हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

न्यायदान नीट होत असतं तर लोकांनी एन्काऊंटर किलिंगचं समर्थन केलं असतं का ? भरपूर पुरावे मिळून गुन्हा सिद्ध झाला तरी न्याय मिळतो आहे का ? 18 वर्षांखालच्या रेपिस्टला मोकळा सोडला तो न्याय झाला का ? का राहावा न्यायदानाच्या प्रोसेसवर विश्वास ? शिक्षा झाली तरी 10 - 10 वर्षं ती अंमलात आणायची शक्ती ज्या न्याययंत्रणेत नाही त्या यंत्रणेचा मान राखण्यासाठी उघड पुरावे असतानाही गुन्हेगारांना डोळ्यादेखत न्यायापासून वाचताना बघायचं ?

न्याय होणं , त्या मुलीच्या कुटुंबाला क्लोजर मिळणं , इतर भविष्यातील गुन्हेगारांना एक वचक बसणं की जेणेकरून ते कृतीपूर्वी 10 वेळा विचार करतील , हे काहीच महत्वाचं नाही आणि फक्त कायदेशीर प्रोसेस झाली पाहिजे या अट्टहासाला काय अर्थ आहे ?

सिग्नल तोडणे आणि बलात्कार ( आणि खून ) या दोन्ही सारख्याच गांभीर्याच्या गोष्टी आहेत का ? भविष्यात ज्यांच्याहातून बलात्कार घडू शकण्याचे चान्सेस आहेत अशांच्या मनात न्याय व्यवस्थेविषयी दहशत नाही , तेव्हा पोलिसांविषयी तरी दहशत निर्माण झाली तर ते समाजाच्या हिताचंच आहे , समाजविघातक नाही .

kathuaa प्रकरणात आरोपींच्या बाजूने मोर्चे काढण्याचे समर्थन करणारे आज इथे पोलिसांची पाठ थोपटत आहेत, उद्या त्या सेंगरचे असेच encounter झाले तर पुन्हा निषेधाचे मोर्चे काढतील.

राधानिशा,
भरभक्कम पुरावे खरेच गोळा केलेले असतात का? की जबरदस्तीने छळ करुन मिळवलेले स्टेटमेंट कोरटात अपुरे पडते? मुळात न्याय सर्वांसाठी समान आहे का? उद्या एखाद्या पोलिटिकल कनेक्शन असलेल्या व्यक्तीने , किंवा पैसे देवून प्रकरण मिटवून टाकता येण्याची कुवत असलेल्या व्यक्तीने आपल्यावरअत्याचार केला तर आपल्याला काय प्रकारचे सहाय्य मिळेल असा प्रश्न प्रत्येकानेच स्वतःला विचारावा. मॉबने कायदा हातात घेणे जसा न्याय नाही तसेच एन्काउंटर हा न्याय नाही. असे एन्काउंटर झाल्यावर ती एक न टाळता येणारी घटना होती हे चौकशी करुन सिद्ध करणे, असे पुन्हा होवू नये म्हणून योग्य ती काळजी घेणे, त्यानुसार वर्क ऑर्डर्स , प्रोसिजर कोड वगैरे अपेक्षित असते. एन्काउंटर हा अपवाद! नाईलाज म्हणून घडलेली घटना! हा काही हिंदी सिनेमा नाही.

भरत,
हे प्रकरण देशभरात पडसाद उमटल्याने आपल्याला माहित झाले पण KCR नेहमीच असे unchallenged शासन करीत आले आहेत.
हे चांगले की वाईट सांगता येत नाही, पण ह्यात नवीन काही नाही. He rules with an iron hand.

कालच बातमी वाचली. नक्षलवादी म्हणून ठार केलेले गावकरी निघाले. त्याबद्दल पोलिसांनी मेडल्स घेतले होते. उच्चस्तरीय चौकशीत प्रकरण बाहेर आले.
चडवा जुलूम तर कुप्रसिद्धच आहे एण्काउंटर्स साठी. मध्यंतरी नागपूरच्या जवळ जे एण्काऊंटर झाले ते लग्नाचे व-हाड होते अशा बातम्या अधूनमधून येत आहेत. आता बहुधा सरकार बदलल्याने चौकशी होईल.

पोलीस अधिका-याकडे न्यायबुद्धी असते हे मान्य असते तर जगभरात न्यायालये मोडीत काढावी लागली असती. हिरो बनण्यासाठी देखील हे योग्य नाही.

