कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि हो, कट्टर शिवसैनिक तर आधीपासूनच भाजपशी युती न्को म्हणून बोंबा मारत होते. ते तर मनोमन सुखावले असतील Happy. >>

त्यातले किती कट्टर शिवसैनिक काँग्रेसशी वा राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करूया असं म्हणत होते?

त्यातले किती कट्टर शिवसैनिक काँग्रेसशी वा राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करूया असं म्हणत होते?
>>>>>

असं थेट कोणी म्हणत नाही ओ. पण जेव्हा दोन उपल्ब्ध पर्यायांपैकी एक नको तेव्हा दुसरा चालेल वा परवडेल असाच अर्थ घ्यायचा असतो.

असं थेट कोणी म्हणत नाही ओ. पण जेव्हा दोन उपल्ब्ध पर्यायांपैकी एक नको तेव्हा दुसरा चालेल वा परवडेल असाच अर्थ घ्यायचा असतो.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2019 - 15:25 >>>

असं व्हय ? बरं बरं

असंच असावे. मी काही तज्ञ नाही. पण सत्ता नसली तरी चालेल हा सूर सोशलसाईटवरच्य भावनिक समर्थकांचा असतो. वरचे नेते असा विचार कधी नाही करत. उलट सत्ता कशी मिळवावी ईथूनच त्यांचा विचार् सुरू होतो.

प्रसंग पहिला :
मागील पाच वर्षांमध्ये भाजपाने सगळ्या असंवैधानिक आणि अनैतिक मार्गांचा वापर करून कर्नाटक, गोवा, बिहार, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हरियाणा, मणिपूर, मेघालय अशा विविध राज्यांमध्ये सत्ता मिळवली, किंवा तसा प्रयत्न केला.

त्यावर 'तटस्थ' विचारवंतांची प्रतिक्रिया :
सब चंगा सी
एलम सौकियाम
शोब खुब भालो
सबू भालाछी
अन्ता बागुंदी
यल्ला चेन्नागिडे
सर्व छान चालले आहे

प्रसंग दुसरा :
महाराष्ट्रात भाजपाला त्यांच्याच भाषेत उत्तर मिळत आहे.

यावर 'तटस्थ' विचारवंतांची प्रतिक्रिया :
शिवसेना-राष्ट्रवादी-कॉन्ग्रेस हे सगळे मिळून जनमताचा अनादर करत आहेत.
हा सगळा प्रकार अतिशय निंदनीय आहे.
किळसवाणे आहे हे सगळे.
लाज वाटायला पाहिजे या पक्षांना.
लोकशाहीचा मर्डर होत आहे दिवसाढवळ्या.
हे देवा, सुबुद्धी दे रे या सगळ्यांना.

