कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ब्लॅक कॅट
तैमूर शी काय संबंध आहे .
तैमूर हा विदेश आक्रमक होता .
ब्लॅक कॅट तुमचे नागरिकत्व भारतीय आहे की अफगाणी,इराणी,पाकिस्तानी आहे.
शंका येतेय

हाहा शिवसेना काँग्रेस राकॉ एकत्र येऊन सरकार बनवतील तर बेस्ट काम होऊन जाईल.

चंपा मंत्री होणार नाही, फक्त आमदारपदावर समाधान मानावं लागेल. भाजप मेगाभरतीवाले कदाचित स्वगृही परततील.

बाकी आपल्या महाराष्ट्राच्या पॉवर कपलला काय- सत्ता आहे की नाही याने फरक पडणार नाही. बॉलिवुडमध्ये मिरवायला भेटल्याशी कारण. त्या आधीच्या एका मुझिक विडियोमुळे भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. आता टिकटॉकचे व्यासपीठ तुमची वाट बघत आहे. बिग बॉस मराठीत जाता येणार नाही कारण तिथे गप्पा मरुन चालत नाही, गप्पा जिवंत ठेवून रोज मराठीत गप्पागोष्टी कराव्या लागतात. पण हिंदी बिग बॉस सुरु आहेच.

राजुभाऊ , ती दुसऱ्या महायुद्धतील घटना आहे,
सहज आठवली.

तुम्ही नका टेन्शन घेऊ

>>>>>रशियाने कुणाचे तरी थडगे उकरले होते, मग त्यांची महायुद्धात पीछेहाट झाली <<<<<
बाबरी मस्जिद पाडली मग भारत कारगील जिंकला !!!
आता थडगी तोडायला हरकत नाही . ..... काय फरक पडत नाय !!

आजच माझ्या कट्टर शिवसैनिक भावाने एक डायलॉग मारला.
"काँग्रेसचा पाठिंबा घेतला किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर पुढच्या वेळी माझे मत शिवसेनेला नाही">>
म्हणजे तो शिवसैनिक नाही आणि कट्टर तर बिलकुल नाही. बर्णाल विकत घे भौ.

पवार साहेब म्हणतायत सेनेकडुन अजुन प्रस्ताव आलेला नाहि, म्हणजे आला तर स्वागत आहे. अशोक चव्हाण म्हणतायत कॉग्रेसचा एक गट सेनेला पाठिंबा द्यायच्या मताचा आहे. याचा अर्थ आता तिन पायांची शर्यत सुरु होणार. भाजपाच्या तोंडचा घास पळवण्याची संधी राकाँ+काँ अशी सहजा-सहजी जाऊ देतील असं वाटत नाहि. भाजपाच्या तोंडाला पानं पुसल्यातंच जमा आहे...

तैमुर काकांचा शाप मस्त भानगड आहे!! तलवारीच्या जोरावरच जग अन भाग्य बदलता येतं!

हतो वा प्राप्यसी स्वर्गम असलं आमचं पब्लिक फक्त गीता पाठांतरातच म्हणत Lol

बर्णाल विकत घे भौ.

नवीन Submitted by Filmy on 10 November, 2019 - 21:01 >>>

मी कशाला घेऊ, आता शिवसैनिकांनाच त्याची रोज रोज गरज पडणार. काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यावर रोज विष पिऊन पिऊन जळजळ होणार ना..

निकाला नंतर फडणविसांचा जवळ-जवळ "खडसे" (बिगमाउथ) झाला होता. मीच मुमं होणार, मीच मुमं होणार याचा घोष लावत होते. दुसरा एखादा मुत्सद्दि नेता असता तर त्याने हि सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली असती. यापुढे त्यांना बेंचवर ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको...

