गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आचार्य म्हणजे आचारी नव्हे तर शिक्षक.
भीम स्वतः नवनव्या पाककृती प्रायोगिक तत्वावर बनवून इतरांना शिकवीत असे म्हणुन त्याला बल्लवाचार्य म्हणत.

वल्लभ नाय हो बल्लव.
वल्लभ म्हणजे प्रियतम /पती
बल्लव म्हणजे स्वयंपाकी.
तलवार या जागी महाभारतातली कथा अहे तर खड्ग हा शब्द चांगला वाटेल.

१ कोस म्हणजे अंदाजे किती किलोमीटर? राजमाता एव्हढं अंतर चालत गेल्या असतील की पालखीतून? की हत्तीवरून? त्या हत्तीचे नाव काय असावे? या प्रवासात राजमाता यांनी दासींबरोबर काहीच वार्तालाप केला नसेल का? साधारण काय बोलणे झाले असावे? राजमाता यांना झेड-प्लस सुरक्षा असायला हवी ना? मग फुटकळ चार पाच सैनिकच का असावेत त्यांच्या बरोबर? हे असे तपशील दिले असते तर लिखाण अगदी अभ्यासू झाले असते.
शिवाय त्याकाळच्या लोकांच्या पोशाखाचे किंवा अलंकारांचे वर्णन आढळले नाही याचा खेद जाहला

त्या काळात न्याहरी काय असेल असा जेन्युईन प्रश्न पडला. अर्थात हा भाग नॉर्थमध्ये येतो म्हणजे साबुदाणा खिचडी, पोहे, उपमा, ढोकळा वगैरे पदार्थ बाद झाले. मग छोले पुरी वगैरे असावी का? Wink

मायबोलीकरांनी एकदा का मनावर घेतलं कि ते लिहिणाऱ्याला उच्च दर्जाचा लेखक बनवतात. चुका काढण्यामागे समोरची व्यक्ती घडावी, तिने उच्च दर्जाची कथा, कादंबऱ्या लिहाव्यात, त्यांच्यावर चित्रपट बनावेत, त्यांना ऑस्कर ऍवॉर्ड मिळावा असा प्रेमळ हेतू त्यामागे असतो. अनेक महान लेखक इथे घडले. त्यामुळे स्वामिनीताई तुम्ही या चुका खिलाडूवृत्तीने घ्याव्यात असं मला वाटतंय.

छोले शिजवायला प्रेशर कुकर नसावेत तेव्हा. चूलीवर छोले शिजवायचे तर हत्तीने अंग झटकायच्या बरच आधी उठावे लागणार. किंबहुना ऑल-नायटर प्रोसेस असणार. अशी ऑलनायटर प्रोसेस मध्ये बल्लव का वल्लभ हो जाता है... सबब नक्की छोले पुरी नाश्ता असणार!

पोहेच असतील हो. सुदामा मथुरेहून द्वारकेला घेऊन आलेला. हस्तिनापुरच्या वाण्याच्या दुकानात मिळत नसतील कशावरून Wink
कांदेपोहेच अगदी फिट्ट आहेत वरच्या प्रसंगात, व्यास येणारेत.

>>त्यामुळे स्वामिनीताई तुम्ही या चुका खिलाडूवृत्तीने घ्याव्यात असं मला वाटतंय.>>>+१

हो वाचतेय मी प्रतिसाद खरंच मला ही ;हे प्रश्न आता पडले आणि खरंच माझा धागा मनापासून आणि वेळातवेळ कडून वाचला जातो त्या बद्दल आभार !आणि वल्लभाचारी याचा अर्थ मला जेवण तयार करणारा असा अभिप्रेत होता . ते खरं तर बल्लभाचारी अस हवं ; पण एकाच शब्दाचा जो उदो उदो केला त्याच मला आश्चर्य वाटले असो माझ्या कडून सुधारणा होत राहतील माझ्यात
सुधारणा व्हाव्यात म्हणूनच इथे आवर्जून मी लेख टाकते . पण काही लोक खूपच ट्रोल करतात त्या बद्दल खेद वाटतो .आणि त्या काळात न्याहारी म्हणजे अपुप (एक प्रकारचे वडे ) ,फलाहार ,दशम्या ,दूध ,वेगवेगळ्या प्रकाच्या खिरी असा असे किंवा माझ्या माहिती प्रमाणे असा असावा .राजमहालात ठिक -ठिकाणी चौक्या पहारे असायचे त्या वेळी त्यामुळे व राजमहाल हे स्वतः चे घर होते राजमाता सत्यवतीचे त्यामुळे चार सैनिक असा उल्लेख केला .आणि एक कोसाचा मंदिर परिसर असा उल्लेख आहे मंदिर एक कोसावर असे नाही त्या मुळे राजमाता चालत गेल्या अस अभिप्रेत आहे आणि मंदिरात जात असताना मौन पाळावे किंव्हा कमी शब्द बोलावेत असा माझा वैयक्तिक समज आहे म्हणून व जी माता पुत्र शोकात आहे व जिचे कुळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ती साहजिकच गप्पा मारत जाणार नाही .
माझ्या परीने मी शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला तरी अजून काही शंका असतील तर विचाराव्यात व काही सुधारणा असतील तर त्याही सुचवाव्यात ही विनंती

