मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवरचे नाव (ID) देवनागरीत करण्याबद्दल नेहमीच सूचना असतात. मायबोली १३ वर्षांपूर्वी सूरू झाली तेव्हा युनिकोड अस्तित्वात नसल्याने सभासदांना रोमन लिपीत ID घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मायबोली जुन्या प्रणालीतून नवीन युनिकोड प्रणालीत आल्यावर देखिल काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा देणं शक्य होत नव्हतं.

गेले बरेच महिने यावर चाचणी समितीत चर्चा चालू होती. तिथे आलेल्या सूचना आणि तांत्रिक अडचणींवर काम चालू होतं. ते आता पूर्ण झालं आहे. आता तुम्हाला आपलं सभासद नांव देवनागरीत बदलता येईल.

१. नवीन ID घेण्याची गरज नाही. "माझे सदस्यत्व"मध्ये जाऊन संपादन करून "वापरायचे नाव" तुम्ही देवनागरीत बदलू शकाल.
२. नवीन आयडी घेताना उच्चाराप्रमाणेच नव्हे तर दुसरा कुठलाही घेता येईल (अगदी दुसरा रोमन सुद्धा) आणि तरी सगळ्या ठिकाणाचे सदस्यत्व, लेखनावरचे नाव अबाधित राहिल. (काहीही न करता सगळीकडे नवीन नाव दिसायला लागेल.)
३. सध्या आपले सर्वच सभासद ID रोमनमध्ये (english) असल्याने मुख्यपृष्ठावर सर्वसाधारण भाषा ईंग्लीश (रोमन लिपी) ठेवली आहे. तेव्हा नाव बदलल्यावर प्रवेश करतांना खाली असलेल्या पर्यांयांमधून मराठी निवडावी लागेल. काही दिवसानी बरेचसे मायबोलीकर देवनागरीत नाव वापरू लागले की सर्वसाधारण भाषा मराठी (देवनागरी) करता येईल.
४. देवनागरी नाव जे उपलब्ध असेल त्यातून मिळेल. तुमचेच रोमनमधले नाव देवनागरीत उपलब्ध असेल असे नाही. तसेच जर का एकाच Id साठी जास्त सभासद उत्सुक असतील (जी शक्यता खुप कमी आहे) तर आपापसात संवाद साधून तो बदलू शकतील. हे बदल करण्यासाठी बराच काळ दिला जाईल.

विषय: 
प्रकार: 

मनस्विनी,
तुम्हाला लिहायचे कारण की हे जे नवीन नाव तुम्ही घेतलेत ते माझे खरे नाव(रियल लाईफ नेम) असून मी इथे माबो वर बर्‍याच वर्षापासून वापरतेय. त्या नावाची माझ्यासाठी अशी एक 'ओळख' आहे. जरा विचित्र वाटले कारण असे कुणाचे तरी नाव घेण्यात काय अर्थ? तुम्हाला जर खरेच माहीत नसेल माझे नाव इथे अस्तित्वात आहे/होते तर समजू शकते पण मला तसे वाटत नाही म्हणून लिहिले. जरा विचार करा व वाटल्यास नाव बदलू शकता. त्यात तुम्ही ':' कसे देवून पुर्ण पणे नाव कॉपी करायचा प्रयत्न केला आहे. आधी तुम्ही मनस्वीनी होते व आता मनस्विनी केलेय.
बाहेर कुठेही दोन नावे असु शकतात. पण इथे ह्या 'मायबोली' फोरम वर तसेच्या तसे नाव कॉपी करायचा प्रयत्न मला समजला नाही म्हणून इथे लिहायचा खटाटोप.
मला उत्तर द्यायचे असेल तर ह्याच 'मायबोलेलेवर देवनागरीत नाव' ह्याच बीबी वर देवू शकता.

कदाचित ऑनेस्ट मिस्टेक म्हणतात तसे झाले असू शकेल इथे. ही मनस्विनी म्हणजे नयना मोरे ना? त्यांना ईमेल करून पहा मनःस्विनी.

हो म्हणूनच तसे लिहिले की 'त्यांना जर कल्पना नसेल तर समजू शकते.' Happy

वाद घालायचा हेतूही नाहीये पण वाटले की सांगावे त्याना(मनस्विनी). Happy

अ‍ॅडमिन, माझा सायोनारा हा आयडी लॉक करुन टाका. एकदा ही आयडी बदलायची सुविधा संपली की कोणी तो वापरायला नकोय.

नमस्कार अ‍ॅडमिन, मी ५-६ वेळा प्रयत्न केला पण आयदी न बदलता खालील मेसेज दिसतोय प्रत्येक वेळी, क्रुपया मार्गदर्शन करा...

The e-mail address is already registered. Have you forgotten your password?

