गांधारी एक अद्वितीय नारी (भाग २)

Submitted by Swamini Chougule on 12 December, 2019 - 13:34

पूर्वेकडून सूर्याची किरणे संपूर्ण सृष्टीवर प्रकाशाची उधळण करत होती . सर्व सृष्टी प्रकाशाने न्हाऊन निघत होती .प्रकाशाची चाहुल लागताच पक्षी किलबिलाट करत होते.पक्षांचे थवेच्या -थवे घरटी सोडत आकाशात उड्डाण करत होते .नदी घाटावर लोक सकाळची स्नान संध्या उरकत होते .तर कोणी मंत्रोच्चार तर कोणी सूर्य नमस्कार करत होते .महिला घरदार स्वच्छ करत होत्या; तर कुठे रांगोळी काढण्यात मग्न होत्या .गुरेढोरे ,घोडे ,हत्ती अंग झटकून उभी राहत होती . गोशाळांमध्ये स्त्री -पुरुष धारा काढत होते.कोठे लांबच्या मंदिराचा घंटा रव कानावर येत होता.तर कुठे भूपाळीचे मधुर स्वर कानावर पडत होते . सर्व हस्तिनापूर गजबजत होते .
इकडे राजमहालात ही दास -दासी स्वच्छता करण्यात मग्न होते. तर बल्लभाचारी न्याहरी बनवण्यात व्यग्र होते.घोड्याची अस्तबले साफ केली जात होती तर हत्तीना चारा दिला जात होता. व्यायाम शाळेतून तलवारीचे खणखणाट ऐकू येत होता.तर मंदिरातून मंत्रोच्चार ऐकू येत होते. राजमाता सत्यवती त्यांची नित्य कर्मे आटोपून मंदिरात जाण्यासाठी निघल्या होत्या.त्यांच्या बरोबर पाच -सहा दासींचा ताफा होता तर चार -पाच सैनिक हि होते .प्रत्येक दासीच्या हातात कशाचं ना कशाचं तरी तबक होते. एकात मोगऱ्याची फुले ,एकात मिष्ठांनाचा नैवेद्य एकात विविध फळे ,एका तबकात चंदन ,भस्म इतर पूजेचे साहित्य तर एका दासीच्या कमरेवर दुधाने भरलेला चांदीचा कलश होता.
राजमाता सत्यवती मंदिर प्रांगणात प्रवेश कर्त्या झाल्या.मंदिराचे प्रांगण दोन-तीन कोस इतके भव्य होते.तिथे वेगवेगळ्या फुल झाडांची रेलचेल होती मोगरा,बकुळ ,जाई जुई ,प्राजक्त,सोनचाफा ,झेंडू ,शेवंती ,केवडा अशी एक ना अनेक झाडे होती .तसेच पळस ,बेल ,केळी ,तुळस ,कर्दळी अशी नानाविध झाडे होती.कोठे भ्रमर मधू रसपान करण्यात गुंतलेले दिसत होते.तर कोठे फुलपाखरे उडत होती.त्या झाडांच्या मध्ये एक छोटेसे तळे होते .त्या तळ्यात कमल पुष्पांवर असलेल्या दवबिंदूवर सूर्याच्या पडलेल्या किरणांनी कमल पुष्पे लखाकत होती. तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या .त्या झाडांच्या मधून एक प्रशस्त मार्ग मंदिराकडे जात होती. राजमाता मंदिरात येत असल्याची वर्दी पुजाऱ्याला दिली गेली.
राजमाता सत्यवतीनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर पूर्ण शुभ्र संगमरवरी होते .सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मंदिर स्फटिका प्रमाणे लखाकत होते. मंदिरात प्रशस्त सभामंडप होता. सभामंडपाच्या मध्यभागी काळ्या पाषाणाचा नंदी होता जो पांढऱ्या शुभ्र सभामंडपात उठून दिसत होता. मंदिराच्या छताला एक मोठी घंटा होती. आत गाभाऱ्यात एक सुंदर घडीव काळ्या पाषाणाचे शिवलिंग होते .एक चांदीची समई पूर्ण गाभारा उजळून टाकत होती .धुपाचा मंद सुगंध गाभारा भर पसरला होता.त्या शिवलिंगाच्यावर मोठा चांदीचा कलश अविरत शिवलिंगावर पाण्याची धार सोडत होता. पुजाऱ्याने चपळाईने येऊन राजमाता सत्यवतीना मुजरा केला.राजमाता शिवलिंगा समोर बसल्या व पुजाऱ्याच्या मंत्रोच्चारा बरोबर एक -एक फुल,बिल्वपत्र अशी पूजा सामग्री शिवलिंगावर वाहू लागल्या.शिवाला केसर ,मध ,शर्करा युक्त दुधाचा अभिषेक केला गेला. पुजार्‍याच्या मंत्रोच्चारा बरोबर राजमाता सत्यावतीनी मिष्ठांनाचा नैवेद्य दाखवला.त्या नैवेद्य दाखवून हात जोडून शिवलिंगासमोर बसल्या होत्या त्यांच्या एका इशाऱ्यावर पुजाऱ्यासहित सर्व दास-दासी मंदिरा बाहेर प्रांगणात जाऊन उभे राहिले.
आता राजमाता सत्यवती एकट्याच शिवा समोर होत्या .त्या हात जोडून शिवलिंगाची प्रार्थना करत बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती ,“ हे महादेवा तुम्ही तर सर्व जाणता .तुमच्या पासून काय लपून राहिले आहे ?मी आज हस्तिनापूर राज्यासाठी व कुरुवंश नष्ट होऊ नये म्हणून खूप मोठा निर्णय घेत आहे .मी जाणते हा निर्णय कठोर आहे पण तो घेणे क्रमप्राप्त आहे. कदाचित कुरुवंश; मी व माझ्या पित्याने केलेल्या पापांचा दंड भोगत आहे, मी त्या पापांच शासन एकटी भोगीन पण कुरुवंशाला दंड भोगावा लागू नये .अशी मी प्रार्थना करते .
