जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळं उघडवाघडं सत्य आहे पण मुद्दामच डोळ्यांवर कातडं ओढून घेऊन पध्दतशीरपणे देश, हिंदू धर्म तोडण्याच्या खेळ्या तथाकथित लोक करत आहेत.
भीमा कोरेगाव लढाईत पाचशे लोकांनी पंचवीस हजार सैन्याचा पराभव केला असता तर इंग्रजांनी अशा असामान्य लोकांना किती डोक्यावर घेतले असते. एवढ्या खतरनाक शूर लोकांना घेऊन त्यांनी अख्खे जग जिंकले असते. भारत सोडून जाताना आपल्या बरोबर शूर जमातीला घेऊन गेले असते. सैन्यात, राणीच्या अंगरक्षकांत याच लोकांची निवड केली असती. विशेष म्हणजे त्यांना अॅट्रॉसिटी कायद्यानं सामाजिक न्याय दिला असता.

आपले राज भाऊ प्रतिसाद देते झालेले नाहीत बराच काळ...

मला त्यांना विचारायचं होत की भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल डफ ने काही लिहून ठेवलंय का? म्हणजे १ जानेवारी १८१८ रोजी २८००० पेशवे मारले वगैरे घटना खरेच झाली होती का ? की पेशव्यांच्या सैन्याकडून त्या दिवशी ब्रिटिशांच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला होता? श्रीमान पवार काकांचे व बिग्रेडचे या इतिहासाच्या बाबतीत काय मत आहे? असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात आहेत..

राज भौंसारखे जाणकार उत्तर देतील काय?

रश्मी, तुम्ही पुन्हा पुन्हा खोट्या प्रचाराला बळी पडता याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
https://twitter.com/timesfactcheck/status/1227856479480270849
https://navbharattimes.indiatimes.com/viral-adda/fake-news-buster/aam-aa...
अमानतुल्लाह खान के जिस ट्वीट का स्क्रीनशॉट शेयर किया जा रहा उससे छेड़छाड़ की गई है। असली ट्वीट में उन्होंने सिर्फ 72 हजार वोटों से आगे रहने का जिक्र किया है।

आता मला सांगा पुन्हा पुन्हा खड्ड्यात पडणारं मेंढरू कोण?

इथे काही लोक हे सग ळं खोटं आहे हे माहीत असूनही ते पसरवतात, तुम्ही त्यांतल्या नसाव्यात अशी अपेक्षा ठेवावी का?>>>>>>> भरत, हे जर खोटं असेल तर मला त्या फेक न्युज वाल्यांविषयी नक्कीच संताप वाटेल, कारण अफवांमुळे काय काय विनाश होतो ते मला माहीत आहे. मी सनातन आणी बजरंग दलाला मानत नाही.. पण मला एक सांगा अशा काही घटना घडल्या की तुम्हाला आमच्यासारख्यांनी खेद व्यक्त करावा असे वाटते, मग तुम्ही कधी ओवेसी सारख्या लोकांच्या चिथावणीवर खेद व्यक्त केलाय का? मला तर तसे कधी दिसुन नाही आले. गोली मारो सारखे उद्गार निश्चीतच निंदनीय आहेत. पण आम्हाला पण करबला माहीत आहे, आमच्या ताज आणी कुतुबमिनार मुळे हे लोक कोट्यावधी कमावतात हे उद्गार कसले चिन्ह आहे? तुम्हाला हे माहीत नसेल असे वाटत नाही. मग तुम्ही त्यावर का नाही खेद व्यक्त केला? खेद नेहेमी एकाच बाजूने का?

माणुस गेल्यावर काही वाईट बोलु नये असे रिवाज आहेत, पण इथे एक माणुस जिवंतपणीच लोकनिंदेला पात्र झालाय त्याचे काय? मी पवारांबद्दल बोलतेय. वर सनवने जे सांगीतलयं ते चूक आहे का? तुम्ही दिलेल्या लिंका खर्‍या आणी बाकीच्यांच्या खोट्या ?

