प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले
मायबोली वासीयांना नमस्कार ,
मी सौ स्वामिनी चौगुले ,
मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .
गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
मी केलेले लिखाण अशुद्ध असून ते सुधारा असे सांगून माझे डोळे उघडले व तुमचा प्रतिसाद मिळाला त्या मुळे मी माझ्या लिखाणात सुधारणा करू शकले तसेच स्वतःच्याच लिखाना बाबद प्रगल्भ झाले . म्हणून तुमचे आभार इथे बऱ्याच जणांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले .ते मी विसरू शकणार नाही
आता तिखट अनुभव मांडते . माझं लिखाण अशुद्ध आहे असे बरेच ताशेरे ओढून मला काही लोकांनी बेशुद्ध व्हायची वेळ आणली तर त्या बाबद; मराठी टाइपिंग करत असताना बऱ्याच वेळा नकळतपणे खूप चूका होतात तर काही वेळेस आपल्या ही न कळत की
बोर्ड आपण टाइप केलेले अनेक शब्द बदलतो .मायबोलीवर एका सदस्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला तो असा
" मराठी टाइपिंग करत असताना अनेक वेळा एरर येतो तसेच बरेच शब्द बदलतात . बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले "
मला हा प्रतिसाद खूप आवडला पण याचा अर्थ असा नाही की मी केलेले अशुद्ध लेखन बरोबर आहे मी माझ्या लेखनात सुधारणा करत आहे आणि करत राहणार .
पण काही महाभाग असतात त्यांना दुसर्याच्या चुका दाखवून व त्यांना कुचकट बोलून आत्मिक समाधान मिळते. अहो ज्यांना अंडर रेस्टिंमेंट हा शब्द नीट लिहिता येत नाहीत ते निघाले दुसर्याचे लेखन सुधारायला. माझ्या सासुरवास या विषयावरील लेखाच्या प्रतिसाद या सदरात काही लोकांनी इतकी घाण केली की माझा लेखच माननिय अडमीन यांना हाटवावा लागला. काहींच्या संगणक प्रणालीने तर चक्क त्यांना सांगितले म्हणे की हा लेख वाचू नका कारण तो खूप अशुद्ध आहे तुझ्या डोक्याला मुंग्या येतील .माझ्या कडे ही लॅपटॉप आहे तो मला असं कधी सांगत नाही हो बालबुद्धी ची किव करावी तेव्हढी कमी आहे
काही लोक मराठीचे पाईक बनून जर माझे लेखन नाही सुधारले तर मराठी भाषा लुप्त होइल अश्या अविर्भावात असलेले मी पाहिले .बर सोशल मीडिया चा पहिला व अलिखित रुल हा आहे की पटल तर घ्या नाही तर सोडून द्या .
माझ्या शुद्ध लेखनावरून खूप कुचकट बोलणं पाहिल . बऱ्याच लोकांना वाटत की मायबोलीवर काय लिहल जात? काय प्रतिसाद दिला जातो या कडे मायबोलीच्या व्यवस्थापकांचे किंवा admin चे लक्ष नसते पण तसे नाही . कालच मला व्यवस्थापणा कडून इ मेल आला की तुम्ही चांगले लिहता लिहत रहा इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते ( विश्वास नसल्यास कोना ला हवे असल्यास मेल चा स्क्रीन शॉट मारून पाठवला जाईल) फक्त लिखाणात सुधारणा करा .हीच मी माझा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे याची पावती समजते.
आता ब्लॉग च्या लिंक विषयी मी इथे अर्धवट कथा व लेख लिहून लिंक देते अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे मी माझ्या ब्लॉग चे views वाढावेत म्हणून मी अस करते अस काही जणांना वाटते. काहीं ना तर असे वाटते की मी बेरोजगार आहे त्या मुळे मी ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते .खर तर इतकं व्यक्तिगत होण्याची गरज होती का ?
काय म्हणे निराशेच्या गर्तेत वगैरे वगैरे आणि एक तर माझ्या ब्लॉग प्रोफेशनल नाही .मला त्यातून सध्या तरी आर्थिक काहीच फायदा नाही.
