जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतीशय समर्पक!
इतरही लेख वाचत आहे.
अलिकडे ईथे ठराविक परेड कंपनी चे जातीयवादी, विखारी, आणि घाणी ने भरलेले डबके सगळीकडे पसरलेलेले बघून माबो चे वाचन बंद केले होते.. ते नाही तर एका ठराविक आयडी ने स्वताच्या आयुष्यातील खाजगी घटना, दर दोन दिवसानी फालतू विषय घेऊन गाॅसिप करायला काढलेले बाफ..याने माबो ची निव्वळ शाब्दिक कचराकुंडी झाली आहे..
पण आता तुमचे लेखन वाचायला यावे लागेल.
का कोण जाणे पण लेखनशैली वरून पेशवे वाटतात.
लगे रहो.

सर्वप्रथम तुमचे आभार, या घटनांचे संदर्भ दिल्याबद्दल. यावरुन पवारसाहेबांनी समर्थांच्या बाबतीत केलेल्या विधानाला पुष्टीच मिळते. का आणि कसं ते सांगतो...

तुम्ही लिहिलेल्या पहिल्या मतप्रवाहा नुसार:
१. "समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली" - याचा लिखित पुरावा उपलब्ध आहे का? नसल्यास पुराणातल्या वानगी सारखा हा प्रकार आहे.
२. " पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला" - याचा लिखित पुरावा जो तुम्ही दिलेला आहे, तो इन्कंक्लुझिव आहे. माझ्या रीड नुसार, रामदास स्वामींनी महाराजांची त्यात स्तुती केलेली आहे, त्यावरुन रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते हा निष्कर्श कसा निघतो ते प्लीज सांगा. राज्यकर्त्याच्या कार्याची स्तुती करणं एखाद्याला गुरुपदी बसवत असेल तर आजच्या काळात श्री श्री रवि शंकर आणि जग्गी महाराज मोदिंचे (स्वघोषित) गुरु आहेत असं मानायला हरकत नसावी... Proud
३. शिवाय, "याच पत्रात समर्थ म्हणतात "तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही" - इथे समर्थ स्वतःच कबुली देत आहेत कि महाराजांशी त्यांची यापुर्वि भेट झालेली नाहि. अँड दॅट निगेट्स योर पॉइंट #१.
४. शेवटि, समर्थांची आणि महाराजांची भेट १६५०-५१ मध्ये झाली असं ग्राह्य धरुया. त्या भेटिनंतर महाराजांनी समर्थांच्या (सो कॉल्ड गुरुच्या) आदेशावरुन "मराठा तितुका मेळवावा..." हे ध्येय डोळ्यासमोर ठेउन स्वराज्याची आस बाळगली असं म्हणणं आहे का? मग तोरणा, चाकण, कोंढाणा, राजगढ हे किल्ले महाराजांनी काय पुण्याची जहागिर वाढवायच्या हेतुने घेतलेले?

थोडक्यात, पहिला मतप्रवाहंच इतका डळमळीत आधारावर उभारलेला आहे कि, दुसर्‍या मतप्रवाहाचं समर्थन करायची मला गरजच भासत नाहि...

मी पेशवे पण नाही आणि भिक्षुक ब्राह्मण पण नाही।
मला वाचायला आणि लिहायला आवडते

वाच राहा। प्रोत्साहन देत राहा।

रामदास महाराजांचे गुरू असतील नसतील,
पण पवारजी मोदींजींचे गुरू आहेत , हे मात्र आताच रेकॉर्डवर नोंदवून ठेवा, उगाच 2400 साली नवा वाद नको

>>> सर्वप्रथम तुमचे आभार, या घटनांचे संदर्भ दिल्याबद्दल. यावरुन पवारसाहेबांनी समर्थांच्या बाबतीत केलेल्या विधानाला पुष्टीच मिळते. का आणि कसं ते सांगतो... >>>

जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच ते वारंवार अशी विधाने करतात.

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/navimumbai-news/shivaji-ma...