भाऊ तोरसेकरांचा यु ट्युबवर व्हिडीओ बघा,मग कळेल पवार काय आहेत. आता असे म्हणू नका की भाऊंना भाजपाने पढवले असेल.

वर सनवने जे सांगीतलयं ते चूक आहे का? तुम्ही दिलेल्या लिंका खर्‍या आणी बाकीच्यांच्या खोट्या ?

मी तर रविष कुमारच्या च्यानलची लिंक दिलीय. पवारसाहेबांचे व्यवस्थित कोट्स आहेत. याबद्दल काहीच बोलता येत नाहीये म्हणून आमची लपाछपी सुरुय Wink

<भरत, हे जर खोटं असेल तर मला त्या फेक न्युज वाल्यांविषयी नक्कीच संताप वाटेल, कारण अफवांमुळे काय काय विनाश होतो ते मला माहीत आहे.> असेल म्हणजे? अजूनही तुम्हांला खात्री नाही ? की आशा आहे, अमानतुल्ला खान तसंच बोलले असतील म्हणून?

प्रतिसादातल्या पुढच्या भागाचा या सगळ्याशी काही संबंध नाही. तो मुद्दा जिथे असेल तिथे बोलेन.

भाजपवाले नित्यनेमाने द्वेषनिर्मिती होईल अशा खोट्या बातम्या पसरवत असतात. हे इतके वेळा दिसूनही तुम्ही पुन्हा पुन्हा त्यावर विश्वास कसा ठेवता? याचं एकच कारण आहे, तुम्हां मंडळींना फक्त द्वेष करायचा आहे. बातम्या खोट्या की खर्‍या याने तुम्हां मंड्ळींना फरक पडत नाही.
इथेच बघा. अमानतुल्ला खान यांच्याबाबत तुम्ही जे लिहिलं ती अफवा आहे हे मी दाखवून देताच त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, म्हटलं गेलं. दुसरेच असंबद्ध मुद्दे मांडले गेले. त्यासाठी ट्रोलधाड चालून आली.

आणि हे भाऊ तोरसेकर कोण? मी का त्यांचा व्हिडियो पाहू ? यापेक्षा बरे उद्योग आहेत मला.

रश्मीने पण तोच प्रश्न विचारलाय जो मी विचारलाय.
कुराणातील इस्लामिक कायदे यात कोणतंही सरकार interfere करू शकत नाही म्हणजे काय? पवारसाहेब म्हणत आहेत. तुमचं मत काय?

इथेच बघा. अमानतुल्ला खान यांच्याबाबत तुम्ही जे लिहिलं ती अफवा आहे हे मी दाखवून देताच त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, म्हटलं गेलं. दुसरेच असंबद्ध मुद्दे मांडले गेले. त्यासाठी ट्रोलधाड चालून आली.>>>>> भरत Proud हे तुमच्या बाबतीत पण लागु होतेय असे नाही वाटत? ओवेसीच्या ( तुम्ही अर्ध्या- १ तासाकरता संपूर्ण भारताचे पोलीस दल काढुन घ्या मग बघा आम्ही काय करतो ते ) आणी शाहीन बाग मधल्या मुस्लिम स्त्रियांच्या करबला विषयी च्या उद्गाराचे तुम्ही समर्थन कराल का? किंवा करता का? किंवा या विषयी तुमचे मत पण जाणुन घ्यायला आवडेल.

जर भाऊ तोरसेकरांविषयी तुम्हाला खरे खोटे जाणुन घ्यायचे नाही ( ते एक वरिष्ठ पत्रकार असुनही ) तर मी कशाला त्या अमानुल्ला की कोण तो त्याचे खरे आहे की खोटे याचा विचार करु?

