हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

मंगला सामंत यांचे निर्भया प्रकरणावेळी लोकसत्तात आलेले लेख वाचनीय आहेत.
लोकस्त्ता चतुरंग ५ जाने २०१३
लैंगिकतेचे शमन की दमन?

लैंगिकतेचे शमन हवेच! लोकसत्ता चतुरंग १२ जाने २०१३

तरीच बोललो अजून धागा कसा नाही आला. काय होणार आहे आता चर्चा करून. मुळात असे धागे काढावेसे वाटतातच कसे तुम्हा लोकांना. की बरं वाटतं तुम्हाला या विषयांवर बोलायला.

नाक्यावर बसून उनाडक्या करणारे.
गल्ली बोळात दादागिरी करणारे,
सार्वजनिक ठिकाणी दारू पीवून धिंगाणा करणारे व्यसनी,
रस्त्यावर सुसाट गाड्या चालवणारे कसलेच नियम न पाळता .
अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मध्ये मध्ये उचलून 20/२५ दिवसाची तुरुंगाची हवा देत जा वरचेवर .
सर्व गुन्हे थांबतील अगदी बलात्कार सुद्धा.
भूक भागवण्यासाठी सुद्धा सभ्य न्यायप्रिय व्यक्ती बलात्कार करत नाही गुन्हेगारी वृत्तीचे लोक करतात..

लोकसत्ता किंवा काही तत्सम विचार सरणीच्या
वृत्त पत्रात पुरोगामी मंडळी आपली वस्तू स्थिती शी विपरीत मत मांडत असतात त्या मुळे त्यांचे लेख वाचायची तसदी घेत नाही .
समस्या कोणत्याही असू द्यात ही मंडळी त्याचे मूळ
भारतीय संस्कृती.
पुरुष sattak कुटुंब पद्धती.
समाजात चालत आलेले रीतिरिवाज .
ह्या मध्येच शोधतात
असे बरेच लेखकांची झुंड आहे ते जनतेचा बुध्दी भेद करण्याचा प्रयत्न करत असतात

निर्भयाच्या वेळेस भरपूर किस पाडून झाला, तिचे गुन्हेगार अजूनही जिवंत आहेत.

ह्या अशा केसेस यापुढेही होत राहणार कारण कायद्याची भीती नाही, शिक्षेची भीती नाही. ही भीती नाही कारण हेच गुन्हेगार आहेत हे स्पष्ट असले तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी कायदा व त्यातील त्रुटी माहीत असलेले कित्येक जण पुढे येतात. त्यांना द्यायला हातात पैसा हवा फक्त.

त्या मुलीबद्दल व तिच्या कुटुंबियांबद्दल खूप वाईट वाटले.

मुंबई पोलीसांनी काही अँपस विकसित केली आहेत जयावरून अशा वेळी मदत मागता येते व gps वापरून पोलीस मदत मागणार्याला त्वरित शोधू शकतात. माझ्या ऑफिसनेही स्वतःची टीम बनवलेली आहे व आम्हा सगळ्यांना फोन नंबर दिलेला आहे त्यावरून मी व माझें जवळचे कुटुंबीय 24x7 फोन करून भारतात कुठेही मदत घेऊ शकतात. ह्या मुलीच्या बाबतीत घडली तशीच घटना रात्रीच्या वेळी घणसोली स्टेशनच्या बाहेर घडण्याची शक्यता ऑफिसमधल्या एका मुलीच्या बाबतीत उद्भवली असता तिने फोन करून मदत मागितली व पाचव्या मिनिटाला मदत उपलब्ध झाली, होऊ घातलेले गुन्हेगार अटकेत गेले.

म्हणजेच पाच मिनिटात मदत मिळू शकेल अशी यंत्रणा आपण उभी करू शकतो, फक्त इच्छा हवी.

त्यामुळे नुसती श्रद्धांजली किंवा राग व्यक्त करून काहीही होणार नाही. समाज सुधारेल तेव्हा सुधारेल. तोवर आपण, पोलीस, आपल्या कंपन्या यांनीच पुढाकार घेऊन मदत केंद्रे उभी करायला हवी. दिवसेदिवस हे प्रश्न खूप वाईट होत जाणार आहेत. काही महिन्यांपूर्वी वाशीला एका पुरुषावर गर्दुल्ल्यानी गँगरेप करून त्याची अतिशय वाईट अवस्था केली ही बातमी वाचलेली आठवले.