शिवाजी महाराजांनी आपले गुरू समर्थ रामदास स्वामी यांना लिहिलेल्या सनदेतील मोडी लिपितील उल्लेख -

‘श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेऊनु विज्ञापना जे’ अशा मायन्याने हे पत्र सुरू झाले आहे.

https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/mumbai/badlapur-sa...

मी पेशवे पण नाही आणि भिक्षुक ब्राह्मण पण नाही।
मला वाचायला आणि लिहायला आवडते
वाच राहा। प्रोत्साहन देत राहा।
Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 12:52
>>> धन्यवाद. माणूस असणं महत्त्वाचं! चार दमड्या कमवणारानं पेशवा म्हणवून घेणं म्हणजे..., जातीच्या बाहेर पडा योग भाऊ!

>>जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच ते वारंवार अशी विधाने करता<<
यात जातीय तेढ कसा काय निर्माण झाला? पवारसाहेबांकडे असेल काहितरी सज्जड पुरावा, रामदासस्वामी महाराजांचे कुठल्याहि प्रकारचे गुरु नसल्याचा. त्यांनी ते विधान केल्यावर एकातरी ईतिहासकाराने/तज्ञाने त्यांना चॅलेंज केलंय का, किंवा त्यांचा दावा खोडुन काढलाय का? असल्यास दाखवा. बाकि, तुम्ही जो वर सनदेचा उल्लेख किंवा पुरावा दिलेला आहे, त्याच्या आधारावर रामदास्स्वामी महाराजांचे गुरु होते हा तुमचा दावा असेल तर पगारेसाहेबांनी राहुल/प्रियांका गांधींचा धडाडीच्या नेत्रुत्वाबाबत केलेला दावा नाकारण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाहि... Proud

धर्मरक्षणार्थ, संवर्धनार्थ महाराजांनी अनेकांना सनदी, देणग्या दिल्या. त्यात तुकाराम महाराज हि आले. त्याचा उल्लेख असलेली एखादि सनद उद्या कोणि शोधुन काढली, तर तुकाराम महाराजांनीहि शिवाजी महाराजांचे गुरु ठरवणार का? तुकाराम महाराज हे एक वंदनीय, आदरणिय आध्यत्मिक व्यक्तिमत्व म्हणुन ठिक आहे परंतु, एखादा त्यांना राजकिय गुरु असल्याचा दावा करत असेल तर राजकिय गुरु काय असतो याचा अभ्यास त्याने करावा, असं मी सुचवेन. (उदा: चाणक्य-चंद्रगुप्त, गोखले-गांधी, लोहिया-फर्नांडिस)

शेवटी - रामदासस्वामी, तुकाराम महाराज हे गुरु नव्हते असं उद्या सिद्ध झाल्याने या दोघांचं ऐतिहासिक्/आध्यात्मिक महत्व कमी होणार आहे का? आणि उपलब्ध दस्तावेजातुन पुरावे मिळत असताना देखील चूकिच्या निष्कर्शांचा अट्टाहास कशाला? तसं केल्याने तुम्ही अगदिच हास्यास्पद ठरतांय, हे लक्षात येतंय का?..

दूरदर्शनवर पूर्वी दारूच्या जाहिरातींना बंदी असे. त्यामुळे दारूचे ब्रॅण्ड्स जाहिरात करत पण जाहिरातीत ते नॉन-अल्कोहोलिक पेये दाखवत. बहुधा पाण्याचीच जाहिरात असे. पण ज्यांना जे समजायचे ते बरोबर समजे.

काकांची वाक्ये अशीच खुबीने पेरलेली असतात Happy हे रामदासस्वामींबद्दलचे वाक्य जेव्हा ते बोलले, तेव्हाचे राज्यातील व देशातील वाद काय होते त्यासंदर्भावरून बघितले तर काही कारण नसताना जातीय तेढ निर्माण करण्याकरता घातलेली काडी होती हे उघड आहे. ब्रिगेडवाल्यांना त्यातून काय वाद निर्माण करायचे ते बरोबर समजले.