मी पूर्ण कथा टाकण्यास सुरवात केली आहे .पण ब्लॉग लिंक दिल्यास काय हरकत आहे असे माझे मत आहे .कारण मायबोली वर शेअर केलेल्या ब्लॉग लिंक वरून मी नितांत सुंदर ब्लॉग पाहिला इथे जर लिंक नसती तर मला त्या ब्लॉग बद्दल कधीच कळलं नसत अस मला वाटते.
बेरोजगारी वाढली म्हणून लोक आज काल यु ट्यूब व ब्लॉग लिहले जातात सरकारने काही तरी केले पाहिजे यालाच म्हणतात ' अधजल गगरी छलकत जाए ' कारण भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलम १९(१) अस आहे .मग सरकारने यांना रोखण्यासाठी काही करावे अस म्हणणे शुद्ध वेडेपणा आहे . आणि यु ट्यूब आणि ब्लॉगिंग हे बेरोजगार लोक करत नसून अनेक डॉक्टर, वकील , इंजिनिअर, शिक्षक असे अनेक लोक ज्ञान दानाचे काम करत आहेत ते ही मोफत तसेच आजची तरुण पिढी दुसर्याची चाकरी करण्यात धन्यता न मानता आपल्या जवळ असलेल्या गुणांचा वापर करून पैसे कमावत आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात भारतात परकीय चलन येेेत आहे.
जर मी जास्त काही लिहल असेन किंव्हा माझ्या मुळेच कोणी दुखावलं गेले असेल तर क्षमा करावी ही विनंती
दूसरों की गलती पर ऊँगलियाँ उठाना आसान हैं।
ख़ुद की गिरेबान को झाक कर देखना नही आता।
दूसरों को गिराने में मशरूक हैं लोग आज कल ।
गिरे हुए को उठाने का हुनर आज किसी को नही आता।
कालच मला व्यवस्थापणा कडून इ
ईकडे पूर्ण लेख लिहून मळमळ काढली असतांना, मेल पाठवायची काय गरज होती हो??
असं मायबोली व्यवस्थापकांनी
असं मायबोली व्यवस्थापकांनी लिहिलं असेल यावर माझा विश्वास नाही. >>
तसेच असावे. कुणी विपु केली की notify@maayboli.com आयडी वरून इमेल येतो.
तो यांना व्यवस्थापनाचा इमेल वाटला असावा. >>
मिळालेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट न बघताच तुम्ही असे बिनबुडाचे अंदाज कसे बांधू शकता. व्यवस्थापणाचा हा ईमेल सगळ्या नवख्या लेखकांसाठी एक भक्कम आधार बनू शकतो. मायबोली व्यवस्थापण नवख्या लेखकांची काळजी करते हा संदेश प्रत्येक नवीन मायबोलीकरापर्यंत पोचणे जरूरी आहे.
लेखिकाताई, तुम्ही कृपया ईथे स्क्रीनशॉट द्यावा ही विनंती.
इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते >> हे १००% सत्य आहे. तुम्ही स्क्रीनशॉट दिलात तर असे पोटदुखी झालेले लोक कोण आहेत त्यांची नावे सुद्धा माझ्य्सहित अनेकजण तुम्हाला नक्की सांगतील. कृपया ईथे स्क्रीनशॉट द्यावा.
मायबोली प्राईम/ प्लस/गोल्ड
मायबोली प्राईम/ प्लस/गोल्ड अशी सुवीधा पण आहे काय..?
कीती रुपयात मिळते..? ज्यात तुमच्या जालीय दुःखाचं सान्त्वन थेट administration करते..?
कशाला स्क्रिनशॉट मागताय -
कशाला स्क्रिनशॉट मागताय - त्यांच्या विपू मध्येaआहे मेसेज.
विपूतला हा मेसेज का?
विपूतला हा मेसेज का?

Screenshot_20191120-094240
Screenshot_20191120-094240_Gmail_0.jpg (102.85 KB)

हा मला आलेला सदस्य कन्फर्म
हा मला आलेला सदस्य कन्फर्म झालेला म्यासेज आणि आता याच इ मेल ईडी वरून आलेला म्यासेज टाकते
Screenshot_20191120-094240_Gmail_4.jpg
(No subject)
(No subject)
हा मेसेज व्यवस्थापकांचा आहे?