भारताचा इतिहास आहे की कुठल्याही हिंदुने कोणत्या धर्मावर किंवा धर्मस्थलावर आक्रमणे केलेली नाहीत. उलट येणार्‍यांना समावुन घेतले आहे. पण याचा अर्थ हा नाही की कोणीही उठावे नी हिंदुना गृहीत धरुन धमक्या द्याव्यात. याच ओवेसीला जेव्हा ABP माझ्याच्या कार्यक्रमात पत्रकारांनी प्रश्न विचारले तर कसा फाफलला होता. भावाची बाजू मांडु शकला नाही.

या लोकांना तर तुमच्या सारखे सेक्युलर्स काहीच बोलत नाहीत, पण हिंदु सहनशील आहेत ना, मग झोडा त्यांना. कोणीही भारतीय मुस्लिमांना कुठे हाकलत नाहीये, पण त्यांच्या अर्धशिक्षीत लोकांचा फायदा घेऊन त्यांना भडकावण्याचे चांगले उद्योग सुरु आहेत. यात तुमची मॅडम, तिचा सुपुत्र, सुकन्या ( तरी मॅडम परदेशी आहेत ) , डावे, खालचे , वरचे सगळे गोंधळ घालतायत.

जाता जाता, इतके दिवस नातवाला शाळेत सोडायला येतांना साडी, बांगड्या, मंगळसुत्र घालुन येणारी एक मुस्लिम स्त्री काही दिवसापासुन पूर्ण पांढर्‍या वेषात ( पंजाबी ड्रेस ) येतेय हे मी दररोज बघतेय.

https://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/040218/talaq-prov...

https://timesofindia.indiatimes.com/india/no-govt-has-right-to-interfere...

https://www.firstpost.com/india/sharad-pawar-says-no-government-has-righ...

अजून दुवे हवेत?

आम्ही चाणक्य सर्वज्ञ आणि शहाणे आहोत
आम्ही चाणक्य सर्वज्ञ आणि शहाणे आहोत
आम्ही चाणक्य सर्वज्ञ आणि शहाणे आहोत

सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे पूर्णपीठ, मुस्लिम वैयक्तिक कायदा बोर्डाचे पदाधिकारी, त्यांचे वकील इ सर्व यांनी स्वच्छ शब्दात मान्य केलंय कि कुराणात तीन तलाकला कोणताही आधार नाही.

पण मतांसाठी काहीही

अहो डॉ. या लोकांना फक्त मते हवीत ( हे लोक म्हणजे भरत किंवा बाकी नाहीत ) आणी आपल्या येणार्‍या २८ पिढ्यांचे कोटकल्याण. मग मरे ना का ते लोक. सामान्य शिवसैनिक का पालखीच वहातो, तो मुख्यमंत्री का होत नाही ? बघा. झाले ना ते मुख्यमंत्री?

आणी काकांचे नातु-पणतु-पुतणे सगळे लाईनीत आले पाहीजेत बरं का सत्तेवर.

कष्टाच्या पैशांतून हेलीकाप्टर घेणार हाये वो नातू.
वार लावून जेवणाऱ्या काही पुढाऱ्यांची पोरं आता मर्सिडीज मधून फिरायलीत.

रश्मी, तुम्हांला माझा मुद्दा कळत नाहीए की कळून घ्यायचाच नाहीए.
अमानतुल्ला खान यांच्याबद्दल जी माहिती तुमच्याबद्दल पोचली ती खोटी आहे. त्यावर तुम्ही रिअ‍ॅक्ट झालात. माझा मुद्दा ती जाणुनबुजून पसरवलेली खोटी बातमी होती हा आहे.
आता तुम्ही स्वतःच लिहिलंत की ते खरं की खोटं हे मी का जाणून घेऊ? म्हणजेच ते खोटं आहे हे माहीत असूनही तुम्हाला त्यावर थय थय नाचायचं आहे.
इथे मुद्दा खरं की खोटं याचा आहे. आणि हे तुमच्या बाबत पहिल्यांदा झालेलं नाही. आणि याबद्दल तुम्हाला खेदही वाटत नाही.