लोकांना असे करायच्या प्रेरणा मिळणारे घटक दिवसेंदिवस वाढत आहेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे व त्यावर हवे ते बघता येते. फक्त पॉर्न बघितले कीच बलात्काराची इच्छा होते असे काहीही नाही. पॉर्नव्यतिरिक्त इतरही भरपूर माध्यमे आहेत ज्यातून भावना उद्दीपित होतील असे भरपूर काही दाखवले जाते. दाखवणाऱ्यांचा उद्देश दरवेळेस भावनाउद्दीपन करणे हाच असतो असे नाही पण बघणारा त्यातून काय उचलेल हेही दाखवणाऱ्याच्या हातात नाही.

याच्यावर बोलावंसं सुद्धा वाटत नाही.प्रत्येक वेळी अत्यंत निर्घृण गुन्हे.सोशल मीडिया वर त्या व्यक्तीचे हसरे जिवंतपणीच फोटो.प्रत्येक वेळी नव्याने हे सर्व वाचून घश्यात दाटून येणं आणि निरुपद्रवी संताप.
(बलात्कारितेचं नाव ओळख जाहीर करायची नाही हा नियम तिचा मृत्यू झाल्यावर शिथिल कसा होतो, असे करण्याचा उपयोग आणि उद्देश काय हे मला अजून कळलेलं नाही.)
'परिस्थिती कशी सुधारेल' 'फाशीच्या शिक्षा द्या' यापैकी कोणत्याही चर्चा घडवण्याचा, मोर्चे काढण्याचा उपयोग होत नाहीये असं वाटतं.गुन्हे त्याच तीव्रतेने होत आहेत.
टेक्नॉलॉजी, नेटवर्क वाढणं, धोक्यात सापडण्याच्या वेळा आणि जागा कमी होणं, सगळीकडे पुरेसा प्रकाश असणं, स्वसंरक्षणाचे काही प्रायमरी उपाय(किमान मदत येईपर्यंत कोणाला तरी रोखून धरता येईल इतके) जवळ असावे इतकंच आता सुचतंय.

ती बातमी भयंकर आहे. तिला बिचारीला एका क्षणी धोक्याची जाणीव पण झाली होती, आणि तिच्या फोन मुळे घरच्यांनाही. पण इट वॉज टू लेट. Sad काय झाले असेल त्यांचे तिचा फोन अचानक स्विच ऑफ झाल्यावर! हार्टब्रेकिंग Sad
टोल प्लाझावर कोणी कर्मचारी नसतात का? पोलिस पॅट्रोल, पब्लिक, इतर गाड्या, कोणाचीच ट्रक ड्रायव्हर्स ना भिती वाटू नये की बिनदिक्कत त्यांनी तिला अप्रोच केले? साडेनऊ म्हणजे इतकीही रात्र नव्हती, ओवरक्राउडेड शहरात मदत मिळणे इतके अवघड का आहे?
तिला तरी काय वाटून तिने तिथे गाडी पार्क केली असेल! एखादेच पुअर जजमेन्ट - कॅन हॅपन टु एनीवन! अन त्याचे असे इमिजिएट भीषण कॉन्झिक्वेन्सेस? भयानक परिस्थिती आहे.

फक्त कडक शिक्षा
हा उपाय गुन्हे रोखू शकत नाहीत उलट गुन्हा चा प्रकार बदलतो आणि गुन्ह्याची तीव्रता सुधा वाढते.
आता आपण अस बोलतो सौदी मध्ये कडक शिक्षा असल्या मूळे असे गुन्हे कमी घडतात पण बाकी कारणांचा उल्लेख आपण स्वार्थी हेतूने टाळतो .
तिथे स्त्री ला बाहेर पडायचे असेल तर पुरुष हा सोबतीला असावा लागतो.
बुरखा वापरण्याची सक्ती.
कमी कपडे वापरू शकत नाही.
रात्री अपरात्री बाहेर स्त्री एकटी बाहेर जावू शकत नाही.
दारू विकत घेण्यासाठी पर्वानी पत्र हवे.
दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी येता येत नाही.जे काही करायचे ते घरात..अशी अनेक बंधने आहेत.
सामाजिक बंधने गुन्हे रोखू शकतात कायदे नाही.
जरा विचार करा आपल्याला आपल्या बहिणी कडे बघून,आई कडे बघून ,मावशी कडे बघून सेक्स ची भावना का येत नाही ..
शेवटी ती पण स्त्री आहे.
कारण पिढ्यान् पिढ्या आपल्या मनावर आपल्या संस्कृती बिंबवल आहे ते पाप आहे .
आणि आपल्या मनावर त्याचा खोलवर परिणाम आहे ( अपवाद असतील पारा हा धातू असून द्रव स्वरूपात असतो)
आता पर्यंत असे जे विकृत गुन्हे झाले आहेत ते शहरात झाले आहेत.
जिथे समाज एकसंघ नाही .
खेडेगावात समाज एकसंघ असतो आणि सर्व एकमेकाला चांगले ओळखत असतात.त्या मुळे असली विकृत गोष्टी समाजाच्या भीती नी होत नाहीत कडक शिक्षेचे भीती नी नाही.
समाज बंधन खिळखिळी करू नका.
अमेरिकेत माथेफिरूने (विकृत लोक) गोळीबार करून कधी निष्पाप लहान मुलानं ठार मारले आहे .
कधी निष्पाप लोकांना.

