अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे विजय देशमुख खतरनाक अनुभव आहे ..
धाग्याला धुगधुगी येत आहे. Lol
मलाही थोडे अमानवीय नाही पण अनाकलनीय अनुभव आले आहेत.
पहिला माझा स्वतः चा ...
माझ्या आईची आई जिला मी मोठ्याई म्हणायचे. तिचा पाच अपत्ये आणि तेरा नातवंडांवर सारखाच जीव होता. पण मी तिला तिच्यासारखी असे वाटायचे. असे घरातील इतर जणांना ही वाटायचे. ती गेली तेव्हा मी तिला भेटणे शक्य नव्हते. एक चार महिन्याच्या तान्ह्या आजारी बाळाला घेऊन भारतात जाणे शक्य नव्हते. मी तिला पोस्टाने फोटो पाठवले व फोनवर बोलले. तेव्हाही ती मलाच धीर देत होती .बाळ एक्स्ट्रीमली प्रिमच्यूर होते. (28 weeks)...नंतर ती तीन दिवसात गेली Sad .
नंतर काही महिन्यानी माझ्या स्वप्नात आली . माझ्या घराच्या दरवाजात उभी आहे. मी आत ये म्हणाले तर मी आता नाही येऊ शकत , तू खूशाल रहा असे म्हणून गेली. दोनच महिन्यानी तिचे वर्ष श्राद्ध होते. त्याच्या नंतरच्या महिन्यात आम्ही काळजी घेऊन सुद्धा मी प्रेग्नंट राहिले. मला खूप गोड मुलगी झाली. तिची बघण्याची पद्धत, डोळे, स्वभाव , अतिस्पष्टवक्तेपणा हुबेहूब मोठी आई...अर्थात हे जिनेटीकही असू शकते. पण वर्षश्राद्धविधी नंतर दहा महिन्यात झालेली ही एकटीच आहे कुटुंबात...पपांकडे कुठलेही लहान मूल पाच मिनीटात जाते... ही कधीच गेली नाही.
कुठलेही लेकरू माझ्याकडे आल्याशिवाय राहूच शकत नाही हा पपांचा आयुष्यभराचा आत्मविश्वास हिने क्षणात घालवला. Lol हिचा आईवरच जीव !! तिच्या बाबा पेक्षा दादा जीव की प्राण Happy . माझ्या मामेभावंडाना सुद्धा फोटो बघीतल्यावर हेच वाटले होते. मी हे विसरले होते आता आठवले.

अजूनही दोन तीन अनाकलनीय अनुभव आहेत. पन्नास वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.
आईच्या नात्यातील एक तरुण ..खूप हुशार अत्यंत प्रेमळ असलेला त्यांना आलेला. ते बायोलॉजी एमएसी करत होते. ते एकदा असेच सहलीला गेले होते जंगलात. तिथे एक पडकी विहीर होती. तित त्यांनी वाकून पाहिले असताना त्यांच्याशी काहीतरी बोलले म्हणे आणि दिसले सुद्धा . ते काही अंधश्रद्धाळू नव्हते. पण दोन दिवसांत त्यांना चित्र विचीत्र भास व्हायला लागले. आणि झोपेतून ओरडत उठायचे. तब्येत हळूहळू खालावत गेली आणि वर्ष भरात ते टायफॉईड ने गेले.
हे आईने सांगितले आहे. ते आज असले असते तर पंचेहात्तरी उलटलेले असते. Sad . पण आई टायफॉईड नेच गेले असतील असे म्हणून ती चर्चा वाढवू देत नसे.
अजून एक म्हणजे आमच्या घरात जेव्हा मला आणि माझ्या भावाला /भावजयीला बाळं झाली. त्याकाळात माझ्या आईच्या घराबाहेर अंगणात ( बर्याच वेळेला) सापाचे दर्शन होते. एरवी कधीच नाही. फक्त प्रेग्नन्सी आणि बाळ खूप तान्हे असताना. घरात नाही , बाहेरच. माझी बाळंतपण भारतात झाली नाही पण त्यावेळी सुद्धा हे झाले. असे तीनदा झाले , चौथ्या वेळेला (माझे दोन आणि भावाचे दोन )आई-वडीलच तिथे नव्हते..त्यामुळे माहिती नाही. मी बाळ एक वर्षाचे झाल्यावर जाऊन आले. त्यानंतर लगेचच सुद्धा एक साप निघाला होता. ते कधीही घरात आले नाहीत म्हणून तितकी भिती वाटली नाही. (आईला काळजी वाटली होती. कारण भाचा तान्हा होता एकदा आणि तिथे आला होता. ) दोन वेळेला संत पाचलेगावकर महाराज यांच्या आश्रमातुन सर्पमित्र आले आणि सापांना घेऊन गेले. एकदा तो खूप शोधून सुद्धा सापडला नाही. ( दिसला होता मात्र) हे सगळे वेगवेगळ्या ऋतू मध्ये झाले आहे. याचे उत्तर मिळाले नाही. आम्ही सगळे हे random समजतो तरी कधी कधी काय कारण असेल असे वाटते

