हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

सरकार जर तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही तर महिलांनी शस्त्र परवाने घेऊन बलात्कार व्हायच्या आधीच अश्या लोकांचे एन्काऊंटर केले पाहिजे. जेंव्हा हे होऊ लागेल तेंव्हा सरकार ला जाग येईन. हजारो महिला शस्त्रं मागायला लागतील तेंव्हा काहीतरी विचार केला जाईल.

कानपूरच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्तरीकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक रिव्हॉल्वर दिले जाते. मात्र त्याची किंमतच १,२०,००० रूपये आहे. त्यामुळे ते सर्वांना परवडेल का ?
ते मिळवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म भरून द्यायचा आहे. कुणासाठी हवे आहे त्याबाबतची माहिती द्यायची आहे. ( तो फॉर्म वेब वर आहे का हे पाहीलेले नाही). त्यानंतर मग ते पिस्तूल द्यायचे कि नाही हे ठरते.

मात्र असे पिस्तूल मागवून त्याचा दुरूपयोग देखील झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसात किती जणांना हे शस्त्र दिले त्याचा तपशील काही आढळला नाही.

ती उन्नाव वाली मुलगी गेली हो, मरताना भावाला म्हणाली "भैया मुझे बचालों". तिच्या आरोपींना (हो अपराधी तो पर्यंत म्हणत नाही जोपर्यंत अपराध सिद्ध होत नाही असे ऐकले होते) वाचवा नाहीतर युपी पोलीस त्यांचा एन्काऊंटर करायची. आणि इथे अजून १०/१२ धागे निघायचे.

स्त्री च्या बाबत भारतात होणारं हे सगळं (सर्व पक्ष/जाती/धर्म/आर्थिक वर्गाकडून) आता अत्यंत हताश आणि 'काही बोलू नये गप शांत बसावं आणि जीव वाचवावा' इतकाच विचार डोक्यात शिल्लक राहण्याच्या लेव्हल ला गेलं आहे.फक्त शहरं नावं आडनावं वयं बदलतायत.क्रौर्य तेच.

सुनिधी, तुम्हाला माझ्या पोस्ट्स समजलेल्या नाहीत हे जाणवले. >> मला समजले, तुम्हाला माझा प्रश्न समजलाय त्याचं सरळ उत्तर ‘हो की नाही’ न देता असभ्य व उद्धट प्रतिसाद लिहिलात पुरोगामी गा. मला तुमच्या संवाद साधायचा नाही. धन्यवाद.
उन्नाव मधल्या राजकारण्याचा एन्काऊंटर केला तर तुम्हाला चालेल का? तो माणुस सुटणार ही शक्यता असेल तर. हा प्रश्न होता.
मी माझे मत आधीच लिहिले आहे. कायदा हातात घेणे व न्यायच न मिळणे हे दोन्ही वाईट ज्यात मग संमिश्र भावना होतात.
पहा विचार करुन विचारक्षमता असेल तर.

मला तुमच्या संवाद साधायचा नाही. >>> मनःपूर्वक आभार. अशा लोकांशी संवाद साधण्यात मला फारसा इंटरेस्ट नाही. सुंवाखोगे.

ज्यांना कुणाला प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही या मधेच हवे असे वाटते त्यांनी खालील एका प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही देऊन दाखवावे

- तुम्हाला वेडाचे झटके यायचे बंद झाले का ?

उन्नाव मधल्या राजकारण्याचा एन्काऊंटर केला तर तुम्हाला चालेल का? >>> हा प्रश्न जर पोस्ट्स समजल्या असत्या तर कुणीही शहाण्या माणसाने विचारला नसता हे साधे उत्तर आहे. इथे सगळे जण सांगत आहेत की उन्नाव मधे असे होणार नाही तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे ? मूर्खपणा आहे हा.
तुमच्या घरातल्या एखाद्या तरूण मुलाला जर पोलिसांनी चुकून धरून नेले आणि त्याचे तीन मित्र दोषी असतील म्हणून त्याला गोळ्या घातल्या तर ? हा प्रश्न इथे उपस्थित होतो. एण्काउंटर हे उत्तर नाही असे सातत्याने सांगण्या-याचे प्रतिसाद इग्नोर मारून झटका आल्याप्रमाणे काहीही विचारायचे आणि आपणच जज्ज होऊन कुठले प्रतिसाद सभ्य हे ठरवायचे हे चर्चेची शिस्त नसल्याचे लक्षण आहे. अरेरावीपणा आहे हा. अशा उर्मटपणाला उत्तर देताना आयडी उडाला तरी चालेल.

उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या जळीत कांडाच्या विरोधात निदर्शने करणा-यांना पोलिसांनी कसा न्याय दिला हे खालच्या व्हिडीओत दिसेलच. सोबत महिलांनाही किती सन्मानाने वागवले जात आहे हे दिसेल. यांच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणा-यांची शिफारस माबोभूषण पुरस्कारासाठी करण्यात यावी.

https://twitter.com/i/status/1203213019238387712

freepressjournal_2019-12_22e5663e-a616-4ab5-8996-7f918724b423_Congress.jpg79299670_3165377003561308_596539041512423424_n.jpg

हैद्राबाद प्रकरणात जरा इतर महत्वाच्या बाजूंवरही लक्ष दिले पाहिजे. या घटनेतील पिडीता ही पशूवैद्यकीय डाॅक्टर होती , ती गोवंश हत्या विरोधी मोहीमेत सक्रिय होती , गोवंश तस्करांविषयी तिला माहीती होती व ती एक लढा देत होती . या पिडीतेला यासंदर्भात धमक्या मिळाल्या होत्या. तिच्याबाबत घडलेली घटना ही पूर्वनियोजित होती आणि या घटना व तिची हत्या यामागिल खरे सुत्रधार शोधणे आवश्यक होते.चार आरोपी पोलीसांच्या हाती लागल्यावर चौकशीतून मुख्य सुत्रधार समोर आले असते , त्यांना वाचविण्यासाठीच चारही आरोपींना एकदाचे ठार मारून हे प्रकरण दडण्यात आले असावे असेच स्पष्ट दिसत आहे
एन्काउंटर हे संशयास्पद आहे . मोठ्या चार गुन्हेगारांना रात्रीच्यावेळी घटनास्थळी चौकशीसाठी कसे नेले जाते ?
पोलीसांची कुमक चार आरोपींसमोर कमी होती काय ?
पोलीसांच्या तावडीतून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न कसा करू शकतात ?
पोलीसांचे पिस्तूल ते कसे हिसकावू शकतात ?
आणि या प्रकरणात पोलीसांनी पिस्तूलासह पळत असलेल्या एक दोन आरोपींना न मारता सर्वच चारही आरोपींना कसे मारून टाकावे ?
असे अनेक प्रश्न आता उभे राहतात !
तेलंगाना सरकारने हैद्राबाद पोलीसांच्या हातून नेमके कोणाला वाचवले आहे याची सर्वच पातळींवर सखोल चौकशी झाली पाहीजे कारण हा पिडीतेवर सरकारतर्फे झालेला दुसरा मोठा अत्याचार आहे.

फेसबुकवर फिरत असलेला हा मेसेज. सत्यतेबाबत कल्पना नाही.

काही व्हिडिओ असे पण आहेत त्या मध्ये हे सांगायचं प्रयत्न केला आहे की चारीही आरोपी हे मुस्लिम धर्मीय आहेत.
पोलिस ना जाणूनबुजून त्यांना हिंदू नाव दिली आहेत.
गुन्हा तर पूर्वनियोजित च होता असे म्हणावे लागेल बातम्या वरून.
पिडीतेची स्कूटर puncture केली गेली होती आणि ती आरोपी नी केली होती .
म्हणजे पाळत ठेवून गुन्हा घडवला गेला आहे..
बलात्कार हा सूडाच्या भावनेतून केला असावा असे वाटत आहे क्रौर्य बघून.

आरोपी चे एन्काऊंटर कोणाला वाचवण्यासाठी केले असावी ही जशी शक्यता वाटते तशीच कायदा सुव्यवस्था धोक्यात येवू नये म्हणून काही बाबी प्रकाश त येवू नये हा सुद्धा हेतू असू शकतो

एका महिलेला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून खून करून तिचा देह जाळला जातो.
कायदा सुव्यवस्था आणखी काय धोक्यात यायची राहिलीय?

भरत
गुन्हा झाल्या वर शिक्षा मिळाली म्हणजे न्याय मिळाला हे तांत्रिक दृष्ट्या योग्य वाटत असेल तर गेलेला जीव परत येत नाही.
त्या पेक्षा गुन्हा घडूच नये हा उध्येश ठेवून कायद्याची रचना करावी लागेल .
प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तुरुंगात ठेवण्याचे पोलिस चे अधिकार मर्यादित आहेत ते वाढवावे लागतील.
पण तसे अधिकार पोलिस ना दिले तर त्या अधिकाराचा गैर वापर होण्याचाच धोका भारतात आहे..मग परत पोलिस यंत्रणेची पुनर्रचना करणे आणि चुकीची कारवाई केली तर संबंधित अधिकारी हा जबाबदार राहील शिक्षेस पात्र राहील असे काही केले पाहिजे.
आपल्या आजूबाजूला क्राईम करणाऱ्या लोकांची आपल्याला माहिती असते तसेच ती माहिती पोलिस ना सुद्धा असते पण गुन्हा घडण्या अगोदर कारवाई करण्या विष्यी आपल्या कडे तरतूद नाही.
पोलिस यंत्रणेला गुन्हा होण्याची वाट बघावी लागते
लोकांच्या स्वतंत्र तेचे अधिकारावर गदा येवू नये हेच आपले धोरण आहे.
वरचेवर combing ऑपरेशन,नाकाबंदी, अश्या प्रकारच्या कारवाया जनता सहन करेल का .

