नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< अनधिकृत पने राज्यात,देशात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी आणि बेकायदा झोपड्या,इमारती बांधणाऱ्या लोकांसाठी राजस्थान च्या वाळवंटात हजारो तुरुंग उभे करा , >>

------ राजस्थानातच का ? उद्या राजस्थानमधे असणारा "राजेश" आय डी म्हणेल हे परप्रांतिय राजस्थान मधे कशाला?

रोजगारीच्या समस्या सुटल्या का ? ४५ वर्षातला बेरोजगारीचा उच्चांक/ रेकॉर्ड मोदी यांच्या नावावर जमा झाला आहे.

ना खाउंगी ना खाने दूंगी असे कांद्याच्या बाबत अर्थमंत्र्यांचे धोरण दिसते आहे.

सरकारी कंपन्या मोडीत काढत आहेत.... नोकरीचा पता नाही, विकास-विश्वास गायब झाले आहेत आणि यांना पडली आहे कॅबची. मस्त पैकी भुलवले आहे.

उदय
धर्म,जात,प्रांत,राजकीय ,पक्षीय,स्वहित
ह्या झूली फेकून देवून खरे मत व्यक्त करायचे झाले तर.
भारतात योग्य वेळी योग्य समस्या सोडवल्या गेल्या नाहीत.
त्यामुळे असंख्य समस्या देशासमोर उभ्या आहेत.
आणि सर्व एकमेकाशी संबंधित आहेत अवलंबून आहेत त्या मुळे ही महत्त्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असे काही नाही.
मला जसे समजत आहे त्या नुसार देशात बेकारी ही समस्या खूप दिवसापासून आहे ती काही नवीन नाही.
अर्थ व्यवस्थेतील चढ उतार खूप वेळा येवून गेले आहेत अगदी सोने सुद्धा गहाण ठेवावे लागले आहे..
जागतिक स्पर्धा तीव्र आहे .
योजना बाह्य खर्च करण्याची सर्व सरकारांची वाईट खोड काही जात नाही.
फुकट देणे,माफ करणे,बाजार भाव पेक्षा कमी किमतीत देतो असे आश्वासन देणे आणि त्या नावा खाली सरकारी योजना बनवून सरकारी पैसा लुटणे ही जुनी परंपरा आहे ती खंडित झालेली नाही ह्या मध्ये ज्यांच्या साठी हे सर्व केले जाते ते आहे तिथेच आहेत.
सामाजिक समतोल राखणे हे आव्हान अजुन आहे त्याच स्थितीत आहे फक्त घटक थोडे बदले असतील

आनंदाची बातमी. काश्मीरपाठोपाठ मोदीशहांचा ईशान्येच्या राज्यांत नरसंहार यज्ञ सुरू.
भाजपसमर्थकांना आता नवनव्या चवीचं रक्तमांस उपलब्ध होत राहणार.
Enjoy the taste of blood on your lips and flesh in your teeth , folk!

आनंदाची बातमी. काश्मीरपाठोपाठ मोदीशहांचा ईशान्येच्या राज्यांत नरसंहार यज्ञ सुरू.
भाजपसमर्थकांना आता नवनव्या चवीचं रक्तमांस उपलब्ध होत राहणार.
Enjoy the taste of blood on your lips and flesh in your teeth , folk!

नवीन Submitted by भरत. on 13 December, 2019 - 08:51

???? ही काय भाषा आहे?????

समजा एखादा पाकिस्तानी मुसलमान भारतात आला आणि म्हणाला मी हिंदू आहे तर कळणार कसे तो हिंदू आहे? या मार्गाने बरेच अतिरेकी घुसू शकतात. याची काही परीक्षा असणार का?

हे बहुधा भारतात आधीच असलेल्या बेकायदेशीर बिगर मुसलमानांना अधिकृत करून त्यांची वोट बँक मिळवण्यासाठी असावे.

यात जर काँग्रेस ने बदल करून मुसलमान शब्द अधिक लावला तर बहुसंख्य अनधिकृत मुसलमान त्यांच्या वोट बँकेत वाढतील. ममता वगैरे सारखे आक्रस्ताळे लोक हे करू शकतात.

भरत
तुमची भाषा अत्यंत नीच पातळीवरची आहे.
आणि दुसरे आसाम किंवा त्या बाजूच्या राज्यात जो हिंसाचार चालू आहे त्याचे मूळ कारण देशांतर्गत होणारे अंधाधुंद स्थलांतर कारणीभूत आहे .
आणि आता पर्यंत सर्व सत्ताधारी पक्षांनी घटनेच्या ठराविक कलमाचा च हवाला देवून त्या कडे दुर्लक्ष केल्या मूळे समस्या गंभीर झाली आहे.
कॅब हे फक्त निमित्त आहे कारण नाही हे सत्य तुम्हाला नक्कीच माहीत आहे

कॅब हे फक्त निमित्त आहे कारण नाही हे सत्य तुम्हाला नक्कीच माहीत आहे
>>>>>

हेच कारण मी कालपासून विचारतोय कोणी सांगत नाहीये. कोणाच्याच सोयीचे नाहीये का सांगणे?

