जाणते काका अणि समर्थ रामदास

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:26

नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।

"रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका " अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सत्तेवर आलेले आघाडी सरकार लोककल्याणकारी राज्य चालवित असल्याने कदाचित "अस्मानी " संकटातून सर्व मराठी जनांची मुक्तता झालेली दिसते। भूमिपुत्राच्या आत्महत्या एकाएकी थांबलेल्या आहेत। भाजीपाल्याचे चढ़े दर , उसाला ज्यादा हमीभाव , घोषित झालेली सरसकट कर्जमाफी यामुळे असेल कदाचित निसर्गाच्या लहरीपणावर वैतागलेला बळीराजा थोडा सुखी वाटतो आहे। "रस्त्यावरील शेवटच्या " माणसाला १० रुपयात जेवण मिळू लागले आहे। असे सगळे "करून दाखविले " असल्यामुळे महाराष्ट्र सुस्तावला आहे।

त्याच मुळे असेल कदाचित आता समस्त पुरोगामी मंडळींनी " सुलतानी" संकटाकडे मोर्चा वळविलेला दिसतो। नवनिर्माणाची हाक देणाऱ्यांना आता " महाराष्ट्र धर्म अणि हिन्दवी स्वराज्य " याची भुरळ पडलेली दिसते , तर पूर्वाश्रमीचे हिंदुत्त्ववादी अणि आता नवपुरोगामी "हिन्दुत्त्व हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे , झेपत असेल तरच अंगावर घ्या " असा प्रेमाचा (?) सल्ला वडिलकीच्या नात्याने देत आहेत। या गदारोळात समस्त महाराष्ट्राचे काका , ज्यांना उभा महाराष्ट्र ( म्हणजे ४ जिल्हे ) जाणता राजा , कूटनीति तज्ञ म्हणून ओळखतो यांनी पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। ज्यांच्या प्रेरणेने हे लोककल्याणकारी राज्य काका चालवित आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज, यांची प्रेरणा कोण होती तर त्यांच्या आई " जिजाबाई ". बाकी इतिहासरूपी नाटक लिहणारे जे लेखनीक आहेत त्यांनी उगाचच " समर्थ रामदास " वैगरे मंडळी श्रेय नामवली मध्ये घुसडली आहेत। खरा इतिहास या पुरोगामी महाराष्ट्रासमोर येणे गरजेचे आहे। त्यामुळे " समर्थ रामदास " हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते अशी श्रद्धा वैगरे असेल तर बाबांनो जरा "सबुरीने घ्या ". कारण "इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे सर्व सोमे गोमे ओरडून सांगत असतात त्यामुळे हे तपासायचे असेल तर "सावधानपण आणोनिया चित्ता " अशी भावना ठेवणे गरजेचे आहे।

"टवाळे आवडे विनोद " च्या धर्तीवर " कुचाळे आवडे समर्थ " असे म्हणणे क्रमप्राप्त आहे कारण गेल्या १०० वर्षात त्यांच्या जीवनाविषयी , वैयक्तिक आयुष्यविषयी इतक्या कुचाळ्या प्रचलित आहेत की तो एक विक्रमच । आजच्या " Millennial " जनरेशनला वाटेल कोण हे "समर्थ रामदास " अणि काय वाद किंवा गोंधळ आहे हा तर त्यांच्यासाठी आजच्या भाषेत सांगायचे तर रामदास हे गेल्या १०० वर्षात आरोप हेत्वारोप यासाठी सोपे लक्ष्य(Soft Target) आहे कारण त्यांच्या आयुष्यात नाट्य आहे. ते असे

>"शुभ मंगल सावधान " म्हणल्यावर लग्न मंडपातुन बोहल्यावरून काढलेला पळ
" चिंता करितो विश्वाची " म्हणुन केलेली रामसाधना , १२ वर्षे देशभर प्रवास करून जाणलेली त्यावेळेची परिस्थिति। धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया आणि देशमुखी किंवा सरदारकी सांभाळन्यात गुंतलेले मराठी वीर।
" राम (आदर्श सांसारिक जीवनाचे टेम्पलेट ) अणि हनुमान ( ब्रम्हचारी अणि बलोपासना करणाऱ्या लोकांचे दैवत ) यांचे आदर्श घेऊन केलेली मठांची स्थापना, अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश। परमार्थाकडून प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करण्यासाठीचा पुरस्कार (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो )
यासाठीच धर्मरक्षक अणि कल्याणकारी राज्य असले पाहिजे म्हणून खटपट , ज्याचाच एक भाग म्हणजे शिवबाला अनुग्रह देऊन स्वराज्य स्थापनेच्या कामात प्रेरणा (यावरच वाद आहे )
असे सगळे "बातमीमूल्य (Story)" असलेले आयुष्य असल्यामुळे समर्थ कुचाळीचे टार्गेट ठरणारच।