अशा घटना नेहमी घडतात पण भारतात अशा घटना घडत नाहीत का ?
कारण ते पाप आहे हे आमच्या मनावर कोरले आहे.
समाज बंधने,एकजीव समाज,कोवळ्या वयात संस्कारी शिक्षण,निरोगी कोटुंबिक वातावरण अशा गोष्टीचं गुन्हा चे प्रमाण कमी करतील .
कडक शिक्षा म्हणजे काय?
फक्त पोलिस नी आपल्या घराचा पत्ता विचारला तरी काही लोकांना ती कडक शिक्षा वाटते .
आनी 10 वर्ष जेल मध्ये राहून सुधा काही लोकांना ती शिक्षा सौम्य वाटते.
प्रत्येकाच्या संस्कार वर कडक शिक्षेची व्याख्या बदलते

राजेश,
रेप प्री प्लॅन करून आलेल्या आणि मारामारीची सवय असलेल्या 5 जनांसमोर तुमची 'बाईच्या सोबतीला सुरक्षिततेसाठी पुरुष' वाली थिअरी निष्प्रभ ठरते आहे.ठाण्यात एकट्या पुरुषावर ड्रग घेतलेल्यानी जो निर्घृण अत्याचार केला तिथे 'पुरुष म्हणजे मला काही धोका नाही' ही थिअरी निष्प्रभ ठरते आहे.
'अंधार म्हणजे धोका' 'एकटी स्त्री बाहेर पडली म्हणून धोका' वगैरे व्याख्या काही प्रमाणात बरोबर असल्या तरी तो सर्व समावेशक सुपरसेट नाही.समाजातली विषमता कमी व्हायला हवी.सर्व वर्गांचा एकमेकांबद्दल चा द्वेष कमी व्हायला हवा.रेप म्हणजे 'अगदी नंतर थोडी शिक्षा झाली तरी सध्या पैसे बिना जबाबदारी मजा' हा माईंडसेट कमी व्हायला हवा.फाशीची शिक्षा वगैरे उपायांचा फायदा होईल की तोटा(स्वतःचा जीव फाशीने जाऊ नये म्हणून एकमेव साक्षीदाराचा जीव घेणे) याचा नीट विचार हवा.फाशीपेक्षा मोठी शिक्षा समाजात जगणं ठरेल असं काही व्हायला हवयं.
हे सर्व काही वर्षांचं काम नाही.बदलायला खूप वेळ लागणार आहे.तोवर स्वतः सुरक्षित राहून(स्त्री पुरुष लहान मुली लहान मुलगे सर्वांनी) परिस्थिती बदलायला आपला हातभार लावत राहणे, स्वतः अश्या परिस्थितीत न सापडणे, सापडल्यास मदत मिळेपर्यंत धोका थोपवण्याइतके स्वसंरक्षणाचे उपाय/साधनं हा प्लॅन ए आहे.

साडेनऊ म्हणजे इतकीही रात्र नव्हती, ओवरक्राउडेड शहरात मदत मिळणे इतके अवघड का आहे? >>
हे पार आऊटस्कर्टला झालंय हो. एका गावातून आऊटर रिंग रोडला एंट्री घेण्याचा टोलप्लाझा आहे तो. एकदोघे जण असतात आतमध्ये बसलेले. बाजूला सर्व्हिस रोड आहे तो पण एकदम सामसूम असतो.