राजहंस होते पण राजहंसांची जोडी हे शृंगार, प्रणय वगैरेचे प्रतीक असताना तुम्ही ते संतपणे विहरत आहे असे सांगितल्याने प्रतीकभंजनाचे काम तुमच्याकडून अनावधानाने झाले.

जी माता पुत्र शोकात आहे व जिचे कुळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ती साहजिकच गप्पा मारत जाणार नाही .>> सहमत.

73 प्रतिसाद म्हणजे काहीतरी खास घडले असणार हे समजून इथे आले आणि निराशा झाली नाही. लेख वाचण्यात वेळ घालवला नाही कारण लेखिकेची भाषेची आणि व्याकरणाची जाण पहिल्याच लेखात कळली होती.

प्रतिसाद वाचून चांगलीच करमणूक झाली. लेखिकेचे प्रतिसाद वाचून तिचे व्याकरण अजून तिथेच आहे याची खात्री पटली. दोन चारदा आंब आंब वाचून तोंड आंबट झाले.

पण तरीही लेखिकेला नाउमेद करावेसे वाटत नाही. लिहायचे आहे, अवश्य लिहा. सवयीने चांगले लिहाल. महाभारत खूप चांगला विषय आहे. त्यात काय घडले हे सगळ्यांना माहीत आहे, आपल्या कुवतीनुसार मूळ कथा तशीच ठेऊन कल्पनाविस्तार करायला भरपूर वाव आहे. त्यामुळे अवश्य लिहा. त्यासाठी आधी भरपूर व चांगले वाचा. सुमार वाचलेत तर तुम्ही सुमार लिहिणार हे लक्षात घ्या. तुम्ही कल्पनाविस्तार चांगला करू शकता. चांगले वाचून स्वतंत्र गोष्ट लिहिण्याचा विचार केलात तर भविष्यात बऱ्यापैकी लेखन करू शकता. फक्त खालील गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचाच फायदा होईल :

1. स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पडू नका. मुळ लेख दुसरीकडे लिहा, लिहून झाल्यावर तो दहादा वाचा. म्हणजे त्यातल्या शुद्धलेखन व व्याकरणाच्या चुका लक्षात येतील. तुम्ही जर स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात असाल तर तुम्हाला एकही चूक दिसणार नाही. प्रेम आवरत नसेल तर लेख कोणा दुसऱ्याला, ज्याला व्याकरणातील कळते त्याला वाचायला द्या व चुका काढायला सांगा. असा तपासलेला लेख इथे द्या. डोक्यातला लेख तसाच भराभर टाईप केला व लेखाच्या प्रेमापोटी तो एकदाही न वाचता पोस्ट केला की ऑटोकरेक्टच्या ढिगांनी चुका राहतात, ज्या तुम्ही सोडून बाकी सगळ्यांना दिसतात.

2. प्रतिसाद डोके थंड ठेऊन वाचले तर लक्षात येईल की लोक चुका दाखवतात; त्याला तुम्ही वाकड्यात जाऊन उत्तरे दिली की लोकही वाकड्यात जातात. त्यामुळे चुका दाखवणारे प्रतिसाद ओळखा व त्याचा उपयोग करून घ्या.