समर्थांच्या संदर्भातील दोन आक्षेप म्हणजे

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे।
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का। ते छत्रपतींचे "राजकीय गुरु " (Political Advisor) का "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) असा एक जोडप्रश्न। त्यासाठी वादाचे हत्यार म्हणजे "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ " , ती शिवबाच्या १४वर्षी(१६४४) झाली का "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली।

संतमालिका अणि समर्थ :

संतमालिकेत जिथे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या नि अठरा पगड़ जातीतील संताना अधिकृतरित्या मानाचे स्थान आहे तिथे दासबोध कार अणि साक्षात्कारी समर्थांना बहिष्कृत करण्यात आले आहे याचे कारण म्हणजे

वारकरी पंथा पेक्षा त्यांचा पंथ वेगळा होता। वारकरी पंथाचे दैवत "पांडुरंग " अणि समर्थ सम्प्रदायचे दैवत "रामचंद्र ". तसे पाहिले तर पांडुरंग किंवा रामचंद्र दोघे ही विष्णुचे अवतार अणि त्यामुळे त्यांचे भक्तगण वैष्णवच पण या भक्तिमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा वेगवेगळ्या।
"मंजिल एक रास्ते अनेक " च्या धर्तीवर " पाण्डुरंगी दॄढ भावो " वर विश्वास ठेऊन चालणारा वारकरी अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करणारा समर्थ सम्प्रदायी (देव पाहून घेईल पेक्षा मी प्रयत्न करतो ) , दोघेही शेवटी विष्णूच्या चरणी लीन होणारे वैष्णवच।
संत विचारात प्रपंच्याच्या मिथ्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे त्यांच्या परमार्थ विचारात संसाराची अवहेलना अणि निवृतिमार्गाची भलावण जास्त दिसते , या उलट अस्मानी -सुलतानी संकटाला कंटाळलेल्या प्रजेला "जन बुडाले बुडाले " चा ठाहो फोडून प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करणारे प्रवृत्तिमार्गी संत म्हणजे समर्थ।
एकाचा निवृत्ति मार्ग अणि एकाचा प्रवृत्ति मार्ग , त्यामुळे अर्थातच समर्थ संत कुळापासून दुरावले।
हे कमी म्हणून की काय " चाय से ज्यादा किटली गरम " या न्यायाने समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले।
खरे बघितले तर तुकोबा(संत मालिकेतील ) अणि समर्थ या शिवकालीन संतांचे उत्तम संबंध होते। शिवाजीराजे मार्गदर्शनासाठी तुकोबांकडे गेले असता त्यांनी सरळ उपदेश केला तो असा "शरण असावे रामदासालागी।नमन साष्टांगी घाली त्यासी "
हे सर्व पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याच्यात वाद तो काय। याचे सोपे उत्तर म्हणजे "आपला नामस्मरणाचा रोग ". ताणतणाव अणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात विसाव्यासाठी , आपल्या पाठीमागे कोणी आहे असा विश्वास देणारे कोणी तरी असावे असे वाटणे चुकीचे नक्कीच नाही। "पांडुरंगी दॄढ भावो " या तत्त्वा प्रमाणे तो आधार "देव " नावाच्या संकल्पनेमध्ये पाहणे हे स्वाभाविक आहे , तिथे पोचण्याचा मार्ग म्हणजे भक्ति / नामस्मरण/सेवा इ। Action(कृति ) पेक्षा Attention ( देव पाहून घेईल) वर भरोसा असलेला असा भाबडा भाविक म्हणजे त्या मार्गावरून देवभेटीचा अनुभव किंवा जीवनाचा अर्थ वैगरे समजून घेताना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे वाटचाल करा असे सांगणाऱ्या समर्थांना "Follow " करणे शक्य नाही। त्याला साहजिकच वारकरी पंथाचा निवृतिमार्ग जास्त भावतो। कारण त्यात एक "Romanticism" आहे।

