जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरा विठ्ठल खऱ्या पुंडलिकाला भेटायला न बोलावता आला होता. नकली पुंडलिकाने नकली विठ्ठल तयार केला न बळंच विटेवर उभा केला. करत बस म्हणावं नकली इठठलाची आर्ती.

<< मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये प्रशासनाने बुलडोझरने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या कृतीविरोधात छिंदवाडा-नागपूर हायवे वर काही काही हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलनही केले. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. >>

----- अपुर्ण बातमी आहे. वरिल बातमीने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे... नव्हे तसाच उद्देश असावा असे वाटणे सहाजिक आहे .

पुतळ्यासाठी जागा मिळवण्यासाठी अर्ज केला होता, अर्जावर प्रशासन विचार करत होते. एका रात्रीत घाई घाईत पुतळा स्थापन करण्याचे कार्य पार पाडण्यात आले.

काही बांधकाम क्रायचे असेल तर प्रशासनाची परवानगीची अवशक्ता नाही आहे. ज्याला जिथे वाटेल तिथे पुतळे बसवायचे. अरे हो... तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहात.... याद राखा....

निर्णय घेण्यास विलंब का केला हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल. बांधकामाची परवानगी नसतांना थोर नेत्यांचे पुतळे उभारणे यामधे त्या थोर त नेत्यांचा आपण आदर करत आहोत का ?

" The bust, which was placed on a platform at Mohgaon Square intersection without any permission, was removed on Monday night, a senior district official said on Wednesday. The bust was put by some local saffron organisations. "

https://www.thehindu.com/news/national/other-states/row-over-removal-of-...

यातील saffron हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तिथे मुस्लिम हा शब्द असता तर कुठल्याही बांधकामावर "एव्हढ्या" तत्परतेने व हिरीरीने कारवाई होत नाही... कारवाई होतच नाही म्हणा ना ..

बरं प्रशासनाने परवानगी देण्याआधी पुतळा उभारला म्हणून पुतळ्याला आधी वेगळे न करता सरळ चौथऱ्यासकट आडवा पाडण्याचे समर्थन होऊ शकत नाही.

त्या एका पुस्तकावरचा जाळ विझवता विझव ता आणखी किती धुरळा उडवणार हे लोक तेच जाणोत. उमा भारती बाईंनीपण तोच तोंडपुजेपणा केला.
आता राममंदिर मार्गी लागलं, तेव्हा दुसरा ज्वलनशील मुद्दा हवा .

पुतळा उमा भारतीच्या सरकारने पाडला की काय भरत? तिने काहीतरी तोंडपुजेपणा केला जो महाराष्ट्रात पवारांसाठी वर्षानुवर्षे होत होता.
असो, सुज्ञ फुरोगाम्यानि या सर्व लोकल मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून "तुकडे तुकडे" साध्या कडे वाटचाल कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे.

"एका निश्चित ध्येयानुसार मार्गक्रमण सुरु आहे."

जे आपण करतो त्याचाच आरोप विरोधकांवर लावण्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. वरपासून खालपर्यंत हाच पॅटर्न स्पष्ट आहे.

चला, सेक्युलर्स चा विश्वास नाही म्हणून कोंबडे झाकले तरी सूर्य उगवतोच. सेक्युलर्स म्हणजे कोण ( पुरोगामी आय डी नाही ) तर झापडबंद घोडे, एकापाठोपाठ एक खड्ड्यात पडणारी मेंढरे. काही वर्षापूर्वी केजरीवालच्या २ दा मुस्काडात का बसली ते आज लक्षात आले. एक व्हिडीओ आहे, तो नक्कीच खोटा नाही. केजरी भाऊंनी दिल्लीतल्या मौलवींना ( इमाम ) वेतन १० चे १८ हजार केले, अजून खैरात वाटलीय. इकडे त्याच्या पार्टीचा एक आमदार म्हणतो मला ७२ हजार मते मिळालीत, इन्शाल्ला वो दिन दूर नही जब भारत मे इस्लाम ही रहेगा. वाजवा टाळ्या येऊ द्या अजून बांगलादेशी. आणी खा मुस्काडात. बहुतेक काही दिवसानी हा पण इस्लाम कुबुल करेल.