परदेशी मॅडम म्हणजे काय? त्या भारताच्या नागरिक आहेत. त्यांना परदेशी म्हणणं हा तुमच्या मनाचा कोतेपणा झाला.

मी अमुक उद्गारांचं समर्थन क रतो का हा प्रश्न निरर्थक आहे. कोणत्याही हिंसाचाराचं किंवा हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या वक्तव्याचं मी कधीही समर्थन केलेलं नाही. पण तुमच्याकडली अनेक मंडळी असं करताना दिसतात. शाहीन बाग बद्दल तुम्ही आता लि हिलंत ते खरं आहे, हे तपासलंत का?. प्रवेश वर्माने शाहीन बाग वरून हे लोक तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील , असं म्हटलं त्याचंही तुम्ही समर्थन केलंत. हाच प्रवेश वर्मा राजीव गांधींचा उल्लेख राजीव खान असा करतो. बघा तुमचा पक्ष पूर्णपणे द्वेषपूर्ण कानगोष्टींवरच पोसलेला आहे. आधी जी कुजबूज होत असे, ते आता उघडपणे बोललं जातं हाच फरक.

'ज्येष्ठ पत्रकार' यातल्या ज्येष्ठ आणि पत्रकार या दोन्ही शब्दांच्या तुमच्या आणि माझ्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.

परदेशी मॅडम म्हणजे काय? त्या भारताच्या नागरिक आहेत. त्यांना परदेशी म्हणणं हा तुमच्या मनाचा कोतेपणा झाला.>>>>> भरत, मग पाकीस्तान व बांगलादेश या देशातुन येणार्‍या हिंदुंना ( जे भारतात शरणार्थी म्हणून येणारेत ) वेगळे का समजले जातेय? परदेशातुन आलेल्या सोनिया या देशाची सन्माननीय नागरीक झाल्या मग बाकी लोकांना तो का नको? की फक्त बांगलादेशी घुसखोरांनाच तो अधिकार आहे? सोनिया या कायद्याला विरोध करतायत म्हणूनच मी तसे म्हणले.

प्रवेश वर्माबद्दल मी कुठेही समर्थन केलेले नाही, किंवा त्याचे नावही घेतलेले नाहीये. मग माझ्याबद्दल तुम्ही असे कसे लिहु शकता? मी आधीच स्पष्ट केले की अमानुल्ला खान बद्दल जर ती अफवा पसरली गेली असेल तर मी नक्कीच खेद व्यक्त करतेय. मी कशाला नाचु? जमत नाही मला ते.

इथे मुद्दा खरं की खोटं याचा आहे. आणि हे तुमच्या बाबत पहिल्यांदा झालेलं नाही. आणि याबद्दल तुम्हाला खेदही वाटत नाही.>>>> हे कुठे बघीतलेत?

सेकुलर काय फक्त हिंदूंनीच राहायचे का? इथे कोणीही काँग्रेसी उठतो आणि सरळ सरळ भगवा दशतवाद म्हणतो त्यांना कोणी काही बोलत नाही पण मारले गेलेले सगळेच दहशतवादी हे मुस्लिम कसे असा प्रश्न विचारला कि काका लगेच खवळतात. त्यांना काही बोलू नका म्हणून उड्या मारायला लागतात. त्यांचा तो चेला आव्हाड तर शाबुद्दीनला बहीण मानून सरळ घरी वगरे गेला होता, त्याला नाही सबुरीचा सल्ला दिला तेव्हा?

खरं तर हिंदूंना इतरांपासून नाही तर या असल्या (अ) जाणत्या लोकांचाच धोका आहे ....

