मायबोली वरील झणझणीत अनुभव

Submitted by Swamini Chougule on 18 November, 2019 - 12:48

प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले

मायबोली वासीयांना नमस्कार ,

मी सौ स्वामिनी चौगुले ,

मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .

गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.

मी केलेले लिखाण अशुद्ध असून ते सुधारा असे सांगून माझे डोळे उघडले व तुमचा प्रतिसाद मिळाला त्या मुळे मी माझ्या लिखाणात सुधारणा करू शकले तसेच स्वतःच्याच लिखाना बाबद प्रगल्भ झाले . म्हणून तुमचे आभार इथे बऱ्याच जणांनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले .ते मी विसरू शकणार नाही

आता तिखट अनुभव मांडते . माझं लिखाण अशुद्ध आहे असे बरेच ताशेरे ओढून मला काही लोकांनी बेशुद्ध व्हायची वेळ आणली तर त्या बाबद; मराठी टाइपिंग करत असताना बऱ्याच वेळा नकळतपणे खूप चूका होतात तर काही वेळेस आपल्या ही न कळत की

बोर्ड आपण टाइप केलेले अनेक शब्द बदलतो .मायबोलीवर एका सदस्यांनी मला खूप छान प्रतिसाद दिला तो असा

" मराठी टाइपिंग करत असताना अनेक वेळा एरर येतो तसेच बरेच शब्द बदलतात . बऱ्याचदा लेखक बोलत असलेल्या भाषेचा परिणाम लिखाणावर होतो . पण तो इतका मोठा मुद्दा नाहीच लेखकाने लिहलेले आपल्याला समजले की झाले "

मला हा प्रतिसाद खूप आवडला पण याचा अर्थ असा नाही की मी केलेले अशुद्ध लेखन बरोबर आहे मी माझ्या लेखनात सुधारणा करत आहे आणि करत राहणार .

पण काही महाभाग असतात त्यांना दुसर्याच्या चुका दाखवून व त्यांना कुचकट बोलून आत्मिक समाधान मिळते. अहो ज्यांना अंडर रेस्टिंमेंट हा शब्द नीट लिहिता येत नाहीत ते निघाले दुसर्याचे लेखन सुधारायला. माझ्या सासुरवास या विषयावरील लेखाच्या प्रतिसाद या सदरात काही लोकांनी इतकी घाण केली की माझा लेखच माननिय अडमीन यांना हाटवावा लागला. काहींच्या संगणक प्रणालीने तर चक्क त्यांना सांगितले म्हणे की हा लेख वाचू नका कारण तो खूप अशुद्ध आहे तुझ्या डोक्याला मुंग्या येतील .माझ्या कडे ही लॅपटॉप आहे तो मला असं कधी सांगत नाही हो बालबुद्धी ची किव करावी तेव्हढी कमी आहे

काही लोक मराठीचे पाईक बनून जर माझे लेखन नाही सुधारले तर मराठी भाषा लुप्त होइल अश्या अविर्भावात असलेले मी पाहिले .बर सोशल मीडिया चा पहिला व अलिखित रुल हा आहे की पटल तर घ्या नाही तर सोडून द्या .

माझ्या शुद्ध लेखनावरून खूप कुचकट बोलणं पाहिल . बऱ्याच लोकांना वाटत की मायबोलीवर काय लिहल जात? काय प्रतिसाद दिला जातो या कडे मायबोलीच्या व्यवस्थापकांचे किंवा admin चे लक्ष नसते पण तसे नाही . कालच मला व्यवस्थापणा कडून इ मेल आला की तुम्ही चांगले लिहता लिहत रहा इथे कुचकट शेरे मारणारे खूप भेटतील इथे नवीन आलेला लेखक जर चांगले लिखाण करत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखते ( विश्वास नसल्यास कोना ला हवे असल्यास मेल चा स्क्रीन शॉट मारून पाठवला जाईल) फक्त लिखाणात सुधारणा करा .हीच मी माझा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे याची पावती समजते.

