मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.

गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.

विषय: 
प्रकार: 

खरंच मस्त! आता स्पेलिंग वरुन मराठीत ड म्हणायचं का द, त का ट? अशा नावांबाबतीत होणार्‍या गमती तरी टळतील आणि आपल्याला जे नाव अपेक्षित आहे त्यानेच लोक ओळखतील. Happy

आपल्याला जे नाव अपेक्षित आहे त्यानेच लोक ओळखतील>>. टण्याची फार मोठी सोय होइल. बिचार्‍याला फार त्रास व्हायचा!!

पण मला अजूनही बदलता येत नाहिये!! Sad

माझे सदस्यत्व मधे जाऊन नाव बदलायची link नाही सापडत आहे. फक्त email ID आणि परवलीचा शब्द यासाठीच जागा आहे. am I missing something?

अगं नंदिनी, या सोमवार पासून अ‍ॅक्टिव्हेट होईल. तन्या का टण्या, चिनूक्स्/क्ष? अ‍ॅडम /एडिएम की अ‍ॅडमिनच? स्लार्टी, स्लार्ती, की एस्.एल. आरती? Lol पण या सोयीमुळे एक प्रासंगिक विनोदाचा स्त्रोत बंद होईल. Happy

मला अजूनही बदलता येत नाहिये!! >>>

'या weekend पासून तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.' असं म्हटलं आहेत ना वर..
धीर धरा.. अजून सुरू व्हायचीये सोय.. येत्या वीकांतापासून होईल.. बरोबर ना अ‍ॅडमिन?

ओके. पूनम..

पण या सोयीमुळे एक प्रासंगिक विनोदाचा स्त्रोत बंद होईल>> कोइ बात नही. नविन काही चालू होइल!! Happy स्त्रोत की स्रोत?? (असेच काहीतरी!!!)

पण मी म्हणतो देवनागरी आयडी वापरायला सांगून तो तुम्ही आमच्या वर लादत आहात. आम्ही कोणत्या स्क्रिप्ट मध्ये आय डी लिहावा हे दुसरे कोण आम्हाला सांगणार? हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर , आविष्कार स्वातंत्र्यावर ,आक्रमण आहे. आमच्या पसन्तीचे स्क्रिप्ट वापरणे अधिक वस्तुनिष्ठ राहील.

Happy Happy Happy हा हा हा... अ‍ॅडमिन दिवाबत्ती करा.... !

बरोबर ना अ‍ॅडमिन?

>>
अ‍ॅडमिन सामान्य माणसाशी बोलत नाहीत. एक प्रकारची विशिष्ट आध्यात्मिक उंची गाठल्यानन्तरच ते प्रकट होऊन अनुग्रह करतात... Happy

वा वा! हे खुपच छान झालं.

'मंजूडी' असा आयडी कोणी घेऊ नका बरं का. मी रूमाल टाकून ठेवतेय. Wink

साजिरा, साजीरा, सजिरा, सजीरा असे ३-४ आयडी झाले तर? (हे आताच लक्षात आले. Uhoh )

मग स्वच्छता करावीच लागेल ना काहीतरी.

Pages