अशाने न्याय मिळण्याची व्यवस्था मजबूत होण्यासाठी जो रेटा येणार होता तो आता येणार नाही. पब्लीकला आवडते म्हणून काहीही करायचे फॅड आले तर पोलीस तालिबान होतील आणि भारताचा सिरीया होईल.

उत्तर प्रदेशातल्या फक्त उन्नावमधे गेल्ञा ११ महीन्यात ८६ बलात्कार झाले आहेत. केसेस मागे घ्या म्हणून दबाव येतो, नाही ऐकले की सरळ जीव घेण्याची पद्धत आहे. त्यांच्या बाबतीत हा न्याय व्हावा का असे म्हटल्याने अनेकांना राग का येतो ? त्यांच्या बाबतही असा न्याय नकोच आहे. पण सिलेक्टिव्हली व्यक्त होणारे त्यामुळे उघडे होत आहेत. असिफाच्या वेळी गुन्हेगारांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले तेव्हांही कुणाला वावगे वाटले नव्हते. अखलाखला केवळ गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून मारल्याने अनेकांना समाधान वाटले होते. त्या केसची चौकशी योग्य पद्धतीने करणा-या पोलीस अधिका-याला झुंडीने ठार मारले. त्याबाबत पोळिस खाते मौन आहे आणि आज सेलिब्रेशन मोड मधे असणारे देखील.

या अशा रा़क्षसी वृत्तीच्या पब्लीकच्या समाधानासाठी यंत्रणा कामाला लागल्या तर कसे व्हायचे ?

पोलिसांचं म्हणणं - मृत महिलेचा मोबाईल तिथे लपवला होता, तो आणि अन्य पुरावे शोधायला आरोपींना तिथे नेले होते.
दहा पोलीस चार आरोपी.
आरोपींना बेड्या घातल्या नव्हत्या. आरोपींनी काठ्या, दगड यांनी पोलिसांवर हल्ला केला. आमच्या बंदुका / पिस्तुले हिसकावली आणि पळण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडल्या . त्यात चारही आरोपी मरण पावले.

हे तपशील पटणारे आहेत?

पुरावे न्यायालयाकडून तपासले जाणे गरजेचे आहे, तेव्हाच त्यांची किंमत ठरते.

१८ वर्षांखालच्या आरोपींबाबत कायद्यात बदल झाला आहे.

त्यांनी बलात्कार केला होता कि नाही हा प्रश्न बाजूला ठेवूयात.
दक्षिणेत नायकाने व्यवस्था धाब्यावर बसवत मोठमोठी भाषणे देत कायदा हातात घेण्याचे अनेक सिनेमे सुपर डुप्पर हिट होत आहेत. हे सर्वच्या सर्व एका विशिष्ट संघटनेच्या अजेण्ड्याबरहुकूम असतात. आपण जी राज्यघटना स्विकारलेली आहे तीच कुठेतरी या सर्वांना जबाबदार आहे हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा सडकछाप सिनेमांचा पब्लीकवर चांगलाच परिणाम होतो.

आश्चर्य वाटतं ते पत्रकारांचं. समाजाला दिशा देण्याऐवजी दोन गट पाडून प्रतिक्रिया विचारण्यात ते गुंग आहेत. अनेक देशात कडक कायदे नसतानाही चटकन न्याय मिळतो , कायद्याचा कीस पाडला जात नाही, ठराविक लोकांच्या बाबतीत अगदी सर्वोच्च न्यायालयाची घटनापीठं आणि काहींना न्यायालयात देखील नेलं जात नाही. कच्च्या कैदेतच त्यांचा मृत्यू होतो.

यावर चर्चा व्हायला हवी होती.
इन्स्टंट न्याय हवा असेल तर पोलिसांनाच का अधिकार ?
आम्हीही घेऊ कायदा हातात. देताय का परवानगी ?
पहिल्यांदा संस्कृतीरक्षकांना फटके देऊयात. गोराक्षसांना रस्त्यात तुडवूयात.

प्रकरण चिघळलं असतं, मॉब हिंसक झाला असता, ही कारणे देखील असतील एन्काउंटरची. पोलिसांना दोष देता येणार नाही. आपण आरोपींवरती विश्वास ठेवत आहोत की - कशावरुन त्यांनीच बलात्कार केला? सिद्ध कुठे झाले होते? पण पोलिस म्हणत आहेत की मोबाइल शोधायला घेउन गेलो, तर का विश्वास ठेवत नाही आहोत?
__
मला पोलिसांच्या कृतीचे समर्थन करायचे नाही पण असे एन्काउंटर्स झाले तर फार वाईट वाटायला नको. जसे बलात्कार होतात, येस तसेच एन्काउंटरही होतात. आता असे म्हणाल की कोणी खोटा आरोप करुन, निर्दोष व्यक्तीला गोत्यात आणेल, मग त्याचेही एन्काउंटर झाले तर? पण जरा सारासार विचार केला तर कळेल की ही एक भयंकर एक्स्ट्रीम केस होती. अशा वेळी जे झाले ते ठिकच झाले.
_______
न्याययंत्रणा सुधारायला हवीच. नो डाउट.

