अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी , खतरनाक किस्सा .
बर्याच दिवसानी काहीतरी किस्सा वाचला . नाहीतर नुसत्याच गप्पा.

सुनिधी, अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला.
बाकीचे दोन्ही अनुभवपण लिहिण्यासाठी रायगडला अनुमोदन.

खतरनाक किस्सा सुनिधी. खूप दिवसांनी या जुन्या आवडत्या धाग्यावर आले .
बाकीचे दोन किस्से हि लिही ना .
दक्षिणा पुढचा 'अमानवीय...? - ३' धागा सुरु कर ना.

सुनिधी , खतरनाक किस्सा .
बर्याच दिवसानी काहीतरी किस्सा वाचला . नाहीतर नुसत्याच गप्पा>>> +111

अरे वा, वाचला का? कारण बोकलतांनी इथे जी जादु करुन ठेवली होती ती पहाता, इथे कोणी येईल की नाही व कोणी हे वाचेल की नाही शंका होती. Happy Happy

उरलेले दोन्ही वेळ झाला की लिहिते. एक बहुतेक जुन्या मायबोलीवर लिहिला होता, कुत्र्याचा. तो फार दु:खी होता. लिहायला पण दु:ख होईल पण शोधते व कॉपी करते. तिसरा छोटुकला आहे.

भयानक अनुभव!
जुन्या मायबोलीवरच आता काहीच दिसत नाहीये.. परत लिहावे लागतील दोन्ही प्रसंग.

कारण बोकलतांनी इथे जी जादु करुन ठेवली होती ती पहाता, इथे कोणी येईल की नाही व कोणी हे वाचेल की नाही शंका होती. >
तुझी शंका रास्त आहे. पण हा खरंच आवडता धागा होता आणि इतरांच्या विनंतीचा मन राखून जर 'बोकलत' या ID ने इथे लिहिणे बंद केले खरंच आनंद होईल

अमानवीय चे नवीन धागे वाचायची इच्छा होत नाहीच. दक्षिणा तूच पुढचे धागे सुरु कर ग

आमचं ऑफिस मुंबई seepz येथे आहे. आज ऑफिस मध्ये मुंबई मेट्रोच्या कामाचा विषय निघाला होता, तेंव्हा एका कलीग ने, जो जवळच राहतो त्याने बोलता बोलता सहज विषय काढला की त्यांच्या इथला एक दुनियादारीत अग्रेसर असणारा माणूस सांगत होता कि मुंबईत काही ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी नरबळी दिलेले आहेत. आता यात तथ्यांश तपासायच काम फारच जिकीरीचं आहे. पण त्याच्या त्या विषया मुळे मला आमच्या गावची एक तशीच गोष्ट आठवली नि मी ती त्यांना सांगितली पण.

माझं गाव देवगड, सिंधूदुर्ग येथिल. आणि आमच्या स्टॉप चे नाव 'रेडेबांध'. लहापणी शाळेत एकदा सांगितलेलं मी माझ्या गावाचं नाव, नि अख्खा वर्ग मला चिडवायला लागलेला.

कधी कसा आता आठवत नाही पण मी आमच्या गावच्या काकांना हा प्रश्न विचारलेला की असं विचित्र नाव का आपल्या स्टॉपचं? त्यावर त्यांनी मला जी कहाणी सांगितली तीच ही कथा 'त्या' नावामागची.

गोष्ट फार जुनी आहे, १८९० ची. त्यावेळी वाघोटन खाडी विजयदुर्ग येथून आत घुसून आमच्या वाडीच्या इथून पुन्हा समुद्राला मिळायची. त्यामुळे आमच्या गावच्या पुढून विजयदुर्गपर्यंतचा प्रदेश पूर्णपणे बेटासारखा बनलेला. तसं विजयदुर्ग फार पूर्वीपासूनच महत्वाचा आरमारी ठाणं असल्याने इंग्रजाना तिथपर्यंत रस्ता पोहचवण्यासाठी आमच्या वाडीच्या इथे खाडीवर बांध बांधणं क्रमप्राप्त होतं. तसा त्यांनी खूप प्रयत्न सुद्धा केला, पण बांध काही बनत नव्हता, वाहून जायचा, जवळ जवळ ३ वर्ष.

