अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो भारी आहे हे....आपल्याला कधी दिसणार नाही बाबा अस.. धारपांच्या दोन गोष्टी आहेत समांतर विश्वा च्या.... पळती झाडे आणि दुसरी एक नाव विसरले...

<< मी सुंदर आहे. बोकलतला इग्नोर मारणं शक्य नाही. तो गुरुघंटालचा देखिल बाप आहे. बेक्कार माणूस आहे बोकलत>>
<< मानव पृथ्वीकर बोकलत को इग्नोअरना मुश्कील ही नही, नामुमकीन है.>>

अरे भावांनो तो माझा बाप आहे कि नाही ते पाहू नंतर, तुम्ही त्याचा इतका उदो उदो करून त्याला तुमचा बाप का बनवताय. तुम्हाला स्वतःची काही मतं, आयडेंटिटी आहे कि नाही? हे असले धंदे मोठ्या लेवल चे चाटू लोक करतात भावांनो. ठरवा आता तुम्हीच काय ते.

आणि हे बोकलत चेच ड्यू आयडी असतील तर नो कॉमेंट्स. भावड्या काही काम धंदा पण कर रे काही चांगलं लिहिलंस तर मोठा साहित्यिक वगैरे होशील.
धन्यवाद

@अज्ञातवासी>>>>> नाही ग्रहण नाही दुसरी एक आहे...त्यात एक माणसाची तीव्र इच्छा असते की त्याचं घर कसं असावं त्याचं आयुष्य कसं असावं ..तो मरतो पण त्याच्या मित्राला सेम त्याच लोकेशन वर तसेच घर दिसते....नंतर कळते की त्या घराचा मालक मरता मरता वाचलेला असतो....नीट नाव आठवेना त्या कथेचं

मला amezon kindle वर नारायण धारप यांची बरीच पुस्तके वाचायला मिळाली. वर उल्लेख केलेल्या बऱ्याच कथा आहेत त्यामध्ये

एका मित्राने सांगितलेला अनुभव त्याच्याच शब्दात:

बरीच वर्षे झाली ह्या गोष्टीला. वडील जाऊन एक वर्ष झाले होते. बेडरूममध्ये ज्या पलंगावर त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो आता तिथे घडी घालून भिंतीला टेकवून ठेवला होता. बाकीच्या वस्तू सुद्धा नीटनेटक्या लावून ती खोली आवरून ठेवलेली होती. तो पलंग, तिथले त्यांचे कपाट आणि इतर वस्तू बघितल्या कि त्यांची तीव्रतेने आठवण येत असे. मी आत्मा वगैरे ह्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही. पण का कुणास ठावूक त्या खोलीत त्यांचे अस्तित्व जाणवायचेच. एक दिवस मी एकटाच घरी होतो. माझ्या अभ्यासिकेत काम करत बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती. थोड्या वेळाने उठून लाईट्स लावायचा विचार करतोय, तोच त्या बेडरूममध्ये अंधुक प्रकाशात कोणीतरी उभे आहे असे मला जाणवले. अगदी वडिलांचीच उंची आणि शरीरयष्टी असलेली व्यक्ती. पण ती सावली किंवा भास वगैरे असेल असे वाटून मी फारसा विचार केला नाही. तरीही ते निमित्त ठरले आणि थोड्या वेळाने वडिलांची तीव्र आठवण येऊ लागली. मग मी मोठ्या भावाला फोन केला. म्हणालो, "दादा सहज फोन केला पप्पांची फार आठवण येतेय". तो आश्चर्यचकित झाला व म्हणाला, "कमाल आहे. तू आत्ताच कसा फोन केलास? अरे आत्ताच मघाशी पप्पा माझ्या मागे उभे आहेत असा मला भास झाला बघ"

इतके सांगून माझा मित्र पुढे म्हणाला, "दादाने सांगितलेले ऐकल्यानंतर मी जागच्या जागी थिजलो होतो"

