मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.

गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.

विषय: 
प्रकार: 

त्यापेक्षा नातूशेठ असे भारदस्त नाव धारण करा तुम्ही! >> नको.. हे म्हणजे नाव लावायचं राजे भोसले आणी चालवायची पिठाची गिरणी असे होईल... Happy

मी needhapa हाच आयडी वापरणार आहे. मला बाहेरगावी मोबाइलवरून नेट अ‍ॅक्सेस करायला बरं पडतं. युनिकोड वाले मोबाइल आले की बदलीन मी. पण म्हणून कोणी नीधप चोरू नका.

तुमचा सध्याचा ID बदललाच पहिजे असं नाही. ही सुविधा आहे, ज्यांना हवंय ते बदलू शकतात. हा बदल सभासदांना स्वतःच करावा लागणार आहे.
तुमचा आधीचा पासवर्ड तसाच रहाणार आहे. अर्थात बदलायच असेल तर तो रोमन किंवा देवनागरीपैकी कुठलाही चालेल.

हे नक्की कसे करायचे कळले नाही. थोडे दिवस न्हवते माबोवर तर इतका बदल. Happy
मी संपादन मध्ये गेले तर नक्की कुठे आहे तो ऑप्शन की रोमन मध्ये नाव घ्या कुठलेही म्हणून?

काहीच कळले नाही. माझे ओरिजिनल नाव तेच दाखवते आहे 'नाव' ह्याच्यापुढे.

अ‍ॅडमिन मदत कराल तर बरे होइल. Happy

admin मी माझ्या सदस्त्यावर संपादन मधे जाउन आले, कुठे नाव बदलायची सोय दिसत नाहि आहे!!??

ही सुविधा आता चालू झालेली आहे. तुम्ही सदस्य खात्याचे संपादन करून "वापरायचे नांव" बदलू शकता. हे आपोआप होणार नाही. तुम्हाला आधी नेहेमीच्या ID ने प्रवेश करून "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.

याचबरोबर अजून एक सुधारणा केली आहे. धाग्याच्या लेखकाने जर प्रतिसाद दिला असेल तर तो आता वेगळ्या रंगाच्या पट्टीत दिसेल.

र्‍हस्व , दीर्घ , वेलांटी , उकार कायबी भानगड नाय आपल्या नांवात , एकदम शिम्पल , मर्हाटीत लिव्हा की विग्लिश मधे सेम सेम Happy रुमाल पण नाही हरवला Happy
धन्यवाद अ‍ॅडमिन

माझे नाव मी आत्ता देवनागरीमधे केले आणि मग बाहेरगावी जाताना जिथे मला सेलवर युनिकोड मिळत नाही(वाचता येते पण टायपता येत नाही) अश्या वेळेला परत तात्पुरतं रोमन मधे केलं तर चालेल का? अशी सोय आहे का? की एकदा झालं की झालं?

मी नंदिनी. २९११ कॅन्सल केले. Happy मज्जा!!! सर्व लेखन पण आपोआप देवनागरी आयडीवर आलेले बघून ही सुविधा देणार्‍या सर्व लोकाना मनापासून धन्यवाद!! नावासकट सर्वजण :"मायबोलीत" लिहू लागले.

धन्यवाद प्रशासक मन्डळी!
एकतर मला ज्ञ कसा लिहायचा ते कळन नव्ह्ते मी आय्डी उघडला तेव्हा. त्यामुळे माझ्या नावाचे न्यति, न्याति असे कायच्या काय होत होते. आता मस्त वाटतेय.

लिम्बुभाऊ बरे केलेत आयडी तोच ठेवला ते Happy

Pages