अखेरीस गावातल्या लोकांनी त्यांना मार्ग सुचवला. काही जुन्या जाणत्या माणसांच्या माहिती प्रमाणे तिथे एका शक्तीचा वास होता. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे मग त्या शक्तीला कौल लावला गेला. शक्ती ने कौल दिला, तिला बळी हवा होता...त्यांनी विनंती केली कि कुणाच्या तरी अंगात येऊन काय हवंय ते स्पष्ट बोलावं ...त्या विधीत तो बोलला ... 'माणसाच्या दोन जोडी हव्यात' ... म्हणजे दोन कपल, त्या शक्तीला निश्चित नरबळी हवे होते. पण त्या वेळचे ती लोकं यात मुरलेली होती. त्यांनी वाटाघाटी करत बोलले की 'आम्ही आठ पाय देतो'....शक्ती त्यावर राजी झाली. विधिवत त्या ठिकाणी दोन जिवंत रेडे पुरण्यात आले...त्यावर जो बांध बांधण्यात आला तोच तो 'रेडेबांध '. तो बांध आवाज जवळपास १२५ वर्षानंतर ही उभा आहे. हे स्थळ विजयदुर्ग पासून १० किमी पूर्वी आहे.

फार नाही अगदी अलिकडचा 2008 चा हा किस्सा आहे. त्यावेळी मी ठाण्यात वैतीवाडीत राहायला होतो. रात्री 9 ला कामावरून सुटून मी आणि माझा मित्र भायखळ्याहून ठाण्याला ट्रेनने येत होतो. त्यावेळी खुपच पाऊस पडत होतो आणि त्यामुळेच की, काय मुलुंडला गाडी येऊन अर्धा तास थांबली तरी पुढे सरकत नव्हती. शेवटी मित्र बोलला की, आपल्याला इथून डायरेक्ट बस आहे. थोडे जास्त पैसे जातील पण लवकर घरी पोहचू. मी लगेच होकार दिला. माझा मित्र पवारनगरला राहत होता आणि त्यावेळी बहुतेक 110 नंबर बस वागळे इस्टेट मार्गे जात होती. मित्राने मला 16 नंबरला उतरून पुढे थोडस चालत गेलास की, पोहचशील असं सांगितलं पण नेमका रस्ता मला माहीत नव्हता कारण ह्या रस्त्याने मी कधी आलो-गेलो नव्हतो.. मी सोळा नंबरला उतललो मित्राने मला उतरतानाच नीट रस्ता समजाऊन सांगितला होता पण कसं कोण जाणे मी रस्ता चुकलो आणि आयटीआय काॅलेजजवळ पोहचलो. तिथे पोहचल्यावर लक्षात आलं की, मी रस्ता चुकलोय ते. रात्रीचे 12 वाजत आलेले. पूर्ण रस्ता सुनसान आणि त्यात पाऊस.. परत रस्ता विचारायचा तर कुणाला? पण सुदैवाने एक वयस्कर माणूस हातात छत्री घेऊन सावकाश मी ज्या दिशेने आलेलो त्या दिशेने हळूवार चालत जात होता. मी लगेचच त्याला गाठलं आणि माझी अडचण सांगितली. त्याने मला व्यवस्थित समजाऊन सांगितलं. काही खुणा पण सांगितल्या जेणेकरून मी पुन्हा विसरू नये म्हणून. मी त्याचे आभार मानले आणि चारच पावले पुढे चाललो आणि त्यांना ते कुठे चालले आहेत? हे विचारावं म्हणून पाठीमागे वळलो तर माणूस गायब?? परत कुठे दिसलाच नाही..

