक किंवा काही महिन्यात मृत्युमुखी पडू शकतो. यात बाह्य घटकांचा भाग कितपत यावर अजूनही काम सुरू आहे, तो आहेच किंवा नाहीच हेही अजून सिद्ध झालेले नाही. कारण त्याच बाह्य घटकांच्या प्रभावाखाली असलेल्या काहींना त्रास होतो, तर काहींना होत नाही.

असेच मनाच्या आजाराचे आहे. बाहेर फिट व आनंदी असणारा माणूस निराशेच्या गर्तेत खोलवर रुतलेला असू शकतो. आपण जीव द्यावा असे वाटून प्रत्यक्ष तशी परिस्थिती शोधून तो जीव देतोही. यात बाह्य घटक किती प्रमाणात परिणाम करतात यावर अजून संशोधन सुरू आहे. परिणाम नाहीच किंवा आहेच यापैकी काहीही अजून सिद्ध झालेले नाही.

शारीरिक आजार अकस्मात होऊ शकतात तसेच मानसिक आजारही अकस्मात उद्भवू शकतात. शारीरिक आजारांची कित्येक कारणे आज ज्ञात आहेत, कित्येक कारणे आजही अज्ञात आहेत पण आज शारीरिक आजार निदान ओळखता तरी येतात. पन्नास वर्षांपूर्वी आमच्या कोकणात कारडीएक अरेस्टमुळे कोणाचा जीव गेला तर त्याच्यावर करणी केली असे समजले जाई. आज लोकांना हार्ट अटॅक हा आजार माहीत आहे. त्यांना कारडीएक अरेस्ट व हार्ट अटॅक मधला फरक माहीत नसेल पण कोणी तडकाफडकी गेला तर अटॅक असणार हा निष्कर्ष ते काढू शकतात, करणीवर लगेच उडी मारत नाहीत.

मानसिक आजारांबाबत अजून तितकी जागृती नाहीय. आणि निराशा या रोगाच्या बाबतीत तर माझ्यासकट कित्येकांना वाटते की यात काय विशेष, ढकलून द्या नैराश्याला व जगा आनंदात, तुमच्या हातात आहे सगळे. काहीही उपचार न करता कँसरला ढकलून देऊन आनंदात जगणे जसे शक्य नाही तसेच नैराश्याला ढकलून देऊन आनंदात जगणे शक्य नाही. शारीरिक आजारावर जसे उपचार लागतात तसे मानसिक आजारावर लागतात. शारीरिक आजारात जसे माणसाची विल पॉवर कमी पडली, जगण्याची इच्छा संपली तर उपचारांचा फायदा होत नाही तसेच यातही आहे आणि यात ग्रस्त माणसाची विल पॉवर वाढवणे, मोराल बुस्टिंग करणे प्रचंड कठीण आहे. 'माझे दार उघडे आहे, चहा पीत माझ्याशी बोलून नैराश्यावर मात करू' वगैरे ठीक आहे पण नुसते बोलून हा आजार बरा होत नाही, औषधोपचार व समुपदेशन दोन्ही हवेतच.

मानसिक आजारांवर अजून खूप संशोधन होणे गरजेचे आहे आणि यावर अजून चांगली, लवकर परिणाम करणारी, साईड इफेक्ट्स कमी असणारी औषधे येणे त्याहीपेक्षा जास्त गरजेचे आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी जे शारीरिक आजार तुरळक होते, ज्यांना आज आपण लाईफ स्टाईल आजार म्हणतो ते आज खूप वाढलेले दिसतात. पण ते डोळ्यांना दिसतात, ग्रस्त माणूस व त्याचे कुटुंबीयांच्या हातात डॉक्टरचे रिपोर्टकार्ड मिळू शकते ज्यात अमुक्तमुक आजार असे लिहून मिळते. संबंधितांनी नाकारले तरी आजाराची बाह्य लक्षणे दिसतात.

मानसिक आजार होण्याचे प्रमाण आज शारीरिक आजारांपेक्षा
जास्त आहे. हाही लाइफस्टाइल आजार असावा बहुतेक.
याची काहीही बाह्य लक्षणे नाहीत आणि त्यामुळे हा नाकारण्याचे प्रमाण प्रचंड जास्त आहे. म्हणूनच जागृती होणे खूप गरजेचे आहे.

हा एक अदृश्य करोना आहे, जो आपल्याला/जवळच्याला झालाय हे मान्य करायलाही कोणी तयार नसते.