माझा व महाराज शांतनूचा विवाह करण्यासाठी माझ्या पित्यानी जी अट गंगापुत्र राजकुमार देवव्रताना घातली व त्यांनी ती मान्य केली .त्यांच्या हक्काचे हनन करुन राजगादी माझ्या पुत्रांना लाभली ;पण ही राजगादी हे राजवैभव उपभोगायला आज माझा एक ही पुत्र ना त्यांचा वंशज या जगात आहे.कदाचित हाच तुमचा ईश्वरीय न्याय आहे! पण हे महादेवा कुरुवंशाच्या नाशाला मी कारणीभूत होऊ इच्छित नाही म्हणूनच कुरुवंश वाढवण्यासाठी व राजगादीला वारस मिळवण्यासाठी मी खूप मोठे पाऊल उचलत आहे .तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्यावा महादेवा! हीच प्रार्थना !”
हे सगळं बोलत असताना राजमाता सत्यवतीच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते त्यांचा आवाज कातर झाला होता. त्या शिवलिंगा समोर नतमस्तक होऊन उठल्या व सरळ राजसभेच्या दिशेने निघाल्या त्यांच्या बरोबर आता फक्त त्यांची खास दासी चालत होती .
राजसभेत राजमाता सत्यवती पोहचल्या तेंव्हा त्यांच्या आधीच राजकुमार देवव्रत ,महामंत्री व राजपुरोहित राजमातेने बोलवल्या प्रमाणे हजर होते.तिघांनी ही राजमाता सत्यावतींना लवून मुजरा केला.राजमाता सत्यवतींनी त्या तिघांना आसनस्थ होण्याची आज्ञा केली .ते तिघे व राजमाता आसनस्थ झाल्या .
आता राजमाता सत्यवती बोलू लागल्या .
राजमाता सत्यवती,“ आम्ही तुम्हाला इथे का बोलावले आहे याचे प्रयोजन आहे, त्या विषयी चर्चा करण्यासाठी आम्ही ही सभा बोलावली आहे.”
राजकुमार देवव्रत ,“ असे काय प्रयोजन आहे माते?”
राजमाता सत्यवती,“तुम्हाला तर माहितीच आहे की महाराज विचित्रविर्याच्या मृत्यूमुळे हस्तिनापूरच्या गादीवर व कुरु वंशावर खूप मोठे वंशनाशाचे संकट कोसळले आहे .तर हे संकट दूर करण्यासाठी व कुरुवंश पुढे चालवण्यासाठी राजसंहिता व धर्मशास्त्रानुसार आम्ही एका निर्णया प्रत पोहोचलो आहोत .”
राजमाता सत्यवती मोठ्या निश्चयाने बोलत होत्या.त्यांची कालची मरगळ कुठल्या -कुठे पळाली होती.आज त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
महामंत्री ,“असा कोणता मार्ग आहे राजमाता जो कुरुवंशाला या संकटातून तारू शकेल ?”
राजमाता सत्यवती ,“धर्मशास्त्र व राजसंहिते अनुसार जर कोणत्याही राजघराण्यावर वंशनाशाचे संकट ओढवले व राजगादीस वारस उरला नाही तर राजगादी व त्या राजवंशाला वाचवण्यासाठी एक तर राजपित्याचा कोणी नातेवाईक किंवा राजमातेचा नातेवाईक त्या वंशाची वृद्धी करू शकतात .” राजमाता सत्यवती मोठ्या धैर्याने बोलत होत्या .
राजकुमार देवव्रत ,“म्हणजे काय?मी समजलो नाही माते. ”
राजमाता सत्यवती,“पुत्र महाराज विचित्रविर्याचा मृत्यू झाला पण त्याचा कोणी वारस/वंशज नाही व तुम्ही ही तुमची प्रतिज्ञा सोडायला तयार नाही म्हणून मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात .हे धर्मसंमत व शास्त्र संमत ही आहे.”
राजपुरोहीत,“ हो राजकुमार देवव्रत महर्षि व्यास हे धर्मसंमतपणे देवी आंबिका व देवी आंबालिका यांना मातृत्व बहाल करू शकतात .”
राजपुरोहीतांनी राजमाताच्या बोलण्याला दुजोरा दिला .
राजकुमार देवव्रत ,“ठीक आहे माते पण या साठी देवी आंबिका व देवी आंबालिका यांची संमती आवश्यक आहे.”राजकुमार देवव्रत बोलले
राजमाता सत्यवती,“ सुष्णा देवी आंबिका व देवी आंबालिका या दोघींना संमत व्हावेचं लागेल पुत्र ,कारण कुरु कुळाच्या कुलवधू या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे ,कुरु वंशाला वारस देणे!”
राजमाता सत्यवती ठामपणे बोलल्या व महर्षि व्यासांना पाचारण करण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गांधारीला १०० पुत्र होतील तेव्हा होतील पुढील कुठल्यातरी भागामध्ये ... पण ह्या दुसऱ्या भागाला मात्र लवकच प्रतिसादकौरव बनलेले पहायला मिळण्याचे संकेत दिसू लागलेत.

