जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत याना त्यांच्या स्वप्नाच्या दुनियेतच रममाण होऊ द्यावे ही नम्र विनंती. निराशेपासून होणारे धोके थोपविण्यासाठी, त्यांचे अंतर्मन त्यांच्यासाठी पर्यायी वातावरण निर्मिती करतंय.

>>पवारांना कसं गुंडाळायच ते <<
अहो सांगताय काय. इतक्यात विसरलां? मोदि-शहा पवारांना गुंडाळता-गुंडाळता महाराष्ट्रात शेवटी पवारसाहेबांच्याच लपेटमध्ये आले. मोर जाउद्या, तुमचा "शहा"मृग होउ देउ नका...

आता मूळ मुद्द्यावर. शिवाजी महाराज आणि रामदासस्वामींची प्रत्यक्ष भेट कधी झाली, ते राजकिय गुरु होते/न्हवते, यांवर प्रकाश टाकणारा "हिस्टरी ऑफ मराठाज" या डफ लिखित पुस्तकातला उतारा. त्यांत जदुनाथ सरकार यांच्या अभ्यासु मताचा हि समावेश केलेला आहे. याउप्परहि कोणाला आपलिच टिमकि वाजवायची हौस असेल तर माझ्याकडुन तरी या चर्चेला विराम...

The date of Sivajl’s meeting with Ramdas has recently been discussed in the vernacular press of the Deccan, some writers holding that it took place only a year or two before Sivajl’s coronation. Brahman admirers of Sivaji accept the earlier date, and prefer to give to Ramdas the chief credit of Sivaji’s political achievements. The evidence so far available is
not sufficiently definite to warrant the rejection of the view that the meeting took place before Sivaji’s twenty-fifth year. (Professor H. G. Limaye’s review in Fergusson College Magazine, February 1919, pp. 155-68.) Professor J. Sarkar is of opinion that Ramdas’s infiuence was purely spiritual, and that the evidence as to his political influence is ‘ neither adequate nor free from suspicion.’ [Shivaji and His Times, pp. 474-5.)]

मोदि-शहा पवारांना गुंडाळता-गुंडाळता महाराष्ट्रात शेवटी पवारसाहेबांच्याच लपेटमध्ये आले. >>

तोही एक शॉर्ट टर्म भ्रम आहे.....

>>> Sarkar is of opinion that Ramdas’s infiuence was purely spiritual, >>>

तेच म्हणतोय आम्ही. समर्थ रामदास स्वामी हे महाराजांचे अध्यात्मिक गुरू होते व दादोजी कोंडदेव हे राजकीय गुरू होते.

>पवारांना कसं गुंडाळायच ते <<
>>> अहो सांगताय काय. इतक्यात विसरलां? मोदि-शहा पवारांना गुंडाळता-गुंडाळता महाराष्ट्रात शेवटी पवारसाहेबांच्याच लपेटमध्ये आले. मोर जाउद्या, तुमचा "शहा"मृग होउ देउ नका... >>>

माझ्या मुलीला केंद्रात मंत्रीपद द्या व फडणवीसांऐवजी वेगळा मुख्यमंत्री करा, तर आम्ही महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत, हे तुमच्याच साहेबांनी ऑक्टोबर २०१९ अखेरीस दिल्लीत मोदींची भेट घेऊन सांगितले होते. पाऊण तासांच्या या भेटीत नंतर शहा सुद्धा होते. मोदी-शहांनी या मागण्या धुडकावून लावल्याने तुमचे साहेब रिकाम्या हातांनी परतले. अन्यथा महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन झाले असते व बोनस म्हणून तुमचे साहेब एखाद्या राज्याचे राज्यपाल झाले असते.

बोनस म्हणून तुमचे साहेब एखाद्या राज्याचे राज्यपाल झाले असते.

नवीन Submitted by पुरोगामी on 10 February, 2020 - 08:41 >>

मला तस काही झालं असतं असं वाटतं नाही. राज्यपाल होऊन राजकारणी काड्या घालायला मिळाल्या नसत्या.. शिवाय महाराष्ट्रापासून दूर जायला लागलं असतं. त्यापेक्षा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद घेऊन राजकारण राजकारण खेळत बसले असते ते.

