मुख्यमंत्री

कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

शब्दखुणा: 

लोकप्रतिनिधींची निषेधार्ह कृत्ये (पक्षनिरपेक्ष)

Submitted by मिर्ची on 31 March, 2015 - 04:40

पाच वर्षांतून एकदा मतं घेऊन गेले की निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात हे सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
भारतात सगळं सुरळित चालू आहे ह्यावर माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास नाही. लोकप्रतिनिधींच्या न पटणार्‍या गोष्टींबद्दल जाब विचारणे ही आपली जबाबदारी आणि हक्क आहे.
इथे कुठल्याही एका पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहिणं अपेक्षित नाही. सर्व पक्ष एकाच तराजूत ठेवून फक्त बातम्या देऊन त्यावर घडलेली गोष्ट योग्य की अयोग्य अशा पद्धतीची चर्चा अपेक्षित आहे.
नम्र विनंती - सर्वांनी अपशब्द टाळून सभ्य भाषेत लिहू या.

Subscribe to RSS - मुख्यमंत्री