आता ब्लॉग च्या लिंक विषयी मी इथे अर्धवट कथा व लेख लिहून लिंक देते अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे मी माझ्या ब्लॉग चे views वाढावेत म्हणून मी अस करते अस काही जणांना वाटते. काहीं ना तर असे वाटते की मी बेरोजगार आहे त्या मुळे मी ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते .खर तर इतकं व्यक्तिगत होण्याची गरज होती का ?

काय म्हणे निराशेच्या गर्तेत वगैरे वगैरे आणि एक तर माझ्या ब्लॉग प्रोफेशनल नाही .मला त्यातून सध्या तरी आर्थिक काहीच फायदा नाही.

मी पूर्ण कथा टाकण्यास सुरवात केली आहे .पण ब्लॉग लिंक दिल्यास काय हरकत आहे असे माझे मत आहे .कारण मायबोली वर शेअर केलेल्या ब्लॉग लिंक वरून मी नितांत सुंदर ब्लॉग पाहिला इथे जर लिंक नसती तर मला त्या ब्लॉग बद्दल कधीच कळलं नसत अस मला वाटते.

बेरोजगारी वाढली म्हणून लोक आज काल यु ट्यूब व ब्लॉग लिहले जातात सरकारने काही तरी केले पाहिजे यालाच म्हणतात ' अधजल गगरी छलकत जाए ' कारण भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलम १९(१) अस आहे .मग सरकारने यांना रोखण्यासाठी काही करावे अस म्हणणे शुद्ध वेडेपणा आहे . आणि यु ट्यूब आणि ब्लॉगिंग हे बेरोजगार लोक करत नसून अनेक डॉक्टर, वकील , इंजिनिअर, शिक्षक असे अनेक लोक ज्ञान दानाचे काम करत आहेत ते ही मोफत तसेच आजची तरुण पिढी दुसर्याची चाकरी करण्यात धन्यता न मानता आपल्या जवळ असलेल्या गुणांचा वापर करून पैसे कमावत आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात भारतात परकीय चलन येेेत आहे.

जर मी जास्त काही लिहल असेन किंव्हा माझ्या मुळेच कोणी दुखावलं गेले असेल तर क्षमा करावी ही विनंती

दूसरों की गलती पर ऊँगलियाँ उठाना आसान हैं।
ख़ुद की गिरेबान को झाक कर देखना नही आता।
दूसरों को गिराने में मशरूक हैं लोग आज कल ।
गिरे हुए को उठाने का हुनर आज किसी को नही आता।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामिनीजी इतरांचं मला माहित नाही पण तुम्ही कथा अर्धवट देउन लिंक देत होतात तेव्हा दोन वेळा मला "पुढील कथा वाचण्यासाठी लिंक क्लिक करा" असं लिहिलं होतं त्या खाली लिंक दिसत नव्हती. एकदा लिंक ओपन झाली नाही. अशा वेळी मन लावून कथा वाचत असतानाची लिंक तुटते. म्हणून शक्यतो लिंक देण्यापेक्शा सलग कथा दिलीत तर बरं होइल. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आदू आणि हर्पेन यांना होम्स आणि वॅटसन या पदव्या बहाल करण्यात येत आहेत.
यातील कुणी कोणती घ्यावी किंवा अडीच अडीच वर्षे दोन्ही वाटुन घ्याव्यात हे सामंजस्याने ठरवावे, अन्यथा बोकलत राजवट लागू करण्यात येईल.

इथं कोणते असं शालिवाहनाचे शिलालेख आहेत की बदल करता येणार नाहीत. >> शिलालेखांबद्दल माहित नाही; पण मायबोलीवर शालिवाहनाबद्दल लेख आहेत खूप छान! त्यानुसार 'शालिवाहन' म्हणून कुणी एक राजा नव्हता. गौतमीपुत्र सातकर्णी - सातवाहन - शालिवाहन - असा काहितरी तो गोंधळ आहे. आता नीटसे आठवत नाही.