>>मला पोलिसांच्या कृतीचे समर्थन करायचे नाही पण असे एन्काउंटर्स झाले तर फार वाईट वाटायला नको. जसे बलात्कार होतात, येस तसेच एन्काउंटरही होतात. आता असे म्हणाल की कोणी खोटा आरोप करुन, निर्दोष व्यक्तीला गोत्यात आणेल, मग त्याचेही एन्काउंटर झाले तर? पण जरा सारासार विचार केला तर कळेल की ही एक भयंकर एक्स्ट्रीम केस होती. अशा वेळी जे झाले ते ठिकच झाले.>>
सिरीयसली?

होय सिरीअसली. हे गुन्हेगार तंगड्या पसरुन तुरुंगात टॅक्स्पेयर्स च्या पैशांनी खात बसले असते. निदान असे एन्काउंटर्स होतात या धाकाने तरी बलात्कारांचे प्रमाण कमी होइल.
कुठवर बोटचेपेपणे, न्यायव्यवस्थेला दोष देत बसायचं? आशावादी मेणबत्ती मोर्चे काढआ, हसं करुन घेत बसायचं?
जर एकच बाजू घ्यायचची असेल तर मी पोलिसांची घेइन. बाकी अनंत काळ चिरफाड करत बसा की हे अयोग्य की ते अयोग्य.

https://twitter.com/Uppolice/status/1202839758772133888

UP POLICE
@Uppolice
The figures speak for themselves. Jungle Raj is a thing of the past. No longer now.

103 criminals killed and 1859 injured in 5178 police engagements in the last more than 2 years.
17745 criminals surrendered or cancelled their own bails to go to jail.

Hardly state guests.

हे उत्तर प्रदेश पोलिस च्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन आलेलं ट्वीट आहे. इथेच बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. दुसर्‍या बलात्कार पीडितेच्या वडिलांचा खून आणि तिच्या खुनाचा प्रयत्न झालाय. एका नर्तकी ने नाच थांबवला म्हणून तिच्या तोंडावर गोळी झाडली गेली.

याच उत्तर प्रदेशात एका पो लीस अधिकार्‍याची जमावाकडून हत्या झाली.

सामो, हे तेच पोलीस आहेत ज्यांनी प्रियांकाच्या कुटुंबीयांना विचारलं, कशावरून तुमची मुलगी पळून गेली नाही. केस नोंदवून घ्यायला टाळाटाळ केली. तपासात दिरंगाई केली.

>>>> सामो, हे तेच पोलीस आहेत ज्यांनी प्रियांकाच्या कुटुंबीयांना विचारलं, कशावरून तुमची मुलगी पळून गेली नाही. केस नोंदवून घ्यायला टाळाटाळ केली. तपासात दिरंगाई केली.>>> फक्त विचारलं ना? संशय घेणं हे काम आहे पोलिसांचं त्याशिवाय खरा गुन्हेगार सापडणार कसा?

एक कोणतीतरी बाजू घावीच लागते. दोन डगरिंवर पाय ठेवता येत नाही. माझा हाच स्टँड राहील झाला तो न्याय झाला. कितीही सिव्हिलाइझ्ड आपण आहोत व म्हणून योग्य त्या रीतीने न्यायनिवाडा झाला पाहीजे वगैरे असले तरी .......... हे गुन्हेगार गुन्हा करताना सिव्हिलाइझ्ड नव्हते. त्या मुलीच्या आईवडीलांच्या मनस्थितीची तर कल्पनाचह करवत नाही.

भारतीय जनता पक्षाचे तर अनेक नेते लैंगिक अत्याचार प्रकरणात बरबटलेले आहेत. इतरही पक्षात ही घाण आहे. यांना निवडून देणा-या प्रत्येकाला गोळ्या घालायच्या का ? कारण हे लोक पोलिसांना आदेश देत असतात. कायदे करत असतात. सेनगरला निवडून देणारे जर हैद्राबाद प्रकरणात न्याय झाला असे म्हणत असतील तर ....... शब्दच संपले इथे.

https://indianexpress.com/article/entertainment/regional/visaranai-oscar...
एम चंद्रकुमार . अजून विशीतही न आलेला. घरच्यांशी भांडण झालं म्हणून पळून गेलेला. आंध्र पोलिसांनी त्याला एका हॉटेलातून चोरीच्या संशयावरून उचललं. आणखी तीन जणांनाही. कोठडीत दोन आठवडे छळ केला. दोघांनी आरोप मान्य केले.