मग इथे परप्रांतीयची व्याख्या मुंबई बाहेरचे लोक का? असेल तरी तशी वाटत नाही कृतीतून.
नाशकातही हीच समस्या आहे का?
>>>>>>

कोणाच्या कृतीवरून?
मी माझे मत सांगितले. तुम्ही दुसरयांची कृती त्याच्याशी जोडून मला पिंजरयात उभे करू नका Happy

भरत
तुमची भाषा अत्यंत नीच पातळीवरची आहे.>>>

त्यांना स्पेशल परमिशन्स आहेत मायबोलीवर!

जर ओपन बॉर्डर्स करुन पाक-बांगला-अफगाणिस्तान मधील मुस्लिमांना भारतात स्थलांतर करुन लगेच नागरिकत्व देण्याची स्कीम काढली (म्हणजे मोदी सरकारने जे बिल आणलंय त्याच्या बरोबर उलट) तर त्यात काँग्रेसचंही नुकसानच आहे.
कारण मुस्लिम समुदायाची संख्या भारतातवाढून एक ठराविक पर्सेंटेज झाली की त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसची, नेहरु-गांधी परिवाराची, सिंदिया-पृथ्विराज चव्हाण- चिदंबरम- थरुर अशा नेत्यांची गरज वाटेल का हा प्रश्नच आहे. किंवा त्यांचा स्वतःचा वेगळा पक्ष बनू शकेल (उदा-मुस्लिम लीग २.०) ? मग भाजप-काँग्रेस दोन्ही दुकानं बंद!

म्हणूनच मला वाटतं काँग्रेसने कॅब ला फार जोरात विरोध न करता पास होऊ दिलं.

@ मानवमामा,
आणि या केसमध्ये परप्रांतीयाची व्याख्या मुंबईबाहेरचे अशी कशी असेल? कोकणातले चाकरमानी लोकं मुंबईतच येतात आणि येणार. बाहेरच्या राज्यातील लोकांनी जवळची विकसित शहरे बघावीत. अर्थात मुंबईतल्या एखाद्या कंपनीत जॉब लागला तर थेट पाकिस्तानहून कोणी मुस्लिम युवक कामाला आला तर काही प्रॉब्लेम नाही. पण नुसते गाठोडे घेऊन यायचे आणि रस्ता फूटपाथ र्र्ल्वेलाईन मिळेल तिथे जम बसवायचा हे परप्रांतीय घुसखोरच झाले. वर कोकणाचा उल्लेख केलाय. त्यांनी असे केले तरी घुसखोर म्हणूया पण तुम्हाला तसे करताना ते दिसणार नाहीत.

मॉरल - जे जे नागरी सोयीसुविधांवर अतिरीक्त ताण द्यायला घुसलेत ते घुसखोर.

कोणाच्या कृतीवरून?
मी माझे मत सांगितले. तुम्ही दुसरयांची कृती त्याच्याशी जोडून मला पिंजरयात उभे करू नका
>>>
तू कुठला प्रतिसाद कोट करून तसं म्हटलं आहेस ते बघ. त्याचाही तुला अर्थ माहीत नसेल तर राहू दे. अज्ञानातही सुख असते.

'हेच कारण मी कालपासून विचारतोय कोणी सांगत नाहीये. कोणाच्याच सोयीचे नाहीये का सांगणे?'' >>>>>>>>>>
ऋन्मेऽऽष, हे फक्त आसाम मध्येच किंवा पूर्वोत्तर राज्यांमध्येच का होत आहे याचा विचार केला तर उत्तर मिळून जाईल. देशात सर्वात जास्त घुसखोर कोठून येतात व कोठे स्थायिक होतात? ह्या बिल मध्ये कोणत्या धर्माच्या लोकांना स्थान नाहीये, बिगर मुस्लिम लोकांना नागरिक हक्क दिला तर येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? त्यामुळे कोणाचे हितसंबंध बिघडू शकतात? या प्रश्नान्ची उत्तरे मिळाली की जाळपोळ करणारे कोण आणि त्यांना कोणाचा पाठिंबा आहे हे लगेच लक्षात येते. बाकी माध्यमात कारणे काहीही देवोत.

धर्म आधारित जे विभाजन झाले त्या गोष्टीला
बॅरिस्टर जिना कारणीभूत होते किंवा सावरकर किंवा गांधीजी असे वेगवेगळे विचार आहेत.
पण हे तिन्ही नेते ऐरे गैरे नव्हते तर अत्यंत हुशार आणि विद्वान मंडळी होती.
हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतील पण त्यांना राजकीय पक्ष एकत्र राहून देणार नाहीत दोन्ही बाजूचे हे त्यांना पक्के ठावूक होते .
रोज उठून हिंसाचार,भयभीत करणारे वातावरण निर्माण होवू नये म्हणून विभाजन हाच मार्ग योग्य असाच त्यांनी विचार करून अमलात आणला .
तरी प्रश्न मेला असे वाटत होते पण त्याचे भूत अजुन अस्तित्वात आहे

काल अमित शहा म्हणाले की मुस्लीम निर्वासितांनी नागरिकत्व मागितले तर त्यांना पण देता येईल. हे बिल त्याला विरोध करत नाही. म्हणूनच बिल खोडसाळ आहे असे चौथ्यांदा म्हणतो. बाकी चालू द्या तुमचे.

