गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तो लेख नाही मिळाला पण ही रामाची वंशावळ आहे, ज्यात नहुषपुत्र ययातीचा उल्लेख आहे, ययाती पुत्र कुरु ज्यापासून कुरुवंश पुढे वाढला.
ययातिपुत्र नाभागापासून पुढे रघुवंश तर कुरुपासून पुढे कुरुवंशंवाढलेला दिसतो.
-------------------
• आदि रूप ब्रह्मा जी से मरीचि का जन्म हुआ। मरीचि के पुत्र कश्यप हुये। कश्यप के विवस्वान और विवस्वान के वैवस्वत मनु हुये। वैवस्वतमनु के पुत्र इक्ष्वाकु हुये। इक्ष्वाकु ने अयोध्या को अपनी राजधानी बनाया और इस प्रकार इक्ष्वाकु कुल की स्थापना की। इक्ष्वाकु के पुत्र कुक्षि हुये। कुक्षि के पुत्र का नाम विकुक्षि था। विकुक्षि के पुत्र बाण और बाण के पुत्र अनरण्य हुये। अनरण्य से पृथु और पृथु से त्रिशंकु का जन्म हुआ।
• त्रिशंकु के पुत्र धुन्धुमार हुये। धुन्धुमार के पुत्र का नाम युवनाश्व था। युवनाश्व के पुत्र मान्धाता हुये और मान्धाता से सुसन्धि का जन्म हुआ। सुसन्धि के दो पुत्र हुये- ध्रुवसन्धि एवं प्रसेनजित।
• ध्रुवसन्धि के पुत्र भरत हुये। भरत के पुत्र असित हुये और असित के पुत्र सगर हुये। सगर के पुत्र का नाम असमञ्ज था। असमञ्ज के पुत्र अंशुमान तथा अंशुमान के पुत्र दिलीप हुये।
• दिलीप के पुत्र भगीरथ हुये, इन्हीं भगीरथ ने अपनी तपोबल से गंगा को पृथ्वी पर लाया। भगीरथ के पुत्र ककुत्स्थ और ककुत्स्थ के पुत्र रघु हुये।
• रघु के अत्यंत तेजस्वी और पराक्रमी नरेश होने के कारण उनके बाद इस वंश का नाम रघु वंश हो गया। रघु के पुत्र प्रवृद्ध हुये जो एक शाप के कारण राक्षस हो गये थे, इनका दूसरा नाम कल्माषपाद था। प्रवृद्ध के पुत्र शंखण और शंखण के पुत्र सुदर्शन हुये। सुदर्शन के पुत्र का नाम अग्निवर्ण था। अग्निवर्ण के पुत्र शीघ्रग और शीघ्रग के पुत्र मरु हुये।
• मरु के पुत्र प्रशुश्रुक और प्रशुश्रुक के पुत्र अम्बरीष हुये। अम्बरीष के पुत्र का नाम नहुष था। नहुष के पुत्र ययाति और ययाति के पुत्र नाभाग हुये। नाभाग के पुत्र का नाम अज था। अज के पुत्र दशरथ हुये और दशरथ के ये चार पुत्र रामचन्द्र, भरत, लक्ष्मण तथा शत्रुघ्न हैं।
https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81_%E0%A4%B5%...

मग या नियमानुसार रामायण आत्ता परवाच्या त्रेतायुगात आणि महाभारत हे त्या पूर्वीच्या द्वापरयुगात झाले असेल तरी आधी महाभारत मग रामायण हा हिशेब लागतो.>>>>>>>प्रत्येक वेळी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करेल याची काय हमी? प्रत्येक त्रेतायुगात रामायण होईलच असे नाही ना! Happy

भाग ३ च्या प्रतिक्षेत
(म्हणजे महाभारतातील काही श्लोक नवीन धाग्यावर लिहिले जातील Proud अन्यथा एकाच खंडाचे वजन १० किलो आणि बाकीचे ग्रॅमवर वजनमात्र उरतील)

@भिकाजी
काही महाभाग आहेत त्यांना दुसऱ्याच्या खोडी काढून त्याला मानसिक त्रास देवून आनंद मिळवायचा आहे तो त्यांना मिळू तर द्या; मग पाहू पुढचं
आत्मपरीक्षण करेन तोवर आणि वाचत राहीन मायबोलीवर