त्यानंतर वीसेक वर्षांनी त्याने त्या अनुभवावर पुस्तक लिहिलं लॉक अप.
त्या पुस्तकावर तमिळ चित्रपट बनला. Visaranai,. याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ऑस्करसाठी तो भारताची प्रवेशिका होता.

https://www.youtube.com/watch?v=4mnzK2KIz9U

. हे गुन्हेगार गुन्हा करताना सिव्हिलाइझ्ड नव्हते. >> सामो, सिव्हिलाईज्ड गुन्हा या कल्पनेचा जरा विस्तार कराल का? कसा बलात्कार केला की तो सिव्हिलाईज्ड वाटेल?
तिथे अमेरिकेत तुमच्यावर तुमच्या रंगावरून संशय घेऊन पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात तुमचे जवळचे लोक गेले तर चालेल का? इथेही केवळ संशयित आरोपींची हत्या झाली आहे. या कामकरी वर्गातील आरोपींच्या जागी जर बॉलिवूड मधले कलाकार किंवा राजकारणी लोक आरोपी असते तर पोलीसांनी असाच गोळीबार करून त्यांना ठार मारले असते का?

मायावतींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी शिकावं असं कौतुक केलेलं आहे. इथे लोक तेच म्हणत आहेत.

मायावतीं ना उतर देतानाच उ प्र पोलिसांनी ट्वीट केलंय आणि आकडेवारी दिलीय.

sengar.jpg
पण मायावती या वरच्या ट्वीटमधल्या बर्थ डे बॉयबद्दल बोलत असतील तर?

>>>>>या कामकरी वर्गातील आरोपींच्या जागी जर बॉलिवूड मधले कलाकार किंवा राजकारणी लोक आरोपी असते तर पोलीसांनी असाच गोळीबार करून त्यांना ठार मारले असते का?>>>>> व्हिझिबिलिटी असलेल्या लोकांना मारुन, पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर धोंडा नक्कीच नसता मारुन घेतला.
>>>>>>तिथे अमेरिकेत तुमच्यावर तुमच्या रंगावरून संशय घेऊन पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात तुमचे जवळचे लोक गेले तर चालेल का?>>> तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुर्दैवी कृत्याचा सामना करावा लागला, तरी तुम्ही न्याय मागत वणवण कराल का?
>>सिव्हिलाईज्ड गुन्हा> गुन्ह्याला नाही गुन्हेगार त्या क्षणी नराधम होते, लिंगपिसाट होते , ते सिव्हिलाइझ्ड नव्हते असे म्हणते आहे मी.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक असलेल्या अबू आझमीची रेपबद्दलची मतं-

“Under Islam, rape is punishable... any woman if, whether married or unmarried, goes along with a man, with or without her consent, should be hanged. Both should be hanged. It shouldn't be allowed even if a woman goes by consent."
"Women are precious like gold. If you expose them, they'll be looted. Women should not move around like men late night. They are weak, so they should think before they venture out."
"When villagers come to big cities they see women with lesser clothes and make-up... that's why such incidents happen in the country."
"If you keep petrol and fire together then it will burn. There should be a law to ensure that there should be no 'nangapan' (nudity). Those who wear less clothes should also be banned."
"Rape is punishable by hanging in Islam. But here, nothing happens to women, only to men. Even the woman is guilty.”

सो आता निदान महाराष्ट्रात सत्ताबदलानंतर म.वि.आघाडीच्या समर्थकांना चिंता करायची गरज नाही. इथे रेपिस्टच्या अंगाला बोट लावायचीही पोलिसांची हिंमत होणार नाही, एन्काउंटर तर दूरची गोष्ट. अबू आझमी की सरकार है, फिर क्या टेन्शन? प्रचार करत राहा नवीन सरकारचा!

तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुर्दैवी कृत्याचा सामना करावा लागला, तरी तुम्ही न्याय मागत वणवण कराल का? >>> हो, अर्थातच. न्याय मागणार का म्हणजे काय ? मागणारच ना. पण याचा अर्थ (देव न करो) तुमच्या जवळच्या व्यक्ती वर अशी वेळ आली तर स्वतः गुन्हेगार शोधून स्वतः शस्त्र हाती घ्याल किंवा हिटमॅन हायर कराल असे म्हणताय का?

Pages