चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी,
आता शिल्लक असलेले कोडे असे:
( शोधण्यास काही भर हवी असल्यास सांगणे !)

२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.

३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.

५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.

७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.

कटप्पा,
नंतर स्पष्टीकरण देतो.
वावे,
२. व्यंकटेश माडगूळकर >>>
हे लेखक बरोबर पण क्रमांक दोनचे वाक्य नाही

माडगूळकर यांनी कथा व कादंबरी दोन्ही लिहिलेल्या आहेत म्हणून अंदाज केला आणि तो बरोबर निघाला.
>>>
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
>>>> अरुण साधू ??

साद,
३. अरुण साधू ?? >>> चूक. हे इथे नाहीत.

साद, नाही

2 , 3 : त्यात एक लेखिका आहे.

अस्मिता >>> चूक.
म्हणजे आता ते २ च.
...
आता फक्त ३ राहिले....

वरील सर्वांना धन्यवाद . आता सगळी उत्तरे एकत्र देतो.

१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
वपु
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
सुनीता देशपांडे (‘मौज’, दिवाळी अंक २००२)

३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
अनिल बर्वे (११ कोटी गॅलन पाणी)

४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
अ अवचट (माणसं )

५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
व्यं. माडगूळकर

६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.
कुसुमाग्रज ( दिवाळी अंक )

७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
विजय तेंडूलकर ( कोवळी उन्हे )

………

Pages