साधारणत: एवढी मोठी व्यापकता असल्यानंतर संख्या ( Stats ) & विदा( Data ) शास्त्राच्या नियमानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते। ते करताना त्याला समूहामध्ये( Cohort ) कैद केले जाते। तसे करताना या समूहाकड़े एक तर ग्राहक म्हणून बघितले जाते किंवा मतदार म्हणून अमिष दाखविले जाते। बाजारपेठ अणि निवडणूक प्रक्रियेत अनिवार्य असणारे वर्गीकरण कूपे ( Classification Buckets) मग या वारकरी पंथाला पण लागु होतात व त्याला आचार -विचार , आवडी -निवडी , खान-पान या सोप्या , सुलभ घटकांमध्ये बंदिस्त करतात। यातून निवडणुकीत आपला विचार आपल्या मतदात्यापर्यंत पोहचविणे कदाचित सोपे जाते। अणि राजकारणात ( विरोधाभास बघा , राजकारण हा शब्द समर्थांनी पहिल्यांदा मराठीत रूढ़ केला ) संख्या शात्र्यावर भर असल्यामुळे मग असे वाद , अशा भूमिका फायद्याच्या ठरतात। कूटनीति तज्ञ काका याला अपवाद कसे असतील।

राजकीय गुरु (Political Advisor) Vs मोक्ष गुरु ( Spiritual Guide):

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्या मागील प्रेरणा स्त्रोत समर्थ होते का हा दूसरा वादाचा मुद्दा। वर सांगितल्या प्रमाणे समर्थ साहित्याचा अभ्यास करणारे इतिहास तज्ञ वारकरी संताना "संताळे " म्हणून हिणवू लागले त्याचा वचपा काही जातीयवादी अणि अशा इतिहास तज्ञांचे विरोधक यांनी मग समर्थांना छत्रपतींचे "मोक्ष गुरु "( Spiritual Guide) करून स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान पुसण्याचे प्रयत्न चालविले। या वादाचे हत्यार होते "समर्थ अणि छत्रपती यांची भेट व भेटीची वेळ"

पहिला मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट शिवबाच्या १४-१५ वर्षी(१६४४-४५ ) मसूर (सध्या जे गाव अख्खा मसूर अणि रोटी साठी फेमस आहे ते ) येथे रामनवमीच्या उत्सवात झाली। समर्थ १२ वर्षे भारत भ्रमण करून कृष्णा तीरी परतल्यावर राम अणि हनुमान यांची उपासना व बलोपासना यांचा प्रचार करून धर्मान्तर , पारतंत्र्य याने पिचलेली प्रजा , अत्याचारामुळे घाबरलेल्या स्त्रिया यांना प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रपंचात स्थिर होण्याचा उपदेश करत होते। पुढे १६५०-१६५१ (शिवबा : वय :१९-२० वर्षे ) मध्ये शिंगणवाडी (चाफळ जवळ ) येथे समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला। स्वराज्य स्थापनेच्या कामी मदत केली।

याचा पुरावा म्हणून "समर्थ वाकेनिशी "(Daily diary किंवा हकिगतीचे टिपण ) किंवा "हनुमंत स्वामी हे जे समर्थ अनुयायी होते त्यांची बखर " मल्हार रामराव चिटनीस कृत "शिवचरित्र " असे दिले जातात ज्यामध्ये " वैशाख शुद्ध द्वितीयेला " शिंगणवाडी येथे अनुग्रह दिला। त्यावेळचे ओवीबद्ध पत्र (१६४९ )म्हणजे

"निश्चयाचा महामेरु / बहुत जनास आधारु

अखंड स्थितीचा निर्धारु /श्रीमंत योगी //"

याच पत्रात समर्थ म्हणतात " तुमचे देशी वास्तव्य केले /परंतु वर्तमान नाही घेतले " याचा अर्थ "एकाच प्रांतात काम करत असताना देखील तुमची भेट प्रत्यक्ष घेतली नाही। " याला उत्तर म्हणून शिवाजी राजे लिहतात

"दर्शनाच्या अपेक्षेने येत आहे कृपा करू दर्शन दिले पाहिजे। " हे पत्र अणि शिवबा एकाच वेळी समर्थांच्या भेटीला पोचतात। १६५०-५१ मध्ये समर्थांनी शिवबाला राजधर्म किंवा क्षात्रधर्म सांगितला, अनुग्रह दिला। पुढे १६५६ मध्ये प्रतापगड बांधून झाल्यावर भवानी देवीच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा झाला। समर्थांनी त्याला हजर राहून देवीला जी प्रार्थना अर्पण केली ती म्हणजे "एकचि मागने आता द्यावे ते मजकरणे। तुझाचि वाढवी राजा शीघ्र आम्हांसी देखता " याचा अर्थ सरळ आहे की " ह्या तुझ्या शिवाजीराज्याला आमच्या देखत लौकर वाढवून तू मोठा कर। "

