इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कव्हर ऑर्डर्स , मार्जिन ट्रेडींग वगैरे बंद असतांना तुम्ही लोक किती कॅपीटल ठेऊन ट्रेड करता ? म्हणजे बर्यापैकी व्यवस्थित ठेवावे लागत असेल ना ?

मार्केट पडायला लागल्यापासून जेव्हा मार्जिन घ्यायला जातो तेव्हा ऑर्डर रिजेक्टचा मेसेज येतो. शेवटी वैतागून ३०-३५ हजारात काय क्वांटिटी येईल ती घेतो.

मार्केट पडायला लागल्यापासून जेव्हा मार्जिन घ्यायला जातो तेव्हा ऑर्डर रिजेक्टचा मेसेज येतो. शेवटी वैतागून ३०-३५ हजारात काय क्वांटिटी येईल ती घेतो.>>>>>>>>>>

Lol Lol

#metoo

ITC बघू किती देतोय.>>>>>>> यात पण १.५% मिळाला.

रिलायंसने ट्रेलिंग स्टॉप लॉस ऊडवला.

आजचा दिवस मस्त गेला.

काल चा लॉस भरुन निघाला.

ITC झक्कास प्रॉफिट.....
१/३rd quantity अजून ट्रेल करतोय.....

रिलायंस चा स्टॉप लॉस ऊडाल्यावर ईन्फी घेतला ५७७ ला. तो पण आत्ता ३.२२ % वर

Watchlist for 26.02.2020
1. BALKRISIND(L)
BALKRISIND 26.02.20.JPG
2. ESCORTS(L)
ESCORTS 26.02.20.JPG
3. BATAINDIA(S)
BATAINDIA 26.02.20.JPG
4. CUMMINSIND(S)
CUMMINSIND 26.02.20.JPG

बोकलत,

तुम्ही किती स्टॉक्स ट्रॅक करता ?

तुम्ही किती स्टॉक्स ट्रॅक करता ?>>>>जेव्हडे FNO लिस्टेड आहेत ते सगळे. १०० च्या खाली किंमत असेलेले आणि ४-५ हजाराच्या वर किंमत असलेले शक्यतो ट्रेड नाही करत.

अतरंगी तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही डेरीव्हेटिव्ह/ऑप्शन डेटा पाहून ट्रेड घेताय. तुम्हाला चार्ट आणि ऑप्शन डेटाची व्यवस्थित माहिती आहे. कुठलं फिल्ड शिकण्यासाठी व्हास्ट आहे? चार्टमध्ये शिकण्यासाठी 100 गोष्टी असतील तर ऑप्शन/ डेरीव्हेटिव्ह मध्ये किती आहेत?

मी पण अजून शिकतोच आहे. त्यामुळे जास्त काय सांगणार ? मी दोन्ही पद्धती फॉलो केल्या आहेत. आता पण अधून मधून फार वेळ असला की चार्टस बघतो.

दोन्ही पद्धती मधे शिकण्यासारखे भरपुर आहे. दोन्ही पद्धती फायदेशीर आहेत.

मला डेटा अ‍ॅनेलेसिस पद्धत सोप्पी वाटते. कारण ती माझ्या आळशी आणि उतावीळ स्वभावाला पुरक आहे. त्यात मला फार कमी काम करावे लागते. एखाद्या लेव्हल ला ओपन ईंटरेस्ट तयार झाला आहे/ होत आहे हे कळले की फक्त मला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा हे बघून कोणत्या रकमेला किती युनिट्स घ्यायची हे ठरवावे लागते. मग मी त्याच्या प्री मार्केट ऑर्डर प्लेस करुन रिकामा होतो. ट्रेड झाला तर झाला नाही तर नाही.
या सर्व साठी साधारण रोज रात्री ३० स्टॉक्स साठी एक ते सव्वा तास लागतो. ट्रेडींग अवर्स मधे स्क्रीन समोर नसले तरी चालते. फक्त ट्रेड अ‍ॅक्टीव्हेट झाला की स्टॉप लॉस आणि टार्गेट ऑर्डर अपडेट करावी लागते. मला माझी नोकरी धंदा संभाळून कोणत्याही साध्या android फोन वरुन हे करता येते.