- Whatsp fwd

गंमत म्हणजे दोन दिवसापूर्वी एक ऊद्धव (सेना) फक्त सत्ता हवी म्हणून अडून बसले होते तर बाकी सर्व विरोधात बसायला भांडत होते.
आता तिकडी सत्तेत यायला ऊत्सुक आहे. ठीकच आहे, शेवटी सत्ताकारणात ज्याच्याकडे संख्याबळ आहे तोच बाहुबली. आणि त्याचेच शासन. ईथे 'महासेना' आता गादीवर आली़ आहे (जवळ जवळ!).. तीचे वचन हेच तीचे शासन! Proud
आता काही प्रश्ण ऊद्भवतातः
१. आज तागायत निव्वळ सत्ताधारी पक्षावर आगपाखड करणे (मित्र पक्षा सकट) आणि सामना मधून सत्ताधार्‍यांवर गरळ ओकणे एव्ह्डाच अनुभव असलेली सेना सत्तेत आल्यावर काय करेल?
२. आता सामना कसा 'चालेल'? Wink
३. 'गर्व से कहो हम हिंदु है ' याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणातून कायमचा लावला आहे त्यामूळे आता तो समान धागा ऊरलेला नाही. तेव्हा भाजपा अन सेना यांचेकडे भविष्यातील युती साठी कॉमन असे फारसे काही ऊरलेले नाही.
४. पुढील सर्व निवडणूका आता भाजप व सेना वेग वगेळे लढतील.. ज्यात अर्थातच महा च्या बाहेर सेने चे अस्तित्व शून्य आहे आणि पुढील लोकसभा निवड्णूक जिंकायला भाजपा ला महा चे आव्हान मोठे असेल.
५. माननीय बाळासाहेबांसाठी मॅडम चा कॉंग्रेस, पवारांचा पक्ष, हे 'अनटचेबल्स' होते... आता मात्र सेने चा हा राजकीय पुनर्जन्म ठरेल का अत्मघातकी डाव हे येणार्‍या काळातच सिध्द होईल. तसेच, सेक्युलर फोर्सेस ना दूर ठेवणे म्हणून हयात घालवलेली काँ. कंपनी आता सेने ला पाठींबा देणार हे म्हणजे काँ चा पुनर्जन्म आहे.
६. नरेंद्र नंतर देवेंद्र ही हवा आता फार काळ टिकणार नाही.. त्यातही भाजपा ने पक्षातील वरीष्ट व अनुभवीं ना दिलेली वागणूक पाहता महा भाजपा मध्ये तरी पुन्हा एक्दा पुढील नेत्रूत्व धुरा कुणाकडे असेल?
७. तीन तिघाडा काम बिघाडा ही जुनी म्हण आहे.. हे तिकडीचे सरकार चालवताना मा. ऊध्दव जीं चा मनमोहन होणार की काय? एके काळी सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती घेऊन राजकीय सूत्रे हालवणार्‍या बाळासाहेबांच्या सेनेवर आता मॅडम, युवराज अन साहेबांच्या हातातले बाहुले होण्याची वेळ आली/येणार का? तिथेही तिकडी कटपुतली.
८. राज्याच्या विकासाचा गाडा धोरणात्मक अन सुनियंत्रीत पध्दतीने हाकण्याचा शून्य अनुभव व ईतीहास असलेल्या महासेनेचे सरकार येत्या काळात राज्यातील अनेक मुलभूत व ज्वलंत प्रश्णांवर काय तोडगा काढू शकेल?
९. निदान या निमित्ताने, भाजपा चा अहंकार व माज ऊतरून पुन्हा जमिनीवर राहून काम करतील अशी शक्यता आहे?
१०. राष्ट्रपती राजवट का फेरनिवडणूका? याचे ऊत्तर पुढील २४ तासात वा एका आठवड्यात मिळेल बहुतेक. बहुदा सत्ता स्थापन दावा करून मग नंतर फ्लोअर टेस्ट... ! पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

बाकी, ऊध्दव ठाकरे सध्या दोन रनर घेऊन बॅटींग करायला ऊभे आहेत.. थोडक्यात दोन्ही बाजूने रन आ ऊ ट होण्याची शक्यता आहे... हेही कधी झालेले नाही... पण क्रिकेट, बॉलिवूड व राजकारणात काहिही होऊ शकते! वाट बघुयात.. Proud
एक मात्र नक्की, शेतकर्‍यांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत (what a joke!) असे कारण पुढे करून आता खिरापत वाटपाला सुरुवात होईल.. कारखानदार, सहकारी बॅंका, पतपेढ्या, ई. सर्वांना पुन्हा सुगीचे दिवस येणार.. मध्यम वर्गाने ऊगाच अपेक्षा ठेउ नयेत. middle class is always in the middle.. यांचा वाली कुणिही नसतो.

जय लोकशाही!

आता लवकरच शिवसेना-कॉन्ग्रेस-रा. कॉन्ग्रेस यान्चे सरकार व प्रत्येकी दिड वर्षं काम करणारे मुख्यमन्त्री बघण्याची आतुरता आहे...

टरबुज्याला सतत ५ वर्षं बघण्यापेक्षा दीड दीड वर्षं नवनवीन सीएम बघणं केव्हाही चांगलंच..!!

संजय राऊत यांना हॉस्पिटल मधे हलवलंय अशी बातमी आहे. ती खरी आहे का?

नवीन Submitted by शाम भागवत on 11 November, 2019 - 18:33
>>>>>>>>
हो, त्यांना अँजिओप्लास्टी करण्याची शक्यता आहे.
लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय.

८. राज्याच्या विकासाचा गाडा धोरणात्मक अन सुनियंत्रीत पध्दतीने हाकण्याचा शून्य अनुभव व ईतीहास असलेल्या महासेनेचे सरकार येत्या काळात राज्यातील अनेक मुलभूत व ज्वलंत प्रश्णांवर काय तोडगा काढू शकेल? >> Lol जणू काही फडण२० ना खूप अनुभव होता आणि गेल्या ५ वर्षात कुठली धोरणं सुनियंत्रित पध्दतीनं (अहंकारानं) हाकलीत ते दिसतंय.. तुम्हीच म्हटलंय "निदान या निमित्ताने, भाजपा चा अहंकार व माज ऊतरून पुन्हा जमिनीवर राहून काम करतील अशी शक्यता आहे?"

