चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.सहा शब्द ......चौथा शब्द आणने या क्रियापदाचे रूप
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.

सगळ्या बरोबर Happy !
धन्यवाद सर्वांना
हो साद...मी सर्व म्हणी एका वेबसाईटवरून जशास तशा अर्थासहित उचलून कोडे तयार केले होते. आणि मला एक दोन माहिती होत्या फक्त, म्हणून जरा uncommon असे म्हणाले. पण तुम्ही म्हणता ते सुद्धा असू शकते.

१.आली अंगावर, घेतली शिंगावर
चार शब्द अर्थ
जश्यास तसे उत्तर देणे.
तिसरा शब्द घेणे या क्रियापदाचे रूप

२.कोल्हा काकडीला राजी
तीन शब्द अर्थ छोट्या गोष्टीत खूष
पहिला शब्द एक प्राणी

३.अती उदार तो सदा नादार.

पाच शब्द तिसरा शब्द तो
"आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते."

४.अढिच्या दिढि सावकाराची शिडी.
चार शब्द चौथा शब्द एक वस्तू
"अडलेला माणूस याच्या पाशात सापडतो."

५.उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
सहा शब्द चौथा शब्द आणने या क्रियापदाचे रूप
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

६.एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
आठ शब्द सातवा शब्द पहाणे या क्रियापदाचे रूप
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.

७.काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती
चार शब्द दुसरा शब्द प्रकाशाशी संबंधित
गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.

८. का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ
पाच शब्द तिसरा शब्द स्त्री या अर्थाने
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.

९.केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले
सहा शब्द दुसरा शब्द खाणे या क्रियापदाचे रूप
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

@तेजो ते शब्द कंसात होते म्हणून मोजले नाही. तुमचे बरोबर आहे.
धन्यवाद मिनल , धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद माऊमैया, श्रद्धा !!

आतापर्यंतच्या कोड्यात असे दिसले की गाण्यांचे कोडे पटकन सोडवून होते. आता पुन्हा एक गाण्यांचेच देतो आहे पण जरा अवघड केले आहे बघा कसे वाटतंय…….

नवा खेळ : मराठी गाणी ओळखा.
या प्रत्येक गाण्याच्या ध्रुवपदातील काही शब्द जसेच्या तसे दिलेले आहेत. त्यानंतर या गाण्यांशी संबंधित एखाद्या कलाकाराबद्दलची विशेष माहिती दिली आहे. ती गाण्यांच्या अनुक्रमानुसार नाही.

गाणे ओळखल्यावर त्याचे ध्रुवपद पूर्ण लिहावे. ही सगळी गाणी प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या ओठांवर असलेली आहेत.
चला तर मग पटकन ओळखू या…..

१. ते, घर, सुंदर :
२. हात, पहा, माझ्या :
३. मंद, तरी का :

४. नाथ, ही, कृष्णा
५. आली, वेडी, ओल्या

६. आलं, हसतंय
७. नवीन, भावना, स्वप्न
.............................................................................................................

कलाकारांची वैशिष्ट्ये:

• याचे गीतकार दीड महिन्यापूर्वी निवर्तले. त्यांनी सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली.
• याचे संगीतकार एका ग्रामीण काव्यप्रकारचे गायक म्हणूनही गाजले

• याचे संगीतकार या गाण्याचे सहगायकही आहेत.
• याच्या गायिका प्रख्यात असून त्यांच्या नावाने चित्रपट संगीतातील पार्श्वगायकासाठी एक पुरस्कार आहे.

• याचे गीतकार हे नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध.
• याचे गीतकार हरहुन्नरी. त्यांचा ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत आणि नाट्य दिग्दर्शन यांतही संचार.

• याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त.

१. जे जे सुंदर
ते माझे घर
मी तर आहे
मस्त कलंदर
३ सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का

७. नवीन, भावना, स्वप्न
नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी

याचे संगीतकार या गाण्याचे सहगायकही आहेत. - सुधीर फडके

१ ते माझे घर ते मा झे घर
जगावेगळे असेल सुंदर

आशा भोसले पुरस्कार - याच्या गायिका प्रख्यात असून त्यांच्या नावाने चित्रपट संगीतातील पार्श्वगायकासाठी एक पुरस्कार आहे

६ आलं, हसतंय

कु ण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय डौलात
गं खुदुखुदू हसतंय गालात

हे नक्की माहीत नाही - याचे संगीतकार एका ग्रामीण काव्यप्रकारचे गायक म्हणूनही गाजले - राम कदम?

२ हात, पहा, माझ्या :

हात धरी रे हरी पहा पण
करात माझ्या वाजे कंकण

गायिका माणिक वर्मा याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त

५ आली, वेडी, ओल्या
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाशवेडी ओल्या दवात न्हाली

गीतकार मधुसूदन कालेलकर याचे गीतकार हे नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध. ?

भरत,
३, ७, १, , ६, २ व ५ बरोबर. छानच !
फक्त......
२ ला मी गायक नसून गीतकाराचे वैशिष्ट्य दिले होते. उत्तर बरोबर.
( ते आता ४ ला लागू होइल ! )
राम कदम? >>> होय .

वावे,
कलाकार जुळला की नाही ते मी पाहिलं नाही.
>>> हे पाहणे आवश्यक.
अन्यथा ३ शब्द तेच असलेली बरीच गाणी असू शकतात .

म्हणजे २ हात धरी रे हरी पहा पण
गीतकार मधुकर जोशी याचे गीतकार दीड महिन्यापूर्वी निवर्तले. त्यांनी सुमारे चार हजार कविता, गाणी लिहिली

(पेपर वाचन बंद असल्यामुळे हे सुटलं. शो धलं तर मुरलीधर गोडे मिळाले होते०)

राम कदमांनी गायलेली गाणी आठवत नाहीत. लावण्याच असणार ना?

याचे गीतकार हरहुन्नरी. त्यांचा ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत आणि नाट्य दिग्दर्शन यांतही संचार - हे सुधीर मोघे. हा क्लु मी उगाच शोधत बसलो.

येईल, येईल !
आता एकच वैशिष्ट्य उरले आहे:

'याच्या गायिका एकेकाळच्या आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या गायिका. राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त.'

राष्ट्रपती पारितोषिक म्हणजे चित्रपट गीत गायनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार?
लता, आशा, अनुराधा पौडवाल , अंजली मराठे, आरती अंकलीकर टिकेकर, बेला शेंडे यांना मिळालाय.

आकाशवाणीच्या अ दर्जाच्या गायिका म्हणजे आरती अंकलीकर टिकेकर असायला हव्यात.

साद , भरत,
नाही. ४ च्या गायिका आता हयात नाहीत.
.........................
मंडळी एव्हाना हत्ती गेलाय आणि फक्त शेपूट राहिले.
संपवून टाका हे कोडे लवकर.......

राष्ट्रपती पारितोषिक म्हणजे चित्रपट गीत गायनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार? >>>

नाही, हे त्याकाळी 'पारितोषिक' वेगळे असायचे.

Pages