पाकीस्तान व बांगलादेश या देशातुन येणार्‍या हिंदुंना ( जे भारतात शरणार्थी म्हणून येणारेत ) वेगळे का समजले जातेय? परदेशातुन आलेल्या सोनिया या देशाची सन्माननीय नागरीक झाल्या मग बाकी लोकांना तो का नको?

Proud

आणा तुम्ही पाकिस्तानातून निराधार हिंदू अन तिला भारताची नागरिक अन भाजपाची अध्यक्ष करा

त्यासाठी नवीन कायद्यांची गरज नाहीच . जुने कायदे सफिसीएन्ट आहेत.
पण गोरगरीब हिंदूंना नागरिक करून घेतो , असे सांगून तुमचे सरकार तर अदनान सामीला नागरिक करून घेत आहे.

----

आणि तुम्हाला ते तसेही जमणार नाहीच , तुम्हाला हे जमले असते तर हिडिंबेचा घटोत्कच , मस्तानीचा समशेर आणि सोनियाचा राहुल ह्यांना तुम्ही हिणवले नसते,

@ BLACKCAT - परदेशी लोकांचा तुम्हाला फारच पुळका दिसतोय. तुमच्या मॅडम जरी नागरिक झाल्या असल्या तरी जन्माने भारतीय नसल्याने त्यांना कुठलेही मोठं पद देणं योग्य नाहीच. हाच नियम इतर लोकांना पण लागू होतो मग तो कोणीही असो.

हो का, तसे कायदे करा,

मला फक्त भारतीय कायद्याचा पुळका आहे,

कायदा बोलला, सोनिया नागरिक , तर त्यांचे स्वागत
कायदा बोलला, अदनान सामी नागरिक , तर त्याचेही स्वागत

काका वारकऱ्यांना म्हणताहेत की "तुम्हाला संप्रदायच कळला नाही" ! अशी दै. सकाळमध्ये बातमी आहे... त्याखालील एका वाचकाची प्रतिक्रिया..

"तुम्ही फक्त मैलोन मेल चालत पंढरीला जाता. तुम्हाला कसा समजणार वारकरी पंथ. आम्ही मोटारीतून जातो, शेतकऱ्यांच्या जमिनी हडपतो, लवासा निर्माण करतो, पैसे देऊन मोर्चा काढतो, सतत समाजात जातीवरून भांडण लावतो. आम्हाला खरा वारकरी संप्रदाय समजतो"

रश्मी, दिल्ली निवडणुका धाग्यां वर प्रवेश वर्मांच्या कमेंटबद्दल तुम्ही फाळणी दरम्यान झालेल्या अत्याचारांचा दाखला देउन ते योग्य ठरवले होते.

छपाक चित्रपटाच्या व्हिलनच ं नाव बदलून तो हिंदू दाखवला या अफवेवर तुम्ही विश्वास ठेवला होता.

सोनियांचा या कायद्याला विरोध का आहे, ते तुम्हांला चांगलंच माहीत आहे. तीन देशच का निवडले आणि त्यातले धार्मिक अल्पसंख्य च का निवडले? इतर का नाही हा मुद्दा आहे.

पुन्हा थोडं मागं जातो.
अमानतुल्ला खान यांच्याबद्दल रश्मी यांनी लिहिलेलं खोटं आहे हे दिसताच स्ट्रॉमन स्पेशालिस्ट नी अमानतुल्ला खान एका लहान पक्षाचा आमदार आहे, महत्त्वाचा ना ही . आपण शरद पवारांवर बोलू अशी बगल दिली. म्हणजे काय तर या अशा खोट्या बातम्या भाजप आयटी सेल पसरवतो या मुद्द्याला बगल दिली. त्याबद्दल कोणाला ना खेद ना खंत. अर्थात यात नवल नाही. प्रकाश जावडेकरांसारखा माणूस जिथे मी अरविंद केजरीवाल ना टेररिस्ट म्हटलं नाही, अमित शहा एन आर सीचा कोणताही विचार नाही, असं आपण वोललो त्याच्या बरोबर उलट धडधडीत खोटं बोलू शकतात तिथे भाजपच्या फेसलेस ट्रोल्सना तर खोटारडेपणात कसलीच कसर ठेवायचं कारण नाही.