Mala ya aadhi amanaviy anubhav aale nahit

Amachya ithe balkani madhe kahi kawale nehami yetat 2-4 warsha jawal jawal. Amhi tyana khayla deto.. 2-3 kawale repeat yetat.. Kahi khayla thewal nasel tar ordun haak martat mag amhi kahi khayala thewato grill madhe..

Tar tyani magcha ek mahina balkani chya grill madhe ekdam bajula gharata banawal aahe.. Tyat egg hota kahi diwasapurvi.. Amhi konich kahi tras nahi dila tyala kadhi.. Matra tya bajula kapade walat takayla etc gelo ko te kawale satark hotat.. Aani lamb jayla lawtat.. Te pan ok amhi.. Te kadechya bajula asalyane jast tikade jatahi nahi..

Mazi aai tyana khayla dete nehami.. Mi job la asalyane ghari kamich .. Pan jevha asen tevha tyana khaylach dila aahe.. Hardly kadhi udawal asel..
Tar aatta lockdown madhe gharich ahot.. Work from home..

Building khali walk la jane suru kela 2-4 diwas zale..
Kaal jast koni aajubajula nasatana ek kaawala warun khali yeun dokyat paay marun gela..
Mi ghabarale aani ghari aale.. Dokyawarun nahi, fakt anghol keli.. Waatal kahi nasel.. May b chukun khali yetana maral asel..

Aaj punha gele hote.. Tar parat almost tyach thikani parat dokyawar paay marun gela..

Kaay asat asa kawalyane maralyawar?

Asa dukha dharun basalya sarkha watatay aani bhiti pan watatey.. Kadhi mungila pan maral nahiye mi..
Asa kawalyane maran ashubh samajtat i guess.. Dont know..

आनंदी असाच एक किस्सा आमच्या गावी घडला होता. एका माणसाने कावळ्याचे घरटे असलेलं झाड तोडलं तेव्हापासून कावळा त्याच्यावर खार खाऊन होता. तो माणूस त्या एरियातून जात असला की कावळा त्याच्या डोक्यावर पाय मारून जायचा. आम्ही या प्रकाराला कावळ्याने शेंडी नेली बोलायचो. सगळे त्या माणसाला सांगायचे की डोक्याला काहीतरी बांध नाहीतर हातात काठी घेऊन जा म्हणजे कावळा जवळ येणार नाही पण तो दुर्लक्ष करायचा. शेवटी त्या कावळ्याची हिम्मत वाढली आणि एके दिवशी चक्क डोक्यावर बसून त्या माणसाच्या डोळ्यात चोच मारून डोळा फोडला. काळजी घ्या.

