चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
आता सहभागींपैकीही कोणीतरी कोडी जरूर द्या.
स्वतः कोडी तयार करण्याची मजा काहे औरच असते.

नवा खेळ : मराठी गाणे ओळखा.

या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील तीन कुठलेही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्याच बरोबर त्या गाण्याशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे.
गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. ही सगळी गाणी प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या ओठांवर असलेली आहेत.
चला तर मग पटकन ओळखू या…..

१. रान, तू, सांग : याच्या गायिका अभिनेत्री पण आहेत.

२. माझ्या, हेच, चुका : याचे गीतकार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते.

३. असावे, भिंती, नुसती : याचे गायक व व संगीतकार एकच व्यक्ती आहे.

४. किलबिल, बोलती, वाहती : या गायिकेने आपली कारकीर्द हिंदी चित्रपटात गाणे गाऊन सुरू केली.

५. वारा, हाक, आज : याच्या गीतकारांनी भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी या प्रकारची गीते लिहिली आहेत.

६. जीवनी, आली, पाऊली : याचे संगीतकार जोडीने दोन पुरुष आहेत.

७. नयन, धार, जळी : याचे भक्तीगीत गायक जितेंद्र अभिषेकींचे शिष्य आहेत.
***********************************************************************

३. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
४.किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती

सोपं केल आहे यावेळी तुम्ही जरा >>>

लवकर सुटू लागल्याचा आनंद आहे.
गुगलयुगात अवघड कोडे बनवणे अवघड होते आहे... Bw

५ चूक. त्यात 'आज ' पण पाहिजे

मराठी म्हणी ओळखा *****
शब्दांची संख्या दिली आहे आणि अर्थ व हिन्ट दिली आहे.

१. चार शब्द
अर्थ जश्यास तसे उत्तर देणे.
तिसरा शब्द घेणे या क्रियापदाचे रूप

२. तीन शब्द
अर्थ छोट्या गोष्टीत खूष
पहिला शब्द एक प्राणी

३.पाच शब्द.... तिसरा शब्द तो
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते.

४. चार शब्द ....चौथा शब्द एक वस्तू
अडलेला माणूस याच्या पाशात सापडतो.

५.सहा शब्द ......चौथा शब्द आणने या क्रियापदाचे रूप
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

६.आठ शब्द .....सातवा शब्द पहाणे या क्रियापदाचे रूप
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.

७.चार शब्द.... दुसरा शब्द प्रकाशाशी संबंधित
गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.

८.पाच शब्द .....तिसरा शब्द स्त्री या अर्थाने
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.

९.सहा शब्द..... दुसरा शब्द खाणे या क्रियापदाचे रूप
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

हे मी आता जरा सामान्य वापरात नसलेल्या म्हणी वापरून बनवले आहे . बनवणे सुद्धा एक मजा आहे Happy !
धन्यवाद कुमार सर .

बरोबर
अजून थोड्या हिंट्स
प्रत्येक म्हणीचा पहिला किंवा शेवटचा शब्द
१. आली
२. कोल्हा
३. अति
४. शिडी
५.मुठी
६.विडी
७.अंगाभोवती
८. ओढ
९.केळी
थोड्या uncommon म्हणी आहेत.

३.पाच शब्द.... तिसरा शब्द तो
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते. >>>>

अति उदार तो सदा नादार

मी ह्या म्हणी पहिल्यांदाच वाचते आहे.. मस्त आहेत... मजा येते आहे.
9. केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले
नवीन Submitted by तेजो on 8 June, 2020 - 01:56

हाहा.. भारी म्हण आहे

>>>
१ आली अंगावर घेतली शिंगावर >>>

ही म्हण ५ अक्षरी आहे -
आली अंगावर तर घेतली शिंगावर
आणि त्याचा अर्थ 'आपल्या वाटेत कोणी आडवे आले तर ते आपण दूर करतो ' असा वाचला.
'जश्यास तसे उत्तर देणे' , हे मला जरा वेगळे वाटते. यात कोणीतरी आपली मुद्दाम खोडी काढतो असा भाव आहे.

Pages