शरद पवारांची लिंक मी मायबोलीवर आधीही दिलेली आहे. ती खोटी असती तर तुम्ही दखल घेऊन दहा पुरावे घेऊन वाद घातला असता. पण ती लिंक अगदीच खरी आहे आणि म्हणून तुम्ही ती sidestep करत आहात.
संविधानानुसार सरकारला कायदे करण्याचा हक्क आहे असं आम्ही शाळेत शिकलो. पण इस्लामिक कायद्यात कसलाही interference करू शकत नाही असं पवार साहेब म्हणतात.
तुम्हाला ना उघडपणे समर्थन करता येतंय ना विरोध.

हो ना
साहेबांच्या भाट आणि खुशमस्कर्यानी

साहेबांबद्दल काहींच्या काही लिहिल्या गेलेलं आहे इथे अध्यक्ष महोदय.

अरे भरत भाजपचे लोक सगळे खोटारडे आहेत नी उरलेले सगळे धुतलेले तांदूळ आहेत हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न आणखी किती करणारेस?? तीन तीन प्रतिसादांत एकच रडगाण गाऊन तू काय म्हणतोय ते इतरांना न समजायला इथे काँग्रेसच अधिवेशन भरलय काय?

तरी बरय की सुप्रीम कोर्टाने रागा ला खोटं बोलण्याच सर्टिफिकेट बाकायदा प्रदान केलय आणि केजरू तसे सर्टिफिकेट मिळायच्या आधी माफी मागून मोकळा झाला !

चल आता बिटिंग अराऊंड द बुश सोड, नी काका पवारांच्या तीन तलाक बाबतच्या वक्तव्यावर मत प्रदर्शन कर... टाईप करायला बोटं चळाचळा कापत असतील तर स्पीच टू टेक्स्ट सॉफ्टवेअर चा वापर कर.

काका पवारांच्या तीन तलाक बाबतच्या वक्तव्यावर

माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेलेला आहे.
मला तसं म्हणायचं नव्हतंच
पत्रकारांनी राईचा पर्वत केला आहे.
व्हिडिओ मध्ये फेरफार केला आहे.
तो मी नव्हेच

यातील कोणतीही किंवा अशीच वाक्ये येतीलच.

भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल डफ ने काही लिहून ठेवलंय का? म्हणजे १ जानेवारी १८१८ रोजी २८००० पेशवे मारले वगैरे घटना खरेच झाली होती का ? की पेशव्यांच्या सैन्याकडून त्या दिवशी ब्रिटिशांच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला होता? श्रीमान पवार काकांचे व बिग्रेडचे या इतिहासाच्या बाबतीत काय मत आहे? असे बरेचसे प्रश्न माझ्या मनात आहेत..

राज भौंसारखे जाणकार उत्तर देतील काय?

भरत, काका पवारांची तीन तलाक बाबतची स्पष्ट मांडलेली मते तुला मान्य आहेत काय? त्यांची मते कुठल्या फुरोगामित्वात बसतात?

<< पुन्हा थोडं मागं जातो.
अमानतुल्ला खान यांच्याबद्दल रश्मी यांनी लिहिलेलं खोटं आहे हे दिसताच स्ट्रॉमन स्पेशालिस्ट नी अमानतुल्ला खान एका लहान पक्षाचा आमदार आहे, महत्त्वाचा ना ही . आपण शरद पवारांवर बोलू अशी बगल दिली. म्हणजे काय तर या अशा खोट्या बातम्या भाजप आयटी सेल पसरवतो या मुद्द्याला बगल दिली. त्याबद्दल कोणाला ना खेद ना खंत. अर्थात यात नवल नाही. प्रकाश जावडेकरांसारखा माणूस जिथे मी अरविंद केजरीवाल ना टेररिस्ट म्हटलं नाही, अमित शहा एन आर सीचा कोणताही विचार नाही, असं आपण वोललो त्याच्या बरोबर उलट धडधडीत खोटं बोलू शकतात तिथे भाजपच्या फेसलेस ट्रोल्सना तर खोटारडेपणात कसलीच कसर ठेवायचं कारण नाही. >>