ठिकै, पवार पवार म्हणून चाललेच आहे तर एक मज्जा पाहिली ती लिहाविशी वाटली. Proud मागे महिना की आठवड्यापूर्वी साहेब उर्फ स्व घो जाणता राजा उर्फ चाणक्य हे त्यांच्या मिशीवाल्या शिष्या बरोबर अदिवासी पाड्याला भेट द्यायला गेले, पहाणी केली, विचारपूस केली, जेवले याचे लय कवतीक झाले सकाळ पेपर मधून. पण फोटो पाहीला आणी तारे चमकले. एका झोपडीत सनमायकाचा टिपॉय, त्यावर चिकन वगैरेने भरलेली थाळी सोबत बिस्लेरी आणी झोपडी बाहेर पहारा देणारा गार्ड. या झोपडीत माझ्या ..... काय ते सुख वर्णावे ! अहाहा ! काय ते जेवण ! अहाहा!

च्यायला, आमची शाळा कॉलेजची पोरं-पोरी बरे यापेक्षा, निदान दाखवायचे दात आणी खायचे दात वेगळे नसतात यांचे. फोटु हाय बरं का माझ्याकडे.

>>समर्थ रामदास स्वामी हे महाराजांचे अध्यात्मिक गुरू होते<<
चला, मी केलेल्या खटाटोपाचा काहितरी फायदा झाला असं म्हणायला हरकत नाहि. सुरुवातीला राजकिय गुरुच कसे होते हे ठासुन सांगण्याचा प्र्यत्न होता. वाईट आणि चिंता या गोष्टिची वाटते कि लोकांचा इतक्या प्रमाणात ब्रेन्वॉश झालेला किंवा केला गेलेला आहे कि खरी माहिती वारंवार हेतुपुरस्सर दाबली जाते, आणि पुढे ती बाहेर आली कि तिला जातीय रंग दिला जातो...

>>दादोजी कोंडदेव हे राजकीय गुरू होते.<<
हा सुद्धा तश्याच प्रकारचा प्रापगंडा. कोंडदेव यांना शहाजी राजांनी पुणे जहागिरीचा कारभारी म्हणुन नेमेलेले (१६३६-३७). ते काम त्यांनी चोख बजावले, पण हा संदर्भ पकडुन त्यांना थेट महाराजांचे राजकिय गुरु ठरवणे हि आत्तापर्यंत केलेली निर्लज्ज धुळफेक आहे. परत एकदा जदुनाथ सरकार यांच्या "शिवाजी अँड हिज टाइम्स" या पुस्तकातला उतारा देतो. याउप्पर प्रत्येकाने आपापलं ठरवावं - आजतोवर लावलेल्या शेंड्या काढुन फेकाव्यात कि अभिमानाने मिरवाव्या ते... Wink

A career of independence was no doubt risky to Shivaji, but it had undreamt of advantages to compensate for the risks, if only he could succeed. On the question of his future career he came into conflict with his guardian. Dadaji Kond-dev was, no doubt, an able and honest land-steward, a man of methodical habits, leading a sober blameless and humdrum life, but quite incapable of lofty ideals, daring ambition or far-off vision. Shivaji's love of adventure and independence appeared to his guardian as the sign of an untutored and wayward spirit, which would ruin his life's chances. He argued long with Shivaji, advised him to follow the footsteps of his / ancestors and rise to wealth and position as an obedient vassal and captain of mercenaries under Adil Shah. The young lad's association with the hill
brigands and his projects about robbery and surprise of forts filled Dadaji with apprehensions about his future. He complained to Shahji, but without succeeding in effecting a reform. Worn out by anxiety and age, Dadaji Kond-dev died, early in 1647, and Shivaji became his own master at the age of twenty.

His early tutor, Dadaji Kond-dev, was a Brahman well versed in the Shastras and estate management. He could only teach Shivaji how to be a good revenue collector or accountant. Shivaji's institutions, civil and military, could not have been inspired by Dadaji.

महाराजांनी आपल्या कारभार्‍याच्या दबावाला बळी न पडता स्वराज्य स्थापन केलं म्हणुन पुढचा ईतिहास घडला. तुम्ही म्हणता तसे गुरु मानलं असतं तर खर्डेघाशी/कारकुनी पदरात पाडुन घ्यावी लागली असती...