पुढे समर्थांचे स्वराज निर्मितीतील योगदान अणि उपदेश एका वाक्यात सांगायचे म्हणजे

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा। " हे ब्रीदवाक्य।

यातील मराठा म्हणजे " महाराष्ट्रातील प्रजा/ हिन्दू लोक " अणि " महाराष्ट्र धर्म/हिन्दू धर्म म्हणजे न्याय अणि सत्यावर चालणारा कल्याणकारी राजधर्म "

दूसरा मत प्रवाह

समर्थ अणि छत्रपती यांची भेट "स्वराज निर्मितीचे काम पूर्ण होत आलेले असताना शिवरायांच्या ३९-४० व्या वर्षी(१६६९-१६७० ) झाली। याचा अर्थ शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण होत आलेले होते अणि त्यात समर्थ रामदास यांचा सहभाग नव्हता। ते फक्त शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु ( Spiritual Guide) ठरतात।

याचा पुरावा म्हणून समर्थ भक्त दिवाकर गोसावी याने केशव गोसावी यास पाठविलेले पत्र। ते पत्र म्हणजे

"राजेश्री शिवराजे भोसले हे समर्थांच्या भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले। मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली असल्यामुळे मी अकास (समर्थ शिष्य )येणे साठी लिहिले परन्तु अका चेही एने व्हावयाचे नाही। गावी भानजी गोसावी असतील राजे यांची पहिलीच भेट आहे। वाडीचे लोकास खटपटेत आणावे उपयोग होईल , झाड़ी बहोत आहे। लोभ करावा। "(चैत्र वदय द्वितीया १६७० )

राजे यांची पहिलीच भेट आहे एका वाक्यावर हा मतप्रवाह अवलंबिलेला आहे की राजे अणि समर्थ हे प्रथम १६७० (शिवबा : वय :४० वर्षे ) भेटले। इतिहास ज्यांना महित आहे त्यांना कळेल की राज्य स्थापनेचे काम जवळ जवळ पूर्ण झाले होते त्यामुळे "राजकीय गुरु " या उपाधिला समर्थ आपोआप च मुकतात।

कूटनीति तज्ञ काका यांचा या दुसऱ्या मतप्रवाहावर विश्वास आहे त्याचे कितीही कमी पुरावे असले तरी कारण सरळ आहे।

"मराठा तितुका मेळवावा / महाराष्ट्र धर्म वाढवावा" म्हणणारे समर्थ " हिन्दू लोकांना एकत्र करा , महाराष्ट्र धर्म म्हणजे स्वधर्म वाढवा असे सांगत आहेत। सेक्युलर काका त्याला कशी मान्यता देतील ,, ते त्यांच्या "Electoral Arithmetic " मध्ये बसणार नाही त्यामुळे अर्थातच शिवाजी महाराजांचे मोक्ष गुरु समर्थ म्हणणे फायद्याचे।

उगाच काही समर्थ प्रेमी (माझ्यासारखे ) काकांना "जातीयवादी " वैगरे ठरवितात ते बरोबर नाही कारण समर्थांवर टिका करून जर मतपेटी बलवान होत असेल तर ते क्षम्य नाही का।

शेवटी काय

"इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील मराठी रक्ताशी गाठ आहे " असे ओरडून सांगणारे सोमे गोमे अणि प्रयत्नवादावर विश्वास ठेऊन प्रवृत्तिमार्गाकडे जाण्यापेक्षा पांडुरंगी दॄढ भावो म्हणत नामस्मरणावर विश्वास असणारे मतदाता हाच तर कूटनीति तज्ञ , जाणते राजे काका यांचा "Target Audience" , त्यामुळे समर्थांचे अस्तित्व नाकारणे ही एक अगतिकता दूसरे काय।

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नंतर मात्र महाराजांनी समर्थांना गुरू म्हणजे आध्यात्मिक गुरू मानले हे तेवढेच सत्य आहे. अन म्हणूनच गुरुस्थानी सज्जनगडावर नेले.
Submitted by रॉनी on 18 February, 2020 - 11:33
<<>>

सहमत !
शिवरायांच्या मृत्युनंतर समर्थनांनी संभाजी राजांना लिहिलेले पत्र आजहि उपलब्ध आहे. त्या पत्रातील मजकूर पाहील्यास, अक्कल जागेवर असणार्‍या कोणाही माणसास हा प्रश्नच पडणार नाही की छत्रपती व समर्थ रामदास स्वामींमधे काय नाते होते ते.