बापरे आनंदी ताई, काळजी घ्यावी. बर्याच वर्षापूर्वी आमच्या colonyमधे एक कावला असाच त्रास द्यायचा. फक्त त्याचा त्रास पगडीधारी शीख व्यक्तीना होत असे. कोणीही सरदारजी दिसला की हा कावला बाणासारखा यायचा आणि चोच मारायचा. कावळे माणसाचा चेहरा लक्षात ठेवतात.
बाहेर पडताना हातात एक काठी असू द्यात

Ha janawal ki dukha dharun attack karat aahe..
Actually tyach gharata tar nit aahe amachya ghari.. Tyala kahi tras pan dila nahiye.. Ulat tyanech dilay.. Amachyach balkani madhe gharatya pasun khup lamb basalo tar yeun ghiratya ghalato aani uthawato..

Chhan katta aahe basayla ha basuch det naahi..

Aai ne kiti kalaji ghetali tyachi ki gharat aahe tyat anda aahe mhanun..

Mi tar neutral kahich kela nahiye.. Radayla yetay.. Sad

Aadhich baherchya paristhiti mule kiti negative aahe sagala.. Office cha tras aani asach yatun baher padav mhanun walk suru kela tar he asa..

Kaahi upay pan nahi disat.. Sad

शेवटी त्या कावळ्याची हिम्मत वाढली आणि एके दिवशी चक्क डोक्यावर बसून त्या माणसाच्या डोळ्यात चोच मारून डोळा फोडला. काळजी घ्या.

Submitted by बोकलत on 28 May, 2020 - 10:46

खतरनाक

ना रहेगा बांस और ना रहेगी बांसुरी
ये घर मेरा है >>
वरील प्रतिसाद गायब झाल्याने (कावळ्यानी पळवला वाटते) प्रतिसाद डिलिट करण्यात येत आहे.

Dhanyawad bandu..
Kharach changale upaay aahet..
Bagha na wichar kala tar mi pan khup google karate.. Ani sakal pasun negative search kela ki kawalyane asa kela tar tyach meaning kay n all..

Tumhi positive upaay dila.. Thank you Happy

boklat कशाला घाबरवताय त्यांना...
आनंदी - घरटे बनवाल्यापासून तुम्ही बाकीच्या कावळ्यांना खायला देणे बंद केलाय का? त्यामुळे तो चिडला असेल... परत सुरु करा...

>>>>>>>>> बरोबर आहे आर्या. तसेच पत्रिकेतील चंद्र- नेपच्युन, गुरु- नेपच्युन यात नवपंचम योग असेल, किंवा बुध अष्टम ( आठव्या ) स्थानात असेल तर असे अनूभव येतात. पत्रिकेत गुरु- नेपच्युन योग असेल तर अध्यात्मात साक्षात्कार होतात. दृष्टांत होतात.
Submitted by रश्मी.. on 8 August, 2018 - 05:11
>>>>>>>
बरोब्बर असावे. माझा चंद्र कर्केत व नेप्च्यु वृश्चिकेत आहे व नवपंचम योगही (अंशाने) होतो आहे. मला असे अनुभव आहेत पण सांगावेसे वाटत नाही. विचित्र आहेत.

.

पनवती लागली राव

घरात माणसे 3 , एक मी , मला अगदी पांढरा शुभ्र शर्ट आणला , जो मी कधीच घालत नाही

मुलीला एक टेबल आणले , तर तेही आणणार्याने पूर्ण पांढरे आणले , त्यावर एक दुसरा कुठला स्पॉटदेखील नाही आहे.

लोक काय अडाणी आणि भिकारडे असतात , अरे एम बी बी एस दोक्तर रोज पांढरे बेड , पांढरे लिनन , पांढऱ्या गोळ्या , पांढरे पेपर ह्यातच असतो , आताच माझ्या समोरचा रुग्ण गेला त्याला पांढरेच घातले आहे. मग त्यांच्या घरात बाकी वेळेसाठी इतर रंगांच्या वस्तू कुणी आणल्या तर बिघडले कुठे , चाळिशीतला डॉकटर आणि शाळकरी मुलगी ह्यांना अगदी आवर्जून एकाच वेळी दोन पांढऱ्या वस्तू देण्यामागचा काय पर्पज ?