3. लेखनाचा काळ ओळखून त्यात शब्द वापरा. कुर्निसात, मुजरा वगैरे शब्द तेव्हा वापरात नव्हते. तुम्ही लेखनासाठी जो काळ निवडला त्या काळाबद्दल आता जे लिखाण होते त्यात संस्कृतप्रचुर शब्द जास्त वापरले जातात. तुम्ही उर्दू वापरलेत तर वाचणाऱ्याला ते बोचणार आणि तो तसे लिहिणार. लेख लिहितांना काळाचे भान हवे आणि केवळ तुम्हाला वाटते म्हणून अमुक शब्द त्यात टाकता येत नाही. शब्दकोशात शब्द तपासून बघा म्हणजे बल्लभाचारी वगैरे गंमती होणार नाही. मुजरा म्हणजे अमुक असे तुम्हाला वाटले किंवा अभिप्रेत असले तरी लोक वाचताना जो काही प्रचलित अर्थ आहे तोच घेणार.

तुम्ही लिहितांना जितक्या गंमती करणार तितक्या गंमती लोक प्रतिसाद देताना करणार. त्यामुळे आधी स्वतःचा लेख दहादा वाचून चुका शोधून त्या दुरुस्त करा.

4. प्रतिसाद देणाऱ्यांचा, त्यात तुमच्या चुका दाखवणाऱ्यांचा उपमर्द करू नका कारण तुम्ही इथे नवीन आहात. प्रतिसाद देणारा स्वतः चांगले लिहिणारा लेखक असेल, पण तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही प्रतिसाद एक धडा म्हणून घेतलात तर देणारे अजून मदत करतील. पण तुमचा आड अजून नीट भरलेला नसताना इतरांवर टीकेला सुरवात केलीत तर नुकसान तुमचेच आहे.

5. दहातले तीन प्रतिसाद लोकांनी वाकड्यात जायला/गम्मत म्हणून/त्यांचा वेळ जात नाही म्हणून दिलेले असतात. ते ओळखून दुर्लक्ष करा किंवा मजेत घ्या.

6. महाभारतावर सिद्धहस्त लोकांनी लिहिलेली टीका वाचलीय. त्यामुळे हल्ली मायबोलीवर जे टीव्ही सिरीयलमधल्या एकेक एपिसोडसारखे लिहिलेले शब्दबंबाळ महाभारत लिहिले जातेय ते वाचायची अजिबात इच्छा नाही. पण म्हणून कोणी लिहू नये असे अजिबात नाही. लिहिणाऱ्यानी प्रतिसादांचे विपरीत अर्थ लावून, निष्कारण वादावादी ओढवून घेऊन त्यातून लोकांचे पॉपकॉर्नयुक्त मनोरंजन व स्वतःचे नुकसान करून घेऊ नये म्हणून वरचे खरडले. पटले तर बघा नाहीतर सोडून द्या.

जी माता पुत्र शोकात आहे व जिचे कुळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ती साहजिकच गप्पा मारत जाणार नाही>>>>

ती साग्रसंगीत पूजेतही वेळ घालवणार नाही, देवाचे पाय धरून याचना करेल असे वाटते. असो. दुःखाचा प्रसंग रंगवताय तर आजूबाजूचे वातावरण उत्फुल्ल आहे असे रंगवू नका. तेही प्रसंगाला साजेसे ठेवा, त्या दिवशी आभाळ भरून येऊन बारीक संततधार सुरू होती व राजमातेचे मनसुद्धा भरलेल्या आभाळासारखे काळवंडलेले होते वगैरे वातावरण निर्मिती केली तर ते प्रसंगाला साजेसे होईल. आनंदाचे व दुःखाचे प्रसंग रंगवण्याची वेळ महाभारतात वारंवार येणार आहे. त्यामुळे जसा प्रसंग तशी वातावरणनिर्मिती करा.

राजमाता पुत्रविरहाच्या शोकात आहे हे तुम्ही प्रतिसादात लिहिले म्हणून कळले. नाहीतर माता व राज्यातले लोक मजेत नित्यकर्मे करताहेत, दासी मिष्टान्न भरून थाळ्या नेताहेत वगैरे वाचून अजिबात संशय येत नाही की राज्यावर दारुण प्रसंग ओढवलाय म्हणून.

तलवार या जागी महाभारतातली कथा अहे तर खड्ग हा शब्द चांगला वाटेल.>>>>>>> खड्ग हा संस्कृत शब्द आहे. तलवारीला उर्दूमध्ये समशेर म्हणतात.