Dr.Amol Kolhe
@kolhe_amol
·
8h
आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशिर्वाद घेतले.यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

https://twitter.com/kolhe_amol/status/1327178424574562305?s=20

--------------
मला वाटतं की सामान्य माणसांना राजकारण कधीच कळणार नाही.

देर आये दुरूस्त आये!

बाबासाहेब पुरंदर्‍यांविरूद्ध आणि तसल्याच आरोपांमधून तमाम ब्राह्मण समाजाविरूद्ध राळ उडवण्याचा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी होउन गेला. नंतर त्यातील हवा निघून गेली. विशेषतः इतर बहुजनसमाज दुरावल्यावर. आणि जे काय पुरोगामी स्टाइलने जातीय ध्रुवीकरण करायचे होते ते करून झाल्यावर नेत्यांचा इण्टरेस्ट गेला. त्यानंतर राष्ट्रवादीतील अनेकांनी पुरंदर्‍यांची बाजूही घेतली आहे. मुळात आरोपही खरे नव्हते व रागही. रागाचे सोंग होते (आणि अनेक स्वघोषित पुरोगाम्यांनी त्यावेळेस बोटचेपी व ब्रिगेड धार्जिणी भूमिका घेतली होती). त्यांची प्यादी अजून उगाचच तेच तेच धादांत खोटे आरोप पुन्हा काढून पकवतात. २०१५ साली त्यांना महाराष्ट्रभूषण दिला गेला तेव्हाही अजित पवारांनी त्याला समर्थन दिले होते व सुप्रिया सुळ्यांनीही त्यांचे अभिनंदन केले होते.

अशांनी "दादा म्हनले" ही कविता आवर्जून वाचावी. किंबहुना सोशल नेटवर्क्स वर असल्या वादांमधून इतरांची जात, धर्म वगैरे काढणार्‍या सर्वांनीच वाचावी.

हो आणि 2015 मध्ये शिवसेना पुरंदरेंच्या बाजूने उभी होती आणि आज सेना ब्रिगेडींची लाडकी आहे. राणे आणि त्यांचे पुत्र त्यावेळी पुरंदरेंच्या विरोधात होते ते आज भाजपवाले हिंदुत्ववादी झालेत(मुळात राणे शिवसेनेचे म्हणजे प्रो- हिंदुत्व आधी होते.)
आता फक्त बाबासाहेब पुरंदरेंना आमचा कधीच विरोध नव्हता आणि त्यांना ब्राह्मणच त्रास देतात असं म्हणायचं बाकी आहे. म्हणजे ब्राम्हण बिचारे नेहमीप्रमाणे 'माझाच गणपुळे' मोडमध्ये Biggrin

सेनेने अजून निदान पवित्रा बदललेला नाही, जरी राजकीय कारणाने राष्ट्रवादीबरोबर असली तरी. सेना व राज ठाकरे दोघेही कन्सिस्टंट आहेत याबाबतीत किमान. तेव्हाही पुरंदर्‍यांच्या बाजूने होते आणि आताही काही बदल झाल्याचे वाचले नाही.

म भु बाबासाहेब पुरंदरेना महान लेखक , कादंबरीकार म्हणून कुणाचाच विरोध नव्हता

काही 2,4 प्रसंग पात्रे ह्यावरून मतभेद असतील , म्हणून लगेच भारत पाकिस्तान इतके टोक होऊ शकत नाही

जाणत्या काकांच्या पक्षाच्या कल्चरचा एक नमुना. बापरे काय सेन्सेशनल आहे. पुरोगामी स्त्रीवादी महाराष्ट्राची हीच व्याख्या असावी. छान छान.

https://www.lokmat.com/mumbai/allegation-against-me-are-false-blackmaili...

