गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”>> पूर्ण पणे असहमत. ह्यामुळेच अनेक पिढ्या भारतीय सुनांना छळ व नको असलेली गर्भार पणे चाइल्ड अब्युज मुलींच्या गर्भाचा व नवजात मुलींचा विनाश ह्या गंभीर गुन्ह्यांना सामोरे जावे लागले आहे. आणि सत्यव ति स्वतः मत्स्य गंधा !! दुसरेपणीची बायको.

@अमा
मी तुमच्या विचारांशी अगदी सहमत पण आंबिका आणि आंबालिका आपल्या सासूच्या लग्नापुर्वीच्या मुलाशी सांगायचं झालं तर इंग्रजी शब्द हाफ ब्रदर इन लॉशी संग करायला लगेच स्वखुशीने तयाला झाल्या असतील हाच मोठा प्रश्न आहे .मग बाकीच्या गोष्टी

@रच्ची
धन्यवाद
@सस्मित
धन्यवाद ,पण तो काळ कसा होता त्या काळात राहणीमान व कुरु वंशाचे राहणीमान व समृद्धी शब्दात वर्णन करण क्रमप्राप्त आहे

@नौटंकी
मुजरा जो मुसलमानी राज्यात हाताने केला जात होता. तसा अर्थ नाही आहे; माझा अर्थ कमरेत वाकून दोन हात जोडून जो केला जातो तो मुजरा; जो हिंदू राज्यांन मध्ये केला जात होता .मग त्याला प्रणाम म्हणा अथवा मुजरा

छान लिहीले आहे. होय आपल्याला कुर्निसात म्हणायचे आहे.

@सामो
धन्यवाद , कुर्निसात म्हणायचं होत मला पण तो शब्द पहिला भाग लिहीत असताना मला नाही आठवला आणि नंतर तो मला खूप जड वाटला पण ;काही लोकांना माझ्या लेखात काही ना काही खोट दिसते !हे माझं दुर्दैव दुसर काय (रडणारी बाहुली)

मुजरा आणि कुर्नीसात दोन्ही शब्दांची ऊत्पत्ती ऊर्दू/तुर्की शब्दांमध्ये आहे.
मराठीत अभिवादन शब्द आहे.

चांगलं लिहिलंय..
शुध्दलेखनात कौतुकास्पद सुधारणा आहे..
ताई तुम्ही लिखाणाचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचे मनपुर्वक अभिनंदन.
एक विनंती आहे, कोणी आपल्या लिखाणात चुक दाखवल्यास/त्यावर टिका केल्यास नाराज न होता टिकाकाराचे आभार मानुन पुढील लेखात सुधारणा केली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.

रडणारी बाहुली अशी देता येईलः
आधी ':' टाइप करा, मग लगेच मध्ये जागा न सोडता '(' टाइप करा.
ही अशी बाहुली उमटेल : Sad

आंबिका आणि आंबालिका आपल्या सासूच्या लग्नापुर्वीच्या मुलाशी सांगायचं झालं तर इंग्रजी शब्द हाफ ब्रदर इन लॉशी संग करायला लगेच स्वखुशीने तयाला झाल्या असतील हाच मोठा प्रश्न आहे >> ह्याला इंग्रजी शब्द ब्लाईंड डेट. नो पन इंटेंडेड... Happy Wink

लगेच स्वखुशीने तयाला झाल्या > लगेचच किंवा स्वखुशीने असे वाचल्याचे आठवत नाही. म्हणूनच एकीचा मुलगा आंधळा, दुसरीचा पंडूरोग असलेला झाला असे आठवतेय.

ते व्यासाशी
भीष्माशी झाल्या असत्या बहुतेक.

@आसामी
स्वखुशीने तयाला झाल्या असतील हाच मोठा प्रश्न आहे . अस आहे ते नीट बघा

लगेच स्वखुशीने तयाला झाल्या > (अस नाही ते)

@सीमांतिनी
ह्याला इंग्रजी शब्द ब्लाईंड डेट. नो पन इंटेंडेड... right
पण आज काल डेटवर जाण्याची जबरदस्ती करत नाहीत व डेट म्हणजे संग (इथे संगचा अर्थ कळला असेल तुम्हाला)नव्हे हे विसरताय तुम्ही it's only about dinner or something like that

मूळ महाभारत वाचले आणि मग लेख लिहीले तर असली विधाने येणार नाहीत. आदिपर्व अध्याय ५ मध्ये सत्यवतीने आधी अंबिकेला विचीत्रवीर्यास मोठा भाऊ आहे तो तुझ्या कक्षात येणार आहे असे स्पष्ट सांगितले होते व ती नियोगास तयार होती. नंतरही अंबालिका नियोगास तयार होती. व्यासालाही काही घाई नव्हती, तो एक वर्ष रहायला तयार होता. सत्यवतीला मात्र वारस लवकर हवा होता.

