जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पवारसाहेब ईडीला भेटायला गेले नामक जो प्रकार झाला त्यावेळी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर वरून पवारांचे छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे चित्र प्रकाशित झाले. स्वराज्यासाठी आयुष्याचा होम करणारे महाराज , आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, फावल्या वेळात बिझनेस करून मोठे उद्योगपती झालेले पवार यांची तुलना कशी होऊ शकते असा वाद त्यातून निघाला. एनसिपीनी नंतर ते ट्विट उडवलं.
भाजपने साधारण असा स्टॅंड घ्यायला हवा होता. जेव्हा वाद झाला तेव्हा- ओके , we made a mistake. We will rectify.
पण गोंधळ घातल्यामुळे पवारांना संधी मिळाली. अर्थात भाजप व पवारसाहेब यांचं अनाकलनीय नातं लक्षात घेता हा सगळाच संगमनताचा मामलाही असू शकेल.

>>> Submitted by भरत. on 9 February, 2020 - 12:07 >>>

अपेक्षेप्रमाणेच अत्यंत जातीयवादी प्रतिसाद

पवारांनी कधी एक रुपयाचाही भ्रष्टयाचार केलेला नाही, मोक्याची जमीन हडपण्यासाठी कोणत्याही सामान्य नागरिकाला कधीच धमक्या दिलेल्या नाहीत, कोणाला आयुष्यातून उठवलेलं नाही, कोणाचाच धमक्यामुळे तणाव येऊन हार्टफेल होऊन मृत्यू झालेला नाही, कुठल्याच पदाचा कध्धीच गैरवापर केलेला नाही याची मला तरी खात्रीच आहे Biggrin

त्यामुळे ईडीने चौकशी केली तरी काहीच निष्पन्न होणार नाही. पवार आणि त्यांचे सर्व समर्थक अगदीच प्रामाणिक आहेत हो. फुल टाइम राजकारण करून केवळ रिकाम्या तुटपुंज्या वेळात इतकं साम्राज्य उभं केलंय त्यांनी.

>>> पवारांनी कधी एक रुपयाचाही भ्रष्टयाचार केलेला नाही, मोक्याची जमीन हडपण्यासाठी कोणत्याही सामान्य नागरिकाला कधीच धमक्या दिलेल्या नाहीत, कोणाला आयुष्यातून उठवलेलं नाही, कोणाचाच धमक्यामुळे तणाव येऊन हार्टफेल होऊन मृत्यू झालेला नाही, कुठल्याच पदाचा कध्धीच गैरवापर केलेला नाही याची मला तरी खात्रीच आहे. >>>

त्यांनी कधीही जातीयवादी वक्तव्ये केली नाही, कधीही कोणाचाही विश्वासघात केला नाही, ते क्रिकेट अतिशय उत्तम खेळतात . . .

गुजराती चाणक्याने इ डी केसचा फटाका पवारांसारखी लावला.
पण त्या स्फोटात सापडले फडण२०.
त्याच फडण२० कडून पवारांच्या पुतण्याने क्लीनचिट सुद्धा घेतल्या.

तेव्हापासून श्री आणि सौ फडण२० आणि महाराष्ट्रातले भाजपायी
अगदीच पिसाळल्यागत झालेत.

क्लीनचीट मिळणारच ना- पवार आणि पुतण्या दोघे अगदीच प्रामाणिक व स्वच्छ आहेत Biggrin

फडणविसांसारख्या पिसाळण्याची टेंडंसी असलेल्या व्यक्तीला पाच वर्ष महाराष्ट्रात सीएम म्हणून पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे राहता आलं ही मात्र अल्टरनेट रिअ‍ॅलिटीतली अफवा आहे हं.

NCP chief Sharad Pawar today said no government has the right to interfere in Islamic laws related to talaq (divorce), which have their origins in the Quran.

He said that said if banning instant triple talaq was about giving protection to women, then "whatever one intends to do should be done by taking prominent people in the Muslim community and clerics in confidence".

"But talaq is a way provided by the Quran in Islam. It's a message, and no ruler has the right to interfere with that," he said at a party rally in Aurangabad.

https://www.ndtv.com/india-news/talaq-laid-out-in-quran-no-government-ca...

पवार साहेबांचे पुरोगामी, सेक्युलर आणि स्त्रीसमानतापूर्ण विचार. या विचारसरणीचे त्यांचे समर्थक या धाग्यावर जोरदार बॅटींग करत आहेत यात नवल नाही.
कुराणात लिहिलेल्या इस्लामिक लॉजमध्ये ढवळाढवळ न करता ते तसेच्या तसे लागू करणारं सरकार यावं या तुमच्या स्वप्नासाठी शुभेच्छा!