NCP chief Sharad Pawar today said no government has the right to interfere in Islamic laws related to talaq (divorce), which have their origins in the Quran.
"But talaq is a way provided by the Quran in Islam. It's a message, and no ruler has the right to interfere with that," he said at a party rally in Aurangabad.

म्हणजे पवित्र धर्मग्रंथातील इस्लामिक कायद्यांत ढवळाढवळ न करता ते तसेच्या तसे लागू करणारं सरकार असायला हवं.
हेच ते निश्चित ध्येय, आयडियॉलॉजी आणि कोअर बिलिफ.

https://www.ndtv.com/india-news/talaq-laid-out-in-quran-no-government-ca...

रश्मी, तुम्ही पुन्हा पुन्हा खोट्या प्रचाराला बळी पडता याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
https://twitter.com/timesfactcheck/status/1227856479480270849
https://navbharattimes.indiatimes.com/viral-adda/fake-news-buster/aam-aa...
अमानतुल्लाह खान के जिस ट्वीट का स्क्रीनशॉट शेयर किया जा रहा उससे छेड़छाड़ की गई है। असली ट्वीट में उन्होंने सिर्फ 72 हजार वोटों से आगे रहने का जिक्र किया है।

आता मला सांगा पुन्हा पुन्हा खड्ड्यात पडणारं मेंढरू कोण?

इथे काही लोक हे सग ळं खोटं आहे हे माहीत असूनही ते पसरवतात, तुम्ही त्यांतल्या नसाव्यात अशी अपेक्षा ठेवावी का?

तो खान एका दिल्लीत मर्यादित पक्षाचा साधा आमदार आहे. त्याला सोडा.

वर सर्वशक्तिमान पवार साहेब काय म्हणालेत ते दिलंय. एनडीटीव्ही सोर्स आहे.

खोटं उघडं पडलं तरी कबूल न करणं हे व्यवच्छेदक लक्षण.

समर्थ रामदास, दादोजी प्रकरणीही दिसलंच.

बाकी नवा मालमसाला येत नसल्याने जुनाच माल ट्विस्ट करून रिसायकल करावा लागतोय.

no government has the right to interfere in Islamic laws related to talaq (divorce), which have their origins in the Quran.

हे वक्तव्य करण्याच्या अगोदर श्री शरद पवारांनी मूलभूत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच वेगवेगळ्या धर्माच्या( एक हिंदू, एक ख्रिश्चन, एक मुसलमान एक शीख आणि एक पारशी) न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने ३९५ पानी निवाडा देताना या विषयाचा संपूर्ण उहापोह केला आहे.
त्यात पाचही न्यायाधीशांनी एकमुखाने तीन तलाक ला कुराणात कोणताही आधार नाही असे म्हटलेले आहे.

त्यापैकी दोन न्यायाधीशांनी (न्या खेहार आणि न्या अब्दुल नजीर) यांनी तीन तलाक बद्दल न्यायालयाने निवाडा देण्याऐवजी सरकारने तसा कायदा करावा असे म्हटलेले आहे.

एवढेच नव्हे तर मुस्लिम वैयक्तिक कायदा बोर्डाचे वकील श्री कपील सिब्बल यांनी सुद्धा तसे (तीन तलाक ला कुराणात कोणताही आधार नाही) हे न्यायालयात मान्य केले.

परंतु जनाची नाहीच पण मनाचीही लाज नसलेल्या शरद पवारांनी मुस्लिम तुष्टीकरणासाठी तीन तलाकला कुराणाचा आधार आहे असे बिनदिक्कत खोटे सांगीतले.

Mr. Kapil Sibal, learned senior counsel, emphasized, that the three forms of talaq – ‘talaqe-ahsan’,
‘talaq-e-hasan’ and ‘talaq-e-biddat’ referred to by the petitioners,
during the course of hearing, were merely depicting the procedure which a
Muslim husband was required to follow, to divorce his wife. It was pointed
out, that none of these procedural forms, finds a reference in the Quran. It
was asserted, that none of these forms is depicted even in the ‘hadith’. It
was acknowledged, that ‘hadiths’ declared talaq by itself, as not a good
practice. It was submitted, that talaq was accepted by all believers of Islam.
It was pointed out, that truthfully
the petitioners were merely assailing the course adopted by Muslim men, in
divorcing their wives through the ‘talaq-e-biddat’ procedure.

https://www.thehindubusinessline.com/multimedia/archive/03194/Supreme_Co...