अरे भावांनो शिवरायांची गुरु एकच. ती म्हणजे जिजामाता!
पारतंत्र्यात हिंदू रयतेच्या जिविताला, लेकीबाळींच्या अब्रूला, धर्मस्थळांना मुसलमानांकडून होत असलेल्या हानी मुळे ती आतून पेटून उठली होती. त्यासाठी तिने शिवबाला बालपणापासून घडवलं.
ती सामान्य स्त्री असती तर शहाजीराजांजवळ राहिली असती. त्या थोर मातेचे उपकार माना व वाद थांबवा. तिच्या नंतर ताराराणी अशीच खंबीर राणी होऊन गेली.

>>> वाईट आणि चिंता या गोष्टिची वाटते कि लोकांचा इतक्या प्रमाणात ब्रेन्वॉश झालेला किंवा केला गेलेला आहे कि खरी माहिती वारंवार हेतुपुरस्सर दाबली जाते, आणि पुढे ती बाहेर आली कि तिला जातीय रंग दिला जातो... >>>

बीग्रेडच्या उदयापासून म्हणजे ९० च्या दशकात लोकांचे ब्रेनवॉश करणे सुरू झाले. त्यासाठी मूळ इतिहास खोटा ठरवून आपल्याला हवं ते खोटंनाटं इतिहास म्हणून छापणे, एका विशिष्ट जातीबद्दल अत्यंत गलिच्छ लिहून द्वेष पसरवणे, वेळप्रसंगी तोडफोड करणे व दहशत माजवणे हे प्रकार सुरू झाले. तत्कालीन राज्यकर्त्यांचा या प्रकारांना पूर्ण पाठिंबा असल्याने हे प्रकार वाढतच गेले. याची परिणिती भांडारकर संस्थेची नासधूस, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा तोडणे, राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणे, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवून कचऱ्याच्या गाडीतून नेणे, बाबासाहेब पुरदरेंच्या अंगावर शाई फेकणे, बाबासाहेब पुरदरेंना दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध करणे, खोटा इतिहास शालेय पुस्तकात छापून शिकवणे, एका विशिष्ट जातीबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिणे या प्रकारात झाली.

या सर्व गुन्हेगारी प्रकारांमागे जातीयवाद, एका विशिष्ट जातीबद्दल तिरस्कार व स्वजातीचा अभिमान हीच कारणे आहेत.

माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर काही महापुरुष हे आता इतका सेन्सिटिव्ह विषय होऊन बसले आहेत की ब्राह्मण समाजाने आपल्या जातीतले इतिहासातले लोक सोडून बाकीच्या महापुरुषांचा विषय काढूच नये. त्यांच्याबद्दल असलेला आदर मनात नक्कीच जतन करावा पण जातीयवाद्यांशी चर्चा करत बसू नये.
त्या महापुरुषांबद्दल त्यांच्या किंवा कोणत्याही जातीचे लोक काहीही बोलले तर 'होय , तुमचं सगळं बरोबर' असं म्हणून टाकावं. कोणाला काय इतिहास बनवायचा तो बनवू दे. उगाच वाद घालून काय फायदा? इतिहास हा जागतिक आहे. स्वजातीय सोडून इतरही इतिहासात रमायचं हाच उद्देश असेल तर जातीयवादी डोकी जिथे नसतील असे जागतिक इतिहासातले महापुरुष निवडा, त्यांचा अभ्यास करा.

पुरोगामी, तुमचा सनावळीत घोटाळा झालेला आहे. हिस्टरी ऑफ मराठाज साधारण १८२६ मध्ये प्रथम प्रकाशित झालं. बाकि ईतिहास कोणि लिहिला, कसा इंटर्प्रिट केला, खोटा ईतिहास गळी कसा उतरवला इ. दस्तावेजावरुन सामान्य लोकांत स्पष्ट होत आहे. आता तुम्हाला शहामृगासारखी मान वाळुत खुपसुन रहायचं असेल तर नाईलाज आहे.