माझा सायोनारा हा आयडी लॉक करुन टाका.>> असा कुठलाही ID आम्ही लॉक करणार नाही आहोत. वरती जसं लिहिलंय त्याप्रमाणे जर देवनागरी ID उपलब्ध असेल तर तो तुम्हाला मिळेल. जर तुम्ही बराच काळ तो ID रोमनमधून वापरत असाल आणि आता दुसर्‍या सभासदाने तो घेतला असेल तर त्या सभासदाशी संपर्क साधून Id मिळत असेल तर प्रयत्न करा.

shraddhadinesh, आहे तोच आयडी एडिट करा. (तुम्ही नवीन आयडी घ्यायला जात असाल, पण ई-मेल आय्डी मात्र जुनाच देत असाल, म्हणून असे होते आहे बहुतेक).

सध्याच्याच आयडीत संपादन करा. वापरायचे नाव मध्ये तुम्हाला जे नवीन घ्यायचे आहे ते (मराठी / इंग्रजी) टाईप करून सेव्ह करा. पासवर्ड तोच ठेवू शकता किंवा बदलूही शकता. संपर्काचा इ-मेल आय्डी मात्र तोच (तुम्ही वर लिहिलेला) राहील.

shraddhadinesh,
काहितरी अडचण आहे तुमच्या खात्यात. ती नेमकी काय अहे ते तपासून सांगतो मग नांव बदलता येईल.

Admin,

एकदा देवनागरी नाव घेतले की इंग्लिश मध्ये लॉगिन करता येणारच नाही का ? असेल तर कोणत्या नावाने ?

मिलिंदा,
एक महिन्यानंतर जेव्हा ही नाव बदलण्याची सुविधा अंद करण्यात येईल तेव्हा तुमचं जे "वापरायचं नाव" असेल तेच नंतर कायम रहाणार आहे.

आता कसं 'होम पीच'वर आल्यासारखं वाटतंय.

(मुखपृष्ठावरून देवनागरी आयडीने प्रवेश करता येत नाहीय. लेखाच्या सुरुवातीला जिथे लेखकाचा आयडी दिसतो, तिथे त्याच्या आयडीतल्या वेलांट्या आणि मात्रे दिसत नाहीयेत.)

shraddhadinesh,
अडचण दुरूस्त केली आहे. तुम्हाला आता नांव बदलता येऊ शकेल.

गजानन,
वरील मुद्दा क्र. ३ पाहिलात का?

अ‍ॅडमिन, हो पाहिला ना. मुखपृष्ठावरचा मराठी पर्याय निवडला तरीही नाव रोमनमध्येच उमटते आहे. मी माझ्या फेव्हरीट यादीतला दुवा वापरून 'संपूर्ण मायबोलीवरील नवीन लेखन' या पानावर आल्यावर मला देवनागरी आयडीने प्रवेश करता आला.

आपले नाव कोणी घेतले आहे हे समजायचा काही मार्ग आहे का? "शोध" अशी सुविधा आयडी साठी आहे का? >> हो. वर मदतपुस्तिका अशी लिंक आहे त्यावर क्लिक करा आणी नंतर मायबोलीकरांची सूची. किंवा इथे जा.. http://www.maayboli.com/maaybolikar

अ‍ॅडमीन,

काही चर्चा/ग्रुप पानांवर धागा सुरु केलेल्याचे नाव नीट दिसत नाही.
उदा: http://www.maayboli.com/node/7293 इथे धागा सुरु केलेल्या नंदिनी चे नाव नीट दिसत नाही. शब्दांच्या मात्रा/वेलांटी गायब होतात...
Clipboard02.jpg

माझा एक घोळ होतोय इंग्रजीत आयडी टाईपताना तो kavaThIchaafaa असा टायपायचा का?
तसा टाईपला तरी लॉगइन होत नाहीये Sad

एकदा देवनागरी लॉगिन नेम घेतलंत की मराठीमधूनच लॉगिन करावं लागेल. त्याचं इन्ग्रजीकरण करून लॉगिन करता येणार नाही.

Admin,

मला माझं नाव बदलायला खुप त्रास झाला. "Shrikant" मधला "कां" हा मराठीत type करताना मी "Help" मध्ये दिल्याप्रमाणे "kaa.N" type करत होतो. पण नंतर कळलं की "kaa.n" type करावं लागतं. माझं माहिती चूकीची असेल तर सांगा.

काही पानांवर लेखकाचे नाव देवनागरीत नसले तर नीट दिसत नव्हते. मात्रा/वेलांट्या गायब होत असत. हो प्रश्न सोडवला आहे. तुम्हाला एखाद्या पानावर अजूनही हा प्रश्न येत असेल तर पान ताजेतवाने (Refresh) करून पहा.

अनुस्वारासाठी ".n" किंवा "M" यातले काहीही चालू शकते.

Pages