माझा मित्र टेक्सासला एकटाच राहत होता २-३ वर्षांपूर्वी. तो भारतातून तिथे गेला होता, पण तिथे राहायला पासून सतत आजारी असायचा. आधी वाटले कि वातावरण बदलामुळे असेल किंवा मग होमसिक झाला असेल. एकदा असेच कळले कि त्याला परत बरं नाहीये म्हणून रात्री skype केले. त्याच्याशी बोलत असतांना सारखा मागे कोणीतरी फिरते आहे अस वाटत होते. त्याला विचारले कि कोणी आले आहे का मदतीला तर तो नाही म्हणाला. पण मला मात्र सारखे त्याच्या खोलीत कोणीतरी आहे असे वाटत होते. त्याला घाबरवायचे नाही म्हणून मग दुसऱ्या मित्राला फोन करून त्याला त्याच्या घरी न्यायला सांगितले.
तिथे २-३ दिवसातच हा एकदम खडखडीत बरा झाला. त्याला सांगितले कि त्या घरात नको जाऊस आणि दुसरीकडे घर बघ. तसेच त्याला सांगितले कि आधीच्या घराची जरा चौकशी कर, तेव्हा कळाले कि आधी तिथे २-३ वर्षांपूर्वी एका चिनी बाई ने आत्महत्या केली होती. आजूबाजूच्या लोकांना काही अनुभव पण आले होते, पण स्वस्तात मिळतंय म्हनुन याने ते घर भाड्याने घेतले होते. नवीन घरात मात्र तो कधीच आजारी पडला नाही आणि अजूनही तो टेक्सास मधेच आहे.

उनाडटप्पू >> अरे बापरे.
माझे वडील जाऊन चौदा वर्षे झाली. काही महिन्यांपूर्वी स्वप्नात आले. मी पटकन पायाला हात लावला तर मागे सरकले. मग परत पुढे आले, मी पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. त्यांनी खूप प्रेमभराने माझ्या कडे हसत पाहून आशिर्वाद दिला. तो स्वप्नातला प्रसंग आठवून खूप समाधान वाटते.

अमानवीय, अमानवीय १ हे धागे वाचून काढले. अमानवीय २ बाकी आहे. मला स्वतः ला अनुभव नाही पण अतृप्त आत्मे,बाधित वास्तू,भारलेल्या जागा असतात यावर पूर्ण विश्वास आहे.
आपण आपल्या नंतर आपले भूत होऊन लोकांना त्रास होऊ नये म्हणून काय करावे?एखादे ठिकाण बाधित आहे हे कसे ओळखावे?अमानवीय अनुभवांपासून सुटका व्हावी यासाठी कोणते उपाय आहेत?
कृपया जाणकारांनी प्रकाश टाका

आपण आपल्या नंतर आपले भूत होऊन लोकांना त्रास होऊ नये म्हणून काय करावे?एखादे ठिकाण बाधित आहे हे कसे ओळखावे?अमानवीय अनुभवांपासून सुटका व्हावी यासाठी कोणते उपाय आहेत?>> भूतांचे कर्दनकाळ बोकलत यांना भेटो.

लहानपणी माझ्या काही मैत्रीणी भुताच्या गोष्टी सांगत असत.एकीच्या म्हणण्यानुसार रात्री बारा वाजता भुतं बाहेर पडतात आणि साडेतीन वाजता आत जातात(त्या लहान वयात भुतं गुहांमध्ये वगैरे रहात असावीत असा माझा गैरसमज झाला होता.)ती एकदा परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करताना तिला आवाज ऐकू आला"काय तपस्या(नाव बदलले आहे)झाला का अभ्यास?"
दुसऱ्या एकीने सांगितले की ते गेलेल्या माणसासाठी म्हणे साखर ठेवतात तशी एकासाठी ठेवली होती. हा गेलेला माणूस दारू पीत असे. त्या ठेवलेल्या साखरेला मुंग्या आल्या नाहीत म्हणून कोणीतरी दारू ठेवली तर त्या दारूला मुंग्या आल्या. हा किस्सा ऐकून मला खूप हसू आले.
त्याच काळात आमच्या शाळेच्या वाटेत एका झाडावर एका सवाष्ण स्त्रीचे भूत होते त्याने एकदोघींना झपाटले होते. तेव्हा आम्ही त्या भुतिणीसाठी एक हिरवी साडी,कुंकू, बांगड्या आणि खीर असे contribution काढून ठेवण्याचे ठरवले होते.

एका बाईचा road accidentमध्ये on the spot मृत्यू झाला होता ती बाई त्याचवेळेस घरात आली होती आणि तिने देवाला नमस्कार केला असा एक किस्सा ऐकला आहे

लिंबाच्या झाडावरील एक जरी लिंबू भगतकीसाठी(जारणमारण,तंत्रमंत्र,करणी,थोडक्यात बाहेरचे) वापरले गेले तर ते झाड मरते असे ऐकले आहे.

महत्त्वाची सूचना:नास्तिक, अंनिसवाले,विज्ञानवादी यांनी ही पोस्ट वाचू नये.
ज्या माणसाचे मरण जवळ आले आहे त्या व्यक्तीला आरशात स्वतः चे नाक दिसत नाही असे ऐकले आहे. ही एक ओळखण्याची खूण चांगली आहे जर हे खरे असेल तर.

