वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका ट्रकच्या मागे लिहिलेल होत.

सिक ले बेटा ड्रायव्हरी, फुटे तेरे करम,
खाना मिले कभी कभी, सोना अगले जनम.

My money goes to XYZ... college/university.
(don't know where my kid goes)

बर्‍याच गाड्यांवर हा स्टीकर दिसतो...

विनय Happy

My other car is a Ferrari.
It is parked right now in my head

विकेन्डला एका टॅक्सीवर (मेरू किंवा कूल कॅब टाईप) पाहिलं. Happy

पार्ले जी Happy

ग्रिनीचमधे एक जॅग नेहेमी दिसते- ITSMYJAG. गेल्या आठवड्यात ट्रॅफिकमधे अडकले होते. अचानक ती गाडी दिसली. अनोळख्या ठिकाणी गर्दीत कुणीतरी ओळखीचं दिसावं तसं वाटलं.

My chihuahua is smarter than your honor roll student!!

I will keep my money, I will keep my guns! You keep the change!!

JAIHO ही रजिस्ट्रेशन प्लेट पण बघितली.

खूप वर्षांपूर्वी दिल्लीहून आग्र्याला जाताना एका ट्रकच्या पाठी ही वाक्ये दिसली होती - "अगर ड्रायवरने नशा कर डाला, तो समझो फोटोपे चढ गयी माला".

कोल्हापुर मध्ये रिक्क्षाच्या मागे हमखास पाहीलेला वाक्य... "लेट्स चिंगळी" .... Uhoh काहीच्या काही लिहीतात बुवा...काय कळलं न्हाय बगा....

आज ट्रॅफिकमधे थांबले असताना एका गाडीच्या मागे लिहिलं होतं "कालू ह्यांचा श्री गणपतीचा कारखाना" ह्याचा पूर्ण उलगडा व्हायच्या आत सिग्नल ग्रीन झाला आणि ती गाडी पुढे निघून गेली. पण हा कारखाना कुठे आहे ह्याची उत्सुकता कायम राहिल Happy

एका रिक्षावर लिहिलं होतं "शराब शरीर और आत्मा दोनोका -- करती है". -- च्या जागी एक पांढरा चौकोन होता त्यामुळे तिथे "नुकसान", "विनाश", "कल्याण" ह्यापैकी काय शब्द होता हे तो रिक्षावालाच जाणे.

तिसर्या रिक्षावर "Keep Distance" हे वाक्य इतक्या छोट्या अक्षरात लिहिलं होतं की त्या रिक्षाच्या अगदी जवळ गेल्याशिवाय दिसलंच नसतं. Happy

.

काल गाड्यांवर पाहिलेली २ वाक्यं:

१. भारत महासत्ता होणारच

केव्हा हे मात्र लिहिलेलं नव्हतं Happy

२. आले बाई दाजिबा

आता हे दाजिबा ओव्हरटाईंम करून बायकापोरांसाठी जास्त पैसे कमावणार्‍यापै़की का दारू घेऊन गटारात पडणार्‍यांपैकी हा खुलासा करून घेता येणं अशक्य Happy

दोन मुक्ताफळं!!

१) बघतोस काय, मुजरा कर !
२) बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलय तुला वाघानं!

कालच पाहिल एका दुचाकीवर.
भगव्या अक्षरात लिहिल होत वाघ तो वाघच अस.

आणखी एक रिक्षा तत्वज्ञान
दोस्त गद्दार, कुत्ता वफादार
बहुतेक या रिक्षावाल्याचा एकही मित्र माणूस नसावा ...

आज एका मारूती कारच्या मागे लिहिलेले दिसले
HELL IS FULL, SO I AM BACK
अर्थ कळाला नाही Uhoh
तसेच या गाडीचा नंबर पण मजेशीर लिहिला होता.
लांबून २०९२०९ असा दिसत होता.
निट पाहिल्यावर दिसले MH12 २०|९२०९ असे होते Happy

काल पेपरमध्ये वाचलं की "3 Idiots" च्या जाहिरातीसाठी बर्‍याच रिक्षाच्या मागे "Capacity - 3 Idiots" असं लिहिलेलं आहे. त्यामुळे रिक्षात बसताना सांभाळून Happy

राहुलदा,
>>नानाचा जोर...
पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , अमोल , बबलु>> Biggrin Rofl Rofl

खरं तर ह्या बाफमध्ये हे बसत नाही तरी लिहितेच. रानडे रोडवर युनियन बुक डेपोजवळ जो चहावाला आहे त्याच्या दुकानात २ पाट्या आहेत. एक, कटिंग चहाचे ५ रुपये सुटे द्यावेत. हे कळलं पण पाटी २ अफलातून आहे - नोकरांना रोज पगार दिला जातो. ह्याचं प्रयोजन कळलं नाही.

नोकरांना रोज पगार दिला जातो>>> लेबर लॉमधून सुटका करुन घेण्यासाठीचे ते वाक्य आहे,त्याचा अर्थ इथे कायमस्वरुपी/मंथली पे रोल नाही,त्यामुळे पीपीएफ,पेंन्शन असल्या गोष्टी मालकाला द्याव्या लागत नाहीत.

Pages