@नौटंकी
तुमचे सजेशन मान्य
@सीमंतिनी
मी हाच विचार केला की अंबाचे नाव कंसात आहे पण मला राहवले नाही म्हणून मी तासाभराणे प्रतिसाद दिला .तुमची चूक दाखवून देण्यासाठी नाही ,कोणाच्याही चुकांवर बोट ठेवण्यात मला रस नाही .By the way तुमचं नाव खूप सुंदर आहे मला हे नाव खूप आवडते कारण शिवलीलामृत मधील सीमंतिनीचे व्यक्तिमत्त्व मला आवडते.

आता वल्लभाचारी नामक चेकॉव्हस गन पहिल्याच परिच्छेदात दिसल्यावर प्रतिसादकौरव होणार नाहीतर काय मायबोलीकरांनी एक प्रतिसाद पॉलिसी काढायची काय??
आफ्टर ऑल,... वल्लभाचारी कौन था? क्यों न्याहरी बना रहा था?? नेशन वाँटस टू नो!! Wink Happy

आणि सगळ्यात भन्नाट - "तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या. "
डिस्कवरी चॅनलवाले टाईम ट्रॅव्हल करून जातील असले राजहंस शोधायला...

धन्यवाद ,सीमंतिनी तुमच्या कडून हीच अपेक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली .(हसरी बाहुली)
तुमच्या कडून मला छान प्रेरणा मिळते लिहिण्याची

भीष्मांनी आंबा ,आंबालिक व आंबिका यांना हरण केले>>> हरणच का? हत्ती, घोडा, वाघ, सिंह का नाही? का तुम्ही सगळे त्या गरीब हरणाच्या मागे लागलाय. तो चावत नाही, नखं ओरबडत नाही म्हणून? रामायणात मारीचने हरणाचे रूप घेऊन श्रीराम प्रभूना बाण मारायला लावला. हा अन्याय आहे. हरीण माझा आवडता प्राणी आहे.