प्रज्ञा, निलाक्षी
तुम्ही देव, अवतार, युगे अशा चष्म्यातून रामायण, महाभारत बघत असाल तर मानवी सभ्यता आणि संस्कृती ह्यांचे स्थित्यंतर आणि ऊत्क्रांती वगैरे संशोधन मातीमोल झाले असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
पूर्वीच्या युगात देव होते, चमत्कारी अवतार होते आणि थोर संस्कृती होती ती लयाला जाऊन आज आपण ह्या सर्वार्थाने मुल्यांचा र्‍हास झालेल्या संस्कृतीत रहात आहोत आणि त्यातल्या युगांच्या हिशोबाने हे आतापर्यंतचे सर्वात रानटी असे कलियुग आहे ह्या थिअरीवर तुमचा विश्वास असावा. अर्थात त्यात चुकीचे वा गैर काहीच नाही.

पण मानव आणि संस्कृतीची ऊत्क्रांतीबद्दलची थिअरी (जी तुम्ही-आम्ही शालेय जीवनात शिकलो) जे सांगते ते ह्याच्या ऊलट आहे.... गुहेत आणि जंगलात राहिलेला मानव हळूहळू रानटीपणा सोडून सभ्य झाला आणि त्याने एकत्रित राहण्याचा, त्यातून समाजनिर्मितीचा आणि त्या समाजाला बांधून ठेवणार्‍या संस्कृतीच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतरच्या स्थित्यंतरातून घडलेला आजचा समाज हा ह्या आधीच्या कुठल्याही समाजापेक्षा सभ्य, प्रगत आणि ऊच्च मूल्य असणारा आहे.

एक ऊदाहरण देतो बघा पटते का....कौरव-पांडव युद्धात आपण काय बघितले....

टीनेज अभिमन्यूला अनेक अ‍ॅडल्ट लोकांनी घेरून मारले.
वस्त्रहरण
खांडववन दहन
निशस्त्र कर्णाचा वध
भीमाने दु:शासनाची छाती हाताने फोडणे
झोपलेल्या पांडूपौत्रांचा खून
जरासंधाचे म्युटिलेशन
कृष्णाच्या अर्भक भावंडांची हत्या
असे एक ना अनेक बार्बेरिक घटनाप्रसंग.

ह्याऊलट रामायण, ह्यात असे बार्बेरिक प्रसंग फार नाहीत. सीतेचे अपहरण आहे, शूर्पणखेचे म्युटिलेशन आहे पण महाभारताएवढे बार्बेरिक काही नाही. ह्याऊलट जास्त कथा ही सगळ्या पात्रांनी जास्तीतजास्त आदर्शवादी असण्याबद्दल आहे. युद्ध आणि संहाराचे नियमही महाभारतापेक्षा जास्त आदर्शवादी होते.

मानव सभ्यता आणि संस्कृतीही रानटीपणाकडून सभ्यपणाकडे ऊत्क्रांत होत गेली असे मानले तर महाभारत कथेतील माणसे (देव नव्हे) ही रामायण कथेतील माणसांच्या आधी होऊन गेली असे एक जनरल अनुमान आपण लाऊ शकतो.

तुम्ही सुरूवातीलाच आधी देव मग, अवतार आणि मग मानव अशी ह्या पौराणिक कथांमध्येच सांगितलेली थिअरी मान्य केली तर आपण ऊच्चतम आणि प्रगत सभ्यता आणि संस्कृतीकडून नीचतम सभ्यता आणि संस्कृतीकडे प्रवास करतो आहोत असे मानता येईल.. पण ही थिअरी मान्य करण्यासाठी ह्या थिअरीला आधार म्हणून काही पुरावे देता येत नाही.

हायझेनबर्ग
पांडव पौत्रास अश्वधामाने झोपेत असताना मारले तेव्हा त्याला श्री कृष्णाने त्याच्या माथ्यावर असणारा मणी फोडून अमरत्वाचा व मतिभ्रष्टतेचा श्राप दिला .ही आख्यायिका आहे पण अश्वधामा अजून ही जिवंत आहे असे म्हणतात हे खरे असेल का?तुमचे मत काय?