रेणू शर्मा नावाच्या बाईने धंनजय मुंडेवर बलात्काराचा आरोप केला आहे , 2013 की 15 पासून बलात्कार सुरू आहे म्हणे

मुंडे म्हणतात , तिच्या बहिणीचे ( करुणा शर्मा) आणि माझे लिव्ह इन आहे , तेही घरच्या परवानगीने

तिला 2 मुलेही आहेत , त्यांना मुंडेंचेच नाव आहे म्हणे , जबाबदारी तेच घेतात.

शर्मा म्हणजे उच्च कुलीन उच्च शिक्षित समाज ना ? मुळात त्या बहिणीच्याच नात्याला कायदेशीर स्थैर्य नाही , विवाहित पुरुषाबरोबर तसेच नांदावे , हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे ? आणि आता तिची बहीण म्हणते , माझ्यावरही बलात्कार केला, सिनेमात काम देतो वगैरे स्टोरीही आहे. आणि आरोप , केस ह्यात बहिणींचा एक भाऊही सामील आहे.

ह्यात लव्ह कोण आणि जिहाद कोण ? ह्यांना जातीतले पुरुष नव्हते का उपलब्ध ?

-----

बायकांना ठेवून घेणारेही हवेतच की, बायका सोडून फरारफुर्र होणारे पुरुष समाजात आहेत , नवरयाना सोडून फरारफिर्र होणाऱ्या बायका समाजात आहेत , म्हणजे त्यांना ठेवून घेणारे पुरुषही त्या समाजात उत्पन्न होणारच ना ?

बायका सोडून फरारफुर्र होणारे पुरुष समाजात आहेत>> Biggrin

शर्मा म्हणजे उच्च कुलीन उच्च शिक्षित समाज ना ? मुळात त्या बहिणीच्याच नात्याला कायदेशीर स्थैर्य नाही , विवाहित पुरुषाबरोबर तसेच नांदावे , हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे ?>> That's all my lord Biggrin

राष्ट्रवादी समर्थक पक्के डबल लिबरल निघालेत !

मुंढे ने अर्धांगिनी ला धोका देऊन ने शेण खाल्ले तरी त्याचे कौतुक !
त्या शर्मा ने मुंढे ला धोका देऊन पैसे उकळले म्हणून तिची निंदा !
सौ फडणवीस गाणी गाते म्हणून तिच्या वर टीका !
सौ ठाकरे च्या नावावर असंख्य ७/१२ पण तिच्या बद्दल अभिमान !

धोका कसला ? तिची परमिशन होती म्हणे

दोघींचा एकत्र फोटोही आहे , अगदी पिंगा ग बाई पिंगा सारखा .

बिचारीने अर्धा नवरा पहिल्या बायकोसाठीही ठेवला

नैतर स्मृती इराणीने मैत्रिणीचा नवरा सगळाच घेतला , मैत्रीणमुक्त नवरा केला

राजकारणात जोपर्यंत एखादा पकडला जात नाही तोपर्यंत साव असतो आणि पकडला की चोर असतो
( बॅकग्राऊंडला प्यार किया तो डरना क्या बाळ ठाकरेंच्या आवाजात )

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी असले कुटाने करायचे असल्यास निस्तरायची धमक ठेवावी नाहीतर गावभर शोभा ठरलेली आहे Lol

भाजप उपाध्यक्ष व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्मा विरुद्ध आज दिनांक 14 जानेवारी 2021 रोजी आंबोली पोलीस स्थानक अंधेरी पश्चिम येथे दिलेल्या तक्रारीचा मराठी अनुवाद.

14.01.2021

प्रती,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
आंबोली पोलीस स्टेशन,
अंधेरी पश्चिम,
मुंबई 4000058

प्रिय श्री कामटे जी,
आपल्या निदर्शनास आणुन देतो कि कि एक श्रीमती रेणु शर्मा या मला सतत फोन करतात, एसेमेस करतात, माझ्याकडे 2010 पासुन तिच्याशी संबंध ठेवायला जबरजस्तीने पाठपुरावा करीत आहेत. सादर प्रकार 2010 पासुन सुरु आहे. हा छळ भीतीदायक पाठलागाच्या स्तरापर्यंत गेला होता. ( 09981111112, 0989281478, 02266934444, 8454802208 )

माझ्या सूत्रांकडून मला असं समजलं होतं कि सदर महिला हि संशयास्पद आणि फसवणूक करणारी असुन ती अश्याप्रकारे सापळा लावते. मी तिला भेटण्याचे पुर्णपणे टाळले.