आता वल्लभाचारी नामक चेकॉव्हस गन पहिल्याच परिच्छेदात दिसल्यावर प्रतिसादकौरव होणार नाहीतर काय मायबोलीकरांनी एक प्रतिसाद पॉलिसी काढायची काय??
आफ्टर ऑल,... वल्लभाचारी कौन था? क्यों न्याहरी बना रहा था?? नेशन वाँटस टू नो!! >> सीमंतिनी Biggrin Biggrin Biggrin

आणि सगळ्यात भन्नाट - "तर त्याच तळ्यात राजहंसाच्या जोड्या संतपणे विहार करत होत्या. "
डिस्कवरी चॅनलवाले टाईम ट्रॅव्हल करून जातील असले राजहंस शोधायला... >> Biggrin Biggrin Biggrin

हत्ती, घोडा, वाघ, सिंह का नाही? >> Biggrin
पळवून आणलेल्या पोरींना वाघ-सिंह करायचे इतका पण भीष्म अलिबागसे आयेला नव्हता.... हरणच परवडेंगा... Happy

संमतीशिवाय झाला तो (अंबा,) अंबिका, व अंबालिकेचा विचित्रवीर्याशी विवाह. भीष्माने हरण केले. ज्यांनी इतरांना काय कळतं, काय आठवतं ह्याच्या पंचाईती करण्यात वेळ घालवला नि मूळ महाभारत वाचले नाही त्यांना महाभारतात काही ना काही (नसलेली) खोट दिसते ! हे माझं दुर्दैव दुसर काय (रडणारी बाहुली)

Submitted by सीमंतिनी on 14 December, 2019 - 03:59
बिचाऱ्या अंबा ,आंबालिका व आंबिका यांना हरण मी नाही केलं कोणी केलं ते पहा आणि मग बोला

हा लेख नाव वाचूनच कंटाळवाणा झाला, पण तरीही बराचसा वाचला. शुद्धलेखन अतिशय सुधारलं आहे, सुधारणेस वाव आहे पण पुर्वी वाचलेल्या लेखनापेक्षा खूपच बरं.

बाकी माबोवर महाभारताच पेव फुटलं आहे. कंटाळा आला या लेखांचा, म्हणून लेखाबद्दल नो प्रतिक्रिया. कारण सत्य कटू असतं आणि कधी कधी न बोलून शांती टिकवून ठेवावी Proud

@नौटंकी
धन्यवाद ,आडात होत फक्त पोहऱ्यात येत नव्हतं इतकच ते ही माझ्याच निष्काळजीपणा मुळे

स्वामिनी, शुद्धलेखनाबरोबरच तुमचे व्याकरण जबरदस्त कच्चे आहे. इथे अनेक दिग्गज आयडी आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात जर तुम्ही 'डिफेन्सिव्ह अप्रोच' सोडला तर.... मी फक्त माझ्या लेखनावर बिल फाडताय म्हणून एक व्याकरणाचा धडा फुकट देते आहे:

@सीमंतिनी
माफ करा एक चूक दुरुस्त करते, भीष्मांनी आंबा ,आंबालिक व आंबिका यांना हरण केले पण आंबालिक व आंबिकाचा विवाह विचित्रविर्यशी झाला
आंबचा नाही

Submitted by Swamini Chougule on 13 December, 2019 - 20:54

>> इथे "यांचे" हरण केले असे हवे. "यांना" वापरणे चूक आहे म्हणून बोकलत यांची पोस्ट तुम्हाला लागू आहे, मला नाही. माझ्या पोस्टीत मी कर्ता -क्रियापद (भीष्माने हरण केले) असा वाक्याचा बेसिक फॉर्म वापरला आहे. "यांना/यांच्या" भानगडीत पडलेही नाही. त्यामुळे ज्यांना व्याकरणाची जाण आहे ते वाचक तिथे आधीच्या वाक्याशी जोड करताना "यांचे" गृहित धरून योग्य अर्थ करणार. दुसर्‍याच्या नसलेल्या चूका दाखवण्याचा आग्रह सोडलात तर नक्की चांगल्या लेखिका व्हाल.

(बाकी, दोष तुमचा नाही. शाळेला फीचे पैसे परत मागा. इतकं कच्च राहिलं व्याकरण तर शिकवलं काय त्यांनी ?)