हो हे खरं आहे. मध्य प्रदेशात फिरतो अश्वत्थामा. मी प्रत्यक्ष पाहिला.
' आपेश मरणाहूनी वोखटे' असं काहीतरी बडबडत होता.

जावेद खान
खरच का बरं !सेल्फी काडायचा ना मग त्याच्या बरोबर

बाबाओ किती प्रतिसाद??
सीमंतिनी नवीन लेखक दिसला कि हाणायची संधी सोडत नाही तुम्ही.. तुम्ही सुरुवात केली आणि बाकीचे हात साफ करायला लागले. पांचट जोक्स - त्याला हसणारे तुमचे लोक... नवीन लेखकांची कुचंबणा.. जोरात चालू आहे ...

स्वामिनी तुम्ही लिहत राहा.. मी तर म्हणतो मराठी अधिक हिंदीत लिहा नाकावर टिच्युन ...

सत्ययुगात पापाचे प्रमाण अगदीच कमी होते.
त्रेतायुगात वाढले.
द्वापारयुगात अजूनही बळावले आणि कलियुगात तर.... काही बोलायलाच नको.

अर्थात, त्या काळीही अधर्म होत होताच. पण त्याला वाचा फोडली जायची. पाप लपून राहायचे नाही. सोबतच त्या काळी मानवाधिकार समित्याही नव्हता. त्यामुळे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करणे सोपे होते.
त्रेतायुगात रामाला रावणाचा अंत करण्याकरता कारण शोधावे लागले. द्वापारयुगात कृष्णाला १३ वर्ष समोरचा पक्ष पुर्णत: अधर्मी आहे, हे पांडवांना पटण्याची वाट पाहावी लागली.
कलियुगात तर पाप सर्रास घडते. आणि न्याय....

जाऊ देत.

सत्ययुगात ड्यू आयडीचे प्रमाण अगदीच कमी होते.
त्रेतायुगात ते वाढले.
द्वापारयुगात अजूनही बळावले आणि कलियुगात तर.... काही बोलायलाच नको.

अर्थात, त्या काळीही ड्यू आयडी ओळखता यायचे. पण त्याला वाचा फोडली जायची. मूळ ओळख लपून राहायची नाही. सोबतच त्या काळी अड्डा कट्टा असे भांडण नसे. त्यामुळे ट्रोलिंग करणाऱ्या आयडीला शिक्षा करणे सोपे होते.
त्रेतायुगात एडमिनला ड्यू वाल्यांचा अंत करण्याकरता कारण शोधावे लागले. द्वापारयुगात वेमांना १३ वर्ष समोरचा पक्ष पुर्णत: डावा आहे, हे सर्वाना पटण्याची वाट पाहावी लागली.
कलियुगात तर धागे भरकटवणे सर्रास घडते. आणि न्याय....

जाऊ देत.

तरी बरे..... त्या काळी आंतरजाल नव्हते. Biggrin

हाब. मी काही रामायण, महाभारतातील लोक देव वगैरे आहेत अस म्हणत नाहीये फक्त वंशावळी प्रमाणे रामायण आधी झालेले दिसते. आता सभ्यपणा, बार्बेरिक प्रसंग यावरून तुम्ही म्हणत असाल तर सध्या आजूबाजूला अनेक प्रमाणात वाईट गोष्टी घडताना दिसतात हे प्रगतपणाचे लक्षण आहे का ? असो.

मला याबाबत अजून माहिती वाचायला आवडेल.

भिकाजी Lol

' आपेश मरणाहूनी वोखटे' असं काहीतरी बडबडत होता. >>
त्याच्यात दत्ताजी शिरला कि काय पानपतातला Lol

आता सभ्यपणा, बार्बेरिक प्रसंग यावरून तुम्ही म्हणत असाल तर सध्या आजूबाजूला अनेक प्रमाणात वाईट गोष्टी घडताना दिसतात हे प्रगतपणाचे लक्षण आहे का ?>>>>>>>>> परफेक्ट !!
आणि कलियुग हे अधोगतीचेच युग आहे. म्हणूनच कदाचित 'घोर कलियुग हो' म्हणत लोक निराशा व्यक्त करतात..... उत्साह-आनंद नाही.
आता यांत्रिक प्रगती बद्दल म्हणाल, तर त्या प्रगती मुळे निसर्गाचे प्रदूषण वाढले.
सत्ययुग सर्वात उत्तम!