सबळ पुरावे मिळाल्यावर जातीचं हत्यार काढल्याबद्दल तुमचं आणि सनवताईंचं अभिनंदन. डफ, सरकार अतिशय जातीयवादि होते हे एकदा सांगुन टाका म्हणजे या वादावर पडदा पडेल... Lol

बाकि ईतिहास कोणि लिहिला, कसा इंटर्प्रिट केला, खोटा ईतिहास गळी कसा उतरवला इ. दस्तावेजावरुन सामान्य लोकांत स्पष्ट होत आहे. >>> कोणी लिहीला आणि काय लिहीला ते एकदा सांगून टाका. Beating around the bush नको. काय खोटा इतिहास आहे ते ही सांगून टाका.

जदुनाथ सरकारांनी इतकी वर्षे आधी लिहीलेल्या पुस्तकातील उतारे राज यांच्याशिवाय इतर कोणाला कसे दिसले नाहीत वा समजले नाहीत हे एक आश्चर्यच आहे Wink

>>> कोणाला काय इतिहास बनवायचा तो बनवू दे. उगाच वाद घालून काय फायदा? >>>

+ १

खरा इतिहास नाकारून आपल्याला हव्या तशा सोयिस्कर व खोट्या गोष्टी इतिहास म्हणून लिहिणे हे १५-२० वर्षांपूर्वीच सुरू झाले आहे. राज्यकर्त्यांचाही याला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे हे प्रकार थांबविणे अत्यंत अवघड आहे. जे खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतील त्यांना दंडुक्यांचा सामना करावा लागतो. निदान महाराष्ट्रात तरी आपल्याला खोटा इतिहासच शिकावा लागणार.

असो. वाद घालून फायदा नसल्याने आता थांबतो.

आणि त्याचबरोबर तो इतिहास असा काय गंभीररीत्या खोटा झाला आहे की पुरोगामी यांनी उल्लेख केलेल्या गोष्टींची जराही दखल न घेता त्या खोट्या इतिहासाबद्दल लिहावे लागले, ते ही सांगा.

राज, तुम्ही म्हणताय म्हणजे ते सगळं बरोबरच असेल. डफ, सरकार यांची मतं तुम्हाला पटतात म्हणजे तीच योग्य असणार.
शिवकाळापासून आजपर्यंत बखरी लिहिणारे, किंवा इतिहासकार असलेले सर्व ब्राम्हण मात्र एकजात सगळे जातीयवादीच होते, त्यांची 509 वर्षे चालत आलेली कन्स्पिरसी होती. त्याकाळी पण ते एकमेकांशी ईमेल व टाइम मशीन वापरून कम्युनिकेट करत असत. त्यामुळे त्यांनी सगळं सगळं खोटं लिहिलं. इथे या धाग्यावर लिहिणारे समस्त ब्राह्मणही त्याच यंत्रणेचा एक भाग आहेत. तुमच्यामुळे, ब्रिगेडमुळे आणि पवारसाहेबांमुळे जगाला सत्य कळलं हो. पवार साहेबांचा प्रामाणिकपणा तर जगविख्यातच आहे. सो ते म्हणतात तेही सगळं बरोबरच असणार.

>>कोणी लिहीला आणि काय लिहीला ते एकदा सांगून टाका. Beating around the bush नको. काय खोटा इतिहास आहे ते ही सांगून टाका.<<
आय्ला, हे म्हणजे रामायण झाल्यावर रामाची सिता कोण, असं विचारणं झालं. तुमचा अजुन विश्वास असेल रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे राजकिय गुरु होते तर डफ्/सरकार यांनी मांडलेली मतं खोडुन काढा - पुराव्यासकट. मग बोलु...

>>जदुनाथ सरकारांनी इतकी वर्षे आधी लिहीलेल्या पुस्तकातील उतारे राज यांच्याशिवाय इतर कोणाला कसे दिसले नाहीत वा समजले नाहीत हे एक आश्चर्यच आहे<<
असेल बुवा आश्चर्य. पण त्याने ना पुस्तकातलं लिखाण बदललं ना खरा ईतिहास. मी समोर आणलेले मुद्दे खोडुन काढा, स्वागत आहे त्यात. मुद्दे नसल्याने विनाकारण जातीचं कार्ड आणि भितीचा बागुलबोवा दाखवुन पळवाट शोधु नका...