हुश्श.....
झाले २०००.
हा धागा पुढे सरकतच नव्हता. गेल्या काही दिवसात काही तरी अमानवीय घडले. अन २००० पुर्ण झाले.

<एक दुनियादारीत अग्रेसर असणारा माणूस सांगत होता कि मुंबईत काही ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी नरबळी दिलेले आहेत.>
महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी माध्यम इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात प्रबोधनकार ठाकरेंचा जी आय पी रेल्वे हा लेख आहे. त्यातून -

१८५३ मध्ये मुंबई - ठाणे रेल्वे सुरू झाली. लोक ती गाडी बघायला यायचे पण गाडीने प्रवास करायला घाबरायचे. त्यातले एक कारण -

" वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे, मुंबईला नव्या इमारती व पूल बांधताहेत ; त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस नेऊन माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे," अशी एक अफवा होती.

१७० वर्षांत वाफेच्या इंजि नावर धावणार्‍या गाडीच्या जोडीला मेट्रो आली तरी त्या अफवा अजूनही फिरताहेतच.

पण त्या वेळचे ती लोकं यात मुरलेली होती>>
कसली मुरलेली? एका मुंगीला किती पाय असतात, गोमेला कितीतरी पाय असतात.

>> Submitted by ऋनिल on 8 February, 2020 - 02:38

थरारक किस्सा आहे हा. रात्री अपरात्री अनोळखी भागात एकट्याने जाणे हेच भीतीदायक असते. पावसाळी रात्र असेल तर अजून थरार. त्यातही असे काही घडले तर बोंबच!

एका मुंगीला किती पाय असतात, गोमेला कितीतरी पाय असतात.>>> मुळात बळी हा प्रकार sacrifice प्रकारात मोडतो...पुर्वीच्या काळी फक्त स्वत: संगोपन करुन वाढवलेले पाळीव जिव बळी देण्याचा रिवाज होता...आताही काही ठीकाणी हा नियम पाळला जातो..

१७० वर्षांत वाफेच्या इंजि नावर धावणार्‍या गाडीच्या जोडीला मेट्रो आली तरी त्या अफवा अजूनही फिरताहेतच.>>>आताच्या बहूतेक अफवाच असाव्यात, कारण सध्या ह्युमन ऑरगन्स ला असलेली किंमत पहाता, माणूस सुटा करून विकणं जास्त फायदेशीर ठरेल...

सौ.चा अनुभव.
माझाही अनुभव तुम्हाला खरा वाटणार नाही.
मी एकदा दुपारी स्कूटरवर जात असताना, माझ्या नेहमीच्या रस्त्यावर अचानक माझ्या स्कूटरवर कुणितरी बसल्याचा भास झाला व स्कूटर डबल सीट सारखी जड झाली. थोडे अंतर पुढे गेल्यावर गाडी टर्न करीत असताना, गाडिवरुन कुणीतरी उतरल्याचा भास झाला आणी गाडी देखिल हलकी झाली. नेहमी गाडी चालवण्यार्‍यांना सिन्गल व डबल सीट चा फरक निश्चितच जाणवतो. गाडी चौकातुन वळवल्यावर २ किमी अंतर हलकी होती. काही दिवसांनि कळले, कि तोच रस्ता सरळ स्मशानात जातो. आणि स्वर्गरथाच्या गाड्या तिथे मिळतात हे नंतर कळले. गाडी ज्यावेळि जड झाली, तेन्व्हा मी गाडी न थांबवता चालवत राहिले आणि टर्निन्गला गाडी स्लो झाली, तेन्व्हा गाडिवरुन कोणीतरी उतरल्याचा स्पष्ट भास झाला. परन्तु त्या दिवसभर किन्वा नन्तरहि मला कोणताच त्रास झाला नाही.

Pages