गुजराती चाणक्याने इ डी केसचा फटाका पवारांसारखी लावला.
पण त्या स्फोटात सापडले फडण२०.
त्याच फडण२० कडून पवारांच्या पुतण्याने क्लीनचिट सुद्धा घेतल्या.

तेव्हापासून श्री आणि सौ फडण२० आणि महाराष्ट्रातले भाजपायी
अगदीच पिसाळल्यागत झालेत.

Submitted by भरत. on 9 February, 2020 - 14:40 >>>

Rajesh१८८ भाऊंची कॉपी करताय की काय? थंड घ्या.. तुम्ही कितीही बाजू लावून धरली तरीही पवार तुम्हाला व्यवस्थित तोंडघशी पाडत राहतील. वरचा प्रतिसाद पहा नी पवारांची ती तलाक बाबतची मते मान्य आहेत म्हणून सांगा...

कोणाचे गुरू कोण होते हे बघण्यापेक्षा त्या कोणाचेतरी आपण शिष्य होऊ शकत आहोत का हे साडे तीनशे, चारशे वर्षांनी बघायची वेळ आहे.

महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतली तशी यांनी राष्ट्रवादी काढून करून घेतली हे एक क्षुल्लक साम्य (!) सोडले तर इतर काय काय साम्य आहे यावरही चर्चा व्हावी बहुधा!

>>मोराने पिसारा फुलवला की पार्श्वभाग उघडा पडतो तशातला प्रकार आहे तो<<
पसंद अपनी अपनी. काहिंना फक्त पार्श्वभाग दिसतो, इतरांना पिसार्‍याचं सौंदर्य बघण्याची दृष्टि असते... Wink

मूळ मुद्दा (महाराजांचे गुरु) खोडुन काढण्यास पुरावे नाहित म्हणुन "जाणता राजा" हे नविन पिल्लु (तेहि चावुन चोथा झालेलं) सोडलेलं आहे. लगे रहो...

>>कोणाचे गुरू कोण होते हे बघण्यापेक्षा त्या कोणाचेतरी आपण शिष्य होऊ शकत आहोत का हे साडे तीनशे, चारशे वर्षांनी बघायची वेळ आहे<<
छ्या, मोदि पण ना. पवारसाहेबांना जाहिरपणे गुरु मानुन भक्तांची अडचण करुन ठेवलेली आहे...

>>> मूळ मुद्दा (महाराजांचे गुरु) खोडुन काढण्यास पुरावे नाहित म्हणुन "जाणता राजा" हे नविन पिल्लु (तेहि चावुन चोथा झालेलं) सोडलेलं आहे. लगे रहो... >>>

जातीय आग लावण्यासाठीच "समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते" हे पिल्लू सोडलेलं आहे.

बाकी पुराव्यांचा विचार केला तर समर्थ रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हे यापूर्वीच खऱ्या इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने बिग्रेंडींनी लिहिलेली द्वेषपूर्ण घाण हाच खरा इतिहास म्हणून मान्यता दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे. बिग्रेंडींची दहशत लक्षात घेता आता कोणताही खरा इतिहासकार या वादात पडत नाही कारण प्रत्येकालाच आपल्या जिवाची भीति असते.

>>बिग्रेंडींची दहशत लक्षात घेता आता कोणताही खरा इतिहासकार या वादात पडत नाही कारण प्रत्येकालाच आपल्या जिवाची भीति असते.<<
हाहा. अशीच दहशत (दडपण) त्या "खर्‍या ईतिहासकारांना" खोटा ईतिहास लिहिण्याकरता झाली असेल का? बघा एकदा विचार करुन...

>>> हाहा. अशीच दहशत (दडपण) त्या "खर्‍या ईतिहासकारांना" खोटा ईतिहास लिहिण्याकरता झाली असेल का? बघा एकदा विचार करुन... >>>

त्या इतिहासकारांनी जेव्हा खरा इतिहास लिहिला तेव्हा सुद्धा कॉंग्रेसच सत्तेवर होती. तेव्हाच्या कॉंग्रेसी सरकारने धमक्या दिल्या असाव्यात का?

छ्या, मोदि पण ना. पवारसाहेबांना जाहिरपणे गुरु मानुन भक्तांची अडचण करुन ठेवलेली आहे...

नवीन Submitted by राज on 9 February, 2020 - 20:33 >>

हा काकांच्या चेल्यांचा एक गोड भ्रम आहे. मोदींनी ते वाक्य नोटाबंदीच्या आसपास बोलून (तारीख पडताळून पहा हवं तर) पवारांना मस्त गुगली टाकली. मग त्यांचं तोंड नोटाबंदी वर उघडायला तब्बल एक महिना लागला !
पवारांना कसं गुंडाळायच ते तीनदा मुख्यमंत्री व दोनदा पंतप्रधान स्वबळावर राहिलेल्या मोदींना माहीत नसेल या भ्रमात कोणी न राहिलेलं बरं.