मला अशी माहिती प्राप्त झाली आहे कि या महिलेने अनेक पुरुषांना अश्या सापळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसुल केली आहे.

मुंबई पोलिसांनी कृपया त्याबाबतचा तपास करावा.

हा छळ, मेसेज करणे, फोन करण्याचा प्रकार 2015 पर्यंत सुरु होता पण तिला भेटण्याचे मी ठामपणे टाळले.

मी तिला स्पष्टपणे सांगितले कि मला तिला भेटण्यात आणि तिला हव्या असलेल्या पद्धतीने संबंध ठेवण्यास अजिबात इच्छुक नाही.

एव्हढेच नाही तर 6 जानेवारी 2021 आणि 7 जानेवारी 2021 ला सुद्धा तिने परत मला व्हाट्स अँप वर 8828265289 या नंबरवरून एसेमेस पाठविले. पण मी तिला एक थंब्स अप ची इमोजी पाठविण्यावयतिरिक्त काहीही रिप्लाय/ प्रतिसाद दिला नाही. दोन दिवसांपूर्वी तिने मंत्री धंनजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप पाहुन मला धक्काच बसला.

आणि मग मी आपल्याला श्रीमती रेणु शर्मा बद्दल कळविण्याची निर्णय घेतला.

आज त्यांनी धंनजय मुंडेंना टार्गेट केलं आहे, दोन वर्षांपुर्वी कदाचित त्याजागी मी राहिलो असतो. आणि उद्या कदाचित आणखी कोणी असु शकेल.

हि लोकांना जाळ्यात ओढुन, ब्लॅकमेल करणे खंडणी उकळणे अशी सुनियोजित कार्यपद्धती आहे, माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे कि या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येऊन संपुर्ण तपास करून प्रकरण लॉजिकल कॉन्क्लुजन पर्यंत नेण्यात यावे.

आपलाच,
कृष्णा हेगडे.

SAVE_20210114_221602.jpeg

या महोदया खरं बोलतात की वरील त्यांचे संभावित सावज खरे बोलतात हे त्यांचे त्यांनाच माहिती पण आपण आपल्या सामाजिक न्यायमंत्री साहेबांवरती बोलुया.
यांनी त्यांच्या अपत्यांचा खरा आकडा जो आजपावेतो ४मुली+१ मुलगा = ५ असा उजेडात आला आहे. ( अजून असतील/नसतील) शपथपत्रात लपवला असल्याने त्यांची विरोधी पक्षनेत्याने आक्षेप घेऊन आमदारकी रद्द होऊन मंत्रिपद लगेच जायला हवे. पण आदरणीय विरोधी पक्षनेते या महत्वाच्या मुद्द्यावर काहीही भाष्य का करत नाहीयेत ? मग आम्ही सामान्य जनतेने काय अपेक्षा करायची नेमकी यांच्याकडून ? याला कारण त्यांचे राष्ट्रीय नेते ज्यांनी आपल्या पत्नीबद्दलची माहिती शपथपत्रात लपवून ठेवली होती हे तर नसेल ना? विरोधी पक्षनेत्याचे नेमके काय काम असते मग ? हे शपथपत्राचे सोपस्कार रद्दच का करत नाही निवडणूक आयोग का काय म्हणतात ती यंत्रणा ?
दुसरे एक वरती त्या ताईंचे वय ३२ असे दिले असून २००६ ला त्या १७-१८च्या असणार. म्हणजे जर त्या १७ असतील आणि त्यांचे म्हणणे खरे असेल तर ताई अंडरएज होत्या त्या वेळेस. शिवाय त्यांचा खण्डणी उकळायचा व्यवसाय खरा आहे असे एक क्षण पकडल्यास मंत्रीसाहेब सुद्धा वाहवत गेले नसते आणि त्यांनी हेगडे साहेबांसारखा संयम दाखवला असता तर अशी वेळ कशाला आली असती. आपला नळ आपल्या ताब्यात असेल तर कोणालापण उठसुठ घागरी थोडी भरता येतील? आम्हालाबी मोहाचे क्षण येत असतात पण आम्ही आमच्या नळाला कुलूप लावून ठेवत असतो. म्हणजे ते जाईना का वाहवत जायचे असेल तर पण असा स्खलनशील माणूस कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना जे वाक्ये बोलतो त्याला किती जागतो ?

