डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पाथफाईंडर रोज लादी आणि किचन चा ओटा साबणाच्या पाण्याने पुसून घेते. घरात अडगळ ही फारशी नाही पण तरी बारीक बारीक झुरळ कुठे ना कुठे लपलेले दिसतात.. जनरली आपण बघतो तसे मोठे झुरळ नाहीयेत. हिट चा स्प्रे मी नाही वापरू शकता खूप वास येतो त्याचा म्हणून कोणीतरी हिट जेल सुचवले

@jui,
माझे प्रातिनिधिक उदाहरण देतो, माझे घर तळमजल्यावर आहे, किचनच्या भिंतीलगत चेंबर आहे.
घरात झुरळे नव्हती, पण प्रथमतः सापडली देवघरात, तुम्ही म्हणता तशीच. हळद, कुंकू व इतर पुजा साहित्याच्या वासामुळे जमा होत असत. ते सर्व साहित्य हवाबंद प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायला सुरवात केली.
तरीही झुरळे कमी प्रमाणात दिसत होती. शोध लागला की बाहेरील चेंबरमध्ये मधून उलटी आत येत आहेत. चेंबरमध्ये साफ करून घेतल्यानंतर हा प्रकार बंद झाला.

@अनु,
थोडे पाली विषयी,

खिडकी ला किटकांसाठी जाळी / स्लायडिंग जाळी असते. या जाळीबाहेर किटक उजेडाकडे आकर्षित होतात आणि त्यापाठोपाठ कोळी आणि पाल. या जाळीबाहेरील सर्व बाजूने एक फुट जागा स्वच्छ राहीली तर हा सर्व प्रादुर्भाव कमी होतो. झाडून जागा साफ करून हिट मारणे. स्लायडिंग काच आणी जाळी साफ करणे आणी त्याच्या बेचक्यात हिट मारणे हे १५ दिवसातून एकदा केल्यास फायदा होईल.

(न जाणो ती कुत्री मांजर पाल नामक डेजर्ट साठी येत असेल आणी न मिळाल्याने निषेध म्हणून ..... Happy )

विडालपर्णास (catnip) ,गवती चहा (Cymbopogon) ह्या विशिष्ट वनस्पती बाल्कनी तसेच खिडक्यांमध्ये कुंडीतून लावल्यास त्याचा दर्प झुरळांना तसेच डासानाही दूर ठेवण्यास मदत करतो. जंगली पुदिना (Ageratum conyzoides) हि वनस्पती अनेक प्रकारच्या कीटकांची प्रजनन क्षमता संपुष्टात आणते व त्यामुळे कालांतराने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. Clovite हे खास करून घोड्यांसाठी वापरण्यात येणारे जीवनसत्व कुठल्याही पशु वैद्यकीय दुकानात उपलब्ध असते आणि ह्याचा वापर झुरळांना पळवून लावण्यापेक्षा कायमसाठी संपवण्यासाठी अधिक परिणाम कारक दिसून येतो. बरणीच्या तोंडाशी झाकणाला ह्याची थोडी पावडर लावली असता झुरळे ती आवडीने खातात व दुसऱ्या दिवशी मरून जातात. ह्याच प्रकारे borax चा सुद्धा वापर करता येतो. कडूनिंब हि वनस्पती कीटकांच्या हार्मोन्स मध्ये बदल घडवून आणते व त्यांचे प्रजनन थांबवते. निंबोळीची पेंड जी शेतकी मालाच्या दुकानात उपलब्ध असते त्याचा वापर ह्यासाठी करतात.
इति झुरळ पुराण संपन्न

बाजीगर पाहिलाय हो आवडीने.पण तुम्ही पालीच्या पायाचा किस घेऊन नंतर तिला न ढकलल्याने जरा संदर्भ जुळवायला वेळ लागला ☺️☺️☺️
Submitted by mi_anu on 10 April, 2020 - 18:25
>>>
झी अनमोल वर बाजीगर चालू आहे. मुद्दाम थांबून तो सीन पाहीला. पायाला कीस नाही केले. सीन कापला का? ( विचारात पडलेला बाहूला)

बरोबरे
किस नाही करत,नुसताच पकडतो.
पिक्चर खूप दिवसांनी पाहिला त्यामुळे मेमरीत घोळ झाला.
https://youtu.be/LwAJpVUV1tM
शिल्पा शेट्टी चा ड्रेस भ या ण आहे.

पिसे नाही काढत आहे, पण माझी परिस्थिती " रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी " अशी झाली आहे. कधी संपणार हे लॉकडाऊन?

