खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आमच्याकडे मी बनवलेली शुध्द सात्विक पाभा होती. शेवटचा घास खाताना फोटोची आठवण झाली. पण पुढच्या वेळी नक्की फोटो टाकेन.

VB , रश्मी , राजसी , स्वाती२ , ShitalKrishna , Piku सगळ्यांना खूप खूप धन्यवाद !!

फलाफल ही अरबी डिश आहे. फलाफल हे काबुली चण्यापासुन बनवतात आणी हमस चटणीसारखे असते ++१
@Shraddha कढी सामोसे मस्त
@Piku Thank you for the रेसिपि , आता सगळ्या भाज्या मिळतील तेव्हा नक्की करून बघेन , सध्या एक भाजी मिळते तर दुसरी नाही .

Madgane..mast..mala khup avdate..pan mi sabudana nahi ghalat..broken wheat ghalte..n lazy aslyamule coconut milk n vaparata gokul milk use karte....aata photo baghun khyachi iccha zhali tar udyach Karen..

मनगाने
नवीन Submitted by किट्टु२१ on 18 April, 2020 - 19:28
<<
हा नवा पदार्थ आहे माझ्यासाठी. काय आहे हे?

आग्या यांनी सांगितल्याप्रमाणे बेसन पिठात वाटाणे पीठ मिक्स करून बटाटेवडे केले मस्त झाले एकदम.
फोटो टाकायचा प्रयत्न केला पण जमत नाहीय.

हमस आणि फलाफल पाककृती
२ कप काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवा.
(हे प्रमाण हमस आणि फलाफल दोन्ही साठी मिळून आहे )
हमस -
१/२ कप भिजलेले चणे उकडुन घ्या .
१ वाटी तीळ
१ कप ऑलिव्ह ऑइल
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
१ लिंबाचा रस
१ चमचा अतिरिक्त ऑलिव्ह ऑइल
१ चमचा मिरची पावडर

कृती - मिक्सर मध्ये उकडलेले चणे (पाणी पूर्णपणे निथळून घ्या) , तीळ ,लसूण, लिंबूरस , मीठ,तेल एकत्र करून एकदम बारीक पेस्ट करा . हे बनवताना तेलाचा सढळ हाताने वापर करा. पाणी आजिबात वापरायचे नाही , लवकर खराब होते . काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा .६ ते ७ दिवस चांगले राहते. मिक्स सलाड मध्ये सुद्धा छान लागते . खायच्या वेळी वरून १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि चिमूटभर मिरची पावडर भुरभुरा . Deeping Ready

फलाफल -
दीड कप भिजवलेले चणे
१/२ चमचा जिरे
१/२ कप कोथिंबीर
२ हिरवी मिरची
१ मध्यम बारीक चिरलेला कांदा
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या
चवीनुसार मीठ
१/२ वाटी तांदळाचे पीठ
तळण्यासाठी तेल

कृती - भिजवलेले चणे , कोथिंबीर, लसूण, जिरे, मीठ सगळे एकत्र करून थोडेसे जाडसर वाटून घ्या . एका bowl मध्ये हे वाटण घेऊन त्यात चिरलेला कांदा घाला . लागेल तसे तांदळाचे पीठ घालून पॅटी बनेल असे बनवून घ्या .गरम तेलात तळा. खूप मोठ्या आचेवर fry करू नये नाहीतर आतून कच्या राहतात
फलाफल आणि हमस सर्व्ह करण्यास तयार आहे !

मला फोटो टाकायचे आहेत माझ्या मोबाईल मधून , image लिंक वर क्लिक केल्यावर एक फोल्डर दिसते आहे, पण empty आहे, फोटो upload कसे करायचे

इमेज -> अपलोड - फोल्डर -> तुमच्या पी सी किंवा फोनमधला फोल्डर निवडून इमेज सिलेक्ट आणि अपलोड करा -> इन्सर्ट फाइल . ही विंडो क्लोज करून बाहेर या.

लॉकडाउन मुळे सध्या घरात आहे.. आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.

१. रसगुल्ला - खास मुलाच्या अग्रहाखातर :
94101997_10221375730918122_4789773744979574784_n.jpg

२. टि - टाईम जीरा निमकी :
93844883_10221375726318007_2109647649001963520_n.jpg

३. जिलेबी :
92925650_10221276619880408_471947743972032512_n.jpg

४. पाणीपुरी : पुरी सुध्हा घरी बनवलेली आहे.
91775438_10221189507662657_2537780816679796736_n.jpg

IMG-20200420-WA0007.jpgIMG-20200420-WA0006.jpg
आज चॉकलेट केक केला होता.

Pages