मी त्याच वेळी बोललो होतो , पनवती लागणार , शेवटी टेबलावर एक दिवस रात्री करण अर्जुनचा की राम लखनाचा व्हिलन विधवेवर रंग उडवतो तसे त्यावर स्केच पेनने रेषा ओढल्या ,

टेबल ताबडतोब हलवायला सांगितले, ते सकाळी सुताराने नेले.

तोवर दुपारी माझा ब्रेथलेसनेस वाढला आणि मी दुपारी लंच अवर्समध्ये तपासण्या केल्या , ते एडमिशन बोलले , मी चार पर्यंत ओपीडी केली आणि मग एडमीट झालो

अर्र काळजी घ्या. खरय हे. काही जणांना काही गोष्टी खरच सुट होत नाहीत. आपण म्हणतो असे काही नसते, पण जो अनूभवतो त्यालाच ते कळते.

पांढरा रंग अशुभ आहे असे माझे म्हणणे नाही

पण एखादा शेतकरी दिवसभर माती झाडे फुले बघतो , त्याला पांढऱ्या रंगाबद्दल भरती येणं , अरे हे तर अमुक लग्नात वापरतात म्हणे , किती सुंदर , किती शांत , किती पवित्र असे तो बोलणारच , काय जाते 2 मिनिटे बोलायला

पण 10 तास तोच रंग बघितलेल्या व्यक्तीने पुन्हा घरात तोच रंग कशाला बघायचा , त्याला नौशिया येईल ना ?

सकाळपासून बुंदीचा लाडू खाल्लाच नाही , त्याला संध्याकाळी एक लाडू दिला तर तो कसा वागेल ? आणि सकाळपासून 4 लाडू खाऊन झाल्यावर पुन्हा एक खा म्हटले तर तो कसा रिएक्शन देईल , ह्याचा अर्थ लाडू नाकारणारा अज्ञानी , अधार्मिक , उर्मट आहे का ?

अरे घरातील वस्तू आहे , जरा रंगी बेरंगी वगैरे दिसू दे ना , कुणाचे काय बिघडणार आहे ?

टेबल पायगुण दाखवत आहे

मी बेडवर , मिसेस दिवसभर माझ्यासोबत , मुलीला जवळपासच्या ओळखीच्यानी 2 दिवस बघितली , आता 4 दिवसांनी तिची शाळा सुरू होईल ,
पण बहुतेक तिची शाळा काही दिवस बुडेल

अमानवीय असेल नसेल, कल्पना नाही..

आमच्या रानात एक गडी होता चंद्रा नावाचा मूळ नाव चंद्रराव पण गाव चंद्राच म्हणायचं, कामाला एक नंबर, हा हा म्हणता पाणी सोडणार, ट्रॅक्टर हाणानार, पण खोड एकच, अधूनमधून देशीच्या गुत्त्यात जाणार, अन् जाऊन आला की गोठ्यात झोपणार, कारण त्याची बायको त्याला पिऊन घरात घेत नसे.

हळूहळू गडी डेली झाला, काम आवरून गुत्त्या वर जायचं हा शिरस्ता झाला, एकदोनदा मी हटकला तर करुण तोंड करून म्हणत असे

"दाद्याव चुकलो रे त्यो एक गल्लास उचलाय नगु व्हता" अन् शून्यात पाहत घळघळ रडत बसायचा. एरवी पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष वगैरे देऊन टुकिने संसार करणारा चंद्रा एकदमच भंजळल्यासारखा वागू लागला, घुम्या झाला, गंमत म्हणजे रोज ज्यांचं सडा सारवण चंद्रा करत असे ती आमची गुरे चंद्रा दारू टाकून गोठ्यात आला अन्चं खाटेवर आडवा झाला की दावणीला हीसडे मारत किंवा अस्वस्थ होऊन गळ्यातील घंटा वाजतील अशी मान हलवत बसत.