क्रोनोलॉजी - भाजपच्या कार्यालयात खेटे शिवाजी -मोदी या पुस्तकाचं प्रकाशन हा सेल्फ बाउंसर होता.
त्यावर भाजपचं डायव्हर्शन जाणता राजा.
पवारांनी त्यांचा उपयोग करून घेतला. >>> डायवर्जन नव्हते ते चपखल प्रश्न होता. वरच्या पोस्ट मधे लिहीले आहे. दोन्ही एकदम सेम आहे. डायवर्जन पवारांनी केले.

यांनी असल्या काड्या घातल्या की ते जातीयवादी आणि त्यांनी घातल्या की ते "उपयोग करून घेणे" वगैरे. हे महाराष्टातील पुरोगामी लॉजिक आहे.

मूळ मुद्दा (महाराजांचे गुरु) खोडुन काढण्यास पुरावे नाहित म्हणुन "जाणता राजा" हे नविन पिल्लु (तेहि चावुन चोथा झालेलं) सोडलेलं आहे. लगे रहो... >>> उलटी क्रोनॉलॉजी आहे ही. तुम्ही ज्या क्रमाने बातम्या आल्या तशा क्रमाने वाचल्या नसाव्यात.

शिवाजी महाराजांची उपमा चेल्यांनी यांना दिलेली आणि त्यांना दिलेली यात काय फरक आहे हा वाद होता. कोण गुरू आहेत वगैरे नव्हे. आता त्याला राजकीय चाल म्हणा, मास्टरस्ट्रोक म्हणा किंवा काहीही. पण हेच लॉजिक इतर पक्षांचे नेते हे करतात तेव्हा लावा.

>>> हा काकांच्या चेल्यांचा एक गोड भ्रम आहे. मोदींनी ते वाक्य नोटाबंदीच्या आसपास बोलून (तारीख पडताळून पहा हवं तर) पवारांना मस्त गुगली टाकली. मग त्यांचं तोंड नोटाबंदी वर उघडायला तब्बल एक महिना लागला !
पवारांना कसं गुंडाळायच ते तीनदा मुख्यमंत्री व दोनदा पंतप्रधान स्वबळावर राहिलेल्या मोदींना माहीत नसेल या भ्रमात कोणी न राहिलेलं बरं. >>>

+ १

मोदींनी तसे उपरोधाने म्हटले होते, हे पवारभक्तांना अजूनही समजलेले नाही.

तो चपखल प्रश्न ते पुस्तक छापून मागे घेईतो पडला नाही का?
-
पवारांनी गुरू शिष्य मुद्दा काढून उलट शिंगावर घेतलं. डायव्हर्शन कसलं?

मोदी घर सोडून जाणार , हे त्यांच्या घरच्यांनाही माहीत नव्हते,

आणि ते उप्रोधाने बोलले हे लोकांना इथे बसून कसे समजले?

बरे , बोलणे उपरोधिक असते , पदमभूषण पुरस्कारसुद्धा उपरोधाने देतात का?

पदमभूषण पुरस्कारसुद्धा उपरोधाने देतात का?

नवीन Submitted by BLACKCAT on 9 February, 2020 - 22:24 >>

नाही तो दयाबुद्धिने दिला...किती वर्ष झाली स्वबळावर काहीतरी करायची, पण आता पिकलं पान झालंय. कलाकारांना कसं जीवनगौरव वगैरे देतात तसच या कलाकाराला पद्मभूषण दिलं..

पडला आता तुझ्या गुढग्यात प्रकाश ?

पवार 79
आणि मोदी 69

अजून दोघे तरुणच आहेत की,

पवारांच पान पिकलं पिकलं म्हणून फडनवीसांचंच कमळ दिल्लीच्या गल्लीत जाऊन पडलं

कॉंग्रेस मधून बाहेर पडून रा कॉं स्थापना करुन ( भले परत इंकॉशी चुम्माचाटी केली) कॉंग्रेस कमकुवत केली. यासाठी पद्मभूषण पुरस्कार दीला असणार.

>>> पवारांनी गुरू शिष्य मुद्दा काढून उलट शिंगावर घेतलं. डायव्हर्शन कसलं? >>>

कसलं डोंबलाचं शिंगावर घेतलं? शिंगे शिल्लक आहेत का? आपली शिंगे, दात, शेपूट इ. त्यांनी केव्हाच सोनियादेवींना अर्पण केलंय. २००२ पासून मोदींना शिंगावर घ्यायचे अनेकांनी जिवापाड प्रयत्न केले आहेत. पण मोदींंना साधे खरचटले सुद्धा नाही, पण शिंगावर घेणाऱ्यांची शिंगे मोडून ते भुईसपाट झाले.

Pages