पक्षांची निष्टा तत्वांशी नाही.
लोकांनी का पक्ष बघून मतदान करावे.
एक तर करूच नये किंवा स्थानिक प्रश्न जो अग्रक्रमाने सोडवतो त्याला करावे .
पक्ष हा प्रकारच नेस्तनाबूत करावा.
हे लोकांनाच करावे लागणार आहे..
हिंदू वादी पक्षाला पाठिंबा देण्यास काँग्रेस ,राष्ट्रवादी ल लाज वाटत नाही.
आणि हिंदू द्वेष करणाऱ्या(कथित)
पक्षांचा पाठिंबा घेण्या पर्यंत सेना बेशरम झाली आहे.
लोकांना काय मूर्ख समजत आहेत का हे सर्व राजकीय पक्ष

हरयाणात चौतालासोबत आणि काश्मीरात मेहबूबा मुफ्तीसोबत अमृतपानच चालू आहे/ होतं की.

नवीन Submitted by भरत. on 10 November, 2019 - 21:09. >>>

मुफ्तीबरोबर सरकार चालवून , स्वताला हवी तशी पॉलिसी (दहशतवाद्यांना संपवणे/ pallet gun वापरून दगडफेक्याना जरब बसवणे वगैरे) राबवून मग राष्ट्रपती राजवट लावून ३७० च्या नख्या काढून takane वगैरे भाजपने मस्त केलं. काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स काय होतंय तेही समजू शकले नाहीत...

उदाहरणं देताना तरी जरा विचार करत जा भावा.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस नी विरोधी बसणे गृहीत
धरले आहे.
आता सेनेला फाट्यावर मारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील
100 च्या वर आमदार आहेत .
झक मारत सेना पाठिंबा देईल.
नाही दिला तरी राष्ट्रवादी,काँग्रेस तोट्यात जाणार नाहीत

>>> निकाला नंतर फडणविसांचा जवळ-जवळ "खडसे" (बिगमाउथ) झाला होता. मीच मुमं होणार, मीच मुमं होणार याचा घोष लावत होते. दुसरा एखादा मुत्सद्दि नेता असता तर त्याने हि सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली असती. यापुढे त्यांना बेंचवर ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको... >>>

शक्य आहे

>>> मुफ्तीबरोबर सरकार चालवून , स्वताला हवी तशी पॉलिसी (दहशतवाद्यांना संपवणे/ pallet gun वापरून दगडफेक्याना जरब बसवणे वगैरे) राबवून मग राष्ट्रपती राजवट लावून ३७० च्या नख्या काढून takane वगैरे भाजपने मस्त केलं. काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स काय होतंय तेही समजू शकले नाहीत... >>>

+ ७८६

जमतंय bjp ला
पण डावपेच कसे करायचे ते.

भरत
शिवसेना धडा शिकली
नाही आता शिवसेनेला
धडा शिकवला जाईल.
पारंपरिक मराठी मतदार पण
सेने पासून लांब जाईल

सध्याची राजकिय परिस्थिती. -
सेना = विन/लुझ
भाजपा = लुझ्/लुझ
राकाँ = विन्/विन
काँ = विन्/विन

शक्यता -
१. सेना+काँ+राकाँ सरकार स्थापन करणार. पाठिंबा आतुन्/बाहेरुन हा मुद्दा गौण. सेना/काँ/राकाँ/भाजपा = विन्/विन्/विन/लुझ
२. कोणताहि पक्ष सरकार स्थापन करण्याला असमर्थ. फेरनिवडणुक अटळ, आणि त्यात सेना/भाजपा या दोन्हि पक्षांचं पानिपत. सेना/काँ/राकाँ/भाजपा = लुझ्/विन्/विन/लुझ...

पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजप साधारणपणे 1३५ जागा जिंकेल आणि अपक्षांना हाताशी धरून सरकार बनवेल. पारंपारिक मतदारांची उदासीनता आणि भाजपच जिंकेल अशी केली गेलेली हवा, ह्यामुळे बरेच भाजप मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाहीत.

