कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बोकलतला करुन टाका मुख्यमंत्री. तसेही त्याने सुचवलेच होते की. भाजप सत्तेत येणार नसेल तर असा विनोदी स्वभावाचा मुख्यमंत्री नक्कीच चालेल. विनोदी दिसणारा सुमीचा नवरा नको हं !
Submitted by रश्मी.. on 9 November, 2019 - 19:46
<<

हा प्रस्ताव घेऊन तुम्हाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे जायला हवे कारण तेच सध्या किंगमेकर आहेत. Happy

मला वाटतं शिवसेना मुरलेल्या राजकारणी लोकांच्या davpechachi बळी ठरेल
उघड पने विरोध करून सेना हिरो न बनता व्हिलान बनत आहे.
Bjp गप्प बसून साव ठरतेय.
पवार साहेबांना हेच पाहिजे होते.
आता सेना संपेल हे नक्की.
सामान्य लोकांच्या बुध्दी नुसार शिवसेना दोषी आहे

सामान्य लोकांच्या बुध्दी नुसार शिवसेना दोषी आहे.... हे लोक म्हणजे भाजपचे समर्थक. सगळेच त्यात येत नाहीत.

इथे मोदी हा फॅक्टर च नाही.
हा महाराष्ट्र आहे.
Bjp हिंदू वादी (डावे,कम्युनिस्ट,) ह्या लोकांची नीच मनोवृत्ती.
काँग्रेस समर्धक.
म्हणून ही हिंदू एकवटले .
बहुजन म्हणून ज्याला म्हणतात तो हिंदूच आहे .
तो पण देव देवतांची नालस्ती सहन न झाल्या मुळे सेना,bjp कडे झुकला .
आयुष्यात प्रथम च शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले .
पण bjp हा आपल्या जाळ्यात येणार नाही हे पक्के ठावूक असलेल्या ठग लोकांनी सेनेला जाळ्यात ओढले .
अपरिपक्व नेतर्तुव फसले .
आणि एका दगडात दोन शिकार झाले

सेनेला जाळ्यात ओढले ?

सेना म्हणते फडणीस खोटारडा अन ते बोलतात हे खोटारडे,

हे जाळे सोनियांनी रचले की राहुल गांधीने ?

विचार करा आणि ठरवा.

दोन पक्ष्यांची शिकार म्हणजे.
सेना संपेल.
आणि युती तुटेल .
हे नक्की.
ह्यात bjp सामील असणार त्यानं गप्प बसणे घट कत आहे.
Bjp ला आता लोढणे नको आहे .

आणि राज ठाकरे.
Bjp,काँग्रेस,राष्ट्रवादी
ह्या सर्व पक्षांचे लाडके होतील.
त्यानं सत्ता नकोच आहे .
फक्त satte मधीला मलिदा दिला म्हणजे झाले.
उध्दव ठाकरे च नेतृत्व खूपच बालिश आहे.

उध्दव ठाकरे च नेतृत्व खूपच बालिश आहे... अशा बालिश माणसा बरोबर युती का केली मग? तीही लोकसभेत एव्हड प्रचंड बहुमत असतानाही.

भारताला नवीन मंदीर, मशीद, चर्च, गुरुूद्वारांची गरज नाही.

- तिहार तुरूंग निवासी चिदू

मंदीराच्या बाजूने निकाल लागल्याने कॉंग्रेसींची मूळव्याध परत ठसठसायला लागली आहे.

https://www.indiatoday.in/india/story/ayodhya-ram-mandir-babri-masjid-ve...

मोदी नी थोडक्या मध्ये
योग्य स्टेट ment दिली आहे.
देश प्रगती पथावर नेन्हे गरजेचं.
मंदिर ,मशीद मध्ये हिंदू आणि मुस्लिम ह्यांना रस नाही .
दोन्ही धर्मातील गुंड सोडले तर.

सेना संपणार नाहि. सेनेला संपवणारे (भुजबळ, राणे) जवळ-जवळ संपल्यात जमा आहेत. राज्यपालांच्या विनंतीला मान देऊन, सेनेला डावलुन सत्ता स्थापन करायचा प्रयत्न भाजपाने केला तर त्यांना राजकारणाचे धडे बिगरी पासुन गिरवण्याची आवश्यकता अहे; कारण पुढे गाठ पवार साहेबांशी पडणार आहे. अमित शाह जेंव्हा हाफपँटित होते तेंव्हा पवार साहेबांनी राजकारणात धोबीपछाड टाकलेले आहेत...

भाजपाच्या नेतेमंडळीत खरंच कोणि चाणक्य निती जाणंत असेल तर ते सत्तेवर दावा करणार नाहित...