---- त्या अमानुल्लाखानाबद्दलचे ट्विट खोटे होते हे भरत यांनी सिद्ध केले. अनेक वेळा पाठपुरावा केला आहे.

खोटी माहिती आहे हे माहित होते.... पण जाणतेपणी खोटी माहिती पसरवली... कारण द्वेष पसरवणे हाच उद्देश होता हे सिद्ध होते. तो उद्देश तसा नसता तर पोस्ट दुरुस्त केली असती.

तुम्ही जे लिहीले आहे त्याची संपुर्ण जबाबदारी तुमचीच आहे. चुका होतात पण त्या मान्य करुन पुढे जाण्याचे धारिष्ट्य असायला हवे. खोट्याचा प्रसार करण्यासाठी आपला वापर होतो आहे आणि तो झाला तरी चालेल पण मुस्लीमद्वेष पसरवणार....

शहानिशा करायची जबाबदारी माझी ? छे छे.... नाहीच.

नकळत चुक झाली असेल (अमानुल्ला खानाचे नसलेले ट्विट त्याचे आहे म्हणून येथे त्यातला तोड फोड मजकुर डकवला असेल) तर मान्य करण्यात कुठलाही कमीपणा वाटायचे कारण नाही.

दौंड स्टेशनवर १०-१२ च्या समुहाने एका प्रवाशाला मारहाण केली. मारहाणीत त्या प्रवाशाचा मृत्यु झाला. अनेक वृत्तपत्रांनी तशी बातमी दिली पण बहुतेक सर्व ठिकाणी मारणा र्‍यांचा धर्म दिलेला नव्हता. काहींना यातही संधी दिसली.

धार्मिक द्वेष पसरविण्याच्या कामासाठी नेमलेल्या IT सेलचे लोक कामाला लागले... धार्मिक तेढ वाढविणारे ट्विट तयार केले गेले. मारहाण करणारे एका विशिष्ट धर्माचे होते असा सुप्त तसाच उघड संकेत देण्याचा प्रयत्न झाला....
बुरखा घातलेली शब्द जोडण्यात घुसडला आहे याची विषे विशेष कळजी घेण्यात आली.

धार्मिक रंग देण्याचा कशासाठी. मारला गेलेला हिंदू होता.... मारहाण करणारे सर्व लोक हिंदूच होते... हे सकाळ / पुढारी मधे नावांसकट आले आहे हा भाग वेगळा.

धार्मिक तेढ पसरवणारे आणि खोटे विधान हे काही तासातंच १२०० लोक reTweet करतात... लाखो लोकांची माथी भडकवतात आणि सर्व भक्त तसेच नवभक्त हिंदूराष्ट्र स्थापनेतले शिपाई एका धर्माला शिव्यांची लाखोली वहातात. या भडकलेल्या मात्यांपैकी १ % लोक काय करु शकतात सांगायला नको.
नंतर ते ट्विट आणि अकाउंट ब्लॉक होते. पण या मधातल्या काळात जो खोटा प्रसार केला गेला आणि माथी भडकवण्याची कामे झाली त्याचे काय ?

सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं...

>>> सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं... >>>

+ ७८६

राफेलबद्दलच्या खोट्या प्रचारातून आणि लोयांच्या मृत्युनंतर ३ वर्षे उलटल्यानंतर अचानक खोटे आरोप करून हे सिद्ध झालंच होतं.

Pages