हा मेसेज व्यवस्थापकांचा आहे?
एकाच इ मेल id वरून दोन
एकाच इ मेल id वरून दोन म्यासेज मग मी हे म्यासेच कोणाचे समजायचे ते पण सांगा
मेसेज मेसेज.
मेसेज मेसेज.
म्हणजे उर्मिला म्हात्रे
म्हणजे उर्मिला म्हात्रे व्यवस्थापन समिती मध्ये आहेत तर.. same msg word to word
बर बर मेसेज बरं का
बर बर मेसेज बरं का
@Swamini Chougule:
@Swamini Chougule:
तुम्ही तुमच्या प्रोफाइलध्ये (माझे सदस्यत्व) जाऊन "माझी विचारपूस" मध्ये जाऊन तिथे तुम्हाला कुणा कडून मेसेज आला आहे हे बघा. तिथे कुणी तुम्हाला मेसेज लिहिला की तोच मेसेज notify@ maayboli. com वरूनही येतो.
म्हणजे तुम्हाला तो मेसेज कुणी पाठवला हे कळेल.
व्यवस्थापनाकडुन आलेले मेसेज हे फॉर्मल भाषेत आणि मराठीत असल्यास देवनागरीतून येतील हे सुद्धा लक्षात घ्या.
अहो स्वामिनीताई..तुम्हाला
अहो स्वामिनीताई..तुम्हाला आलेले मेल हे विचारपूसच्या नोटीफिकेशन्स आहेत...इथल्याच काही सदस्यांनी तुम्हाला विपूवर मेसेज टाकले आहेत
नोटीफेकशन्स notifymayboli असंच येत ..नीट बघाल तर तिथे तुम्हाला ज्यांनी मेल किंवा विपू केला आहे त्यांचा इमेल आयडीसुद्धा दिसेल..
हे इथल्याच लोकांचे मेल आमि मॅसेज आहेत...मायबोली व्यवस्थापनांचे नाही..
मायबोली व्यवस्थापन कधीही विपू किंवा मेल करत नाहीत.
ह्या चार वर्षात मलातरी एकदाही आला नाही...
वेमा / अडमीन,
वेमा / अडमीन,

टोटल तिर्हाईक बाईंना " dear..." करायला काहीच वाटले नाही का तुम्हाला?? श्शी!!
टोटल तिर्हाईक बाईंना " dear..
टोटल तिर्हाईक बाईंना " dear..." करायला काहीच वाटले नाही का तुम्हाला?? श्शी!! >>
समजूतीचा गोंधळ अन म्यासेज चा सुकाळ
स्वामिनी ताई, तुमचा हेतू लेख
स्वामिनी ताई, तुमचा हेतू लेख लिखाण करण्याचा, मायबोली वर लिहण्याचा आहे तर हे सगळे प्रतिसाद तुम्हाला मार्गदर्शकच आहेत, नाही का? बेरोजगारी चा प्रतिसाद सोडून.
एवढा त्रागा नका करू. अजूनही तुम्ही शुद्ध लिहीत नाहीये..
टोटल तिर्हाईक>>>>> म्हणजे??
टोटल तिर्हाईक>>>>> म्हणजे??
स्वामिनी, वर कुणी लिहिलंय तसं हा मेसेज व्यवस्थापकांचा नाहीये.
नोटीफाय सगळ्याच मेसेज इमेल्स ना येतं. नीट पाहिलंत तर पाठवणार्याचं नाव इमेल दिसेल.
वेमा / अडमीन,
वेमा / अडमीन,
टोटल तिर्हाईक बाईंना " dear..." करायला काहीच वाटले नाही का तुम्हाला?? श्शी!!
>>
तरी बरं वेमा वगैरे पुरूष आहेत, स्त्री असते तर वेगळाच संशय यायची शक्यता होती 'डीअर' म्हणण्यावरून.
@Swamini Chougule:
@Swamini Chougule:
अभ्यास वाढवा.
तुम्हाला
Lai bore lihita rap tumhi
असा मेसेज नाही का आला (मराठी_प्रेमी) मायबोली व्यवस्थापनाकडून?
तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाताय असा समज होऊ पाहतोय.