मोदींना 'आजके शिवाजी' म्हणून कोणीतरी बिनडोक तोंडपुजेपणा केला त्यावर टीका झाली. पण त्याचबरोबर मग पवारांना जाणता राजा म्हंटलेले कसे चालते असाही प्रश्न लोकांनी केला. त्यावर त्यांच्याकडे समर्पक उत्तर नव्हते म्हणून मग त्यांनी रामदास स्वामींना मधे आणले. 'जाणता राजा' हे शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी म्हंटले होते की औरंगजेबाने हा प्रश्न नव्हता. मोदींवर टीका करणार्‍यांना मग पवारांना ही उपाधी दिलेली कशी चालते, हा मुख्य प्रश्न होता. पण काका काड्या घालतात आणि बरेच मराठी पेपर्स तेच उचलून धरतात.

बाकी विरोधाचे म्हणाल तर एकूणच यांच्या (ब्रिगेड) आजकाल कोणी नादी लागत नाही. पुरंदर्‍यांवर केलेले धादांत खोटे आरोप अजूनही अनेक लोक खरे समजतात. त्यानंतर खुद्द शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी पुरंदर्‍यांची तारीफ केलेली आहे. आणि ब्रिगेड ज्या बहुजनांना भीती घालून आपल्याकडे वळवत होती त्या बहुजनांनाही हे एक दोन वर्षांत कळून चुकले की जातीयवादाच्या बाबतीत सनातनी व ब्रिगेडी हे कादर खान आणि शक्ती कपूर आहेत. तेव्हा हरी नरक्यांपासून अनेकजण वेळीच दूर झाले.

फारएण्ड,

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत!

>>> काकांची वाक्ये अशीच खुबीने पेरलेली असतात हे रामदासस्वामींबद्दलचे वाक्य जेव्हा ते बोलले, तेव्हाचे राज्यातील व देशातील वाद काय होते त्यासंदर्भावरून बघितले तर काही कारण नसताना जातीय तेढ निर्माण करण्याकरता घातलेली काडी होती हे उघड आहे. ब्रिगेडवाल्यांना त्यातून काय वाद निर्माण करायचे ते बरोबर समजले. >>>

संभाजी भोसलेंना मोदींनी राज्यसभेत नियुक्त खासदार केल्यानंतर पवारांनी अशीच जातीयवादी काडी पेटवली होती.

"पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणुक करायचे, पण आता पेशवे छत्रपतींची नेमणुक करतात" हे पवारांचे जातीयवादी वाक्य ब्राह्मण पेशवे (म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस) आणि छत्रपती (म्हणजे संभाजी भोसले) यांच्या जातीशी संबंधित होते व मराठ्यांना ब्राह्मणांविरूद्ध भडकावण्याच्या हेतूनेच मुद्दाम सांगितले होते.

त्यांनी ते विधान केल्यावर एकातरी ईतिहासकाराने/तज्ञाने त्यांना चॅलेंज केलंय का, किंवा त्यांचा दावा खोडुन काढलाय का? >>

इतिहासकार असल्या भानगडीत कशाला पडतील? पवारांचे बिग्रेडि चेले भांडारकर संस्थेची केली तशी तोडफोड त्यांच्याही घरी करतील.. नाही काय?

>>> त्यांनी ते विधान केल्यावर एकातरी ईतिहासकाराने/तज्ञाने त्यांना चॅलेंज केलंय का, किंवा त्यांचा दावा खोडुन काढलाय का? >>>

हा जातीय वाद पवारांच्या बिग्रेडींनी ९० च्या दशकात जन्माला घातल्यानंतर पांडुरंग बलकवडे, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक इतिहासकारांनी बिग्रेडींचे जातीय दावे पुराव्यानिशी खोडून काढले आहेत. असे असताना मुद्दाम तोच जातीय असत्य दावा पुन्हा करण्यामागे जातीयवादाची आग भडकावण्याचाच हेतू आहे. जी गोष्ट अनेकदा पुराव्यानिशी सिद्ध केली आहे, तीच गोष्ट जातीयवादाने अंतर्बाह्य माखून निघालेल्याला समजावून सांगण्यात अर्थ नसतो.