माझे पणजोबा खूप मोठे ज्योतिषी होते. एका ठिकाणी मशिनरी सारखी बंद पडत होती.अजिबात टिकत नव्हती.तेव्हा त्यांना तिथे बोलावले. त्यांनी सांगितले की या ठिकाणी खाली अमुक फुटांवर खणून काढा.तेवढे फूट खणले तेव्हा तिथे मानवी हाडे, कवटी इत्यादी होते. ते काढून तिथे मशिनरी बसवली.नंतर कोणतीही समस्या नाही. असाच सेम किस्सा आहे फक्त तिथे घरातील माणसे एकापाठोपाठ एक मरत होती. शेवटचा माणूस मरणशय्येवर असताना त्यांनी पणजोबांना बोलावले तेव्हा घराखाली कवटी,हाडे सापडली.

अमानवी शक्तींपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने दररोज थोडी तरी उपासना करावी.आपले कुलदैवत व कुलदेवतेची आराधना करावी. हेमावैम.

माणसाचे मरण जवळ आले आहे त्या व्यक्तीला आरशात स्वतः चे नाक दिसत नाही>>> हे खरं आहे. ज्यांना लवकर मरायचं नाही त्यांनी घरी आरसा ठेऊ नये. सेल्फी काढता येणारा मोबाईल घेऊ नये. ड्रायव्हिंग करू नये, करायची पाळी आलीच तर सोबत कोणालातरी घेऊन जावे जेणेकरून पाठीमागे कुठली गाडी असेल तर आपल्याला कळेल. मॉलमध्ये, बाजारात चुकूनही आरशात पाहू नये

जिथे जिथे अपघाती मृत्यू, खून,बलात्कार, आत्महत्या झालेल्या असतात, त्या जागा बहुतांश वेळी बाधित म्हणजे तेथे आत्मे असतात. अनेकांना अनुभव आहेत. तेव्हा अशा प्रकारे इशारा देऊनही एखाद्याच्या माहितीची खिल्ली उडवली गेली आहे या प्रकारामुळे खूप यातना झाल्या आहेत. इथून पुढे या धाग्यावर प्रतिसाद देणे शक्यतोवर टाळेन.

खिल्ली उडवणारे प्रतिसाद इग्नोर करावेत. जसं बोकलतचा स्विकार केला तसेच...
माझ्या ओळखीच्या कुटुंबाने नवीन जागेत घर बांधले. ते एका बुजवलेल्या ओढ्याकाठी होते. तेथे सतत आजारपणं सुरू झाली. एका ज्योतिषाने सांगितले की अमुक ठिकाणी खणा. तिथं खणल्यावर कोणत्या तरी प्राण्याची हाडं निघाली. त्याचं विधिवत विसर्जन केल्यावर आजारी पडणं बंद झाले.

