मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत
मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.
गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.
१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.
ते रीक्षाचे हूड बनवतात
ते रीक्षाचे हूड बनवतात त्यांना काय म्हणतात रे दिप्या? हूडमेकर ना?
mi thand ch h maazaa hi
mi thand ch h
maazaa hi rumaal
मला अजय आयडी नाही ना मिळणार
मला अजय आयडी नाही ना मिळणार अॅड्मीन
मग रोमनच बरं
झक्की अन टोणगा यांच्या
झक्की अन टोणगा यांच्या आयड्यांवर रुमाल टाकावा काय? (:विचारमग्न बाहुली:)
'आपुलाच वाद आपणांसि' चा जिवंत अनुभव येऊन मी वेडा होईन. मग मी यावर कथा लिहिन.
पण १ जानेवारीला तसा बराच टैम आहे अजून.
रुमाल... माझा आयडी ' ट्युलिप
रुमाल... माझा आयडी ' ट्युलिप '.
साजिर्याच्या मुद्द्यामध्ये
साजिर्याच्या मुद्द्यामध्ये दम आहे खरा. पण यावरही काहीतरी उपाय असेलच अॅडमिनकडे.
लय झ्याक..
लय झ्याक..
आधीच नाव (रोमन) बदलावेच
आधीच नाव (रोमन) बदलावेच लागेल का?
नाव नाय रे कुलदिपका, आयडीची
नाव नाय रे कुलदिपका, आयडीची लिपी बदण्याविषयी चाल्लाय. काय घाई असते एकेकाला लग्नाची...
किरू, रुमाल टाकलाय आधीच..
किरू, रुमाल टाकलाय आधीच..
माझापण रुमाल..........
माझापण रुमाल.......... मधुकर.७७
बाप रे. रुमालांचे गठ्ठेच
बाप रे. रुमालांचे गठ्ठेच जमणार आता अॅडमिनकडे.
धुवून वाळवून परत देतील ते
धुवून वाळवून परत देतील ते आपल्याला
अभिनंदन! प्रशासकांचे
अभिनंदन! प्रशासकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
मला एक कळत नाही, नवीन आयडी
मला एक कळत नाही, नवीन आयडी मिळणार म्हणल्यावर २९११, ७७ ही शेपटं कशाला हवी आहेत या लोकांना?
तो १३१२ बघा. त्याने केला का असला काही हट्ट?
तू पण घे की साजिर्या एखादं
तू पण घे की साजिर्या एखादं शेपुट, साजून दिसेल तूला ते
घ्यायला ते काय नांव आहे काय?
घ्यायला ते काय नांव आहे काय?
हे लई बेस झालम एडमिन.
हे लई बेस झालम एडमिन. धन्यवाद
किरु
नाव नाय रे आयडी हाय.
माझ आपलं "मनिषा लिमये" हेच बर आहे.
रुमालाची गरज नाही तरी रुमाल टाकलाय
हे छान झालं. रुमाल - स्वाती
हे छान झालं. रुमाल - स्वाती
तुमचा रुमाल तर .... माझं पण
तुमचा रुमाल तर ....
माझं पण धोतरं
"श्री" आयडी वर .
वा! हे झकास काम झाल. शनिवारी
वा! हे झकास काम झाल. शनिवारी होइन न सुरु.. नाही काय आहे.. शनिवारी आहे आमच गटग त्यामुळे आत्ताच मीही रुमाल टाकते... अमृता.
माझा पण रूमाल - अश्विनी.
माझा पण रूमाल - अश्विनी.
मी "सीमा" च घेईन. जास्त
मी "सीमा" च घेईन. जास्त complicated करायला नको.:)
अनिलभाई वर मी आधीच रुमाल
अनिलभाई वर मी आधीच रुमाल टाकलाय हं.
- अनिलभाई
माझाही रुमाल माझ्याच आयडी वर
माझाही रुमाल माझ्याच आयडी वर - सायोनारा.
माझा रुमाल-- प्राजक्ता आयडीवर
माझा रुमाल-- प्राजक्ता आयडीवर
वा. चांगली सोय झाली. आता मला
वा. चांगली सोय झाली. आता मला कोणी नाट्या म्हणणार नाही..
देवनागरी आयडीत स्पेस चालेल का?
त्यापेक्षा नातूशेठ असे
त्यापेक्षा नातूशेठ असे भारदस्त नाव धारण करा तुम्ही!
'मृण्मयी'वर रुमाल.
'मृण्मयी'वर रुमाल.
अॅडमिनसाठी एक शंका. या आधी
अॅडमिनसाठी एक शंका. या आधी पासवर्ड रोमन मध्येच टाईप करायचे सगळे. मग आता पासवर्ड बदलायचा का ? का जो होताच तो आता मराठीतूनच टाईप केला जाणार.
Pages