कृपया blackcat ला "लग्नसमारंभात मध्ये मध्ये खायला काही मिळते का हे बघताना पायात घुटमळणारे मांजर समजून" इग्नोर करा...

<मोदींना 'आजके शिवाजी' म्हणून कोणीतरी बिनडोक तोंडपुजेपणा केला>

चूक. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहिलं. या प पुस्तकाचं प्रकाशन दिल्ली भाजपच्या कार्यालयात करण्यात आलं.

अख्खं पुस्तक लिहिणं आणि त्याचं प्रकाशन पक्ष कार्यालयात , पक्षाने आयोजित केलेल्या धार्मिक - सांस्कृतिक संमेलनात होणं या सगळ्याला
बिनडोक तोंडपुजा इतकं क्षुल्लक समजावं का? किती पाणी घालून पातळ करावं?

या पुस्तकाने निर्माण झालेला जाळ विझवण्यासाठी पाणी ओतताना भाजपवाल्यांनी जाणता राजा मध्ये आणलं.
आप क्रोनोलॉजी समझो.

त्यावर पवार म्हणाले की मी स्वतःला जाणता राजा कधीच संबोधत नाही किंवा संबोधून घेत नाही.
जाणता राजा -> रामदास स्वामी - महाराजांचे गुरू . अशी क्रोनोलॉजी आहे.

त्यांनी काड्या बिड्या न घालता काय ते स्पष्टच म्हटलंय.

"जाणता राजा’ हा शब्द रामदासांनी आणला. काही लोक म्हणतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते, हे साफ खोटं आहे. महाराजांच्या गुरू राजमाता जिजामाता याच होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे जिजामातांच्या संस्कारांतून घडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते. मात्र काहींच्या हाती लेखणी होती. त्यांनी या कर्तृत्वसंपन्न महामानवाला घडवण्याचे काम रामदासांनी केले अशी कमाल लेखणीद्वारे केली आणि आपण मानू लागलो की महाराजांचे कर्तृत्व हे रामदासांमुळे आहे, पण हे खरं नव्हे.” असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे."

यातलं त्या काळात रामदास नव्हते हे विधान तांत्रिक दृष्ट्या चूक आहे. समर्थांचा महाराजांवर प्रभाव होता वा ते गुरु स्थानी होते हा दावा त्यांना अमान्य आहे.

असे वाद फक्त याच नव्हे तर अनेक गोष्टींमध्ये आहेत आणि फक्त ब्रिगेडी म्हणवल्या जाणा र्‍या इतिहासकारांपुरताच नाही.

भरत, जाणता राजा ही पदवी फक्त छत्रपती शिवरायांची आहे. बरं तो वाद झाल्यावर जितेंद्र आव्हाड नावाच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने होय पवारच जाणते राजे आहेत वगैरे मखलाशी केली, त्याबद्द्ल पवारांनी त्या व्यक्तीला झापलेल दिसलं नाही. नुसतं मी कोणाला म्हणायला सांगितलं नाही वगैरे मखलाशी उपयोगाची नाही , ते कृतीत आणून कधी दाखवणार?

वर जी काही क्रोनोलोजी दिलीय ती स्पष्टपणे जाणता राजा या शब्दांबद्धलचा वाद पातळ करण्यासाठी कसा वापर झाला ते दाखवण्यासाठी उपयुक्त आहे. एकदा रामदास स्वामींच महत्त्व कमी करून टाकलं की त्यांनी कोणाला काय उपाधी दिली हा प्रश्न गौण ठरतो, मग मराठा समाज जाणता राजा ही पदवी चिकटवून घेतल्याबद्दल आपल्यावर रागावणार नाही, हा सोपा हिशोब त्यामागे आहे. नाहीतर रामदास स्वामिंबद्धलच वक्तव्य त्या नेमक्या वेळी आलेच नसते.... यालाच आम्ही काड्या घालणं म्हणतो.