' आपेश मरणाहूनी वोखटे' असं काहीतरी बडबडत होता.
माबोच्या बाहेर पडले तर कोण अपयशी आणि कोण किती यशी आहे ते कळेल .
(झालेल्या मनःस्तापामुळे प्रतिसादास वेळ लागला क्षमस्व)

फक्त वंशावळी प्रमाणे रामायण आधी झालेले दिसते. >> निलाक्षी वंशावळ सापडणे हे अजिबातच कसले प्रमाण नाही. ऊदाहरण देतो.
पर्वतीवरच्या संग्रहालयात एक पेशवेकालीन दस्तावेज आहे (मी लहान असतांना होता सध्या काय आहे माहित नाही). त्यात रामाची वंशावळ दिली आहे आणि त्यात वंशावळीत सांप्रत कालात कोण आहे माहिती ? छत्रपती शिवाजी महाराज.
अशीच वंशावळ तुम्हाला राजस्थानात गेलात तर तिथेही मिळेल.. त्यात रामाच्या वंशावळीत राणा प्रताप आहेत.
त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुण्यप्रताप एवढा सर्वदूर पसरला होता की ते जेव्हा औरंगजेबाला भेटायला गेले तेव्हा 'हे कोणी तरी दैवी अवतारी पुरूष आहेत ज्यांनी दक्षिणेत अनेक चमत्कार केले आहेत.' अशा भावनेने महाराजांच्या दर्शनाला दुतर्फा लोक दिल्लीच्या रस्त्यांवर ऊभे होते' पुढे महाराज आग्र्यातुन निसटल्यानंतर हा समज अजूनच दृढ झाला. त्या राजाबद्दलच्या प्रेमातून लोकांनी वंशावळी लिहिल्या.

साहित्यातलेच ऊदाहरण देऊ का? कदाचित पटणार नाही पण देतो,
हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक आले... एक छोटा मुलगा जादुगारांची दुनिया वगैरे. मग सातव्या पुस्तकांत आपल्या पुराणांसारखी एक 'बीडल द बार्ड' म्हणून जादुगारांच्या पुराणकथांचे पुस्तक येते. त्यात अदृष्य होण्याचा झगा कसा साक्षात मृत्य्यूदेवतेने एका जादुगाराला दिला होता अशी गोष्ट येते.
पहिल्या पुस्तकात असा झगा हॅरीकडे असलेला दाखवला आहे. ह्यावरून पुराणकथेत मृत्य्यूदेवतेकडून झगा मिळालेला जादूगार कसा हॅरीचा अनेकानेक पिढ्यांपुर्वीचा पूर्वज होता ही माहिती येते.. त्यांची वंषावळाही दिलेली आहे.
तात्पर्य कागदावर वंशावळ असणे हे कसलेच प्रमाण नाही.