ज्यायला हेगडे साहेब २०१० ते २०१५ पर्यंत फक्त नकारच देत होते. भाजपाचे असुनही साधी तक्रारही केली नाही की ती बाई कॉल करते ते नंबरही ब्लॉक केले नाहीत.
वर इथल्या सुजाण डॉक्टरांनी ते नंबरही पब्लिक केलेत. (कदाचित त्यांनी फोन करुन खात्री केल्याची शक्यता नाकारता येत नाही)

एव्हढेच नाही तर 6 जानेवारी 2021 आणि 7 जानेवारी 2021 ला सुद्धा तिने परत मला व्हाट्स अँप वर 8828265289 या नंबरवरून एसेमेस पाठविले. पण मी तिला एक थंब्स अप ची इमोजी पाठविण्यावयतिरिक्त काहीही रिप्लाय/ प्रतिसाद दिला नाही.
अंगठा वर करुन "गो अहेड" तर दिला नाही ना महोदयांनी (एक मनात आलेली कॉस्परंसी)

व्वा धन्या शाब्बास ! "धन धना धन" ची धून वाजली की मोठमोठाली संकटे चुटकीसरशी नाहीशी होतात Wink
(आत्ता बातम्या चेक केल्या तर तिच्या ट्विट शिवाय काही सापडले नाही जास्त तरी प्रतिसाद ठेवतो तसाच कारण पुढे हीच 'शक्यता' दिसतेय. )

जिद्दु , खरं आहे. अनेक नेत्यांची अशीच प्रकरणं आहेत म्हणे.
भाजप गप्प कारण खोगीरभरती करताना vetting केलेलं नसणारे. सगळे सारखेच.
वाईट या गोष्टीचंही वाटतं बलात्कार, व्यभिचार, ड्रग्ज, जमिनी घोटाळे यात नाव येत असलेले हे लोक स्वतःला सतत फुले आंबेडकर सावित्रीबाई जिजाऊ यांचे वैचारिक वारसदार म्हणवून घेतात.ही किती क्रूर थट्टा आहे. कुठे ते थोर व्यक्ती आणि कुठे हे.
त्यापेक्षा स्वतःला थोरल्या बाजीरावाचे वैचारिक वंशज म्हणवून घेणं त्यांना योग्य ठरेल.
नेहरू वाजपेयी यांच्याशी तुलना करणंही असंच हास्यास्पद वाटतं. कदाचित हा माझा bias असेल पण नेहरू वाजपेयी यांची व्यक्तिमत्व , कर्तबगारी एकूणच क्लासीनेस कुठे आणि हे लोक कुठे. म्हणजे गुलजारच्या एखाद्या आर्ट फिल्ममधला प्रेमाचा त्रिकोण आणि कुठलीतरी सी ग्रेड फिल्म याची तुलना करण्यासारखं आहे.

भारतीय झेंगाट पक्षाचे नेते नव्हते म्हणून बाई जगली

नाहीतर मानसी सोनी झाली असती

रेणू तुझे अजून किती गिनू ?

काका ने त्या दिवशी मिडीयाला सांगितले होते धनु बाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ .
खरे म्हणजे या वाक्याचा असा अर्थ होतो आम्ही काहीच निर्णय घेणार नाही.

धनुचा गेम करायचा प्रयत्न त्याच्या पक्षांतर्गत विरोधकांनीच केल्याची चर्चा कानावर आली.... खरे खोटे काय माहित!

एकीकडे बोंब ठोकयची प्रत्येक हिंदुने कमीत कमी ४ अपत्ये जन्माला घालावीत. आता मंत्री साहेबांनी ५ घातली तर ह्या आजन्म ब्रम्हचारी किंवा बायको सोडुन्न पळालेल्या धर्माच्या ठेकेदारांच्या तश्रीफीत का दुखते...?? Biggrin

यापेक्षा स्वतःला थोरल्या बाजीरावाचे वैचारिक वंशज म्हणवून घेणं त्यांना योग्य ठरेल.>> हो नं... त्याच बाजीरावापासून जन्मलेले आपले किरमिजी चुलत भाऊ (कलावंतीणीचं कूळ अन तिच्या अपत्याचं मूळ शोधू नये म्हणतात तरिही) लाथाडायचे आणि दुसर्‍या धाग्यावर हिरवं-भगवं करत हिंडायचं Proud

रेणूच्या मागे खंबीरपणे उभे रहाणार्‍या तिलिट तोमैय्या, रावण कदम अन समस्त भाजप मंडळींचे मुख-कमल रंगून निघाले..! Biggrin

Pages