स्वामिनी, जर आपण अजुनही
स्वामिनी, जर आपण अजुनही अशुद्ध लिहितोय याची जाण असेल आणि इमेल-मेसेजचा मुद्दा कळला - पटला असेल तर..
''ओह! ओके. माझा गैरसमज झाला. मला माहित नव्हतं लोकहो. आता मी नीट वाचलं तेव्हा कळलं कुणाचा मेसेज होता ते. मी शुद्धलेखनाकडे लक्ष देत आहे. धन्यवाद."
एवढं लिहुन समारोप केलात तर बरं. नाहीतर हा धागा जोपर्यंत माबोकरांना कंटाळा येत नाही तोपर्यंत मनोरंजन करत राहिल.
पटलं तर घ्या नाहीतर सोडुन द्या. धन्यवाद.
हर्पेन 007.
हर्पेन 007.
(No subject)
हे बघा, हे असे आहे,
कोणत्याही विपु चा असा मेलसुद्धा येतोच,
माहीत नसेल तर खरचं काही प्रॉब्लम नसतो ,इथे खूप छान सल्ले, माहिती देणारे भेटतात,आणि आपला टोन व्यवस्थित असेल तर एखाद्या टिंगल करणाऱ्या id ला परस्पर टोकले सुद्धा जाते पण हर्पेन म्हणताय त्याप्रमाणे वेड घेऊन पेडगाव ला जात असाल तर मात्र अवघड आहे आणि खरचं तसे असेल तर माझा तरी पास आता
माझ्या एक दशकभराच्या इंटरनेट
माझ्या एक दशकभराच्या इंटरनेट अनुभवात कोण्या अॅडमीनला एवढी पाल्हाळ भाषा वापरतांना, तसेच शुद्धलेखन बाजूला सारून प्रत्येक वाक्यानंतर दोन टिंब देतांना बघितलेले नाही, आणि त्यात मायबोलीसारख्या प्रतिष्ठीत संकेतस्थळाचे अॅडमीन अशी भाषा वापरतील
ही गोष्ट पचत नाही.
किती हसवताय रे सगळे.
एकाच इ मेल id वरून दोन म्यासेज मग मी हे म्यासेच कोणाचे समजायचे ते पण सांगा>>> स्वामीनीताई मोबाईलवर नक्की कुठली बटणं दाबलीत आणि हे दोन नवीन शब्द मराठी भाषेला बहाल केलेत?
खरं तर स्वामिनी यांनी
खरं तर स्वामिनी यांनी व्यवस्थापन कडून मेल म्हटल्यावर माझीही उत्सुकता ताणली गेली होती,म्हटलं मागे स्पर्धा वगैरे च्या वेळी इतका गदारोळ होत असताना व्यस्था मिठाची गुळणी घेऊन बसले होते आणि आता पोटदुखी सारखे शब्द वापरायला लागले,
म्हणून मी अति उत्सुकतेपोटी त्यांची विपु बघितली तेव्हा सगळा उलगडा झाला
म्या (मी) असेच करते ह्याचे
म्या (मी) असेच करते ह्याचे लघुरूप म्हणजे म्यासेच असे गृहीत धरून मायबोली डिक्शनरीमध्ये शशक हहगलो अश्या शब्दांच्या भरीस ही एक नवीन जोड़ करायला हरकत नाही
पाकृ च्या धाग्यावर अनुमोदन देताना ह्या शॉर्टफोर्मचा यथोचित वापर नक्कीच होऊ शकेल.
(उदा- १ला प्रतिसाद - मी हींग मोहरी फोडणी वरुन ओतते....२रा प्रतिसाद - म्यासेच...)
बाकी ते म्यासेज म्हणजे गंगुबाई नॉन मेट्रिक भाषा झाली .. तेव्हा पुढील लिखाणात शुद्धतेचा आग्रह धरणे म्हणजे १ किलो मिठाचा खारटपणा कमी करायला चिमुटभर साखर पेरणी ठरेल.
उदा- १ला प्रतिसाद - मी हींग
उदा- १ला प्रतिसाद - मी हींग मोहरी फोडणी वरुन ओतते....२रा प्रतिसाद - म्यासेच.>>>>
Pages