इंट्राडे चार्ट्स

Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20

शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.

IMG_20200105_101458.jpgScreenshot_2020-01-05-10-10-56-504_in.marketpulse.png

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज portfolio मधल्या ७५% goldbees विकुन प्रॉफिट बूक केले.
निफ्टी १०६०० च्या खाली गेला की उर्वरीत प्रॉफिट बूक करावे म्हणतो.

काही कारणाने सध्या महिन्यापासून ट्रेडिंग बंद आहे, आज वेळ काढला पण एवढ्या गॅप नंतर कुठले ट्रेड घेणे आज कठीण वाटतेय.

Gap up , gap down
फार प्रॉब्लेम करत नाही , कारण दोन्ही विकून हेजिंग करत असले तर फरक पडत नाही

गॅप ऑलरेडी झालेला असतो, नंतर ते तिथेच वर खाली होते

मार्केटमध्ये टेक्निकल काम नाही करत असा माझा आतापर्यंतचा अंदाज आहे. >>>>

मी खूप मोठा गॅप अप किंवा गॅप डाउन असेल आणि volatility जास्त असेल तर सरळ सुट्टी घेतो. बदल म्हणून घरची नाहीतर ऑफिस ची कामं करतो Happy

टेक्निकल analysis , डेटा analysis काही काम करत नाही अशा वेळेस. 28 फेब, 2 मार्च , काल एकही ट्रेड केला नाही.

भयाण दिवशी ब्रोकर मार्जिन देत नाही>>>>>

ट्रेड न करण्याचे हे अजून एक कारण......

काल पीडिलाईट माझ्या रेंज मध्ये आला आणि त्याच वेळेस zerodha चा bo co ब्लॉक केल्याचा आणि मार्जिन कमी केल्याचा मेसेज आला.

आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास......

अतरंगी बरं झालं, कारण पीडिलाईट भयाण वर गेला नंतर.
सगळा प्रॉफिट धुवून वर लॉस करून गेला.

नाही.

कारण मी १६४० ला शाॅर्ट करून १६३१, १६२४ ला प्राॅफीट बूक केला असता आणि बाकी quantity चा स्टाॅप लाॅस १६४० ला आणून ठेवला असता.

१६४० लाच का शॉर्ट केला असता हे गुरुवारची ऑप्शन चेन पाहिल्यास लक्षात येईल.

बोकलत,

तुम्ही मागे मी फॉलो करत असलेली पद्धत कुठे शिकायला मिळेल असे विचारले होते.

खालचा व्हिडिओ पहा. यातली मॅक्स पेन थेअरी सोडून बाकीचे सर्व ठोकताळे मी जसेच्या तसे वापरतो.

https://youtu.be/2u_87Z5YHEs

माहीत नाही. मार्केट मध्ये पॅनिक किंवा खुशीची लहर असेल तर कसले सपोर्ट आणि कसले रेजिस्टन्स...

सध्या एक तर शांत बसून राहीन नाहीतर hdfcbank सारखे शेअर्स किंवा इंडेक्स फंड मध्ये पैसे टाकेन.

आज बरंच करून झाल्यावर 500 रुपये प्रॉफिट कमावून गंगेत घोड न्हाल.
ब्रोकर मार्जिन फार कमी देताय.

एक अवांतर प्रश्न विचारावासा वाटतोय.

मी sbicards च्या आयपीओ साठी बीड केली होती, त्यानंतर फोनपे मध्ये जाऊन ऑटोपे रिक्वेस्ट असेंप्ट केली.
त्यानंतर चुकून मी ipo ची बीड डिलिट केली, तरीही autoपे रिक्वेस्ट अजून तशीच दाखवतय, आणि फ़ंड ब्लॉक झालेत.
तर हे फंड कधी रिलीज होतील, काही आयडिया?

Screenshot_20200308-184624.png

आणि ही ऑटोपे रिक्वेस्ट एक्सपायर झाल्यावर फ़ंडस रिलीज होतात का?

चिकन मटण चे दर खाली आले. त्यासाठी कोणत्या कंपन्यात गुंतवता येईल?
Venkys आहे एक त्यात थोडे गुंतवले आज.
अजून कुठले काही सजेशन?

today also market down.. can anyone suggest kuthle shares gheu.. but Large Cap. aattach L & T ghetale...

Yes बॅंकेचा शेअर ठराविक रेंजमध्येच फिरतोय. या situation मध्येपण दोन-चारशे रुपये दोन दिवसांपासुन दररोज पदरात पडले. उद्या बघु काय होतं.

can anyone suggest kuthle shares gheu>>> सध्यातरी कुठलेच घेऊ नका. सिप पण नका करू. आठवडाभर मार्केटला एका ठिकाणी सपोर्ट घेऊ द्या नंतर इन्व्हेस्ट करा ते पण सिप प्रमाणे.

Pages