माझा गैरसमज झाला हे मान्य त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते
पण माझ्या मुळे तुमचे मनोरंजन झाले आणि जसे हसणारे आहेत तसे समजावून सांगणारे ही आहेत मायबोलीवर
हो मी शुद्ध लेखन सुधारेल हे मी पहिल्यांदा ही सांगितले आणि आता ही म्हणते
@बोकलात(मुद्दाम ला केलय काय हे अशुद्ध आहे)
वाचा आणि सांगा ना काय चुकलं ते

@अज्ञानी
किती छान उदाहरण दिले तुम्हीं ,तुम्ही एखादे छान पुस्तक लिहू शकता हो कुचकट बोलण्यावर; गंगुबाई नॉन मॅट्रिक राहुद्या तुम्ही PHD केली की हो कुचकट बोलण्यावर
(कृपया शुद्ध लेखक तपासावे ही विनंती) तुमचे नाही माझे बर का !!

आता आवरा! सगळ्यांनीच बास करा.>>>>>+१११११ मी पण थांबतो.
@Swamini Chougule ती बेरोजगारीची कमेंट मी तुम्हाला वैयक्तिक केली न्हवती. तुमच्यावर वैयक्तिक टिप्पणी करण्याचा माझ्या कोणताही उद्देश न्हवता, तरी पण तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो.

@ मेघना
इथून पुढे कथा पूर्ण वाचायला मिळतील तुम्हाला
मी पूर्ण कथा टाकायला सुरवात केली आहे धन्यवाद

@king of net
आपल्याला प्रश्न पडण्याची गरज नाही तपासणा रे तपासतात त्यांना मायबोली वर नियुक्त केलय त्या साठी
कोण किती अशुद्ध लिहत, कस लिहत काळजी नसावी

@सिम्बा
@ विनिता झक्कास
@भास्कराचार्य
तुमच्या सारखी कोती बुद्धी नाही ना माझ्या कडे नाही तर मी असा मूर्ख पणा केला असता का ?

Swaminiताई थांबा आता प्लिजच. कुणाला कोते म्हणताय, अजुन काय काय लिहिलय. येथे अगोदर ओळख होऊद्या लोकांची मग लिहा हवं ते. उगाच कशाला माणसे दुखावताय तुम्ही. तुम्हालाही त्रास होत असेलच.

तुमच्या सारखी कोती बुद्धी नाही ना माझ्या कडे नाही तर मी असा मूर्ख पणा केला असता का ?
नव्हे,

तुमच्यासारखी कोती बुद्धी नाही ना माझ्याकडे, नाहीतर मी असा मूर्खपणा केला असता का?

असे हवे. संपादन करा बघू जमलं तर.

आपल्याला प्रश्न पडण्याची गरज नाही तपासणा रे तपासतात त्यांना मायबोली वर नियुक्त केलय त्या साठी
कोण किती अशुद्ध लिहत, कस लिहत काळजी नसावी

त्याऐवजी
आपल्याला प्रश्न पडण्याची गरज नाही. तपासणारे तपासतात. त्यांना मायबोलीवर नियुक्त केलंय/ केलं आहे त्यासाठी. कोण, किती अशुद्ध लिहीतं याची काळजी नसावी.

@हरिहर
अहो मी जेंव्हा पासून लिहिते तेंव्हा पासून खूप काही बोलले आहेत ते , तुम्हीं वरचा प्रतिसाद वाचा मग कळेल तुम्हां ला

बाकी राहू दे लोकांची करमणूक झाली ना इथून पुढे करमणुकीचा धागा तरी तयार झाला . वाचा आणि मनसोक्त हसा दुसऱ्यावर हसणे खूपच छान असते

@अज्ञानी
किती छान उदाहरण दिले तुम्हीं ,तुम्ही एखादे छान पुस्तक लिहू शकता हो कुचकट बोलण्यावर; गंगुबाई नॉन मॅट्रिक राहुद्या तुम्ही PHD केली की हो कुचकट बोलण्यावर
(कृपया शुद्ध लेखक तपासावे ही विनंती) तुमचे नाही माझे बर का !! >>>>

@king of net
आपल्याला प्रश्न पडण्याची गरज नाही तपासणा रे तपासतात त्यांना मायबोली वर नियुक्त केलय त्या साठी
कोण किती अशुद्ध लिहत, कस लिहत काळजी नसावी
नवीन Submitted by Swamini Chougule on 20 November, 2019 - 15:10>>>>

लेखक शुद्ध वा अशुद्ध कसे तपासावेत हा प्रश्न अज्ञानीजींना होता (अशुद्ध लेखक बहुतेक आंघोळ न करता शुद्ध लेखन करत असावेत or other the way )
पण आपल्या उत्तरासाठी धन्यवाद!!

