मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.

गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.

विषय: 
प्रकार: 

नमस्कार webmaster, admin,

अनुस्वार जर a.N ने type होत नसेल तर कृपया Help मध्ये तो बदलाल का? माझ्यासारखे नवीन सभासद confuse होतील म्हणून, बाकी काही नाही. प्रतीसादा बद्दल धन्यवाद. Happy

अ‍ॅडमिन-टीम, मला मुखपृष्ठावरून देवनागरी आयडीने आत येण्यात जी अडचण येत होती, ती आता येत नाही.

५. काही काळानंतर (सुमारे महिनाभरानंतर) नाव बदलण्याची सोय बंद करण्यात येईल.
<<<
याबबत - कितपत शक्य आहे याची कल्पना नाही पण - मला असे सुचवावेसे वाटते, की ज्यांनी देवनागरीत आयडी घेतलेत, त्यांच्यासाठी ही सोय बंद करावी. ज्यांचे आयडी अजून रोमनमध्येच आहेत त्यांच्यासाठी जोपर्यंत ते देवनागरीत आयडी बदलत नाहीत, तोपर्यंत ही सोय खुली ठेवण्यात यावी.

मनःस्विनी, विसर्ग देण्यासाठी तुम्ही लिहिल्याप्रमाणेच कीबोर्डवरील कोलन हे चिन्ह वापरावे. (सेमीकोलन नव्हे)

धन्यवाद,
मदत समिती

धन्यवाद.
ह्या निमित्ताने मला हवा असलेला माझा सार्वत्रिक आयडी ही मिळाला आणि माझे खाते ही पुन्हा सुरू झाले.
आता लिखाणालाही सुरूवात होईल Happy

जेव्हा देवनागरीत "महेश" हा आयडी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावर आधीच रूमाल पडलेला होता.
हा आयडी घेतलेल्या "महेश मते" यांना विनंती केल्यावर त्यांनी माझा "महेश" हा आयडी देऊ केल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !

Pages