आता सभ्यपणा, बार्बेरिक प्रसंग यावरून तुम्ही म्हणत असाल तर सध्या आजूबाजूला अनेक प्रमाणात वाईट गोष्टी घडताना दिसतात हे प्रगतपणाचे लक्षण आहे का ? >> हा प्रश्न १००% येणार हे आधीचा प्रतिसाद लिहितांना माहित होते. त्याचे ऊत्तरही लिहिले होते पण प्रतिसाद खूप मोठा झाला म्हणून काढून टाकले.
जसे बार्बेरिक प्रसंग तेव्हाही होते तसेच आताही आहेत हे काय अधोरेखीत करते? तर ती देखील आपल्यासारखी माणसेच होती. Happy
तर माणसे आहेत तर हेवेदावे, खून, शोषण, अत्याचार, चोरी, हत्या हे अनादीकालापासून चालत आले आहे पुढेही चालत राहिल त्यात हजारो वर्षात फरक पडला नाही पुढेही पडणार नाही.
फरक पडला तो सामाजिक सभ्यतेत... माणसे मारणे ही पूर्वीसारखी नीतिमानता राहिली नाही. शारिरिक ईजा पोहोचवून बदला घेणे हे निषिद्ध होत चालले आहे झाले आहे. सामान्य माणसांना ईतरांना शारिरिक वा मानसिक ईजा पोहोचवण्याचा हक्क सगळ्या परिस्थितीत नाकारला आहे. न्यायव्यवस्था अस्तित्वात आली आहे. ह्या संदर्भात एक ऊदाहरण देतो.
तुम्ही शंभुकाची कथा ऐकली आहे का?
तर रामाकडे एक ब्राम्हण त्याच्या अकाली निवर्तलेल्या मुलाचे शव घेऊन येतो आणि रामाला म्हणतो, मी आयुष्यात कधीही पाप केलेले नाही, असत्य बोललेलो नाही पण हे दु:ख माझ्या वाटेल आले. ह्याचे कारण तू आहेस. तू राजा म्हणून तुझ्या कर्तव्यात कसूर केलीस. राम विचारतो, मी काय केले. ब्राम्हण म्हणतो तुझ्या राज्यात धर्म बुडतो आहे. कोणी एक शूद्र वेदपठण, तपसाधना करतो आहे. ह्यामुळे पाप वाढीस लागले.
राम ऋषीमुनींशी सल्लामसलत करतो. ते म्हणतात कृतयुगात फक्त ब्राम्हण, त्रेता युगात ब्राम्हण आणि क्षत्रिय, द्वापार युगात ब्राम्हण, क्षत्र्य आणि वैश्य आणि मग कलियुगात पहिल्या तिघांबरोबर शुद्रांना वेदपठण, तपसाधना करता येईल त्याआधी नाही. असे झाल्याने राम स्वतः शंभुकाला हुडकून त्याचा शिरच्छेद करतो.
आजच्या जगात सभ्यता आणि धर्माच्या नावाखाली तुम्हाला शिक्षण घेतले म्हणून कुणाला मृत्य्यूदंड न मिळणे ही संस्कृतीची प्रगती वाटते की अधोगती?
कलियुगातल्या दु:शासनांना शासन करण्यासाठी न्यायसंस्था अस्तित्वात आहे आणि स्त्रीच्या रक्षणकर्त्याला कोणाचा खून करण्याची वेळ येत नाही ही प्रगती आहे की अधोगती?
कौटुंबिक कलहातून भांडणे ते महायुद्ध असे काहीही होऊ नये म्हणून यंत्रणा अस्तित्वात आहे.
स्त्रियांना समान हक्क मिळण्याकडे वाटचाल होते आहे.... मला तरी हे सगळे सभ्यता आणि संस्कृतीची प्रगती वाटते.

प्रत्येक पिढी म्हणते पूर्वीची पिढी चांगले होती तेव्हा हे चांगले होते ते चांगले होते.. पण खरं तर सगळी असमाजिक तत्वे ईतिहासात प्रत्येक वेळी अस्तित्वात होतीच....आताही आहेत पुढेही राहतील. पण समाज सतत अजुनाजुन जागरूक, सभ्य आणि सुसंस्कृतच होत राहतो.

हायझेनबर्ग
छान माहिती ,माझा धाग्याला ज्ञानाचा खजिना केलात तुम्ही सगळ्यांनी खूप खूप आभार

बर्ग कोण आता??? ते हायझेनबर्ग आहेत. तुम्ही मुद्दाम अशी नावं लिहित असाल अशी शंका यायला लागले आता. चालू द्या. Wink

हाब, चांगला प्रतिसाद.
आँख के बदले आँख असा 'कायदा' असणं वेगळं आणि वैयक्तिक पातळीवर कुणी असं कृत्य करणं वेगळं.

बर्ग कोण आता??? ते हायझेनबर्ग आहेत. तुम्ही मुद्दाम अशी नावं लिहित असाल अशी शंका यायला लागले आता. चालू द्या.
Submitted by बोकलत >> तुमचे भीम पराक्रम वाचायला आतुर झालेत सगळे. तिथेपण हजेरी लावा एकदा.

Pages