मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत
मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.
गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.
१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.
धन्यवाद अॅडमिन, हे चांगले
धन्यवाद अॅडमिन, हे चांगले झाले.
अॅडमिनराव हे लै झ्याक झालं.
अॅडमिनराव हे लै झ्याक झालं.
अतिशय उत्तम...धन्यवाद अॅडमिन
अतिशय उत्तम...धन्यवाद अॅडमिन
अॅडमिन, अत्यंत उत्तम
अॅडमिन, अत्यंत उत्तम
धन्यवाद, हे छान झालं,
धन्यवाद, हे छान झालं,
धन्यवाद अॅडमिन. हे मात्र फार
धन्यवाद अॅडमिन.
हे मात्र फार छान केलात.
धन्यवाद अॅडमिन
धन्यवाद अॅडमिन
खरंच मस्त! आता स्पेलिंग वरुन
खरंच मस्त! आता स्पेलिंग वरुन मराठीत ड म्हणायचं का द, त का ट? अशा नावांबाबतीत होणार्या गमती तरी टळतील आणि आपल्याला जे नाव अपेक्षित आहे त्यानेच लोक ओळखतील.
आपल्याला जे नाव अपेक्षित आहे
आपल्याला जे नाव अपेक्षित आहे त्यानेच लोक ओळखतील>>. टण्याची फार मोठी सोय होइल. बिचार्याला फार त्रास व्हायचा!!
पण मला अजूनही बदलता येत नाहिये!!
हे भलतीकडे पडले.
हे भलतीकडे पडले.
माझे सदस्यत्व मधे जाऊन नाव
माझे सदस्यत्व मधे जाऊन नाव बदलायची link नाही सापडत आहे. फक्त email ID आणि परवलीचा शब्द यासाठीच जागा आहे. am I missing something?
अगं नंदिनी, या सोमवार पासून
अगं नंदिनी, या सोमवार पासून अॅक्टिव्हेट होईल. तन्या का टण्या, चिनूक्स्/क्ष? अॅडम /एडिएम की अॅडमिनच? स्लार्टी, स्लार्ती, की एस्.एल. आरती? पण या सोयीमुळे एक प्रासंगिक विनोदाचा स्त्रोत बंद होईल.
मला अजूनही बदलता येत नाहिये!!
मला अजूनही बदलता येत नाहिये!! >>>
'या weekend पासून तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.' असं म्हटलं आहेत ना वर..
धीर धरा.. अजून सुरू व्हायचीये सोय.. येत्या वीकांतापासून होईल.. बरोबर ना अॅडमिन?
ओके. पूनम.. पण या सोयीमुळे एक
ओके. पूनम..
पण या सोयीमुळे एक प्रासंगिक विनोदाचा स्त्रोत बंद होईल>> कोइ बात नही. नविन काही चालू होइल!! स्त्रोत की स्रोत?? (असेच काहीतरी!!!)
स्रोत
स्रोत
पण मी म्हणतो देवनागरी आयडी
पण मी म्हणतो देवनागरी आयडी वापरायला सांगून तो तुम्ही आमच्या वर लादत आहात. आम्ही कोणत्या स्क्रिप्ट मध्ये आय डी लिहावा हे दुसरे कोण आम्हाला सांगणार? हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर , आविष्कार स्वातंत्र्यावर ,आक्रमण आहे. आमच्या पसन्तीचे स्क्रिप्ट वापरणे अधिक वस्तुनिष्ठ राहील.
हा हा हा... अॅडमिन दिवाबत्ती करा.... !
स्त्रोस्त्रस्त्स्त्स्त्त्स्रत
स्त्रोस्त्रस्त्स्त्स्त्त्स्रत्र.... बहुधा..
बरोबर ना अॅडमिन? >> अॅडमिन
बरोबर ना अॅडमिन?
>>
अॅडमिन सामान्य माणसाशी बोलत नाहीत. एक प्रकारची विशिष्ट आध्यात्मिक उंची गाठल्यानन्तरच ते प्रकट होऊन अनुग्रह करतात...
वा वा! हे खुपच छान
वा वा! हे खुपच छान झालं.
'मंजूडी' असा आयडी कोणी घेऊ नका बरं का. मी रूमाल टाकून ठेवतेय.
नंदिनी.२९११
नंदिनी.२९११
मी पण , पण मी "धनुडी"
मी पण , पण मी
"धनुडी"
हुड.. साजिरा माझा पण रुमाल.
हुड..
साजिरा
माझा पण रुमाल.
इकडे कसली स्वच्छता करताय
इकडे कसली स्वच्छता करताय रूमाल टाकून?
जेव्हा सुविधा सुरू होईल, तेव्हा वेळेवर या..
साजिरा, साजीरा, सजिरा, सजीरा
साजिरा, साजीरा, सजिरा, सजीरा असे ३-४ आयडी झाले तर? (हे आताच लक्षात आले. )
मग स्वच्छता करावीच लागेल ना काहीतरी.
आशूडी. मोठा पंचा.
आशूडी. मोठा पंचा.
धन्स अॅडमिन...
धन्स अॅडमिन...
psg चं बहुतेक 'रुमाली रहस्य'
psg चं बहुतेक 'रुमाली रहस्य' दिसतंय...
मोठा पंचा. >> असला का आयडी
मोठा पंचा. >> असला का आयडी हवाय तुला आशूडे
मी तर सुविधा सुरू होई पर्यन्त
मी तर सुविधा सुरू होई पर्यन्त रुमाल, पन्चे, चादरी न टाकता, स्वतःच त्या आय डी वर बसून राहीन
मी घेणारे आता हूड असा आयडी
मी घेणारे आता हूड असा आयडी
Pages