पण हेच जर मला चार्ट बेसिस वर करायचे झाले तर वेगवेगळ्या कँडलस्टीक्स, चार्ट पॅटर्न, व्हॉल्युम, सपोर्ट- रेझिस्टन्स हे सगळं वेगवेगळ्या टाईमफ्रेम मधे पहाणे, शिवाय कोणत्या स्टॉक्स चे रिझल्ट आहेत, कशा मधे काय न्युज आहे ह्यावर लक्ष ठेवणे, हे सर्व आले. या सगळ्या मधे मार्केट संपल्यावर कमीत कमी २ ते ३ तास जायचे. शिवाय चार्ट किंवा कँडलस्टीक बेसिस वर ट्रेड घ्यायचा तर कायम स्क्रीन समोर असणे गरजेचे आहे. मी स्क्रीन समोर असलो की उगीच जे घ्यायला नको ते पण ट्रेड घेतो.

चार्ट मधे/ कँडल्स्टीक पद्धती मधे मार्केट manipulation मुळे स्टॉप लॉस हिट होण्याचे प्रमाण जास्त आहे असे पण काही जण म्हणतात.

तुम्ही चार्ट्स पद्धतीत एक्स्पर्ट झालेले दिसत आहे. तुम्ही चार्ट्स आणि ओपन ईंटरेस्ट चे कॉम्बो कसे केले ते पण लिहा. मला पण शिकायला मिळेल.

डेटा अ‍ॅनेलेसिस चा सर्वात मोठा फायदा नोकरदार/ गृहिणींना आहे. ही पद्धत स्विंग ट्रेडींगला बेस्ट आहे.
रोज रात्री एक दिड तास दिला की झाले.

शिवाय एखाद्याकडे भांडवलाची कमी नसेल तर फक्त एखादा कॉल नाहीतर पुट विकून रोज स्टॉप लॉस ठेवणे आणि तो अधून मधून ट्रेल करणे ईतके केले तरी चार पैसे सुटतात.

मी शक्यतो पॅटर्न फॉलो करतो. हायर लो पॅटर्न बनला कि बाईंग प्रेफर करतो आणि लोअर हाय बनला कि सेलिंग. स्टॉक सिलेक्ट करताना डेली कॅन्डलस्टिक बघतो आणि प्रत्यक्षात ट्रेडिंग करताना 1min कॅन्डलस्टिक पॅटर्न बघतो. मार्केट सेंटीमेंट जर खूपच बुलिश किंवा बेअरिश असेल तर पहिल्याच मिनिटात एंट्री घेतो. आता डेरीवेटीव्ह डेटा बघायला लागल्यापासून एंट्री लवकर होते पॅटर्न फॉर्म व्हायची वाट नाही पाहत.

Trade on 26.03.2020
1. Cumminsind Short Loss Entry 368.85 Exit 371.20
Reason: Falling Market in morning, 8300 support for nse on option chain market start moving in up direction
CUMMINSIND TD 26.02.20.JPG
2. Balkrisind Long Profit Entry 847.75 Exit 869.40
Reason: Market moving up from 8300 support. Trailing SL hit.
BALKRISIND TD 26.02.20.JPG

मी आज प्रॉफीट बुकींगसाठी वेगळी पद्धत ट्राय करायची ठरवली. नेहमी पार्शियल प्रॉफीट बुक करतो. आज नाही केलं. स्टॉप लॉस पण ट्रेल नाही केले. या महीन्यात मार्केट volatile आहेच शिवाय आज मंथली एक्स्पायरी मुळे जरा अजुन manipulation अपेक्षित होतंच. आजचा दिवस उगीच निवडला ट्राय करायला.

थोडा लॉस झाला.

Watchlist for 27.02.2020
1. ACC(L)
ACC 27.02.20.JPG
2. BAJAJ-AUTO(L)
BAJAJ-AUTO 27.02.20.JPG
3. COLPAL(L)
COLPAL 27.02.20.JPG
4. SUNPHARMA(S)
SUNPHARMA 27.02.20.JPG
5. TECHM(S)
TECHM 27.02.20.JPG
6. PIDILITIND(S)
PIDILITIND 27.02.20.JPG
7. TATASTEEL(S)
TATASTEEL 27.02.20.JPG

शक्यतो भाव कॉपी मधून घेत चला किंवा मोठा ट्रेड घेणार असाल तर क्रॉसचेक करत चला. कधी कधी या मधे फरक येतो म्हणे.

कुठली फाईल डाउनलोड करायची? प्रत्येक स्ट्राईक प्राईझवर काय ऍक्शन झाले ते डिटेल्स पण येतात का एक्सेल मध्ये?

Pages