चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

3या कुन्देदु तुषार हार धवला
6गुरु ब्रम्हा गुरु विष्णु
7गणाधीश जो ईश सर्वागुणाचा
9आकाशात् पतितं तोयं
10शान्ताकारं भुजग शयनं
11ब्रम्हानंदं परम सुखदं
14वदनी कवल घेता नाम
16प्रभाते मनी राम चिंतीत जावा
17कैलास राणा शिवचंद्रमौळी
18वसुदेव सुतं देवं
20त्वमेव माता पिता त्वमेव
21ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
सर्वांना धन्यवाद Happy

मजा आली. आता थोडे वेगळे कोडे देतो:

म्हणी ओळखा
एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा.

१. शरीर, नकार, दौड.

२. अवयव, भंग, प्राणी

३. बोट, पहाड, वाढ.

४. कप्पा, दाम, सम्राट.

५. कलत्र, ईश्वर, ती.

एक उदा. देतो.
(चादर, अवयव, कृती ) याचे उत्तर :

अंथरूण पाहून पाय पसरावे.

(शोधसूत्रातील शब्दक्रमाने जावे.)

३. बोट, पहाड, वाढ.
>>>>> करंगळी सुजली म्हणजे काय डोंगरा एवढी होईल ?

अवनी, नाही
आधी 'अवयव' येइल.
हा प्राणी एकदम लहान आणि सरपटणारा आहे !

2 डोकं, फुटो, साप
कप्पा = कोनाडा सम्राट=राजा, राव
म्हणींचं असं आहे की...लगेच सुचते नाहीतर अजिबात सुचत नाही......

* ठीक, सोपे करतो. Bw

२. अवयव, भंग, प्राणी : पाय, भंग, छोटासा सरपटी प्राणी

४. कप्पा, दाम, सम्राट. : वस्त्राचा कप्पा, दाम, सम्राट

५. कलत्र, ईश्वर, ती. : बायकोचे उद्गार !

@ अवनी,
मला वाटते की २ मध्ये साप नसणार कारण त्याला पाय नसतात.
5 मध्ये बायकोचा ' तिच्या' वर राग असणार.

Pages