नैराश्याला आपण जेवढं कवटाळू तेवढं ते खोल नेऊन एक दिवस बुडवतं. दुर्दैवाने नैराश्यावर मात फक्त नैराश्याचा रुग्णच करु शकतो. औषधोपचार, कौन्सिलिंग हे फक्त टेकू आहेत. निराश माणूस " सारं संपलं आहे" अशी खात्री करून मनाशी हेच वाक्य आळवत असेल तर तो बरा होणं अशक्य आहे.
सुशांत नं आत्महत्या केली नाही हे माझं मत आहे. चौकशीतून काय बाहेर येते याचीच वाट पहात आहे.

अभिनेत्री मयुरी देशमुख चा पती आशुतोष भाकरे याने नैराश्यातून आत्महत्या केली त्याला 13 दिवस झालेत,
काल त्याच्या आई ने FB वर पोस्ट टाकली होती ती इकडे देत आहे, (वर भरत यांनी तीच लिंक दिली आहे)
वर वर पाहता नैराश्यातून सावरत असणारा मनुष्य एखाद्या कमकुवत क्षणी असा टोकाचा निर्णय घेतो हे यातून दिसते.
तो वैफल्यग्रस्त आहे हे लोकांना माहीत होते, मित्र, कुटुंबीय , डॉक्टर्स यांची भक्कम साथ त्याला होती, तरीही एका चुकार क्षणी हे घडले,
वैफल्यग्रस्त माणसाचे जग वेगळे असते, एखादी गोष्ट आपण हसून सोडून देऊ, ती त्याच्या जिव्हारी जखम करणारी ठरू शकते. एखाद्या रुग्णाला कडेलोट व्हायला निमित्त ठरणारी गोष्ट बाकी लोकांच्या दुनियेत "all in the days work" टाइप ची असू शकते ( सुशांत च्या केस मध्ये फिल्म हातातून जाणे, बॉलिवूड पॉलिटिक्स, GF ने डम्प करणे, ) त्यामुळे ज्यांच्यामुळे या गोष्टी झाल्या (असतीलच तर..) त्यांना खुनास जबाबदार ठरवणे पूर्णपणे चूक आहे.

असो...
वर भरत यांनी लिंक दिली आहे ती सौ.भाकरे याची पोस्ट देतो आहे, एक भक्कम सपोर्ट सिस्टम असतानाही रुग्ण कसा निर्णय घेऊ शकतो हे अधोरेखित करण्यासाठी ही पोस्ट इकडे चिकटवत आहे, (त्यावर वेड्यावाकड्या कमेंट्स केल्या नाहीत तर आवडेल.) यातले कोणते फॅक्टर्स सुशांत कडे होते, याचा हि लोकांनी विचार करावा.