'वेडात मराठेवीर दौडले सात' या कवितेत तलवारीची पात असा उल्लेख आहे. म्हणजे तलवार हा शब्द आजही मराठीत सर्रास वापरला जातो आणि पूर्वी सुद्धा वापरला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो शब्द वापरला तर वाचताना अडथळा तरी नक्कीच येत नाही. Happy

स्वामिनीजी, मुजरा व तत्सम शब्द वापरू नका, त्या ऐवजी प्रणाम करणे, प्रणिपात करणे, अभिवादन करणे इ. चा वापर करावा, असा एक सल्ला देते आहे. पटला तर घ्या. Happy

आणि हो, हे सगळे हलकेच घ्या. Light 1

साधना शतःश धन्यवाद!! अगदी नेमकी पोस्ट मायेने लिहीलीत.

सर्व व्याप सांभाळून मायबोलीवर लिहीणारे अनेक हौशी लेखक आहेत. कधी कधी अनावधानाने त्यात गंमती जमती घडतात, त्रुटी राहून जातात. क्वचितच स्पष्टपणे तर बहुतेकवेळा विनोदी, मिस्कीलपणाची झालर लावून लेखाकाला ओशाळे (एंबॅरॅस) न करता त्या त्या वाक्यांकडे लेखकाचे लक्ष वेधले तर लेखक बदल करतात. संस्थळांवरचे वाचन/ लेखन हा इंटरअ‍ॅक्टीव्ह अनुभव असतो. पण इथे बेसिक में राडा असल्याने वाचन आणि काही पोस्ट करणे हा फ्रस्टरेटींग अनुभव ठरतो आहे. Let's see what's the new low अशा मनोभूमिकेतून आले तर बरं पडतं. दहा आयडीनी "डिकोड" करून सांगावे लागते - बहुतेक लेखिकेला अमुकढमुक म्हणायचे असेल....

तर आता मुद्द्याची गोष्ट लेखक आयडी साठी - संत आणि संथ ह्या शब्दाच्या अर्थात फरक आहे. राजहंस संथपणे विहार करतो, संतपणे विहार करणारा मी वाचलेला हा पहिला राजहंस. सबब - लोक ट्रोलिंग करतात हे म्हणणे सोपे आहे पण त्या लोकांना आपल्यापेक्षा मूळाक्षरे, शब्द जरा जास्त कळतात हे पचवणे जड आहे. बघा जमलं तर....

@साधना
@मी मधुरा
धन्यवाद, मी सूचना लक्षात ठेवेण

लिहीत रहा. रोज काही ना काही लिहीत गेले पाहीजे. व्या़करणाच्या चुका वगैरे होत राहतील. हळू हळू त्या नाहीशाही होतील.
तुमच्यात एक महान लेखक नाथमाधव दडलेले आहेत. वर्णनांच्या बाबतीत त्यांच्याशी कुणीही स्पर्धा करू शकणार नाही. तुम्हीही चांगली वर्णने करता. नाथमाधवांची पुस्तके वाचून काढा. शुभेच्छा !

>>खड्ग हा संस्कृत शब्द आहे. तलवारीला उर्दूमध्ये समशेर म्हणतात.>>
मूळ महाभारत हे संस्कृत भाषेतच आहे म्हणूनच संस्कृत शब्द सुचवला. खड्ग हे पुरातन भारतीय शस्त्र. त्याला दुहेरी धार.
समशेर, तलवार ही एकेरी धार आणि बाक असलेले पाते. ती नंतरच्या काळातली. असो.

साधना, दोन्ही प्रतिसाद उत्तम!

जिला मुठीच्या साईडला बोटांचे रक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक गोलाकार दांडी असते ती तलवार आणि जिला असा दांडी नसते ती समशेर/ शमशिर. पुन्हा तलवारीचा बाक समशेरीपेक्षा कमी असतो.
खड्ग जे आपल्याकडे पुराणकाळातील साहित्यापासून ज्ञात आहे ते दुधारी असते. यवनांची एकधारी बाक असलेली समशेर पाहून तिला मॉडिफाय करून तलवार आली आणि त्यासाठी तरवारी हा शब्द संस्कृतमध्ये घुसडण्यात आला. बहुतेक हिंदू राजे गुप्त, अशोक, पृथ्वीराज चव्हाण, राणा प्रताप वगैरे खंडा/खडग वापरत.