चंद्राची बायको एकदा संध्याकाळी दिवेलागणीला घरी येऊन उंबऱ्यावर रडत बसली, तशी आमची आजी ते अशुभ वाटून थोरल्या भावाला म्हणाली,

"आप्पा हीचे बघ की बाबा काहीतरी"

मी बाहेरून आलो तितक्यात, अप्पा चिडून ओरडला होता माझ्यावर,

"तात्या आत्ताच्या आत्ता जा अन् गुत्त्यातून त्या भडव्याला ओढत आण, सोन्यावाणी गृहस्थीला चुड लावतोय भोसडीचा"

आमचं अप्पा चिडला का वेताळ होतो म्हणून मी गप बाहेर पडलो, गुत्ता जवळ आला तशी मी गाडी कडेला उभी करून ठेवली अन् दबक्या पावलांनी खिडकीतून चंद्रा नेमका कुठं बसलाय बघू लागलो, तिथं चंद्रा एकटाच गयावया करत होता अक्षरशः समोरच्या खुर्चीकडे बघून, मला वाटलं चंद्रा अति पिण्यामुळे बरळत असेल पण एकंदरीत तो घरी आला तरी पिल्या नंतर पण शांत असे, तिथं चंद्रा भेसूर रडत होता,

"आर सोडा रे सोडा मला, नका माती करू रे, सोन्यासारखी बायको अन् दोन कच्चीबच्ची उघड्यावर पडतील माझी", मध्येच त्याचा चेहरा पिळवटून निघे, मध्येच हिंस्त्र होई , गुत्त्याचा मालक त्यावेळी त्याच्याकडे कावळा करतो तशी तिरकी मान करून एक डोळा बारीक करून चंद्राला एकटक बघत बसलेला होता.

अर्धातास असे झाल्यावर मालकाकडे कोणीतरी आल्यासारखे त्याचे लक्ष हटले तसे चंद्रा जीवाच्या आकांताने बाहेर पडला मी त्याला थोडे पुढे पळू दिले अन् नंतर त्याच्या मागे जोरात गाडी मारून त्याला सोबत घेऊन घर गाठले, मधेमधे तो मात्र मागे भयातिरेकाने वळून पाहायचा अन् माझा गियर वर असलेला डावा हात घट्ट धरून किंचाळायचा

"दाद्याव मला सोडव"

उत्तम तालीम, गाव उनाडक्या वगैरे करून पोसलेला माझा पिंड पण त्यावेळी टराटर फाटणे म्हणजे काय ह्याचा अनुभव घेत होता कारण चंद्रा मध्येच ओठांची टोके कानांना लावत हिंस्त्र हसे, मध्येच भेसूर रडे, असा काहीतरी झालेला चंद्रा वाड्यावर येईपर्यंत जरा शांत झाला,

परत आल्यावर आजीने चंद्राला पाहून अतिशय विचित्र तोंड करून थोरल्या भावावर ओरडली,

"आप्पा ह्याला मागं पडवीत ने अन् जात्याला बांधून घाल" त्यावेळी मात्र पाच फूट दोन इंच चंद्राने माझा अन् भावाचा तालमीत निघेल त्याच्या दुप्पट घाम काढला होता. मधेच मात्र तो शांत चेहरा करून

"माई (आजी) मला नक्की वाचवत्याल दाद्याव, अप्पासाहेब फार सोसताय तुम्ही मालक" वगैरे बोलत असे.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळ व्हायच्या आधी, आजीने गावातीलच दोन शिकलेले ब्राह्मण बोलवून घरी हनुमानाची काहीतरी पूजा करवून घेतली, त्याचा अंगारा लावून घ्यायला जात्याला बांधून घातलेला चंद्रा मात्र नकार देऊ लागला, जोरात हिसडे मारून त्यानं मनगटे अन् पिंडऱ्यांवर घट्टे पाडून घेतले होते, आजीनं त्यादिवशी चंद्राची बायकोमुले वाड्यावर ठेऊन घेतली होती ती पण घाबरली होती, अश्यातच चौघा पाच जणांनी त्याला धरून अंगारा माखला तशी तो ग्लानी येऊन पडला, पाऊण तासाने उठला तशी एकदम शांत अन् हसरा होता, बायकोला म्हणाला "मला माफ कर धनीण तुझं कुक्कू बळकट म्हणून हनमंताने मला वढून काढलं बघ".

