खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव माहीत नाही (बायकोशी भाण्डण झाल्यने तिला विचारायचे धारिष्ट्य नव्हते)
पण चवीला कमाल होते.
एक खाल्ले मग दुसरयाचा फोटो काढला.

तळटीप - यातले दही मी बनवलेय. पहिले खाऊन झाल्यावर त्यासोबत कश्या टाईपची चटणी छान लागेल हा विचार करून...

पिस्ता पुडिंग व ब्लु बेरी जेलो.

पिस्ता pudingबेरी jell-o

किट्टु धन्यवाद रेसेपी बद्दल. साबुदाणा वडा करतांना बटाट्याचे प्रमाण कमी ठेवायचे. ( मी प्रमाण सांगु शकत नाही पण १ वाटी भिजवलेल्या साबुदाण्यात पाव वाटी उकडुन कुस्करलेला बटाटा बास होईल. ) बटाटा जास्त झाला की वडे फुटतात, मऊ होतात किंवा विरघळतात.

इथले सगळेच नवे फोटो मस्त!
किट्टू, साबूदाण्याचे आप्पे पाकृसाठी धन्यवाद. हा मेला करोना गेला की नक्की करेन.

सामो ते पुडिंग आणि जेलो बाप्पासमोर ठेवून त्याला विचारात कि पाडलंत??
तो मोदकांची वाट बघत असेल तर हे काय आलंय समोर असं वाटलं असेल त्याला.

ShitalKrishna,

खल्लास फोटो!सुगरण आहेस बाई

सामो.. दोन्ही रेसिपी शेअर करा प्लीज.
चकली मस्त.
मी या 3 4 दिवसांत काही काही पदार्थ केले पण सगळे फोटो नाही काढले. पनीर टिक्का, ब्रोकोली सूप, क्रीम वेजीटेबल सूप, white sauce pasta, garlic bread आणि आज हक्का नूडल्स विथ (भरपूर) शेझवान चटणी.

पनीर टिक्का आणि क्रिमी वेज सूप
IMG-20200407-WA0027.jpg

<<< Vb मला आपला शाकाहारी बेतच आवडला.>>> थांकू किट्टू

<<< VB majja ahe tumchi....tumchya navrane tumchyasathi bhakri n kanda chutney banvali..mastch agdi gavron menu.. yummy..

Submitted by श्रवु् on 12 April, 2020 - 20:03
>>> <थँक्स श्रवू , मटण सुदधा नवऱ्यानेच बनवले होते, मी फक्त भात अन तांदळाच्या भाकऱ्या केल्या होत्या. अन चुलीवर करायला काय काय दिव्य केलीयेत ते आम्हालाच माहीत आहे, थँक्स टू लॉक डाउन.

धन्यवाद piku☺️

@shraddha <<खूप मस्त दिसतायत चकल्या..>> धन्यवाद

@देवकी <<खल्लास फोटो!सुगरण आहेस बाई>> Happy धन्यवाद Happy चवीने खाणार त्याला करता येणार Wink

@वेडोबा <<चकल्या बघून खाव्याशा वाटताहेत... >> धन्यवाद

@piku धन्यवाद.. पनीर टिक्का कातील दिसतोय

@श्रवु << Shitalkrishna..chakli mast..tumche saglech padarth..subak astat ekdam... >> चवीने खायची सवय हो दुसरं काय! धन्यवाद Happy

@TI << chaklya khasach patkan uchlun khavyashya watatayt! >> धन्यवाद Happy

@अथेना भजी जाम भारी दिसतायत

Todays special
मटरी/ मठरी

खरं म्हणजे खाऱ्या तिखट शंकरपाळ्या करायच्या होत्या, पण लाटून कट करण्या पेक्षा मठरी try करावी म्हटलं. त्यामुळे हळद आहे त्यात, नाहीतर हळद नसते मठरी मध्ये.

IMG-20200414-WA0027.jpg

कलोंजी टाकली आहे..

IMG-20200414-WA0028.jpg

@ ShitalKrishna आहाहा !! चकल्या एकदम खुसखुशीत दिसत आहेत .. मठरी पण मस्त
@Piku पनीर टिक्का आणि क्रिमी वेज सूप छान .. सूप ची रेसिपी पण सांगा ना
@अथेना खेकडा भजी भारी

Pages