मी. अनु
पैसे असले की गुन्हे दडपता येतात ( ह्या मध्ये स्त्री सोडून बाकी सर्व गुन्हे) हे सत्य असले तरी .
समजात स्त्री संबंधित गुन्हे आपल्या हातून घडले तर इज्जत जाईल (ती कशी जाईल ते स्वतः शोधा)ही भीती असते .
आता पर्यंत देशाच्या इतिहासात श्रीमंत लोकांच्या हातून असे अमानवीय गुन्हे घडले नाहीत( बिना लायकीचे राजकारणी पुत्र आणि ब्लॅक धंधा करणारे हे सोडून)

अमेरिकेत माथेफिरूने (विकृत लोक) गोळीबार करून कधी निष्पाप लहान मुलानं ठार मारले आहे कधी निष्पाप लोकांना.अशा घटना नेहमी घडतात पण भारतात अशा घटना घडत नाहीत का ?कारण ते पाप आहे हे आमच्या मनावर कोरले आहे. >> हे वाक्य काहीच्या काही आहे. ते पाप आहे हे भारतातल्या मनांवर कोरलेय आणि बायबलात काय ते पुण्य आहे असे लिहिलेय की काय, ज्यासाठी अमेरिकेत लोकांनी ते करावे. उद्या बिग बझार मधे आणि फुटपाथ वरच्या गाड्यांवर बंदुका विकायला सुरुवात झाली तर तिथेही असली शूट आउट्स सुरु होतील हे नक्की. Sad

फार भयानक आहे हे !
साधना आणि मी_अनु, सहमत!

>>एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.
>>
असे काही नाही. इथेही पुरुष ग्रुपने फिरतात. एका व्यक्तीद्वारे लैंगिक अत्याचार होतात तसेच टोळक्यानेही होतात.

>>आता पर्यंत असे जे विकृत गुन्हे झाले आहेत ते शहरात झाले आहेत.
जिथे समाज एकसंघ नाही .
खेडेगावात समाज एकसंघ असतो आणि सर्व एकमेकाला चांगले ओळखत असतात.त्या मुळे असली विकृत गोष्टी समाजाच्या भीती नी होत नाहीत कडक शिक्षेचे भीती नी नाही.
समाज बंधन खिळखिळी करू नका.
अमेरिकेत माथेफिरूने (विकृत लोक) गोळीबार करून कधी निष्पाप लहान मुलानं ठार मारले आहे .
कधी निष्पाप लोकांना.

अशा घटना नेहमी घडतात पण भारतात अशा घटना घडत नाहीत का ?
कारण ते पाप आहे हे आमच्या मनावर कोरले आहे.

>>
राजेश, खेडेगावत असे गुन्हे घडतात मात्र ते बरेचदा दाबून टाकले जातात. खेड्यात उलट लागेबांधे बघता आणि सोकॉल्ड अब्रू गेली मानसिकतेतून पिडित व्यक्तीला गप्प रहायला भाग पाडले जाते. भारतात सामान्य माणसाच्या हातात गन मिळणे हे मुश्किल त्यामुळे त्यातून होणार्‍या घटना नाहीत. त्याचा पाप-पुण्याशी काही स्बंध नाही. आणि गावठी पिस्तूल, सुरे- चाकूचा धाक दाखवणे, अ‍ॅसिड हल्ले वगैरे असते की!

बायबलात काय ते पुण्य आहे असे लिहिलेय की काय.
नक्कीच नाही
आधुनिकतेच्या नावा वर समाज बंधने सैल झाली तिकडे हे कारण आहे.
आणि अजुन आपल्या कडे त्या विचारांनी सर्व लोक प्रभावित नाहीत

>>आधुनिकतेच्या नावा वर समाज बंधने सैल झाली तिकडे हे कारण आहे.>>
आणि मग इथे ज्याला फॅमिली व्हॅल्यूज म्हणतात ते काय असते? समज बंधने सैल झाली आहेत म्हणजे काय ? मला तरी इथे समाज बंधन सैल वगैरे जाणवले नाही. चुकीच्या वर्तनाची भलावण इथेही कुणी करत नाही.