आता मी घाईत परत वाचताना सीन कापला का ऐवजी पाय कापला का वाचले आणि जाम घाबरले.
काल भिंतीवर एक शिशुपाल होते.त्यावर हिट मारले.पण ते पळून आमच्याकडे एक स्टोरेज एरिया आहे तिथे गेले.एकतर ते तिथे मारून पडेल किंवा 80ज च्या पिक्चर मध्ये धावणारा मुलगा एकदम मोठा हिरो बनतो तसे मोठी पाल होऊन बाहेर पडून भेडसावेल.जे प्राक्तन असेल त्यास निधड्या झाडूने सामोरे जावे हेच उत्तम.

पाली घराबाहेर असतात तेव्हा जास्त काळपट दिसतात आता आल्यावर पांढरट दिसतात. उन्हात रापल्या जातात की काय...

400

आता झुरळांच्या जोडीला काल पाल आली आहे मोठी Sad
अर्धे अधिक झुरळ तर जेल ने मारून टाकले पण मला पाल या प्राण्याची भयंकर किळस आणि भीती वाटते Sad

मला पालीची प्रचंड भीती वाटते, म्हणजे अगदी स्वच्छ माहीत असेल की रबरी /प्लॅस्टिकची आहे तरी मी हात लावणं दूर, पण बघूही शकत नाही. पाल जर घरात आली तर ती मेलेली पाहिल्याशिवाय माझं ब्लडप्रेशर नॉर्मल होत नाही. आणि त्यादिवशी रात्री पालीची, रादर अनेक पालींची स्वप्न पडतात.
काल एक काळी आणि अत्यन्त जाड पाल बागेत कुंडी मागे पाहिली आणि अर्थातच रात्रीची झोप भयाण होती. मी देव कधी प्रसन्न झाला तर सगळ्या भौतिक सुखांची हाव दूर ठेऊन एकच वरदान मागणार - देवा, प्लिजच पाली आणि सरडे पृथ्वीवरून कायमचे नष्ट कर आणि हे फार दुष्ट वाटत असेल तर कमीत कमी सगळ्यांना तिकडे देवलोकात घेऊन जा Sad

मला पाल प्लास्टिकची आहे असं दाखवून आणि आधी वॉर्निंग देऊन जरी माझ्या दिशेला टाकली, अंगावर नाही, नुसती माझ्या दिशेला टाकली, तरी मी पटकन मरू शकते Lol

☺️☺️☺️
पाली घरात नाही आल्या पाहिजेत.तो काही असा प्राणी नाही की चिमणी अडकली होती, खिडकी उघडल्यावर उडून गेली.आपण काठी ने दाराची किंवा उघड्या खिडकीची दिशा दाखवली की 'गो टू हेल' म्हणून मिडल फिंगर दाखवून त्या आपल्या दिशेला येतात.फार वाईट मूड मध्ये असल्यावर छतावरून चालतात.एकदा पाल छतावरून चालायला लागली की हे विश्वचि तिचे घर.मग काय बचाव करणार आणि काय मारणार.आपणच हार्ट ऍटॅक येऊन मरणे टाळावे आणि जीव मुठीत धरून ती धर्मयुद्धाचे नियम पाळून परत भिंतीवर यायची वाट पाहावी.

आपण काठी ने दाराची किंवा उघड्या खिडकीची दिशा दाखवली >>> छे छे ! हे अतीव शौर्याच कृत्य झालं. पाल दिसली की विरुद्ध दिशेला शक्य तितक्या लांब पळून जाणे हुशारपणाचं लक्षण. नवरा घरी असेल तर तिचा मृत्यू अटळ, नसेल तर भाडोत्री मारेकरी, जसं की सिक्युरिटी, ड्रायव्हर, फोन करून दीर किंवा मित्र मागववा लागतो. मी नवरा भारतात नसताना टेरेसमध्ये पाल दिसल्यावर ते टेरेस 20 दिवस बंद ठेवलं होतं. बाग सगळी सुकून काटक्या झाली होती Sad

सास बहु + गत जन्माच्या स्मृति असे काहीसे कॉम्बिनेशन ह्या पाली आणि त्यासंबधीच्या फोबिया मध्ये असावे का ह्याचा जीवशास्त्रीय तसेच इतर गूढ़ शास्त्र (?) शाखेच्या अभ्यासकांनी आवर्जून विचार करावा असे आता वाटू लागले आहे (ऋ-- हे तुमचे फेवरेट खानवाले शा खा नाहीये ह्याची कृ नोंद घेऊन त्याच्या अभ्यासकांनी धाग्यात शाखा आणु नये)