आनंदाची बातमी. काश्मीरपाठोपाठ मोदीशहांचा ईशान्येच्या राज्यांत नरसंहार यज्ञ सुरू.
भाजपसमर्थकांना आता नवनव्या चवीचं रक्तमांस उपलब्ध होत राहणार.
Enjoy the taste of blood on your lips and flesh in your teeth , folk!>>>>> भरत, तुम्ही सुशिक्षीत आहात असे वाटले होते. पण तुमच्या या प्रतीसादाने तो गैरसमज दूर झाला.

79446306_3183863928297694_3839882401085915136_o.jpg

शिवसैनिक हा मेसेज फिरवत आहेत
परकीय नागरीक घरात घेण्यापेक्षा अनाथ केलेली आपलीच बायको सन्मानाने घरात घ्या

फाळणी किंवा बंगला देश युद्ध वेळी जे आले त्यात सर्व असतील.
ढाका हे त्या वेळचे चांगले शहर होते.
त्या मुळे फाळणी(पाकिस्तानची) मध्ये सर्व भाषिक हिंदू भारतात विस्थापित झाले त्या बांगला बोलणारे जास्त असण्याची शक्यता आहे ..
मुस्लिम पण विस्थापित झाले जसे चिडकू म्हणतात तसे त्या मुस्लिम लोकांनी आपली identy लपवून हिंदू नाव धारण केली .
पण ज्यांनी विस्थापित म्हणून नोंदणी केली तेव्हा त्या वेळच्या सरकारने पूर्ण देशात विविध ठिकाणी त्यांना वसवले एकच राज्यावर बोजा टाकला नाही .
आंध्र,महाराष्ट्र मध्ये सिंधी अस सर्वच राज्यात वसवले.
आसाम मध्ये जे विस्थापित एकवटले आहेत ते अनधिकृत घुसखोर आहेत विस्थापित नाहीत. त्या लोकांची नोंद नाही

आनंदाची बातमी. काश्मीरपाठोपाठ मोदीशहांचा ईशान्येच्या राज्यांत नरसंहार यज्ञ सुरू.
भाजपसमर्थकांना आता नवनव्या चवीचं रक्तमांस उपलब्ध होत राहणार.
Enjoy the taste of blood on your lips and flesh in your teeth , folk!>>>>> भरत, तुम्ही सुशिक्षीत आहात असे वाटले होते. पण तुमच्या या प्रतीसादाने तो गैरसमज दूर झाला.

Submitted by रश्मी.. on 13 December, 2019 - 09:51

२०१२ मध्ये आसाममध्ये बोडो आणि बांगला मुस्लिम यांत दंगल, violence झाला होता. त्यावेळी असाम राज्यात व केंद्रात दोन्हीकडेही भरत. यांच्या लाडक्या काँग्रेसचं राज्य होतं. अधिकृत मृतांचा आकडा ७७. पोलिस फायरिंगमध्ये किमान ४ डेथ. त्यावेळी भरत यांनी कसं एन्जॉय केलं हे आज न्यूजमध्ये 'असाम' शब्द ऐकून त्यांना आठवलं व त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला असावा.

गुजराँवाला के हिंदुओं की चिंता कीजिये लेकिन गुजरात में UP बिहार पूर्वांचल के लोग मार मार के भगाये जा रहे थे तो आपके मुँह से आवाज़ क्यों नही निकली @amitshah जी? असम में फँसे पूर्वांचलियो की नागरिकता का क्या होगा,अपनी सनक से देश चलाना चाहती है भाजपा।
https://www.facebook.com/SanjaySinghAAP/videos/1283777305157725/

करुन पाक-बांगला-अफगाणिस्तान मधील मुस्लिमांना भारतात स्थलांतर करुन लगेच नागरिकत्व देण्याची स्कीम काढली (म्हणजे मोदी सरकारने जे बिल आणलंय त्याच्या बरोबर उलट) तर त्यात काँग्रेसचंही नुकसानच आहे.

हे मात्र २०० percent खरे आहे.
मुस्लिम पक्षाला च मुस्लिम मत देतील
मग काँग्रेस,समाजवादी,कम्युनिस्ट ह्यांची मोठी गोची होईल .न घर के
ना घाट के अशी अवस्था होईल.

३७० असेच एका रात्रीत काढले. लोकांनी आनंदोत्सव साजरे केले. आज काश्मीरमधे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. ज्यांनी आनंदोत्सव साजरे केले ते लोक आज ह्यावर एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत. निव्वळ काहीतरी सन्सनाटी मनोरंजन होते एक दिवस पुण्या मुंबैइतल्या जनतेचे. ज्यांना दुष्परिणाम भोगायला लागतात त्यांचे तर नेटच बंद आहे.

राजेश या आयडीची कोण फसगत करतंय समज्त नाही. अफगाणिस्तान हा भारतातच आहे.

Pages