मुद्दे नसल्याने विनाकारण जातीचं कार्ड आणि भितीचा बागुलबोवा दाखवुन पळवाट शोधु नका... >>

मस्त वाक्य आहे. मी कॉपी करून ठेवलंय. कामाला येईल भविष्यात.

>>नवीन Submitted by सनव on 10 February, 2020 - 12:44<<
या पोस्टमध्ये लिहिलेला सगळा तुमचा कल्पनाविलास आहे. माझ्यापुरतं सांगायचं तर ब्लॅक अँड व्हाइट मध्ये काय असेल ते दाखवा. ब्रेन्वॉश झालेला कोरडंप नको...

अरे तुमचं सगळं बरोबर आहे म्हटलं तर त्यात काय कल्पनाविलास?
कोण कोणाचे गुरू होते का शिष्य होते का स्नेही होते, आध्यात्मिक होते का राजकीय होते , हा माझ्या अस्मितेचा विषय नाही.
तुम्ही लिहिलंय- ///बाकि ईतिहास कोणि लिहिला, कसा इंटर्प्रिट केला, खोटा ईतिहास गळी कसा उतरवला इ. दस्तावेजावरुन सामान्य लोकांत स्पष्ट होत आहे. >>> This alludes to a conspiracy. So I just confirmed it!

>>मस्त वाक्य आहे. मी कॉपी करून ठेवलंय. कामाला येईल भविष्यात.<<
अलबत! शिवाय, आतापर्यंत तुम्हाला कळुन हि चुकलं असेल कोणाकरता ते वाक्य वापरायचं ते... Wink

आजकाल सुशिक्षित, संतुलीत लोकांची हि मचुरिटी लयाला गेली आहे का असा प्रश्न वारंवार पडतो. नको तिथे रिडिंग बिटवीन द लाइन करुन त्यात अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ शोधुन काढ्ण्याची मानसिकता जोपासली जातेय, जी काहि वर्षांपुर्वि फक्त भेंडिबाजारात पहायला मिळायची. काय साध्य करायचा प्रयत्न आहे हा?..

आय्ला, हे म्हणजे रामायण झाल्यावर रामाची सिता कोण, असं विचारणं झालं. तुमचा अजुन विश्वास असेल रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे राजकिय गुरु होते तर डफ्/सरकार यांनी मांडलेली मतं खोडुन काढा - पुराव्यासकट. मग बोलु... >>> तुम्हीच म्हणताय ना खोटा इतिहास लिहीला आहे मग तुम्हीच सांगा कोणी आणि कसा ते. उगाच स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट्स काढत आहात.

बाकि ईतिहास कोणि लिहिला, कसा इंटर्प्रिट केला, खोटा ईतिहास गळी कसा उतरवला >>> हे तुमचेच वाक्य आहे.

मुद्दे नसल्याने विनाकारण जातीचं कार्ड आणि भितीचा बागुलबोवा दाखवुन पळवाट शोधु नका... >>> हे मी केलेले नाही. भलत्याच गोष्टी माझ्या नावावर टाकू नका.

>>कोण कोणाचे गुरू होते का शिष्य होते का स्नेही होते, आध्यात्मिक होते का राजकीय होते , हा माझ्या अस्मितेचा विषय नाही<<
वेरी गुड. मग पवारसाहेब तुमची दुखरी नस आहे का? कारण त्यांचा विषय निघाला कि तुम्ही अगदि पदर खोचुन असाल तिथना येता, म्हणुन म्हटलं. आणि कांस्परसी वगैरे काहि नाहि हो, खुप मोठ्ठा शब्द आहे तो. झेपत नसेल तर वापरु नका...