सॉरी पण एवढं काय घाबरायचं पालीला? ती काय येऊन चावणार नाही. हां चुकून अंगावर पडली किंवा अचानक हलली तर दचकायला होणं बरोबर आहे. किळस वाटणंही समजू शकते. पण मी घाबरत वगैरे नाही पालीला. आमच्याकडे दोन तीन पाली असतात. मी मारतबिरत नाही. दुर्लक्ष करते.
मी हे घाबरणाऱ्यांंची चेष्टा करायला सांगत नाहीये. तुमची भीती कमी करण्यासाठी सांगत आहे याची नोंद घ्यावी. Happy

खरं तर इतक्या छोट्या प्राण्याची भीती वाटायला नको.पण पालीच्या डोळ्यांकडे पाहिलं की मला ते मगरीचे डोळे वाटतात.ती आपल्याकडे बघतेय असं वाटतं.आणि पाल आपल्याला बाहेर पडता येणार नाही अश्या जागी भेटेल(उंच स्टूलवर उभं राहून शेल्फ उघडल्यावर शेल्फ मध्ये, जिना उतरताना उघड्या पायाखाली, अंघोळीला किंवा टॉयलेट ला गेल्यावर दार बंद केल्यावर दारावर वगैरे.)आणि आपण उंच जिन्यावरुन/स्टूल वरून पडून डोक्याला लागेल असं वाटतं.मी उभी आहे आणि पाल 10 फुटावर झाडावर आहे असं असेल तर अजिबात भीती वाटत नाही.

आमच्या घरात अचानक भुंग्यासारखे बारीक कीटक दिसायला लागले आहेत. काय आहेत ते समजत नाहीये. चप्पल वगैरे ने मारले तर मरत नाहीये.. जोडलेला फोटो बघून कोणी सांगू शकेल का काय आहे हे नक्की आणि त्यांना घालवायचा उपाय? गोचीड वगैरे नाहीये ना? आमच्या घरात कोणताही पाळीव प्राणी नाहीये..
कोरोना मुळे घराची लादी तर दररोज पुसली जाते स्वच्छता ही असते..
IMG_20200726_182514.jpg

हे प्राणी उडत नाही ना? नसेल तर बहुतेक ढेकूण असावा असे वाटतेय.मसुरीएव ढा आणि तशाच रंगाचा असतो.मी पहिला नाही ऐकीव वर्णनावरून लिहितेय.

नाव माहीत नाही, पण हा ढेकूण नक्की नाही. काळ्या रंगाचा असेल. याला हात लावा आणि वास बघा.. खूप छान, आल्हाददायक सुवास असतो. आणि हो, वास घेतल्यावर प्रतिक्रिया नक्की द्या.

श्रावण सुरू झालाय..
आता खाताही येणार नाहीत.
मारून फ्रिजरमध्ये ठेवले तर महिनाभर टिकतील का?

जोडलेला फोटो बघून कोणी सांगू शकेल का काय आहे हे नक्की आणि त्यांना घालवायचा उपाय? >>> omg हे तर डॉग्जच्या अंगावर असणारे टिक्स आहेत. तुमच्याकडे पाळीव प्राणी नाही तर आले कसे? या सिझनला (भारतात) हे खूप असतात. प्राणी गवतात गेले की त्यांच्या अंगावरून घरात येतात. घाबरवत नाही, पण हे वाईट चावतात. हे कशानेही मारले जात नाहीत आणि पटकन उडतात त्यामुळे पाण्यात बुडवणे पण अवघड. घरातले कशाने घालवायचे माहीत नाही, पण फ्लोअर क्लिनर बरोबर व्हिनेगर घालून बघा.
(डॉग्जसाठी एक इंजेक्शन किंवा मग गळ्यात घालायचा टिक बेल्ट असतो, त्यामुळे हे टिक्स दूर रहातात. शिवाय एक धातूचा कंगवा /फणी मिळते त्याने केस विंचरले की या टिक्स निघतात. फिरून आलं की दोन्ही वेळेस केस विंचरण Must )

बहुतेक ढेकूण असावा असे वाटतेय.मसुरीएव ढा आणि तशाच रंगाचा असतो.मी पहिला नाही ऐकीव वर्णनावरून लिहितेय.
Submitted by देवकी on 26 July, 2020 - 11:58
>>>
ढेकूण न पाहिलेले लोकही आहेत जगात??? मला तुमचा हेवा वाटतो...

श्रावण सुरू झालाय..
आता खाताही येणार नाहीत.
मारून फ्रिजरमध्ये ठेवले तर महिनाभर टिकतील का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2020 - 21:18

मी शाकाहारी आहे Happy

Pages