खेडेगावात बलात्कार होत नाहीत किंवा कमी होतात हे राजेश कुठल्या आधारावर म्हणत आहेत??
तुमच्या शहरातल्या पेपर मध्ये किंवा न्यूज चॅनेल वर बातम्या येत नाहीत म्हणून हे प्रकार होत नाहीत असे दडपून द्यायला वेळ लागत नाही

Rapes occur in India, not in Bharat हे सुप्रसिद्ध विधानं आठवलं.
यामागे अर्थातच western influence आहे हे कारणही जोडून आहेच.

खेडेगावात बलात्कार होत नाहीत किंवा कमी होतात हे राजेश कुठल्या आधारावर म्हणत आहेत??
मी दोन्ही समाजात राहिलो आहे.
तरुण पना पर्यंत गाव आणि नंतर मोठे शहर असा प्रवास आहे.
असले विकृत प्रकार गाव खेड्यात खूप खूप कमी प्रमाणात होतात.
इज्जत जाणे ही खूप मोठी गोष्ट असते.

राजेश,
माझाही प्रवास खेडेगाव ते अमेरीका आहे. आजोळ खेड्यात आणि वैद्यकीय व्यवसायात त्यामुळे याबाबतचा डेटा चांगलाच माहिती आहे. अब्रूतर गेली आता बोभाटा नको फक्त औषधपाणी करा अशी विनवणी करणारे दिनवाणे आईबाप बघितलेत?

आज व्हाट्सअप्पवर मला फॉरवर्डमध्ये विडिओ आला. 112 india app बद्दल माहिती देणारा. हे अँप डालो करायचे, त्वरित पोलीस मदत मिळते, पोलीस लोकेशन ट्रेस करून येतात.

मी डालो केले, रेजिस्ट्रेशन केले. Otp व्हेरिफिकेशन झाल्यावर पुढच्या स्क्रीनवर माझे लोकेशन दिसायला लागले व पोलीस,फायर, मेडिकल व अन्य ही बटन्स दिसली. मी टेस्ट करायचे म्हणून पोलीस बटन दाबले. माझ्या मोबाईलवरून कॉल गेल्याचे दिसले, पण बहुतेक मिस्ड कॉल असणार. I m safe हे अजून एक बटन दिसले. मी तेही प्रेस केले, उगीच पोलिसांना कामाला लावायला नको म्हणून.

पुढच्या 2 क्षणात मला फोन आला. मॅडम, तुम्ही 112 इंडिया हेल्प मागितली, पोलीस हेल्प हवी का? मी नको म्हणून आभार मानले. रात्री 12.14 ला फोन आला हे विशेष.

कृपया, 112 INDIA हे अँप डालो करा, इतरांना सांगा व आपल्याला शक्य तितके सुरक्षित करा.

ज्या भxxxनी हे नीच काम केले ते सगळे ट्रक ड्राइवर आणि क्लिनर (अंगमेहनत, पडीक काम करणारे ) कॅटेगरीतले होते. हे लोक सतत प्रवास करत असतात यांचे घरच्यांशी संबध फक्त पैसे पाठवण्यासाठी असतो. यामुळे यांच्यातील प्रेम भावना, मैत्री, नैतिकता, अनैतिकता असल्या बाबी मेलेल्या असतात केवळ आपली पोटाची भूक आणि शरीराची भूक हीच त्यांना माहित असते आणि ती भागवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. नॉर्मली असे लोक हिजडे किंवा वेश्या यांचा वापर आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी करतात पण त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात, म्हणून ते कमी पडले तर मग फुकटात कोणी सावज सापडेल का ते बघतात. मग अशी लोक रस्त्याच्या कडेला झोपड्यात राहणाऱ्या लहान मुली ज्या अनायसे खेळताना सापडतात, किंवा शाळा, ट्युशन, कॉलेज, किंवा कामावरून रात्री किंवा दिवसाही परतणाऱ्या मुली यांच्या सावज होतात. आता राहिला मुद्दा हा कि अशी घाणेरडी माणसे पेपर मध्ये लिहिलेले नीतिमत्तेचे धडे वाचत असतील का. आतापर्यंत जेवढ्या रेप केसेस उघडकीस आल्या आहेत मग त्या निर्भया असो, जम्मूतील ८ वर्षावरील मुलीवर झालेला बलात्कार असो, मुंबईतील रिपोर्टरवर पडीक मिल मध्ये झालेला महाराष्ट्रातील एका गावातील शाळकरी मुलीवर झालेला यामध्ये जे आरोपी होते ते सर्व अशिक्षित, अर्धशिक्षित, नशेडी लोक होती. ह्या लोकांना नेमका नीतिमत्तेचा धडा कोणी आणि कसा शिकवायचा.