फारएण्ड - जातीचं कार्ड किंवा तेढ संदर्भात, या धाग्यावरचा तुमचा पहिला प्रतिसाद वाचा; अचंबित व्हाल. आणि वर खरा-खोटा ईतिहासाच्या संदर्भात तोच प्रश्न परत-परत विचारताय, उत्तर समोर असतानाहि. अ‍ॅज इफ यु आर लॉक्ड इन अ‍ॅन ऑर्बिट. तुम्हाला एस्केप वेलॉसिटीची गरज आहे बहुतेक. दुर्दैवाने ती मी किंवा कोणिहि देऊ शकत नाहि, ती आतुनच यावी लागते. असो. याच धाग्यावर मी आधी लिहिल्याप्रमाणे रामदासस्वामी काय, किंवा दादोजी कोंडदेव काय, दोघंहि महाराजांच्या आयुष्यात आल्याने त्याचं श्रेय नाकारता येणार नाहि. परंतु न केलेल्या कार्याचं श्रेय देणं हे ईतिहासाशी प्रतारणा करण्यासारखं आहे - असं मी तरी समजतो. तुम्ही आणि तुमचे समविचारी तसं समजंत नसतील तर फेअर इनफ. आयॅम नॉट हियर टु चेंज योर माइंडसेट. ऑल आय कॅन डु इज पिटी द माइंडसेट दॅट ओरिजिनेट्स अँड ड्राइव्ज सच थॉट प्रोसेस/डिस्कशन्स (दॅट टेक्स यु नोव्हेर बट ए सोशल अनरेस्ट).

सायलेंट बँकर - इंटेशनली ऑर अनइंटेशनली यु हॅव स्टर्ड दि पॉट. डिड यु लर्न एनिथिंग ओवर दि पास्ट टु डेज? इफ सो, दॅट कुड बी ए की टेकवे... Wink

सुपर लोल. माझा पहिला प्रतिसाद पवारांच्या वक्तव्याशी संबंधित आहे. तेथे तो बरोबरच होता. मी ती सगळी क्रोनॉलॉजी भारतात अनुभवली आहे त्यावेळेस, त्यामुळे एक्झॅक्टली काय चालले होते हे मला माहीत आहे.

इथे तुमच्या मुद्यांबद्दल मी कधी जातीचं कार्ड/बागुलबुवा काढला हे विचारतोय. दादोजी हे राजकीय गुरू होते की नाही याबद्दल नाही. ते असतील किंवा नसतील. पण तुम्ही जे इतक्या ठामपणे खोटा इतिहास वगैरे म्हणत आहात ते कोणाबद्दल इतकेच मी विचारले आहे. त्याचे उत्तर नसेल किंवा द्यायचे नसेल तर ठीक आहे. त्याकरता इतका घोळ घालायची गरज नाही.

राज,
फारएन्ड आणि मी दोघेही सेम विचारतोय की खोटा इतिहास वगैरे जे तुम्ही लिहिलं ते जरा स्पष्ट करा.
मी त्यापुढे जाऊन म्हटलं की त्यातून समोर येणारी conspiracy theory ब्राम्हण समाजाने मान्य करून टाकावी व विषय संपवावा.
पवार साहेब दुखरी नस वगैरे नाही. पण ब्राह्मण समाज त्यांच्या प्रत्येक कमेंटला react होतो हे मला आवडत नाही.
अशाच कन्स्पिरसी थिअरी ज्यू समाजाबद्दल युरोपात होत्या. तेव्हा खंडन करून फायदा झाला नाही. सो ब्राह्मण समाजानेही 'तुमचंच सगळं बरोबर' म्हणून टाकावं, वेळ फुकट घालवू नये.

पण तुम्ही जे इतक्या ठामपणे खोटा इतिहास वगैरे म्हणत आहात ते कोणाबद्दल इतकेच मी विचारले आहे. त्याचे उत्तर नसेल किंवा द्यायचे नसेल तर ठीक आहे. त्याकरता इतका घोळ घालायची गरज नाही.

Submitted by फारएण्ड on 11 February, 2020 - 07:26 >>

त्यासाठी त्यांना जातीय कार्ड बाहेर काढावं लागेल. त्यात त्यांच्या आरोपांना सिद्ध करण्यास कुठलेही पुरावे नसतील. त्यामुळे, मग त्यांचेच खालील वाक्य त्यांच्या तोंडात कोंबले जाईल. म्हणून कदाचित तुमच्या नेमक्या प्रश्नाला बगल दिली जात असावी....

मुद्दे नसल्याने विनाकारण जातीचं कार्ड आणि भितीचा बागुलबोवा दाखवुन पळवाट शोधु नका

Pages