>>>>>>>>>>>>>>>
आज ११ आॅगस्ट, आशुचा ३२ वा वाढदिवस, आज आशुला जाऊन तेरा दिवस झालेत. गेल्या तेरा दिवसात त्याच्या आठवणी आल्या नाहीत असा एकही क्षण गेला नाही. त्याचे बालपण, शाळा, काॅलेज, माॅडेलिंग व पिक्चर आणि बिझीनेस साठी मुंबई ला जाणे, लग्न, लग्नानंतरची साडेचार वर्ष हे सारे डोळ्यासमोरुन तरळून जाते. त्यातल्या त्यात तो नैराश्यात (Depression) गेल्या नंतर सगळ्यांनी त्याला त्यातून बाहेर काढणेसाठी केलेले प्रयत्न आठवतात. मी ,मयुरी, त्याचे वडील डाॅ भाकरे, त्याचा अमेरिकेतील लहान भाऊ अभिलाष, आजी, मामा , मामी, मयुरीचे आई व वडील मयुरीचे दोन्ही भाऊ-वहिन्या, मयुरीचे व आशु चे मित्र व मैत्रिणी , नांदेड व मुंबई येथील मनोविकार तज्ञ डाॅक्टर्स ह्या सर्वांनी आपापल्या परीने त्याला नैराश्यातून बाहेर काढणेचे खूप प्रयत्न केलेत. सगळे खूप सपोर्टीव होते. मयुरी कायम मला म्हणायची मम्मी आपण आशूला यातून बाहेर काढूच , काळजी करू नका. आशु योग्य प्रतिसाद ही देत होता. त्या साठी मयुरीने मागील दोन वर्षात तिला आलेल्या खूप सिरियलस नाकारल्यात कारण सिरियल म्हटली म्हणजे दररोज सकाळी सहा पासून रात्री दहा पर्यंत व्यस्त रहाणे. केवळ आशुच्या आग्रहाखातर नाट्य व सिनेसृष्टीशी टच राहावा म्हणून एखादे नाटक व सिनेमा स्वीकारला. ह्या काळात मयुरीने त्याच्या पत्नीच्या व्यतिरिक्त त्याची मैत्रिण , मार्गदर्शक, आणि विशेष म्हणजे त्याची आई होवून लहान बाळा प्रमाणे काळजी घेतली. लाॅकडाऊन मध्ये २५ मार्च पासून ते ३० जून ला मयुरी व आशु नांदेडला येईपर्यंत देशमुख परिवारातील आशु व मयुरीसह नऊ सदस्य एकत्रित राहत. रात्री जेवणानंतर करमणुकीसाठी पत्ते, ऊनो, लुडो, डम्ब शेराज, कॅरम, ई. असा दिनक्रम होता. आशु व मयुरी स्वयंपाक घरात विविध प्रयोग करत. ह्या काळात मयुरीचे सर्व व्हिडिओजचे शूटींग आशुनेच केले. मयुरी त्याचे कडून त्याच्या कलाने प्राणायम, मेडिटेशन करुन घेत असे. ३० जूनला नांदेड ला मयुरी व आशु आले तेव्हा आशुने स्वताने पाचशे किलोमीटर गाडी चालविली. आशु व मयुरी दोघे नांदेडला आल्यावर देखील स्वयंपाक घरात वेगवेगळे प्रयोग, करमणुकीसाठी पत्ते ,लुडो ,कॅरम. तसेच चित्रपटसृष्टीशी संबधीत आॅनलाईन क्लासेस, प्राणायम, मेडिटेशन ई. दिनचर्या सुरू होतीच. तो बऱ्यापैकी रिकव्हर होत होता. पत्त्यांच्या जजमेंट ह्या गेम मध्ये तो ८०% वेळा जिंकायचा. तो असे काही करेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण आम्हा सर्वांची नजर चुकवून तो गेला.
आमचा मुलगा म्हणून मी व डाॅक्टर भाकरेंनी आशुची सर्व काळजी घेतलीच पण आशुच्या सासू सासर्यांनी ही तेवढीच काळजी घेतली. मयुरीच्या आई हेमाताईंनी आशुला स्वताच्या मुलाप्रमाणे जपले.
त्याचे सासरे देशमुख साहेब यांचे आग्रहाखातर आशु , मी, डाॅक्टर भाकरे साहेब व देशमुख साहेब असे आम्ही चौघांनी डिसेंबर २०१९ मध्ये शेगाव येथे मानस योग साधनेचे सात दिवसीय शिबीर केले. तेथे व तद् नंतर ही आशु मध्ये फरक जाणवला.
सर्वांनी सर्व प्रयत्न केलेत, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते.
आशुच्या दहाव्याच्या कार्यक्रमानंतर रितीरिवाजानुसार मयुरीला तिच्या आई वडिलांबरोबर पाठवावे असे सर्व नातेवाईक यांचे म्हणणे प्रमाणे ठरले. घाटावरून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून सर्व नातेवाईक परतले नंतर सर्वांसमोर मयुरी ने तिच्या आई वडिलांना सांगितले की रुढीपरंपरेनुसार मी तुमचे बरोबर यायला पाहिजे, पण इथे मम्मी व पप्पा एकटेच पडतील, अभिलाष देखील दूर अमेरिकेत आहे, आता त्यांना माझी गरज जास्त आहे त्यामुळे मी त्यांचे जवळ नांदेड येथेच थांबते. मी तुमचे कडे येतांना त्यांना दहा पंधरा दिवसांसाठी घेवून येते. केवढी ही प्रगल्भता ईतक्या कमी वयात ह्या माझ्या मुलीत ( मला दोन्ही मुलंच असलेने मयुरीला मी कधीच सून मानले नाही ) . ती आमची सून नसून मुलगीच आहे हे मला तेव्हा प्रकर्षांने जाणवले.
परवा मी मयुरी माझ्या लहान मुलाला फोन वर बोलतांना ऐकलं, ती त्याला समजावताना म्हणाली आम्ही सर्व इथे आहोत, तू तिकडे अमेरिकेत एकटा आहेस, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि काळजी घे. इतके सामंजस्य कुठून येते ह्याचे मला आश्चर्य वाटले.