सकाळपासुन बातम्यात दाखवतायत. निरागस राजकुमार, भावी पंप्र, कॉ चा अध्यक्ष , आंखेमारु सन्माननीय राहुल गांधी एका सभेत बरळला. की नरेंद्र मोदी हे मेक इन इंडिया म्हणत नसुन रेप इन इंडिया म्हणत आहेत. भाजपाने याचा धिक्कार केलाय. आता याच्या मर्कटलीला कुठपर्यंत जाणार आहेत देव जाणे !

मोदींनी तसे म्हणणे सुद्धा खूपच चूकीचे होते यात सवालच नाही. दुपारच्या बातम्यात ऐकले मी ते. मुळात प्रश्न हा आहे की त्या वेळचे सरकार आणी आताचे सरकार हे दोघेही कसे या घटनांना जबाबदार ठरु शकतात?

माणसाची नीच हलकट वृत्ती कुठेही कशीही उफाळुन येते, अगदी घरातही मुली सुरक्षीत नाहीत. आज दुपारीच बातमी आलीय लोकसत्ता मध्ये की सावत्र बापाने मुलीची हत्या केली. मग याला कुठल्याही पक्षाचे सरकार जबाबदार आहे असे मी तरी कधीच नाही म्हणणार. बायका-मुली-मुले यांना सुरक्षीत वाटावे असे वातावरण तयार झालेच पाहीजे. गुन्हेगारांना सुद्धा भयानक पद्धतीने शिक्षा झाली पाहीजे. पण प्रश्न हा सुद्धा येतो की ती केस कोर्टात जायच्या आधीच पिडीतेला मारले जाते उदा. उन्नाव केस. गुन्हेगार भाजपाचा असोप वा झोपडपट्टीतला. कायद्याने शिक्षा ही झालीच पाहीजे. पण हैद्राबाद पोलीसांना हे माहीत आहे म्हणून कदाचीत त्यांनी सीम्बा स्टाईल उडवले की काय असे वाटते.

प्रश्न राहीला मर्कट लिलेचा तर त्या वेळोवेळी सिद्ध झाल्याच आहेत.

यात काय चुकीचं आहे?
https://twitter.com/ANI/status/1205369520929562624

WATCH Rahul Gandhi, Congress in Godda, Jharkhand: Narendra Modi had said 'Make in India' but nowadays wherever you look, it is 'Rape in India'. In Uttar Pradesh Narendra Modi's MLA raped a woman, then she met with an accident but Narendra Modi did not utter a word. (12.12.19)
व्हिडियो पण आहे.

या वक्तव्याचा विपर्यास करून चवताळून उठलेल्या स्मृती इराणींनी सेनगर किंवा चिन्मयानंदबद्दल अवाक्षर तरी काढलं होतं का?

हिंदू युवा वाहिनीच्या प्रमुखाच्या उप स्थितीत एक नेता संस्थेच्या व्यासपीठावरून म्हणाला - मुस्लिम स्त्रियांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार केले पाहिजेत. त्या हिंदू युवा वाहिनीचा प्रमुख आज उत्तर प्रदेशचा मुख्य मंत्री आहे.

“मीडिया काही दिवसांनी निघून जाईल, आम्ही इथेच आहोत,” हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी
बलात्कार झालाच नसल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा

https://www.loksatta.com/desh-videsh-news/hathras-dm-seen-intimidating-h...

बलात्कारितेला उपचार करायला यूपीवरून दिल्लीला नेतात
आणि योगीजी म्हणतात यूपीत मोठी फिल्म सिटी काढू

मै भी चौकीदारवाले कुठे उलथले ?

काँग्रेसने 70 साल मे क्या किया , 10 साल मे गुंगे सिंग ने क्या किया.

2013 साली निर्भया act पास करून झाला आहे

आता फक्त पकडून शिक्षा द्या.

राहुल गांधी ने क्या किया.
निर्भयाच्या भावाला पायलट व्हायला मदत केली , कोणताही गाजावाजा न करता

Pages