संमतीशिवाय झाला तो (अंबा,) अंबिका, व अंबालिकेचा विचित्रवीर्याशी विवाह. भीष्माने हरण केले. ज्यांनी इतरांना काय कळतं, काय आठवतं ह्याच्या पंचाईती करण्यात वेळ घालवला नि मूळ महाभारत वाचले नाही त्यांना महाभारतात काही ना काही (नसलेली) खोट दिसते ! हे माझं दुर्दैव दुसर काय (रडणारी बाहुली)

हल्ली बी आर वाक्य प्रमाण मानून सिरियली बघुन / कादंबरी वाचून इकडे लेखन माला सुरु करणाऱ्या आणि आधुनिक महाभारत मायबोलीवर खरडणाऱ्या लेडी व्यास तयार होऊ लागल्या आहेत. एका सीनियर लेडी व्यासनी काही प्रसंगाबाबत आधीच मायबोलीवर बरेच महाभारत घडवलेले आहे तेव्हा हाही धागा त्याच वळणावर जाऊ नए ही मनापासून इच्छा आणि पुढील लेखनास शुभेच्छा.

@सीमंतिनी
पहिल्या सर्व इथल्या अनुभवावरून मी न अभ्यास करता इथे काही पोस्ट करण्याचे धाडस करेन का?
बर मी इतकी मोठी पौराणिक कथा अशीच न अभ्यास करता नाही लिहीत हो ;मी महाभारत वाचलंय त्याचा अभ्यास ही केलाय आणि राजमाता सत्यवतीनी , त्या दोघींना कसे तयार केले व त्या दोघी तयार झाल्या कशा; हे पुढच्या भागात येणार आहे जरा सबुरीने घ्या.

किती ही झालं तरी आंबिका व आंबालिका या त्यांची इच्छा नसताना तयार झाल्या म्हणून तर एक पुत्र आंधळा व एक पंडू रोगी निपजला ना !
विदुराच्या बाबतीत असे नाही झाले तो आरोग्य संपन्न निपजला त्याला ही कारण आहे या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह पुढे येणार आहे
तुम्हाला विनंती आहे की कृपया जरा वाट पाहावी

ओके, पुढील लेखनास शुभेच्छा!
(शुद्धलेखन, ब्लॉग लिंक इ बद्दल मला फार आग्रह नसतो, काही मत ही नसते; पण लिहीण्यापूर्वी थोडाफार म्हणजे निदान भन्साळी इतका तरी अभ्यास करावा अशी माझी माफक अपेक्षा माझ्यासहित सर्व मायबोलीकर लेखकांकडून असते.)

@भिकाजी
धन्यवाद मी काय महर्षि व्यास होण्याच्या लायकीची नाही किंवा माझी इतकी पात्रता नाहीच पण माझ्या अल्प मतीने जे महाभारत ग्रहण केले ते गांधारीच्या दृष्टीकोनातून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे

@सीमंतिनी
माफ करा एक चूक दुरुस्त करते, भीष्मांनी आंबा ,आंबालिक व आंबिका यांना हरण केले पण आंबालिक व आंबिकाचा विवाह विचित्रविर्यशी झाला
आंबचा नाही

@सीमंतिनी
माफ करा एक चूक दुरुस्त करते, भीष्मांनी आंबा ,आंबालिक व आंबिका यांना हरण केले पण आंबालिक व आंबिकाचा विवाह विचित्रविर्यशी झाला
आंबाचा नाही

ओके केलं माफ Happy माझ्या पोस्टीनंतर चूक शोधायला तासभर लागत असेल तर काय गंमत नाय चर्चा करण्यात. जाऊ दे, शुभेच्छा!

काही लोकांना माझ्या लेखात काही ना काही खोट दिसते !हे माझं दुर्दैव दुसर काय>>

स्वामिनी, तुम्हाला काही सुधारणा सुचवल्या तर राग का येतो?
तुम्ही खिलाडूवृत्तीने विचार करून आवश्यक बदल केले तर तुमच्याच लिखाणाचा दर्जा सुधारेल. आणि जर कोणी तुम्हाला चुका सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुमचं लिखाण आवर्जून आणि वेळात वेळ काढून वाचलं जातंय. आणि त्याकडे गांभीर्याने पाहिले जातंय. तेव्हा या गोष्टींना सकारात्मक दृष्टीने बघा.

आंबा ,आंबालिक व आंबिका >> अंबा, अंबालिका, अंबिका

जाऊ दे ना नौटंकी. राग का येतो इतक्या अवघड प्रश्नाचे उत्तर लेखकाने दिलं तर पोस्टीतले कंस सोडवून सोडवून दुसर्‍याच्या चूका कोण दाखवणार. ह्या आयडीने कंसात एखादा शब्द का टाकला असेल. कंस लेखनात कधी टाकतात जरा माहिती केली rules of parentheses तर ....
पण तुझी पोस्ट माझ्या उपयोगी पडली. सिरीयसली, वेळात वेळ काढून उगाच आले इथे....

Pages