@सीमंतिनी
तुम्ही खुप विद्वान आहात मराठी भाषा कर्ता, कर्म क्रियापद सगळं काही येत तुम्हाला मान्य झाले का समाधान !बर माझ्या लेखावर बिल फारडण्यासाठी पहिल्यांदा मी अंबिका आणि अंबालिकाचा अजून माझ्या लेखात उल्लेखच केला नाही अजून ; तुम्ही इतकं भडकायची तुम्हाला काहीच गरज नव्हती आणि बोलकतच म्हणाल तर ते माझ्यासाठी एक्झिस्ट करत नाहीत
तुमच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी परत एकदा धन्यवाद
--/\-- ( शाळेची फिच म्हणाल तर मी पाहून घेईन )

@सीमंतिनी
तुम्ही खुप विद्वान आहात मराठी भाषा कर्ता, कर्म क्रियापद सगळं काही येत तुम्हाला मान्य झाले का समाधान ! बर माझ्या लेखावर बिल फारडण्यासाठी पहिल्यांदा मी अंबिका आणि अंबालिकाचा अजून माझ्या लेखात उल्लेखच केला नाही ; तुम्ही इतकं भडकायची तुम्हाला काहीच गरज नव्हती आणि बोलकतच म्हणाल तर ते माझ्यासाठी एक्झिस्ट करत नाहीत
तुमच्या अमूल्य मार्गदर्शनासाठी परत एकदा धन्यवाद
--/\-- ( शाळेची फिच म्हणाल तर मी पाहून घेईन )

@blackcat
युधिष्ठिराने दुर्योधनाला विधवेचा पुत्र आहे म्हणून चिडवले का नाही ते मी आत्ताच नाही सांगू शकणार पण गांधारीचा धृतराष्ट्रांशी विवाह होण्या अगोदर ती एकदा विधवा झाली हे मात्र खरं ,ते कस? का?या गोष्टींचा उहापोह होणार आहे

भडकले कुठे... मी तर अजून वाट बघत आहे - वल्लभाचारी कोण होता?? का न्याहरी बनवत होता तो? कोण सांगत नाय मला इथे...

आणि बोलकत नाही हो! बोलकत कुणासाठीच एक्झिस्ट करत नाही. बोकलत असा शब्द आहे... अस्सल ग्रामीण बाजाचा शब्द आहे.

प्रतिसादांना उतरणारे देण्यात जेवढा वेळ घालवला तितक्यात मूळ लेखाचं दहादा मुद्रितशोधन झालं असतं.
अर्थात आडात असेल तर पोहऱ्यात येईल.

{मी असा निर्णया प्रत आले आहे की राजसंहिते नुकसान माझे पुत्र महर्षि व्यास हे कुरु कुलवधू आंबिका व आंबालिक यांना मातृत्व बहाल करू शकतात}
हे फोनवरून टाइप केल्यामुळे झालेलं ऑटोकरेक्ट असावं अशी आशा आहे.
वल्लभाचार्य अजून डोक्यात शिरलाच नाहीए.

वल्लभाचार्य? आता हे कोण होते म्हणे? Uhoh

अज्ञातवासात असताना आचारी बनलेल्या भिमाचं नाव वल्लभ होतं ना?

ते व्यास येणार होते ना थोड्या टायमानंतर? त्यांच्याच न्याहारीची तयारी चालली असेल. व्यासांबरोबर शिष्यपरीवार वगैरे भरपूर गोतावळा असणार. कांदे कापणं, पोहे निवडणं इ. कामे करत असतील वल्लभाचारी Proud

हाब,
गांधारीच्या नजरेतून महाभारताचं लेखन चालूये..गांधारी अफगानिस्तान/पाकिस्तान या प्रदेशातली ना.. उर्दू शब्द चालतील की! Wink

ओह्ह्ह.... बल्लवाचार्य म्हणजे तर भीमाचे नाव. तर व्यास आजोबांसाठी न जन्मलेला भीम पोहे करत होता! बेश्ट...

(बल्लव म्हणजेच आचारी. बल्लवाचारी म्हणायचं म्हणजे "मुलींच्या कन्याशाळेला गोल राऊंड मारून आलो" प्रकार झाला!! Happy जाऊ द्या, पण निदान काहीतरी टोटल लागली.)

Pages