त्यादिवशी रात्री, गुत्त्याच्या मालकाला paralysis किंवा अंगावरून वारे जाते तसे झाले अन् त्यातच तो महिनाभरात खपला, पुढे तंटामुक्त नशामुक्त गाव वगैरे कार्यक्रमात लोकांनी गूत्ता पाडून टाकला, तेव्हा गुत्त्या मागच्या गचपणात पाच शेंदूर फासलेले अन् हळद कुंकू वाहिलेले दगड सापडले, गावातल्या म्हाताऱ्या शहाण्या लोकांनी ते प्रकरण ओळखून लगेच त्या गुत्त्याचा जुना नोकर बोलवून त्याला विचारले तशी त्याने सांगितले की,

एकेकाळी गुत्त्याचा धंदा नीट चालत नसल्याने मालक कुठंतरी जाऊन ही पाच पितरं घेऊन आला होता, त्यासाठी तो जवळपास आठवडाभर गायब होता म्हणे, त्यानंतर तो रोज संध्याकाळी धंदा सुरू करायच्या अगोदर आतल्या बाजूला त्यांची पूजा करून कापूर पेटवायचा अन् एखाद गिऱ्हाईक हेरून त्याच्या पहिल्या ग्लास मध्ये एक चिमूट अंगारा टाकून द्यायचा, नंतर तो त्या गिऱ्हाईकाकडे एकटक बघत बसायचा अन् ती पितरं त्या माणसासमोर बसून त्याच्यावर गारूड घालून त्याला पाजत/ पिण्यास भाग पाडत, अन् जोवर ते गिऱ्हाईक पित बसेल तोवर तिथे राबता राहायचा बेवड्यांचा अन् धंदा उत्तम व्हायचा (म्हणे), अश्या फेऱ्यात चंद्रा अडकला होता अन् म्हणूनच तो संध्याकाळी ओढ लागल्यासारखं तिकडे धावत सुटायचा, पण तिथं गेल्यावर त्याला पश्चाताप होऊन तो त्या पितर अन् मालकांना गयावया करत असे, पण मालकाचे त्याच्यावरून लक्ष उठेपर्यंत तो काहीच करू शकत नसे, एकदा नजर जरा भंगली का चंद्रा धावत तिथून पळून जायचा.

त्यानंतर गावकऱ्यांनी देवऋषी वगैरे बोलवून ती पितरे गावातून घालवून हनुमानाचे पूजन करून भंडारा वगैरे घातला,

हा एक अनुभव आज शेअर करावा वाटला.

जेम्स वांड थरारक अनुभव मांडलात. करणी वगैरे प्रकार ऐकून माहित आहेत. लहानपणी माझ्या ओढणी चा चौकोनी तुकडा कापला होता हे आजीच्या लक्षात येताच तो पुर्ण ड्रेस च जाळायला सांगितला होता. दुरच्या एका नातलग स्त्री ने मामांच्या हॉस्पीटलात असलेल्या नवर्याला वाचवायला करणी करून गंंडांतर टाळायचा प्रयत्न केला होता असे ऐकले. तो मनुष्य वारला..

आज बरोब्बर ३० दिवसांनी हा धागा उघडला. नवीन वर क्लिक केल्यावर चंद्रा गडी (जेम्स वांड यांची पोस्ट) समोर आली. जरा वर जाऊन पाहिलं तर ब्लॅक कॅट यांची ती पोस्ट. मन चरकलं. ही पोस्ट लिहील्यावर अवघ्या काही दिवसातच..
त्यांना पर्सनली कुणी ओळखत असेल तर त्यांच्या मागे त्यांच्या मुलीची काळजी कोण घेतंय हे कळवावे ही विनंती. आई वडील , भाऊ किंवा अन्य कुणी नातेवाईक असतीलच. अन्यथा त्यांना गरज असेल आणि चालणार असेल तर आपण माबोकर काही मदत करू शकतो का हे प्लीज कळवा. __/\__

Pages