तुम्हाला माहाभारत कालीन शब्द हवा असेल तर तो आहे 'असि' जी पहिल्यांदा ब्रम्हाने तयार केली. अर्जुन जसा एकमेवादिव्तीय धनुर्धारी होता तसा नकूल एकमेवाद्वितीय असिधारी होता. नकूल आणि भीष्मामधला शस्त्र म्हणून असि श्रेष्ठकी धनुष्यबाण ही चर्चा प्रसिद्ध आहे ज्यात नकूल भीष्मांना पटवून देतो की असि श्रेष्ठ आहे.

खड्ग हे बलिदानाचे शस्त्र आहे. पूर्वी शस्त्र त्या त्या कामाला वापरले जात असे. मात्र त्या काळातही आज मायबोलीवर लिहीलेले वाचता येण्याची सोय होती. मायबोलीवर लिहीणारे शब्दांच्या आग्रहाबाबत बेफिकीर झाल्याने मग पूर्वीचे लोक गोंधळले आणि बळीचे आयुध युद्धासाठी तर युद्धाचे आयुध बलीसाठी असा वापर होऊ लागला.

मूळ कथा फारच रसपूर्ण आहे.
दक्ष बावाच्या प्रजापतीला साठ मुली झाल्या. या मुलींनी सृष्टीला जन्म दिला. यात दैत्य आणि देवही आले. दैत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी सर्वांना हैराण करून सोडले. त्यामुळे देवांनी एक यज्ञ केला. त्या यज्ञाच्या अग्नीतून नील, कृशोदर, तीक्ष्णदंत आणि एक अत्यंत दैदीप्यमाने असे अस्त्र निर्माण झाले. ब्रह्माने सांगितले की या अस्त्राची निर्मिती मी लोकरक्षेसाठी केली असून याचे नाव आजपासून खड्ग असे राहील.

खड्गाचे तीन प्रकार आहेत.

कमल (कमळासारखे)
मंडलाग्र
वसियष्टि

वराहमिहिर याने ५० अंगुल (वीत ) एव्हढे मोठे असलेल्या खड्गाला सर्वश्रेष्ठ अस्त्र मानले आहे. त्यापेक्षा छोट्याला तलवार म्हटले जाई. पुढे तलवार एका बाजूने धार असलेली असे. खडगाच्या मुठीच्या दोन्ही बाजूला पान असते. तलवारीच्या एकाच बाजूला असते. खड्ग एका रेषेत सरळ असते. तलवारीला थोडासा बाक देण्यात येऊ लागला. युद्धशास्त्र विकसित होत गेले तस तसे खडग वापरणे कमी होत गेले.

कोकणी कोयत्याच्या मोठ्या भावाला साऊथ इंडीयन मुव्हीच्या हिंदी आवृत्तीमध्ये तलवार बोलतात Proud त्यांना सुद्धा कन्फ्यूझन दूर करायला हां लेख + प्रतिसाद वाचायला द्यायला हवेत.
Aruval

मूळ महाभारत हे संस्कृत भाषेतच आहे म्हणूनच संस्कृत शब्द सुचवला. >>>>>>>> त्यावर मी सहमत आहेच. उलट संस्कृत प्रधान मराठी भाषेचा मनावर ठसा उमटतो. समशेर, तलवार आणि खड्ग या शस्त्रांमध्ये फरक आहेत, हे माहिती असल्याने ते ही मान्य! मी फक्त तलवार शब्दावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही, इतकेच म्हणत होते. Happy

पुरोगामी गाढव, छान माहिती लिहिलीत.

माबोवर मूळ लेखनातकेच प्रतिसाद सुद्धा रोचक असतात. रादर, मूळ लेख गंडला की प्रतिसाद जास्तच रोचक Wink आणि खरोखर माहितीपूर्ण असतात. मी लेखन वाचायला कंटाळा आला तर उडी मारून डायरेक्ट प्रतिसाद वाचायला घेते आणि ते मात्र कधीही निराशा करत नाहीत.

चांगली माहिती. असिधारा व्रत असा वाक्प्रचार ऐकला होता. पण त्याचा महाभारतकालीन संदर्भ असेल हे माहिती नव्हते.

Pages