कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

युतीचं यावे असे अजुन मत आहे कारण जनादेश तसाच आहे

पण bjp वर अंकुश असावा म्हणून सेनेला महत्वाची खाती देणे गरजेचं आहे
वरच्या पोस्ट मध्ये मी bjp ची नीती सांगितली आहे त्या मुळे.
मोठ मोठी दिसणारी उदाहरणे जरी अभ्यासली तरी लक्षात येईल की विरोधी लोकांच्या लोकप्रतिनिधी ची ताकत कमी करण्यासाठी जनतेचे नुकसान करण्यात bjp कुचराई केली नाही..
पश्चिम महाराष्ट्र हा सहकारी संस्थेचा गड आहे.
त्या मार्फत पश्चिम महाराष्ट्र ची अर्थव्यवस्था चालते.
सहकारी बँका,सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध उत्पादक संघ,आणि बागायती शेती हे पश्चिम महाराष्ट्र ची विकासाची इंजिन आहेत.
त्या सर्व संस्थेची पद्धतशीर वाट bjp नी लावली
शेतीला वीजपुरवठा देणे बंद केले(नवीन कनेक्शन) आणि सौर ऊर्जेचा पर्याय वापर करावा म्हणून जबरदस्ती चालू केली.
त्या साठी 2 ते 2.5 लाखाची investment करावी लागते.
पाणी खेचणारे पंप शेतात गावा पासून लांब असतात तिथे सौर panel सुरक्षित राहू शकत नाहीत तोडफोड होवू शकते
.
मुळात तो पर्यात व्यवहारिक दृष्ट फायद्याचा नाही त्या मुळे लोकांची अडवणूक होवून शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना धोक्यात आल्या.
सौर ऊर्जा वर चालणारे पंप बसवणाऱ्या कंपन्या पण ह्यांच्याच.
नोट बंदी मध्ये सहकारी बँकांना नोट बदलून देण्यास प्रतिबंध केला त्या मुळे त्या बँकांना धंधा करणे अवघड झाले.
अनेक बंधने आणून सहकारी बँकांची मुस्कटदाबी ह्याच bjp नी केली .
अशी खूप उदाहरणे आहेत फक्त आपण डोळे उघडे ठेवून तिकडे बघितलं पाहिजे
जाहिराती ना फसून मत बनवणे सोडलं पाहिजे

त्या मुळे आताच्या घडामोडी मुळे सेना संपेल,राष्ट्रवादी संपेल काँग्रेस संपेल .
तर अस काही होणार नाही .
सैरावैरा धावयला bjp ला मोकळे रान महाराष्ट्रात मध्ये कधीच मिळणार नाही.
नियंत्रित सत्ता मिळू शकते

आता झारखंड,

तिथलेही पार्टनर सोडून चाललेत म्हणे

अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
अरे कुठे नेऊन ठेवलाय मुख्यमंत्री माझा

220

भाजपा सेनेला ऑफर देतेय? Lol तेही राउतची भेट घेऊन?
आणि
>>सेना आणि राऊत हेडक्वार्टर झाले आहे..<<
आर यु किडींग?

___

मी सकाळपासून सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. राऊत यांना सकाळीच सकाळी उगाच एकापाठोपाठ एक एकूण एक पक्षाचे नेते भेटून नाही गेले. आज ईथून काय घडणार आहे याची सुरुवात लीलावतीमधील आज सकाळच्या सत्राने चालू झाली आहे.

असो
बहुधा लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होतेय.

कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव आहे ? icu मध्ये फोने पण चालत नाही,रक्तात ब्लॉक असल्यावर मांडी पण घालून देत नाही आणि एक आठवडा विश्रांती घ्यायचीच लागते हे संपादकीय कसे लिहितात

बांगला देश,पाकिस्तान,भारत एकच कॅटोगरी चे देश आहेत
राज्यकर्ते आणि लोक सुसंस्कृत होईपर्यंत लोकशाही राजवट स्वीकारायला नको होती.
राजेशाही उत्तम होती.
चांगले संस्कारी राजे तरी सत्तेवर असते इथे

सेनेने राज्यपालांनाच कोर्टात खेचलेय.
राष्ट्रवादीने सेनेला २.५ वर्षे मुख्यमंत्र्याची ऑफर दिली आहे.
हे पाहून भाज्पाही सेनेशी संपर्क साधत आहेत.