लाडक्या पक्षाला सत्ता मिळत नाही म्हटल्यावर किती तो जळफळाट..

<१. आज तागायत निव्वळ सत्ताधारी पक्षावर आगपाखड करणे (मित्र पक्षा सकट) आणि सामना मधून सत्ताधार्‍यांवर गरळ ओकणे एव्ह्डाच अनुभव असलेली सेना सत्तेत आल्यावर काय करेल?>

२०१४ साली जन्माला आलेल्या किंवा अक्कल आलेल्या लोकांना मनोहर जोशी, नारायण राणे ही नावं माहीत असणं शक्य नाही.

< राज्याच्या विकासाचा गाडा धोरणात्मक अन सुनियंत्रीत पध्दतीने हाकण्याचा शून्य अनुभव व ईतीहास असलेल्या महासेनेचे सरकार येत्या काळात राज्यातील अनेक मुलभूत व ज्वलंत प्रश्णांवर काय तोडगा काढू शकेल?>
फडण२.० नी नक्की काय तोडगे काढले?

शिवसेना भाजपचा सर्वात जुना सहयोगी पक्ष. आज वेगळा झाला.
गेल्या वर्षी दसर्‍याला उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुका एकट्याने लढवू अशी घोषणा केली होती.
ती अंमलात आणली नाही. पण 'हीच ती वेळ' निवडली.
ते नितिश कुमार होतात की कुमारस्वामी ते कळेलच.

यांचे लुटूपुटूचे सरकार पडले, सगळ्या हौश्यागौश्यांची हौस फिटली की फडणवीस परत येणार
आत्ता सुद्धा शिवसेनेने तुणतुणे लावले होतेच की अमित शहांना बोलवा, गडकरींना मध्ये घ्या, वगैरे वगैरे पण शीर्षस्थ नेत्यांचा फडणवीसांवर विश्वास आहे असेच दिसले!

>>दोन रनर घेऊन बॅटींग<<
अगदी अगदी!
रनर पण कसले तर समोरच्याला रनआउट करण्यात हातखंडा असलेले.... आणि फिल्डींगला केंद्रात भाजपा आणि राज्यात विरोधी बाकांवर फडणवीस
आता फक्त मॅगी... just in two minutes!
मजा बघायची Proud

ऊप्स. फडणवीस विरोधी पक्षनेता ठरवणार होते. तोही वंचित आघाडीचा.
आता ते स्वतःच (पुन्हा ) विरोधी पक्षनेते होणार.

मी पुन्हा येईन! #

जे घडत आहे ते योग्य च घडत आहे .
Bjp नी सेनेला नेहमीच कमी महत्वाची खाती दिली आहेत.
नावाला फक्त युती सरकार पण पूर्ण वर्चस्व bjp चे.
Bjp ल धक्का देणे गरजेचं होते आणि तो सैनेनी दिला .
आता देशातील बाकी राज्यात सुद्धा bjp ला धक्के बसत जातील.

ओ १८८,
परवापरवापर्यंत "युती"च येणार म्हणून सगळीकडे पोस्टत होता की.... आता काय झाले?

नवीन Submitted by खरा पुणेकर on 11 November, 2019 - 19:34

त्यांची मते सकाळ संध्याकाळ दरम्यान दोन वेगवेगळ्या टोकांना दोलायमान होत असतात...

टरबुज्याला सतत ५ वर्षं बघण्यापेक्षा दीड दीड वर्षं नवनवीन सीएम बघणं केव्हाही चांगलंच..!!

Submitted by DJ.. on 11 November, 2019 - 18:13. >>>

अर्थात सगळीकडे ज्याना मनोरंजनाची साधने हवी व डेली सोप सारखा राज्याचा कारभार चालावा असे ज्याना वाटते ,त्यांचे मनोगत वरीलप्रमाणेच असेल...

राज्यपालांनी बहुधा वेळ संपल्याने दारं बंद करून घेतलीत.
असं खरंच झालं असेल तर इथेही कर्नाटकसारखं प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयाकडे जावं लागेल.

आत्ताच आलेल्या गोपनीय माहितीनुसार, जेव्हा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मिटिंगसाठी खोलीत प्रवेश केला तेव्हा सोनिया, राहुल आणि शरद पवार जोरजोरात हसायला लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते शिवसेनेला पाठिंबा देतील पण त्यासाठी उद्धव ठाकरे यांना सिंघम गाण्यावर पंजा हालवत डान्स करायला लागेल.

Pages