खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ho..mast crispy hotat..n sabudana vade khalle n diet pan maintain..donhi goshtich samadhan..

Shreya....sankashti taat mastach..soyabeanchya bhajila n kadhila colour mast aalyay...

श्रेया-११,
मी अक्खे ताट संपवेन आणि डुलकी काढेन... सोया भाजी सोडून .

दही भात, कढी, चपाती मस्त खुसखुशीत आणि शेवेची खीर..

लॉक डॉऊन मुळे घरी जुगाड म्हणून चुलीवर शिजवलेले मटण अन रस्सा

Screenshot_2020-04-12-15-05-56-943_com.miui_.gallery_0.png

आणि ही नवऱ्याने माझ्यासाठी केलेली खास कांदा चटणी अन ज्वारीची भाकरी

Screenshot_2020-04-12-17-36-44-441_com.miui_.gallery.png

सुर्यगंगा, रश्मी धन्यवाद.
मागे थोपुवर टाकलेली रेसिपी तीच ईकडे काॅपी पेस्ट करतेय.
मी एक वाटी साबुदाणा तीन तास भिजवून घेतला. नंतर त्यातले पाणी काढून टाकले व त्यात चार छोटे उकडून स्मँश केलेले बटाटे, बारीक चिरलेली हिरवी मिरची,कोथिंबीर, एक वाटी शेंगदाणे कूट व मीठ घालून नीट मिक्स करून घेतले. अप्पे बनवण्यासाठी लागणा-या कन्सिस्टनसीचे मिश्रण बनवण्यासाठी थोडे पाणी घातले (दही देखील वापरू शकता). अप्पे पात्र नीट तापल्यावर थोडे तेल घालून प्रत्येक साच्यात मिश्रण घालून पाच मिनिटे झाकून ठेवले ,पाच मिनिटानी सर्व अप्पे परतून थोडे तेल टाकून परत पाच मिनिटे झाकून ठेवले. खमंग खुसखुशीत साबुदाणा वडे तयार. ते पण कमी तेलात.
मला साबुदाणा वडे तळून बनवता येत नाहीत. वडे तेलात सोडले की त्यांचे स्फोट सुरू होतात त्याची भिती वाटते. आणि खिचडी बनवता येत नाही म्हणून हा सोपा डायटवाला मधला मार्ग.

संकष्टीचं ताट अहाहा दिसतंय .
टरबूजात टरबूज ज्यूस हे भारीय.
Vb मला आपला शाकाहारी बेतच आवडला.
देवरूप eggless caramel custard ची रेसिपी द्याच.

हो पाथफाईंडर सोयाबीन चंक्स ची भाजी ...
धन्यवाद श्रवु , झंपी , Piku
मी अक्खे ताट संपवेन आणि डुलकी काढेन... सोया भाजी सोडून ---- आवडत नाही का ? आमच्याकडे सगळ्यात आवडत्या भाज्यांपैकी ही एक आहे

caramel custard कसल अफलातून दिसत आहे ..

तुम्ही दुसऱ्या दुकानातून साबुदाणा घेऊन बघितला का? माझ्या वड्यांचा पण एकदा स्फोट होत होता. भयंकर प्रकार . मी त्या दुकानातून साबुदाणा घेणं बंद केलं. पण मनात अजूनही इतकी दहशत बसली आहे की दरवेळेस वडे करताना पहिला वडा तेलात टाकला की लांब जाऊन उभी राहते.

तुम्ही दुसऱ्या दुकानातून साबुदाणा घेऊन बघितला का? >>> नाही.
मलाही दहशतच बसली त्या प्रकाराची म्हणून रेसिपीच बदलली.

VB majja ahe tumchi....tumchya navrane tumchyasathi bhakri n kanda chutney banvali..mastch agdi gavron menu.. yummy..

Mazyakade pan sabudana ahe..khichdi chikat hote mhanun nahi use kela..tasach padun ahe..tyache asech appe hotil ka ? Ki appe pan chikat hotil?

Chulivarche mutton n bhakri..mast....tondala pani sutle..aamhi 7 years back alibaug la gele hoto..tevha tithe chulivarchi bhakri n chicken khalle hote..tyachi aathvan zhali..

Thank you किट्टु२१ ..
माझे साबुदाणा वडे मस्त होतात पण deep fry पेक्षा हा option कधीही चांगलाच ..

VB कातिल फोटो.. कांदा चटणी बघून सिंहगड भजी ची आठवण झाली..
श्रवु साबु भिजवताना पाणी जास्त होतय का.. नाहितर फोडणीत (तूप, जिरं, मिरच्या) घालताना साबुदाणा मधे कूट मिक्स करून घ्या आणि मग एकत्र टाका

Piku mi dusra sabudana aanun khicdi keli... ti chhan zhali...mhanje rather once in a month mi kartech....pan to sabudanach chikat hoto mhanun tasach padun ahe..

IMG_20200412_214514.jpgलच्छा पराठा, पालक आलू, दाल तडका

Pages