१०वी मधला अनुभव. अजुनही डोळ्याच्यासमोर जसाच्या तसा.
चाळीत रहायचो. ७-७ घरांच्या समोरासमोर २ ओळी. एका बाजुला आत-बाहेर जायचा मोठा दरवाजा व दुसर्‍या बाजुला पाणी भरायचा मोठ्ठा सामायिक हौद, कपडे धुवायचा मोठा कट्टा व त्यामागे अंधारा रहदारी नसणारा बोळ.
२ छोट्या खोल्यांचे घर. मोठा भाऊ चाळमालकांच्या मोठ्या घरात अभ्यास करायचा व तिथेच मस्तपैकी गच्चीत झोपायचा व सकाळी ५ ला येऊन दारावर थाप मारायचा. मग आम्ही दरवाजा उघडायचो, तो आवरुन कॉलेजला जायचा असा दिनक्रम.
शनिवारी माझी ६ ला शिकवणी. बहुतेकदा भावाला ५ ला दरवाजा उघडुन , मीपण लवकर उठुन आवरुन जायची.
त्या दिवशी भावाने दरवाजा वाजवल्यावर मातोश्री म्हणाल्या ‘दरवाजा उघड‘. मला दरवाजा वाजवल्याचा आवाज नव्हता आला तरी पट्कन दरवाजा उघडला, तेव्हा २ गोष्टी झाल्या.
समोरच्याच घराच्या जवळुन (फक्त १०-१५ फुट अंतर) आकाशाकडे पहात, डोक्याला हात लावुन (कदाचीत कानबिन खाजवत असेल वगैरे) एक अनोळखी अंबाडा वगैरे घातलेली स्त्री शांतपणे हौदाच्या दिशेने चालताना दिसली. मी जोरात दरवाजा उघडला फटकन तरी तिने माझ्याकडे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुनही पाहिले नाही. तरीही मला वाटले समोरच्या काकु असतील, पण बाईच्या हातातही काही नव्हते.
दरवाजा बंद केला व धावत आत जाऊन बादली आणली व मातोश्रींना बोलले ‘हौदावरुन पाणी आणते, काकु आहेत तिथे सोबतीला’. मातोश्री म्हणाल्या, ‘तरीही एकटी नको जाऊस, मी येते‘.
दोघी हौदावर गेलो, म्हटले ‘बघ काकु असतील इथे‘, पण तिथे चिटपाखरुन पण नव्हते. केवळ ७-८ सेकंदात काकु वा ती बाई वा जे काही होते ते गायब झाल्याचे लक्षात आल्यावर... जी काही अवस्था झाली ती सांगता येत नाही. त्या बाजुने चाळीबाहेर पडायला जागाच नव्हती. बोळ असा होता की दिवसा पण तिथे लोक जायचे नाहीत. अस्वच्छ पण अत्यंत. मग ती स्त्री कुठे ???
प्रचंड धक्का बसुन, हादरुन, घाबरुन पळत घरी आले. मातोश्रींनी तरीही तेव्हा कोणी घराबाहेर गेले आहे का पहायला सर्व घरांची दारे नुसती ढकलुन पाहिली, कारण तसे असते तर दरवाजा उघडा असता. पण सर्व कडी लावुन झोपलेले होते.
घरी आल्यावर दुसरी गोष्ट लक्षात आली की भाऊ आलाच नव्हता.
मग मातोश्री पण जरा हबकल्या कारण दरवाजावर थाप तर पडली होती.. म्हणाल्या, ‘किती वाजलेत’?
तेव्हा कुठे घड्याळ पाहिले तर साडेतीन वाजले होते. !!!!!!!!!

बसलेला धक्का जायला बरेच दिवस लागले.
सकाळी सर्वांना जाऊन विचारले, ३ साडेतीनला हौदाकडे गेला होतात का? पण कोणीही गेले नव्हते.
मग झाला प्रकार सांगितल्यावर २-३ ज्येष्ठ स्त्रियांनी सांगितले की त्यांनाही पुर्वी मध्यरात्री अशी बाई चालताना दिसली होती. आजुबाजुला सर्वजण माहिती होते, अगदी येणारे पाहुणे व चक्क भिकारी पण माहितीचे होते. लोक तसेही फार नव्हते, सगळ्या चाळीच होत्या. त्यामुळे ती बाई नक्की ओळखु आली असती.
यात चाळीची रचना अशी होती की खरी मानव बाई ५-१० सेकंदात दुर निघुन जाणे शक्यच नव्हते. ती चाळीच्या अंगणाच्या मधुन चालायचे सोडुन समोरच्या घराजवळुन चालत होती व मुख्य म्हणजे मी फटकन दरवाजा त्या शांततेत उघडला तेव्हा ती माझ्यासमोरच होती तरी माझ्याकडे तिने वळुन पाहिले नाही.
हा आयुष्यातला तिसरा व शेवटचा अनुभव. पुन्हा असा अनुभव घ्यायची इच्छा नाही. हालत वाईट होते.

>>२ छोट्या खोल्यांचे घर. मोठा भाऊ चाळमालकांच्या मोठ्या घरात अभ्यास करायचा व तिथेच मस्तपैकी गच्चीत झोपायचा व सकाळी ५ ला येऊन दारावर थाप मारायचा. मग आम्ही दरवाजा उघडायचो, तो आवरुन कॉलेजला जायचा असा दिनक्रम.

Waah... warnan khup chaan. 80s cha time asel ha? Kay diwas hote raao!
Baki tumcha kissa thararak. Wachla pn pahate 3.30 chya darmyan. So thrillful. Similar asach anubhaw pan khedegawatla mi purwi ya dhagyawar lihila ahe bahutek. Tya case madhye ti baai eka gharatun chotya baalala uchlun gheun geli hoti. Te baal nantar khup durwar sapadle. Thodefar kharchtle hote tyala itkech baki kahi nahi. (Sorry for English letters. Writing via cellphone)

३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. Source : inmarathi.com
>>>आजही गाव ओसाड आहे,भेसूरपणा जाणवतो." वाचवा, वाचवा " असे आवाज ऐकू येतात.
असे आमच्या आजीसासूबाई सांगतात.

Pages