आज आशु चा वाढदिवस, पण माझी अतोनात इच्छा आहे की जास्तीतजास्त लोकांनी डिप्रेशन ह्या गंभीर आजारावर गांभीर्याने विचार करावा म्हणुन मी लिहीत आहे. आई चे दुःख तर खूप आहे पण आम्ही सर्वांनी आणि खास करून मयुरी नी केलेल्या प्रयत्नांनी आशु खुप बरा झालेला , पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आशु ला मदत करण्यासाठी इतके लोक होते त्याचे वडील स्वता अेम. अेस.डाॅक्टर , पत्नी , सासू-सासरे उच्च शिक्षित , सर्व नातेवाईक , मित्र-मैत्रिणी समंजस, सपोर्टीव पण आम्हाला न कळू देता आम्हाला सोडून गेला.
आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्यग्रस्तांची (Depression) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या कुटुंबात ही अशी व्यक्ती असू शकते. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा व्यक्ती कडे दुर्लक्ष करु नका. त्याला बोलतं करा, त्याला सपोर्ट करा आणि मनोविकार तज्ञांच्या ट्रीटमेंट साठी प्रोत्साहित करा.
मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे.
आपण कॅन्सर किंवा हृदय विकार असलेल्या व्यक्तींकडे ज्या प्रेमाने आपुलकीने हात देतो, डॉक्टर कडे नेतो तितकीच काळजी आणि आधाराची गरज मानसिक त्रासात असणार्‍या व्यक्तीला असते. त्याला त्याच्यातून बाहेर काढणेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि समजून घ्या.
नैराश्याला चेहरा नसतो, नाहीतर सर्वांना हसवणारा, नेहमी मदत करणारा आशु असं करूच नसता शकला.
ह्या विषयावर गांभीर्याने विचार आणि चर्चा केली पाहिजे तरच आपण अशा नैराश्याच्या रुग्णांना मदत करू शकू.
नैराश्य हा खराखुरा अस्सल व त्रासदायक आजार , त्याकडे दुर्लक्ष करु नका .एकमेकांना मदत करा मानसिक आधार द्या , रुग्ण नक्कीच बरा होवू शकतो. ह्या रुग्णांकडे सकारत्मकतेने पहा हीच एका आईची विनंती.
सौ. अनुराधा गोविंदराव भाकरे

सिम्बा धन्यवाद. मला असं वाटतं की पुरुषाला सुक्ष्म का होईना अहंकार हा असतोच. मला लोकांनी यशस्वी म्हटलंच पाहिजे हे एक प्रकारचे ओझं नकळत का होईना मानगुटीवर बसलेलं असतं. नापास होणारी मुलं, पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करणारी मुलं ही असं दडपण घेऊन जीव देतात. काही पुरुषांना पत्नी जास्त यशस्वी असेल तर न्यूनगंड येतो.
अभिनेत्यांच्या बाबतीत बोलायचे तर हे काय जन्माला येतानाच अभिनेते बनून येतात काय? चित्रपट, मालिकेत काम नाही मिळाले तर सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी पकडायची एखादी. किंवा असलेल्या भांडवलातून छोटासा उद्योग धंदा काढायचा. जीव देणं हा पर्याय नाही.

"मानसिक आजारांबाबत अजून तितकी जागृती नाहीय. आणि निराशा या रोगाच्या बाबतीत तर माझ्यासकट कित्येकांना वाटते की यात काय विशेष, ढकलून द्या नैराश्याला व जगा आनंदात, तुमच्या हातात आहे सगळे. काहीही उपचार न करता कँसरला ढकलून देऊन आनंदात जगणे जसे शक्य नाही तसेच नैराश्याला ढकलून देऊन आनंदात जगणे शक्य नाही." अगदी अगदी.
नैराश्यच नव्हे तर बाय पोलर, स्किझोफ्रेनिया सारखे अनेक रोग रुग्णाला सामाजिक अजञातवासात ढकलतात. यांपैकी अनेकांना O C D असतात. समाजात जाणिवेचा अभाव, शून्य सहानुभूती, फुकटचे येडपट सल्ले, मदतनीस अजञानी असणे अशा अनेक अडथळ्यांशी पालकांना झुंजावे लागते. "फार लाड करता तुम्ही. आम्ही असतो तर फोडून काढले असते " इथपर्यंत शेरे ऐकावे लागतात. ख्रिश्चन शेजारी असतील तर थोडी मदत होते. ह्या लोकांमध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आणि करुणा असते. एकंदरीतच भारतात वैद्यक शास्त्र आणि त्यातही मानसोपचार शास्त्र आणि रुग्ण याविषयी जागृती फार म्हणजे फारच कमी आहे.

फार लाड करता तुम्ही. आम्ही असतो तर फोडून काढले असते " इथपर्यंत शेरे ऐकावे लागतात.
>>>>>

हि जुनी पद्धतच बरी होती वाटते.
मुलं माराने कोडगी होतात म्हणे. डिप्रेशनच्या विरुद्ध असेल तर चांगलेच आहे हे असे वाटते.

सुशांतसोबत 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेली आणि कुटूंबाव्यतिरिक्त त्याला सर्वाधिक ओळखणारी व्यक्ती म्हणजे अंकिता लोखंडे. तिने व्हिडियो बनवला आहे व त्यात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Pages