मतांसाठी काहीही आणि कितीही खोटे बोलणाऱ्या या राजकारण्याला त्यांच्या भाटांनी "जाणता राजा" म्हणणे किंवा त्यांना "शिवरायांच्या पातळीवर" आणणे हे शिवाजी महाराजांचा अपमान आहे

पण ज्या गोष्टींना कुराणाचा आधार आहे त्याही गोष्टींना केवळ कुराणाचा आधार आहे म्हणून मान्यता द्यावी का- की फक्त संविधान हाच एकमेव निकष असावा?

आणि धर्माच्या आधारावर सीएएमध्ये भेदभाव होतो।म्हणून विरोध करणारे जाणते काका व इतर विरोधक समान नागरी कायद्यालाही का विरोध करतात?

>>> खोटं उघडं पडलं तरी कबूल न करणं हे व्यवच्छेदक लक्षण.

समर्थ रामदास, दादोजी प्रकरणीही दिसलंच. >>>

+ ७८६

शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांच्या बाबतीत खोटी जातीयवादी विधाने करून समाजात आग पेटवण्याचा काकांचा खोटेपणा पूर्ण उघडा पडला.

आज काका कळवळलेत, मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एन आय ए कडे देण्यास मान्यता का दिली म्हणून विचारत आहेत... जणू काही खंजीर खुपसायचा ठेका फक्त यांचाच आहे ! आता एन आय ए लवकरच त्या प्रकरणांतील कळीचे नारद शोधून काढेल.

काका आज म्हणालेत की CAA चा फटका मागासवर्गीयांना ही बसणार... कसा ते सांगायच्या फंदात पडले नाहीत (कारण त्यांनीही ते माहीत नसणार). काकांचा एखादा फॅन उत्तर देईल काय?

काकासाहेबांचे जे तलाक-कुराण वाले कोट्स एनडीटीव्हीने टाकलेत ते योग्यच आहेत, असं म्हणायला इथे समर्थक लाजत का आहेत हेच कळत नाहीये.

विजय नास्तिक आहे. देवावर विश्वास नाही. प्रसाद पण घेत नाही. पण, त्याचा ७८६ च्या बिल्ल्यावर मात्र विश्वास आहे. तोच विश्वास आणि बिल्ला त्याला दुष्मनाच्या गोळी पासून वाचवतो..

शास्त्रात ह्यालाच सेक्युलरीजमचा रेहमानी किडा असे म्हणतात !!
>>>फेसबुक वर वाचलं

आपले राज भाऊ प्रतिसाद देते झालेले नाहीत बराच काळ...

मला त्यांना विचारायचं होत की भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल डफ ने काही लिहून ठेवलंय का? म्हणजे १ जानेवारी १८१८ रोजी २८००० पेशवे मारले वगैरे घटना खरेच झाली होती का ? की पेशव्यांच्या सैन्याकडून त्या दिवशी ब्रिटिशांच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला होता? श्रीमान पवार काकांचे व बिग्रेडचे या इतिहासाच्या बाबतीत काय मत आहे? असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात आहेत..

राज भौंसारखे जाणकार उत्तर देतील काय?

अमानतुल्ला खान आणि महाराजांबद्दल पसरवलेल्या अफवा उघडल्या पडल्याने ते झाकायला कोल्हेकुई सुरू आहे.

>>> बाकी नवा मालमसाला येत नसल्याने जुनाच माल ट्विस्ट करून रिसायकल करावा लागतोय. >>>

नवा मालमसाला नसल्याने नथुराम, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी हे जुनेच विषय पुन्हा पुन्हा उकरून काढावे लागतात.

पवारसाहेबांबद्दल टाकलेली बातमी अफवा नाही. एनडीटीव्हीची आहे. कुराणमधील इस्लामिक कायद्यात भारत सरकार ढवळाढवळ करु शकत नाही- हे खूपच मोठं व दिशादर्शक स्टेटमेंट आहे. तुम्ही त्याबद्दल ओपनली बोलणं टा़ळताय यातच सगळं काही स्पष्ट आहे.

Pages