अमित शाह जेंव्हा हाफपँटित होते तेंव्हा पवार साहेबांनी राजकारणात धोबीपछाड टाकलेले आहेत... >> ते धोबी पछाड टाकतात पण कोणाला टाकला आहे ते टाकून झाल्यावर, टाकला एकाला आणि आपटी दुसर्‍याला असे झाल्याशिवाय कळत नाही.
Wait until you see the entire NCP fleet of MLAs missing from the dance floor on the day of the trust vote.
शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यापेक्षा simultaneously अल्पमतातले भाजप सरकार राज्यात खेळवणे आणि तो leverage वापरून केंद्रात सोंगटी हलवण्याचा मास्टर स्ट्रोक ते खेळू शकतात.
तेव्हा खरा धोबीपछाड भाजपला घालून आपटी शिवसेनेला मिळेल Lol

पवारांनी बाहेर पडून महाराष्ट्रात कां संपवली. दिल्लीच्या तख्तासमोर नाचावे लागायला नको म्हणून. तो चांगला निर्णय होता. आतापर्यंत हे कुणाला जमले नव्हते.
परंतू त्यांनी कां पक्षामधलाच एक मतदार गठ्ठा आपल्याकडे वळवला. बाहेरच्या/दुसऱ्या पक्षातले ( सेना/भाज/) मतदार वळवण्यासाठी काही विशेष धोरण अवलंबले नाही.

खरा धोबीपछाड

सध्या भाजपचं सरकार तारणे आणि बदल्यात आपल्या पक्षाला बळकटी आणणे एवढाच हेतू पवारांचा आहे. यात सेना रिंगणाबाहेर फेकली जाणार आहे पण तो उद्देश नाही.

सेनेने अगदीच मूर्खपणा केला, त्यात राऊत बरळणे म्हणजे हाईट. थोडे दिवस ताणणे ठीक पण एवढं. त्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद घ्यायचे, मुलाला अनुभव घेऊ द्यायचा, चांगला वाटला लोकांना तर होईल पुढे कधीतरी मुख्यमंत्री, त्यापेक्षा अधिक मंत्रीपदे घ्यायची होती. अमित शहा पण नाही आले इथे, ते आले असते तर झालं असते बहुतेक असं. आता सेना सर्वच घालवणार एकंदरीत.

राऊतलाच पुढे करतात मग काय, आहे तेही जाणार. कोणी चांगला सल्लागार नाही का, मागे प्रशांत किशोर होते ना.

मुख्यमंत्री फडणवीस झालेलेच आवडतील मला personally.

त्रिशंकूच्या पोस्टमध्ये असलेली कोटी सुहास नाडगौडा यांची आहे .
त्यांच्या फेसबुकवरील टाइमलाईनवर पाहायला मिळेल

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3235329426540755&id=10000191...

बोकलतला करुन टाका मुख्यमंत्री. >>> मी खरोखरच मुख्यमंत्री झालो होतो. शपथविधी घेताना सगळे माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. मोदीजी माझी पाठ थोपटत होते. सगळे माझ्याकडे आशेने पाहत होते. आता बोकलत आपल्याला संकटातून बाहेर काढणार, रोजगार उपलब्ध करणार. कंपनीचा बॉस चेहऱ्यावर उसनं हसू आणून मला मिठाई भरवत होता. गावा गावात लोकं एकमेकांना पेढे भरवत होते. मायबोलीवरच्या सगळ्यांना वर्षावर पार्टीसाठी बोलावलं होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. चक्क ट्रम्प तात्या माझ्या भेटीला आमच्या छोट्याशा गावात आले होते. बायकोला बोललो मस्त चहा ठेव. तर बायको बोलली दूध संपलंय जा आणि घेऊन या. मी बोललो कोणालातरी पाठव, पण "दूध संपलंय घेऊन या" हा आवाज वारंवार माझ्या कानावर पडतच राहिला शेवटी सगळं असह्य झालं आणि डोळे उघडले, एका गोड स्वप्नाच्या आठवणींनी गालातल्या गालात हसू आणलं आणि मी ब्रश करून दूध आणायला बाहेर पडलो.

आता देवरा यांनी शिवसेनेला, आघाडीलाच तुम्ही पाठींबा द्या असं सांगितल आहे. भाजप करणार नसेल स्थापन सरकार तर आघाडी म्हणून आम्ही दुसरे आहोत, आम्ही स्थापन करू.

त्यामुळे शिवसेनेचे एकंदरीत काही खरं नाहीये. आघाडी थोडीच मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार, राष्ट्रवादीचा होईल.

आता पोस्टर्स लागली आहेत उद्धव मुख्यमंत्री, tv वर दाखवत होते.

Pages