माझ्या मते आपले लिखाण खूप छान आणि वाचनीय आहे. त्यात शुद्धलेखनाच्या चुकाही फार नाहीत. आणि तरी देखील अनेकांना ते वाचवत नाही याची दोन कारणे खाली दिली आहेत. आपण (म्हणजे लेखकांनी) अगदी थोडी काळजी घेतली तरी बरेच वाद शमवता येतील.

१) शब्दात विनाकारण स्पेस देऊ नये. विभक्ती प्रत्यय चा, ची, चे, च्या हे शब्दाला जोडूनच हवेत. त्यामागे स्पेस देऊ नये.
उदाहरण म्हणून हे शब्द पहा...
मायबोली च्या
बालबुद्धी ची
मेल चा / ब्लॉग च्या
"माझ्या कडे ही लॅपटॉप आहे". हे वाक्य "माझ्याकडेही लॅपटॉप आहे". असं लिहिलं की काम झालं!

२) स्पष्टोच्चारित अनुनासिकासाठी अनुस्वार द्यावा.
हे वाक्य पहा...
बर पटल तर घ्या. खूप कुचकट बोलणं पाहिल . बऱ्याच लोकांना वाटत की मायबोलीवर काय लिहल जात? त्याच कलम १९(१) अस आहे. खर तर सरकारने काही करावे अस म्हणणे शुद्ध वेडेपणा आहे .

यात अनुस्वार नको का? पुढे दिलेले शब्द अनुस्वाराशिवाय लिहिले तर त्यातून वेगळाच अर्थ निघू शकतो.
बरं, पटलं, पाहिलं, वाटतं, लिहलं, जातं, असं, खरं

आपण इंटरनेटसाठी गुगल क्रोम वापरता की फायरफॉक्स? जर फायरफॉक्स वापरत असाल तर खाली दिलेल्या पानावरून स्पेल चेकसाठी हे ऍडऑन जोडून घ्या.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/

आता आपल्याला लोकांच्या नजरेत भरणाऱ्या चुका लाल रंगात अधोरेखित होताना दिसतील. त्यावर उजवी टिचकी मारली की जे पर्याय दिसतील त्यातील सर्वात पहिला पर्याय बहुतेक वेळा स्वीकारता येतो. या स्क्रीन-शॉटमध्ये दाखविल्याप्रमाणे

सोडून द्या, दुर्लक्ष करा आणि पुढे जा हा पर्याय आम्हा वाचकांपुढे आहेच. पण जेव्हा आपण आपले लिखाण मायबोलीसारख्या व्यासपीठावर मांडता तेव्हा त्यावर जाहीर चर्चा होणारच. पब्लिकचा तो हक्कच आहे. भाषेच्या बाबतीत पुरेशी खबरदारी घेऊनही जर टीका झाली तर मात्र या पूर्वग्रहदूषित प्रतिक्रिया आहेत असे म्हणून तक्रार करता येईल. पण त्यासाठी आपल्याकडून अधिक प्रयत्न होणं आवश्यक आहे.

तुमच्या सारखी कोती बुद्धी नाही ना माझ्या कडे नाही तर मी असा मूर्ख पणा केला असता का ? >> करताय तो दिसतेच आहे. वरचा स्क्रिनशॉट स्पष्टच सांगतोय ते!

मी बाकी काहीही म्हटले नसतांना मला मेल पाठवून फालतू बडबड केलीत. वर अक्कल शिकवताय. धन्य आहे तुमची
__/\__ कोपरापासून प्रणाम ! इथे भेटलात , परत कुठे भेटून नका.

PhDलिहा ओ
PHD कुठून आली
:डोकं बडवणारी बाहुली:
(वेमा कृपया ही बाहुली समाविष्ट करा अश्या लेखांसाठी नितांत आवश्यकता आहे)

शुद्ध लेखक Rofl वाचून तर बेशुद्ध व्हायची पाळी आली

Pages