राष्ट्रपती राजवट लागू झाली मग आता मुख्यमंत्री,राज्यमंत्री इ. ही महत्वाची पदे आधीचे लोक सांभाळतील की कोणीच नसणार या पदांवर.

लेटेस्ट ...

कॉ आणी राष्ट्रवादींनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय, पत्रकार परीषद चालु आहे.

रात्री साडे आठपर्यंत मुदत आहे शिवसेनेला. मु पद वाटुन घ्यायचा प्रस्ताव रा कॉ ने ठेवलाय. आता उठा आणी आठा काय करतात बघु. मग ते अपला उम करतील सध्या. मग उठा/ आठाचा कार्यकाल संपला की अप मु होईल. आणी उठा / आठा , उम होतील.

>>>>>>>>>>संजय राऊतांची exclusive दृश्ये
हॉस्पिटलच्या बेडवर बसून संपादकीय लिहीत आहेत.
अचाट आहे हा माणूस.
नुकतेच पवार भेटून गेलेत त्यांना >>>>>>>>>>>>>..

संजय राऊतांनी शेवटी उठाचा राज्याभिषेक केलाच !! आता येणार्या पाच वर्षांत शिवसेना महाराष्ट्राचा कायापालट करणार !

महाराष्ट्राच्या राजभवनात रँप वॉक

१ बिजेपी

२ शिवसेना

३ काँग्रेस

४ राष्ट्रवादी कॉ

आणी अविवाहीत राज्यपाल सगळ्यांना सांगतात की " फिगर दाखवा "

>>>>>>>>>>संजय राऊतांची exclusive दृश्ये
हॉस्पिटलच्या बेडवर बसून संपादकीय लिहीत आहेत.
अचाट आहे हा माणूस.
नुकतेच पवार भेटून गेलेत त्यांना >>>>>>>>>>>>>

..कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव आहे ? icu मध्ये फोने पण चालत नाही,रक्तात ब्लॉक असल्यावर मांडी पण घालून देत नाही आणि एक आठवडा विश्रांती घ्यायचीच लागते हे संपादकीय कसे लिहितात

राष्ट्रपती सर्व राज्याचे मुख्यमंत्री होतील असे एकदाचे जाहीर करा.
लोकशाही धिंडवडे काढू नका
असे पण लोकांना निवडणुकीत मत देण्यास इंटरेस्ट नाही.
ज्यांना आहे त्यांचा सुधा इंटरेस्ट नष्ट कारणे सोडा

टाइम्सऑफ इंडिया.
हा विश्वासू पेपर नाही.
गुजराती आणि मारवाडी लोकांचा बोलका पोपट आहे .
त्या पेक्षा cnbc,bbc हे म्हणतात ते थोडे तरी निःपक्ष असेल

BCC, Al Jazira, New York Times & Washington Post
पुर्ण पणे निःपक्ष !!!

Biggrin

Higlights from online news copy pasted
Sharad Pawar said the two parties will discuss and evolve a consensus on what should be the policies and programs if the Shiv Sena was to be supported
Ahmed Patel said the Shiv Sena, which had contested the elections in alliance with the BJP, approached the Congress-NCP officially only on Monday.

The Shiv Sena petitioned the Supreme Court complaining that the Governor had refused to grant it extra-time even though the BJP was given two days to prove its numbers. Senior lawyer Kapil Sibal, a Congress leader, is representing the Sena, say sources. At a news briefing, Mr Thackeray said the Shiv Sena, NCP and Congress may have different ideologies but they "will find a way to work together".

>>त्या पेक्षा cnbc,bbc हे म्हणतात ते थोडे तरी निःपक्ष असेल
अरे देवा! ईथे युके मध्ये खुद्द BBC वर भयंकर रोष आहे... biased!
असो.. प्रत्येक मिडीया चा बोलवता धनी आहे हे मान्य. म्हणूनच सर्वांच्या बातम्या वाचल्या की जास्त गोंधळ ऊडतो.

गेले काही दिवस सेना चे सरकार कधी येतय/येत नाही म्हणून ते फेमस एबिपी माझा वरचे सर्व अक्षरशः xxx ऊड्या मारत होते... बिजेपी नाही तर कोण आसुरी आनंद झालेला.. आता सेना येत नाही म्हटल्यावर थोडे शमलेत.. ;फिदी:

Pages