साधना ,तुमचे वाचून अँप डाउनलोड केला,अगदी सेम अनुभव
Type करायचा कंटाळा आला आहे तर तुमचाच प्रतिसाद whts app ला forward केला तर चालेल का

अजनबी, मुद्दा आवडला हे बलात्कार करणारे एस्पेशियली ट्रक चालक वगैरे असतात त्यांना नवीन जगाशी काही देणे घेणे नसते. आजकाल मोबाईल-इंटरनेटवर, टीव्हीवरील ढिगभर चॅनेल्सवर झालेली चर्चा त्यातून दिले जाणारे नैतिकतेचे धडे, मूल्य वगैरे ऐकून एखाद्या अट्टल गुन्हेगाराला सुद्धा समाज क्रोधाच्या भयाने गुन्हे करायला मागेपुढे पाहायला लावतात.

पण या ट्रक चालकांची दुनिया वेगळीच असते, त्यांना सतत प्रवासात राहावे लागते त्यामुळे समाजात काय चाललंय, काय घडतंय याबद्दल त्यांना काही माहिती नसते, त्यामुळे ते असे लैंगिक गुन्हे करायला घाबरत नसावेत.

एवढे असले तरी यावर आवर घालण्यासाठी कायदे सक्तीचे होणे गरजेचे आहे, आणि अशा बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी देऊन याची, मीडियाद्वारे जाहीर वार्ता झाली तरी समाजात असे गुन्हे करणाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कायद्याचे भय वाटेल.

गुप्त पने माहिती काढण्याची यंत्रणा ताकत वान आणि अलर्ट असावी जेणेकरून गुन्हा घडण्याच्या अगोदर तो रोकता येईल.
लहान सहान गुन्हा कडे बिलकुल दुर्लक्ष करू नये.
लहान लहान गुन्हे करणारेच नंतर मोठे गुन्हे करतात.

गुप्त पने माहिती काढण्याची यंत्रणा ताकत वान आणि अलर्ट असावी जेणेकरून गुन्हा घडण्याच्या अगोदर तो रोकता येईल.
लहान सहान गुन्हा कडे बिलकुल दुर्लक्ष करू नये.
लहान लहान गुन्हे करणारेच नंतर मोठे गुन्हे करतात.

नवीन Submitted by Rajesh188 on 2 December, 2019 - 03:52

सर, अशी यंत्रणा चोरी, दरोडे, आतंकवादी हमले रोखू शकते. बलात्कार करणारा प्लॅन करून बलात्कार करत नाही जे पोलीस यंत्रणा वेळीच रोखू शकते.

एवढे असले तरी यावर आवर घालण्यासाठी कायदे सक्तीचे होणे गरजेचे आहे, आणि अशा बलात्काऱ्यांना लवकरात लवकर फाशी देऊन याची, मीडियाद्वारे जाहीर वार्ता झाली तरी समाजात असे गुन्हे करणाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कायद्याचे भय वाटेल.

Submitted by प्रशि_क on 2 December, 2019 - 03:38>>>>>हो , रेपिस्ट ला वकील मिळता कामा नये. अशी केस फास्ट कोर्टात चालवून कडक शिक्षा झाली तरच समाजात जरब बसू शकते.

तसं झालं तर जनक्षोभ शमवण्पोयासाठी पोलीस गुन्हेगार म्हणून कोणालाही अडकवून त्याला फासावर लटकवू शकतात.
फाशी दिल्याने समाजाला सूड उगवल्याचं समाधान मिळतं. एवढंच.

अजनबी यांनी लिहलेले अगदी चपखल आहे ,राजेश यांचेही. झोपडपट्टि छाप ,रानगट , व्यसनी लोकांपासुन महिलांनी जपूनच रहावे. असे लोक जनरली ब्लू कॉलर कामं करत असतात व जात्याच गुन्हेगारी वृत्तीची असतात. अमेरीकेतही असलेच लोक गुन्हेगार्या करत असतात. शहरांच्या आजूबाजूला पसरलेल्या झोपडपट्ट्या गलिच्छ वस्त्यांमध्ये असले किडे पडीक असतात. अश्या एरीयात पोलिस चौक्या वाढवाव्यात ,सिसिटीव्ही नेटवर्क वाढवावे.

Pages