ते नाही तर एका ठराविक आयडी ने स्वताच्या आयुष्यातील खाजगी घटना, दर दोन दिवसानी फालतू विषय घेऊन गाॅसिप करायला काढलेले बाफ.>>>>> हे कोण?

फार एंड +११११

लेख आवडला.

भरत, तुम्ही जी क्रोनॉलॉजी लिहीली आहे तीच मी लिहीली आहे. त्या पुस्तकाबद्दल जे काही झाले त्यालाच मी बिनडोक तोंडपुजेपणा म्हणतोय. ते किती हलके होते वगैरे हा माझा क्लेम नाही. ते तुम्ही गृहीत धरून काहीतरी लिहीताय.

ते ज्या लेव्हलचे आहे त्याच लेव्हलची उपमा पवारांना जाणता राजा वेळोवेळी म्हणणारांनी दिलेली आहे. त्यात काय फरक आहे. पवार स्वतः म्हणत नाही की मला जाणता राजा म्हणा. मग मोदी तरी तसे कधी म्हणतात? दोन्हीकडच्या अतिउत्साही लोकांचे हे उद्योग आहेत.

आता यात रामदास स्वामी कोठे आले? आणि त्याहून ते गुरू होते का नव्हते हे यातून बाहेर काढण्याचे काय कारण? भाजपवाल्यांनी जाणता राजा हे पवारांच्या बाबतीत विचारले. शिवाजी महाराजांच्या बाबतीत नव्हे. पुन्हा एकदा - शिवाजी महाराजांना जाणता राजा कोणी म्हंटले हा प्रश्न कधीच नव्हता. काकाजींना चांगली कल्पना आहे की असले वाक्य मीडियात सोडून दिले की त्यांना प्रतिप्रश्न करायचे सोडून मीडिया तेच चघळत बसेल. मग त्याला विरोध करणारे त्यात पडतील, बाजू घेणारे पडतील. यातून निष्पन्न इतर काही झाले तरी आपल्यावर आलेला बाउन्सर डिफ्लेट होईल.

रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का नव्हते याबद्दल मला काहीच माहिती नाही. हे त्याबद्दल नाही. तो प्रश्न काहीही संबंध नसताना उकरून काढण्याबद्दल आहे. हे असले कोणतेही प्रश्न न सोडवणारे इमोशनल इश्यूज बळंच काढले जात आहेत. काल पुण्याचा म्हणे कशानेतरी अपमान झाला आहे. महाराष्ट्राचा तर आजकाल उठसूठ होत असतो. कधी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले, कधी साईबाबांच्या जन्मस्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी वक्तव्ये केली. ७० च्या दशकात इंदिरा गांधींनी काहीतरी केले. गावे च्या गावे आख्खा दिवस बंद होती.

समर्थ रामदास गुरू होते की नव्हते याबद्द्लचं मतप्रदर्शन हे पवारांचं डायव्हर्शन नव्हे.
त्यांना तेच म्हणायचं आहे.
हे निमित्त त्यांनी साधलं इतकंच.

क्रोनोलॉजी - भाजपच्या कार्यालयात खेटे शिवाजी -मोदी या पुस्तकाचं प्रकाशन हा सेल्फ बाउंसर होता.
त्यावर भाजपचं डायव्हर्शन जाणता राजा.
पवारांनी त्यांचा उपयोग करून घेतला.

त्यावर भाजपचं डायव्हर्शन जाणता राजा. >>

दुतोंड्यांना त्यांचा दुतोंडी पणा दाखवून देणे म्हणजे डायव्हर्शन !

----------------
पवारांनी त्यांचा उपयोग करून घेतला. >>>

मोराने पिसारा फुलवला की पार्श्वभाग उघडा पडतो तशातला प्रकार आहे तो ... Lol

मोदींची तुलना महाराजांनी करून तोंडावर पडलेल्या भाजपायींची तडफड समजू शकतो.
आधी गुजराती चाणक्य उताणा पडला. मग हे तोंडावर पडले.

Pages