>>> सध्याची राजकिय परिस्थिती. -
सेना = विन/लुझ
भाजपा = लुझ्/लुझ
राकाँ = विन्/विन
काँ = विन्/विन

शक्यता -
१. सेना+काँ+राकाँ सरकार स्थापन करणार. पाठिंबा आतुन्/बाहेरुन हा मुद्दा गौण. सेना/काँ/राकाँ/भाजपा = विन्/विन्/विन/लुझ
२. कोणताहि पक्ष सरकार स्थापन करण्याला असमर्थ. फेरनिवडणुक अटळ, आणि त्यात सेना/भाजपा या दोन्हि पक्षांचं पानिपत. सेना/काँ/राकाँ/भाजपा = लुझ्/विन्/विन/लुझ... >>>

Perfect analysis

फडणवीसच पुन्हा ५ वर्षे मुख्यमंत्री झाले असते तर सलग दहा वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री.
सेना भाजप युतीत भले सेना सध्या छोटा भाऊ असेल, पण या दहा वर्षानंतर ते छोटाच वा त्यापेक्षाही छोटा बनून राहिले असते. किंबहुना भाजपने पुढच्या वेळी सेनेची गरजच पडणार नाही यासाठी आणखी प्रयत्न केले असते.
सेनेला आताच काय ती रिस्क घेत स्वताची ओळख स्वताचे अस्तित्व शाबूत ठेवायला मुख्यमंत्रीपदाची गरज होती. काही कामे करतील तर ती दाखवतील. किंवा प्रत्यक्षात न करता आभास निर्माण केले तरी पुरे पण त्यासाठी सत्ता हवीच. युतीत ते असून नसल्यासारखेच होते. फडणवीस आणि भाजपचेच सरकार असल्यासारखे होते. फडणवीस जेव्हा म्हणत होते की मी पुन्हा येईन तेव्हा यात सेना कुठे नव्हतीच Happy

आणि हो, कट्टर शिवसैनिक तर आधीपासूनच भाजपशी युती न्को म्हणून बोंबा मारत होते. ते तर मनोमन सुखावले असतील Happy

मला सेनेची खेळी योग्य वाटते.
पवार काँग्रेस समोर त्यांची डाळ शिजणार नाही वगैरे हे नंतरचे.... काळ ठरवेल

निकाला नंतर फडणविसांचा जवळ-जवळ "खडसे" (बिगमाउथ) झाला होता. मीच मुमं होणार, मीच मुमं होणार याचा घोष लावत होते. दुसरा एखादा मुत्सद्दि नेता असता तर त्याने हि सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली असती. यापुढे त्यांना बेंचवर ठेवलं तर आश्चर्य वाटायला नको... >>>
>>
आय डाउट. भरपूर ठिकाणी फडणविस साहेबांनी सिच्युएशन व्यवस्थित हँडल केलीय, शिवाय ग्रामीण भागात जिथं भाजपचा बेस कधीच नव्हता, तिकडं शिरकाव केलाय. त्यामुळं बेंचवर जरा कठीण वाटतं. पक्ष संघटन वगैरे मजबूत करतील अन 2024 ला परत येतील.

बट ह्यावेळी, खडसे साहेब निवांत हसत असतील!! सध्या त्यांचा अंतर्गत शत्रू तोट्यात गेलाय ;-

तांत्रिक दृष्ट्या योग्य वाटत आहे.
राजकारण मध्ये संधीचा फायदा घेणे योग्य आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सुधा संधीचा फायदा घेतील त्यात बळी सेनेचा पडू नये.
मतदार तयार करावे लागतात.
प्रत्येक पक्षाची बोट बँक आहे.
तशी सेनेची पण आहे .
पण भागीदारी मध्ये

युती न्को म्हणून बोंबा मारत होते. ते तर मनोमन सुखावले असतील
>>

ठाकरे साहेब किना अजून कोणी भाजप्यानी युती तोडल्याच जाहीर केलेलं नाहीये, कदाचित फायदे तोटे गणित सुरू असेल!

बाय द वे, बीएमसी मध्ये काँग्रेसचा सपोर्ट मिळाला तर बीएमसीही शाबूत राहील.

SS नो दाउट प्लेइंग व्हेरी नाईस गेम!

Pages